Velas Turtle Festival 2025 Best Time To Visit
भारतीय नागरिक हे उत्सवप्रेमी आहेत हे आपण जाणतोच. सतत काही न काही सण उत्सव आपण आनंदात साजरे करत असतो. आपण बरेचदा महाराष्ट्रातल्या एका समुद्रकिनारी होणाऱ्या कासव महोत्सवा बद्दल कुठे ना कुठे वाचलं अथवा ऐकलं असेल. चला तर जाणून घेऊयात, हा अनोखा कासव महोत्सव नक्की आहे तरी काय आणि तो कुठे साजरा केला जातो.
Velas Turtle Festival Best Time To Visit
कुठे साजरा होतो हा अनोखा कासव महोत्सव? Where Turtle Festival Is Celebrated?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात असणाऱ्या वेळास या छोट्या टुमदार गावातील समुद्रकिनाऱ्यावर हा कासव महोत्सव साजरा केला जातो. ज्याला महाराष्ट्रासह देशभरातून निसर्गप्रेमी हजेरी लावतात.
वेळास हे गाव मुंबईपासून २०० किमी आणि पुण्यापासून १८० किमी अंतरावर आहे. वेळास या गावाला दीड किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
कासव महोत्सव कधीपासून साजरा केला जातो? कासव महोत्सवाचा इतिहास History Of Velas Turtle Festival In Marathi
फार पूर्वीपासून वेळास इथल्या समुद्रकिनारी समुद्री कासवं साधारणतः दिवाळीच्या नंतर अंडी घालण्यासाठी येत. पण इथले स्थानिक लोक एकतर ही अंडी खाण्यासाठी चोरून नेत किंवा मग बैलांना खाऊ घालत नाहीतर ती विकून पैसे कमवत. कासवाच्या मादीने अंडी घालायला सुरुवात केली की स्थानिक लोक गुपचूपपणे ही अंडी चोरून नेत. नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत इथे बऱ्याच जणांचा हाच उद्योग सुरू होता. या गोष्टीचा ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) या कासवांच्या संख्येवर लक्षणीय परिणाम झाला.
सन २००२ मध्ये चिपळूण इथल्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र‘ संस्थेचे कार्यकर्ते वेळास इथे समुद्री गरुडांचा व त्यांच्या घरट्याचा अभ्यास करण्यासाठी आले होते. तेव्हा किनाऱ्यावर फिरताना त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी गावात चौकशी केली असता त्यांना एका स्थानिकाकडून या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती मिळाली.
या कासवांचे संवर्धन होणे गरजेचे आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सरपंचांची भेट घेत गावातल्या ग्रामस्थांची एक सभा घेतली. या कासवांचे संवर्धन, संरक्षण कसे गरजेचे आहे याबद्दल त्यांनी ग्रामस्थांना पटवुन दिले. त्यांनतर त्यांनी वनविभागाच्या मदतीने येथे संशोधन कार्यास सुरुवात केली. वेळास बरोबरच लगतच्या किनाऱ्यांवर ज्या ज्या ठिकाणी कासवांची अंडी सापडली त्याठिकाणी माणसे नेमून कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणाच्या कामास सुरुवात केली गेली. Velas Turtle Festival Best Time To Visit
यानंतर संस्थेच्या, वनविभागाच्या आणि ग्रामस्थांच्या बैठकीत सन २००६ साली पहिला ‘कासव महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्या खाण्याच्या सुविधांचे नियोजन करण्यात आले. आणि अशा रितीने २००६ साली पहिला ‘कासव महोत्सव’ साजरा झाला
२०१५ मध्ये दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातल्या किनाऱ्यावर देखील कासव महोत्सवास सुरुवात करण्यात आली.
कसा साजरा होतो कासव महोत्सव? How Turtle Festival Is Celebrated In Marathi?
मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या कासव महोत्सवादरम्यानच्या काळात किनाऱ्यावर अनेक कासव अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने सरपटताना बघणे हे दृश्य मन मोहित करणारे असते. हाच दुर्मिळ अनुभव घेण्याकरिता अनेक पर्यटक, अभ्यासक तसेच छायाचित्रकार वेळास समुद्रकिनाऱ्यावर हजेरी लावतात. ही इवलीशी पिल्ले त्यांच्या आयुष्यातील पहिली पाउलं टाकताना बघणे ही एक दुर्मिळ पर्वणी असते.
Velas Turtle Festival Best Time To Visit
जेव्हा कासव त्यांच्या अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात त्याच वेळी कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवामध्ये कासवांना समुद्रात सोडण्याची ही संपूर्ण प्रकिया पर्यटकांना प्रत्यक्ष पाहायला, अनुभवायला मिळते.
आधी तीन, सात दिवस चालणारा हा महोत्सव पहिलं घरटं उघडण्यापासून ते शेवटच्या घरट्यापर्यंत म्हणजे दीड दोन महिन्यांपर्यंत हा महोत्सव साजरा करण्यात येतो. Velas Turtle Festival Best Time To Visit
वनविभागाने आता या कामासाठी ठराविक माणसं देखील नेमली असून त्यांना मानधनही देण्यात येतं.
स्थानिक लोकांच्या सहभागाने कासवांचे संवर्धन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. गावात ‘कासव मित्र मंडळाची’ स्थापना देखील करण्यात आली आहे.
