Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride मराठमोळा तरुण बाईकवरून पोहोचला थेट लंडनला

मराठमोळ्या तरुणाची मुंबई लंडन मुंबई अशी भन्नाट बाईक राईड Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

 

जगभरात साहसवेडे असणारे लोक आणि त्यांच्या भन्नाट गोष्टी आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. काही जण चालत जग पादाक्रांत करायला निघतात, तर काही जण सायकलीवरून जग प्रवासाला निघतात. असं वेडं साहस करायला निघालेली ही माणसं खरोखरच झपाटलेली असतात. भारतातून देखील अशी बरीच लोकं भारत भ्रमण तसेच जग प्रवासासाठी बाईक वा सायकल वरून निघतात.

भारतात मोटारसायकलची आवड असणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न हमखास असतं, एकदातरी लडाखला बाईकवर जायचं. कोणी हे स्वप्न पूर्ण करतं तर बऱ्याच जणांचं हे स्वप्नच राहतं. पण याहीपुढे जात महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील करांडेवाडी या गावचे ३२ वर्षीय योगेश आलेकरी यांनी मुंबई ते लंडन आणि परत मुंबई अशा भन्नाट प्रवासाची योजना आखली आणि ती नुकतीच पूर्ण देखील केली.

WhatsApp Group Join Now

२७ जुलै २०२३ रोजी मुंबईतुन निघालेले योगेश २७ देशांचा प्रवास करत १८ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत दाखल झाले. १३६ दिवसांच्या या प्रवासात २९ हजार किमीचा प्रवास करत त्यांनी २ खंडांमधील २७ देशांना भेटी दिल्या. हा संपूर्ण प्रवास त्यांनी Royal Enfield Himalayan या मोटरसायकलवर पूर्ण केला. आणि यासोबतच मुंबई-लंडन-मुंबई असा प्रवास करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

युरोप खंडातील या देशांना दिल्या भेटी

योगेश यांनी आशिया आणि युरोप या खंडातून मोटरसायकलवर प्रवास करून विक्रम केला आहे. यादरम्यान ‘सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या दोन महत्वपूर्ण संदेशांचा जगभरात प्रसार करण्याचे काम योगेशने केले आहे.

या बाईक राईडमध्ये योगेश यांनी इराण, तुर्की, ग्रीस, नॉर्थ मॅसिडोनिया, अल्बनिया, माँटेनिग्रो, बॉस्निया, हर्जेगोविना, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्स, यूके, बेल्जियम, लक्संबर्ग, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया, बल्गेरिया, तुर्की, जॉर्जिया, अझरबैजान, अर्मेनिया, इराण, यूएई या देशांना भेटी दिल्या.

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

हे देखील वाचा- Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.

 

लंडन बाईक राईड साठी कागदपत्रे जुळवणी आणि युद्धाचा फटका

या संपूर्ण प्रवासासाठी आणि एवढे देश फिरण्यासाठी, तिथं जायला लागणाऱ्या कागदपत्रांची जुळणी करणं खरंतर अवघड काम, पण योगेश यांनी ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या. ६० दिवस प्रवास केल्यानंतर जेव्हा त्यांना इस्रायल कडे जायचं होतं, नेमकं त्याच काळात हमास आणि इस्रायल यांचं भयंकर युद्ध चालू होतं. त्याचा फटका त्यांनाही बसला आणि इस्रायल कडे न जाता त्यांना आपली मोहीम बदलावी लागली. यासोबतच पाकिस्तानचा व्हिसा मिळत नसल्याने, दुबईवरून विमानाने कोचीन येथे प्रवास करत रस्ते मार्गाने कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, कराड असा प्रवास करून १७ डिसेंबर रोजी ते मुंबईत दाखल झाले.

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

या राईडमध्ये त्यांनी अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बर्न (स्विस) इथल्या आणि निकोला टेस्ला यांच्या सर्बिया मधल्या बेलग्राड शहरातल्या घराला भेट दिली. या दोन गोष्टी माझ्यासाठी खुप महत्त्वाच्या वाटतात असं योगेश आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये नमुद करतात.

बाहेरच्या देशात पुरणपोळी आणि कौतुकाचा वर्षाव

बाहेरच्या एखाद्या देशात घरगुती जेवण मिळणं म्हणजे कमालच, आणि त्यातही चक्क पुरणपोळी खायला मिळणं म्हणजे अवर्णनीय आनंदच म्हणावा लागेल. पण परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांच्या कृपेने योगेश यांना या सर्व गोष्टींचा सुंदर अनुभव घेता आला. योगेश यांनी ज्या ज्या देशांना भेटी दिल्या, त्यापैकी बऱ्याच देशांमध्ये त्यांना भारतीय लोक आणि त्यांच्या मराठी आदरातिथ्याचा अनुभव आला. परदेशात राहत असलेल्या मराठी कुटुंबांनी, मित्रांनी त्यांची खास भेट घेऊन, घरी बोलावून त्यांना मराठी जेवण खाऊ घातलं. परदेशात या गोष्टी होणं म्हणजे निव्वळ कमालच आहे.