वेळास गावात हॉटेल जरी नसले तरी होमस्टे ची सुविधा येथे आहे. गावाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर कासव महोत्सवावर अवलंबून आहे. एकेकाळी कोणाला माहितीही नसलेल्या या गावाचं नाव आज जागतिक नकाशावर झळकत आहे. २००६ च्या पहिल्या कासव महोत्सवात १२५ पर्यटकांनी इथे भेट दिली होती तर आजघडीला हजारो पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. गावाची ही ओळख निर्माण करण्यात सह्याद्री मित्र मंडळ, वनविभाग आणि स्थानिकांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
Velas Turtle Festival Best Time To Visit
हे देखील वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय
वेळासला कसं जाल? How To Reach At Velas Turtle Festival?
रस्तामार्गे By Road-
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस किंवा खासगी ट्रॅव्हल्स द्वारे आपण दापोली किंवा मंडणगड येथे पोहोचू शकता. तिथून खासगी वाहनाने वेळास येथे पोहोचता येईल. दापोली आणि मंडणगड येथुन वेळास गाव ४० किमी अंतरावर आहे.
रेल्वेमार्गे By Train-
चिपळूण हे वेळास पासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तिथून खासगी वाहनाने वेळास येथे पोहोचावे. चिपळूण ते वेळास हे अंतर १०० किमी आहे.
बऱ्याच खासगी Travel कंपन्या, संस्था वेळास कासव महोत्सवाला जाण्यासाठी दरवर्षी आयोजन करतात. आपण त्याचाही विचार करू शकता.
Velas Turtle Festival Best Time To Visit
पुणे पासुन वेळास अंतर- १८० किमी
मुंबई पासुन वेळास अंतर- २०७ किमी
कासव महोत्सव बघण्यासाठी सर्वोत्तम काळ Best Time To Visit Velas Turtle Festival-
वेळास कासव महोत्सव पाहण्यासाठी मार्च ते एप्रिल महिना हा सर्वोत्तम कालावधी आहे. दररोज सकाळी साडेसहा वाजता आणि दुपारी ऊन उतरल्यावर ही कासवाची पिल्लं समुद्रात सोडली जातात.
Olive Ridley कासवांबद्दल माहिती Olive Ridley Turtle Information In Marathi-
उष्ण कटिबंध किनारे आणि दलदलीच्या प्रदेशात वाढणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचं वजन साधारणपणे ५०-६० किलोग्रॅम आणि लांबी ६० ते ७० सेमी असते. या कासवांच्या विणीचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च महिन्याचा असतो. कासव मादी रात्रीच्या वेळी अंडी घालते. एका वेळेस साधारणपणे १०० ते २०० अंडी घातली जातात. ४० ते ५५ दिवसांमध्ये ही अंडी नैसर्गिकरीत्या उबतात.
Velas Turtle Festival Best Time To Visit
कासव महोत्सव अनुभवताना या गोष्टी लक्षात असु द्या. Things To Remember At Velas Turtle Festival
१)कासवांच्या पिल्लांना उचलू किंवा स्पर्श करू नका.
२)कासवांच्या समुद्रात जाण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणु नका. संरक्षित जाळ्या ओलांडून पुढे जाऊ नका. यामुळे कासवांच्या पिल्लांना इजा होण्याची शक्यता असते.
३)हा समुद्रकिनारा कोकणातील एक धोकादायक किनारा असून इथे पोहायचा मोह टाळा.
४)प्लॅस्टिकचा वापर टाळा.
५)लक्षात असु द्या, या कासवांच्या कित्येक पिल्लांपैकी केवळ काहीच पिल्ले जगतात. त्यामुळे या नामशेष होत जाणाऱ्या कासवांच्या प्रजातीचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे.
६)पिल्लांना समुद्रात सोडण्याची वेळ ही सकाळी सात ते साडेसात आणि सायंकाळी सहा ते साडेसहा अशी आहे.
७)कासव महोत्सवात फोटोग्राफी साठी कसलेही बंधन नाही. Velas Turtle Festival Best Time To Visit
२०२५ मधील कासव महोत्सव कधी साजरा होणार आहे? Dates Of Velas Turtle Festival In 2025
ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार २०२५ या वर्षीचा कासव महोत्सव साधारणपणे १५ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. २०२५ चा वेळास कासव महोत्सव कधी सुरु होणार हे २०२५ मधील मार्च महिन्याच्या सुरुवातीला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत ठरवले जाते.
कासव महोत्सव बघण्यासाठी किती फीस आकारली जाते? Entry Fees/ Charges For Velas Turtle Festival
यावर्षीपासून वेळास येथे कासव महोत्सव बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून प्रती व्यक्ती ₹२०० एवढी प्रवेश फी आकारण्यात येणार आहे.
वेळास हे छोटे निसर्गरम्य गाव असून इथे फार सुविधा जरी मिळत नसल्या तरी तिथल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या.
Velas Turtle Festival Best Time To Visit
मराठमोळ्या तरुणाची मुंबई लंडन मुंबई बाईक राईड
मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आम्ही आपल्यापर्यंत अशीच सविस्तर आणि खास माहिती घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या ब्लॉगला भेट देत चला. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर देखील कळवू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी या साईटवर whatsapp किंवा फेसबुकचा आयकॉन आपल्याला दिसेलच.
तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.
Velas Turtle Festival Best Time To Visit
टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog
kasav mahotsav phkt shanivari ani raviavrich ASTO KI ROJ