त्यांना या प्रवासात विविध देशातील लोकांचे चांगलेच अनुभव आले. एक तरुण हिमालया बाईकला भारताचा झेंडा लावून प्रवास करतोय हे त्यांच्यासाठीही अचंबित करणारं होतं. भारतातून आलोय म्हटल्यावर पुढच्या प्रत्येक व्यक्तीकडून सकारात्मक अनुभव आल्याचं योगेश सांगतात. Royal Enfield Himalayan या dashing देशी गाडीने परदेशातही सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. अनेक लोक थांबुन चौकशी करतात, फोटो काढतात तेव्हा तो अनुभव खरंच भारी असतो. Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

या संपूर्ण प्रवासात मुक्काम, जेवण यासाठी लागणारे साहित्य त्यांच्या बाईकसोबत तयारच होतं. तसेच बाईकची दुरुस्ती किट वगैरे सामानही त्यांनी सोबत घेतलेलंच होतं. या जगप्रवासात स्वित्झर्लंड मधल्या सुंदर रस्त्यापासून ते तुर्की मधल्या Dark Canyon मधल्या सर्वात खतरनाक रस्त्यांवर बाईक चालवायचा अनुभव हा जबरदस्त असल्याचं योगेश सांगतात.

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

हे देखील वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

मुंबई लंडन मुंबई बाईक राईड साठी खर्च किती आला? Cost Of Mumbai London Mumbai Bike Ride in Marathi

या मुंबई लंडन मुंबई प्रवासासाठी त्यांना अंदाजे २५ लाख इतका खर्च आला. ज्या ज्या ठिकाणी बाईक शक्य नाही त्या त्या ठिकाणी विमान, बोट यांमध्ये बाईक टाकून त्यांचा प्रवास झाला. Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

बरं, हा एवढा जबरदस्त आणि मोठा प्रवास करायचा म्हटलं तर तशी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी खुप महत्वाची आहे. पण योगेश यांना आतापर्यंत बाईक राईड चा प्रदीर्घ अनुभव असल्याकारणाने हे सहज शक्य झालं. दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी बाईक वरून भारतीय सीमा गाठून ते भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करायचे. तसेच सिक्कीम, मेघालय वगैरे राज्यांमध्ये बाईक वरून त्यांनी बरेचदा प्रवास केलेला आहे. लहानपणीपासूनच योगेश यांना बाईक वरून भ्रमंती करायचे वेड होते. स्वतःची दुचाकी नसताना देखील मित्राच्या बाईकवरून त्यांनी भारत भ्रमंती केली. यात हिमालय पर्वतरांगा, लडाख, थार आणि कच्छ वाळवंट, तसेच आसाम, सिक्कीम, मेघालय आणि नागालंड या राज्यांमध्येही त्यांनी बाईक राईड केली.

यासोबतच नेपाळ, भूतान, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांमध्येही त्यांनी बाईक वरून प्रवास केला आहे. जेव्हा त्यांनी स्वकमाईतुन रॉयल एन्फिल्ड हिमालया ही बाईक विकत घेतली तेव्हा दर चार वर्षांनी एक आंतरराष्ट्रीय राईड करायची असा आराखडा तयार केला. यात सुरुवातीला असलेल्या सिंगापूर राईडला कोरोना मुळे त्यांना जाता आलं नाही. परंतु दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लंडन बाईक राईड साठी त्यांनी तयारी सुरु केली होती.

या ट्रीप साठी लागणाऱ्या नियोजनासोबतच आर्थिक गोष्टीही योगेश यांनी जुळवून आणल्या आणि यामुळेच मुंबई लंडन मुंबई असा ऐतिहासिक प्रवास घडू शकला.

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

हे देखील वाचा- Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट या हिंदू मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी 2024

 

आंतरराष्ट्रीय बाईक राईड साठी लागणाऱ्या गोष्टी Licences, Permits And Documents Required For International Bike Ride In Marathi-

प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागणारे सर्व आवश्यक परवाने आणि आंतरराष्ट्रीय कागदपत्रे क्रमाने मिळवणे ही सर्वात पहिली आणि मुलभूत गोष्ट आहे. सर्वात आधी स्थानिक अधिकाऱ्यांशी बोला आणि मोटारसायकलवरुन आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणती महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत ते शोधा. ज्या ज्या देशांमधून प्रवास करणार आहात तिथला व्हिसा, पासपोर्ट, International ड्रायव्हर परमिट, मेडिकल सर्टिफिकेट, वाहन नोंदणी दस्तावेज आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यासाठी एका विशेष कागदपत्राची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टीचं व्यवस्थित नियोजन केलं तरच हा मोठा प्रवास विना अडथळा पार पडू शकतो.

 

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

लंडन बाईक राईड साठी काही टिप्स Tips For Mumbai London Bike Ride-

१)जेव्हा हवामान सौम्य असेल तेव्हा वसंत ऋतु किंवा शरद ऋतूमध्ये तुमचा प्रवास सुरू करा.

)तुम्ही प्रवास करणार असलेल्या मार्गाची व्यवस्थित योजना करा तसेच विश्रांती आणि दुरुस्तीसाठी भरपूर वेळ द्या.

३)आव्हानात्मक भूप्रदेश आणि खराब हवामान परिस्थितीसाठी तयार रहा.

४)प्रवास सुरू करण्यापूर्वी शारीरिक स्थिती चांगली आहे ना ते तपासा.

५)सोबतीला कोणी असेल तर उत्तमच.

६)तुम्ही ज्या देशांमधून प्रवास करण्याची योजना आखत आहात तेथील राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती मिळवा.

Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride

हेही वाचा-भारतातली सुंदर हिल स्टेशन्स 

मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आम्ही आपल्यापर्यंत अशीच सविस्तर आणि खास माहिती घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या ब्लॉगला भेट देत चला. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर देखील कळवू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी या साईटवर whatsapp किंवा फेसबुकचा आयकॉन दिसेलच.

तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

हे देखील वाचा-Best Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.

 

1 thought on “Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride मराठमोळा तरुण बाईकवरून पोहोचला थेट लंडनला”

Comments are closed.