Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

भारतातील सर्वात समृद्ध आणि सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेला अरबी समुद्रासमोर स्थित आपल्या राज्याला लांब किनार्‍यासह शेकडो समुद्रकिनारे लाभले आहेत. जे पर्यटकांसाठी अत्यंत सुंदर आणि उत्तम आहेत. कोकण किनार्‍याला लागून असलेले, हे रमणीय समुद्रकिनारे सिमेंटच्या जंगलातल्या दगदगीत आयुष्य घालवणाऱ्या आणि शांततेच्या शोधात असलेल्या शहरवासीयांना दिलासा देतात. महाराष्ट्रातील ऑफबीट समुद्रकिनाऱ्यांपैकी काशीद, तारकर्ली, हरिहरेश्वर आणि गणपतीपुळे हे सर्वोत्तम समुद्रकिनारे आहेत. मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांमध्ये अलिबाग हे अत्यंत जवळचे असल्याकारणाने लोकप्रिय बीचचे ठिकाण आहे. चला तर आपण पाहुयात महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध समुद्रकिनारे Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

 

Famous Sea Beaches In Konkan Maharashtra कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे 

१)हरिहरेश्वर बीच Harihareshwar Beach Raigad

हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील एक किनारी शहर असून पुण्यापासून सुमारे १७० किमी आणि मुंबईपासून २०० किमी अंतरावर आहे. हरिहरेश्वर इथं प्राचीन शिव मंदिर असून त्याला महाराष्ट्राची दक्षिण काशी असंही संबोधलं जातं. इथं सावित्री नदी महासागरात विलीन होते.

WhatsApp Group Join Now

हरिहरेश्वर सोबतच दिवेआगर, श्रीवर्धन या त्याच मार्गावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यांनाही आपण भेटी देऊ शकतो. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-२०० किमी

पुण्यापासून अंतर-१७० किमी

Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

२)तारकर्ली बीच Tarkarli Beach Sindhudurg. Famous beach In Konkan

सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले तारकर्ली हे पर्यटकांसाठी नंदनवन आहे. तारकर्ली बीच हा मालवणच्या दक्षिणेस सुमारे ७ किमी अंतरावर कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर आहे. कोलाम, तारकर्ली आणि आचरा सारख्या असंख्य समुद्रकिनाऱ्यांसह, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस फिरण्यात आणि मजेत घालवू शकता आणि तिथं उपलब्ध असलेल्या विविध साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. तारकर्ली बीच हा आताच्या काळात तिथल्या साहसी खेळांसाठी ओळखला जाऊ लागला आहे. ज्यामध्ये स्कुबा डायव्हिंग, बोटिंग सारख्या खेळांचा समावेश आहे. इथलं पाणी कमालीचं स्वच्छ असून काही ठिकाणी आपण पाण्याचा तळही बघू शकतो.

मुंबईपासून अंतर-५३८ किमी

पुण्यापासून अंतर-४०० किमी

 

३)काशीद बीच Kashid Beach Raigad. Cleanest beaches Of India and Maharashtra

अलिबागपासून ३० किमी अंतरावर असलेला काशीद बीच सुंदर पांढर्‍या रंगाच्या वाळूसाठी प्रसिद्ध आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हा समुद्रकिनारा ३ किमीवर पसरलेला आहे आणि कॅसुआरिना नावाच्या झुडुपे आणि झाडांनी वेढलेला आहे. इथल्या बीचवर बोटिंग, बनाना राईड, पॅराशुट राईड, घोडेस्वारी, स्पीड राईड इत्यादी साहसी खेळ आपण खेळू शकतो. काशीद बीच लोकप्रिय असल्याने सुट्ट्यांच्या दिवशी इथं गर्दी असते.

Beautiful Fort Near Kashid Beach Alibaug

काशीद बीच पासून अवघ्या १२ किमीवर कोरलाई नावाचं अतिसुंदर असा किल्ला आणि समुद्रकिनारा आहे. पोर्तुगीजांच्या काळातील ह्या किल्ल्याची पडझड झालेली असली तरी चारी बाजूंनी समुद्र आणि मध्ये एका डोंगरावर किल्ला असल्याने तिथली सुंदरता अवर्णनीय आहे. किल्ल्याच्या पायथ्याला लाईट हाऊस असून तिथल्या सुरक्षारक्षकाकडून त्याबद्दल सगळी माहिती सांगितली जाते.

मुंबईपासून अंतर-१३०

पुण्यापासून अंतर-१७५

४)अलिबाग बीच Alibag Beach

अलिबाग समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील एक नयनरम्य किनारा असुन त्यावर काळी वाळू आढळून येते. किनाऱ्यावरून कुलाबा किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते. समुद्रकिनाऱ्यावरून किल्ल्याचे अवशेष स्पष्टपणे दिसतात ज्यात कमी भरतीच्या पाण्यातून फिरून आणि भरतीच्या वेळी लहान बोटीतून सहज जाता येते. समुद्रकिनारा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. अरबी समुद्र, सूर्योदय, सूर्यास्त आणि कुलाबा किल्ला पाहत निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-९५ किमी

पुण्यापासून अंतर-१४६ किमी

 

५)जुहू बीच Juhu Beach Mumbai

जुहू समुद्रकिनारा मुंबईतील सर्वात लांब समुद्रकिनारा आहे आणि पर्यटकांमध्ये देखील सर्वात लोकप्रिय आहे. मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूडसच्या विविध प्रकारांसाठी हा जुहू चौपाटी भाग प्रसिद्ध आहे. जुहूचा आजूबाजूचा परिसर हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय परिसरांपैकी एक आहे आणि अनेक प्रसिद्ध बॉलीवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींचे निवासस्थान आहे.

समुद्रकिनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या प्रतिष्ठित इस्कॉन मंदिराला देखील भेट देऊ शकता किंवा प्रसिद्ध पृथ्वी कॅफेमध्ये थिएटर परफॉर्मन्स पाहू शकता. समुद्रकिनारा अस्वच्छ असल्याची टीका होत असली तरी, बीएमसीच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांत दृश्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-१० किमी

पुण्यापासून अंतर-१५० किमी

६)गणपती पुळे बीच Ganpati Pule Ratnagiri

गणपतीपुळे बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर वसलेला एक प्रेक्षणीय आणि आश्चर्यकारक समुद्रकिनारा आहे. इथं प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर असून, गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणपतीपुळे बीचची किनारपट्टी निःसंशयपणे नेत्रदीपक आणि सुंदर आहे, आणि विविध प्रकारचे उत्कृष्ट वनस्पतींचे घर आहे, ज्यामध्ये दाट नारळाची झाडे आणि खारफुटीचा समावेश आहे.

सुदैवाने, गणपतीपुळे बीचला अद्याप व्यापारीकरणाचा फारसा परिणाम झालेला नाही आणि आजतागायत ते एक प्राचीन आणि सुंदर स्थान राहिले आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-३४० किमी

पुण्यापासून अंतर-२९० किमी

७)दिवेआगर बीच Diveagar Beach Raigad. Famous beaches in Maharashtra

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातलं एक सुंदर आणि नयनरम्य ठिकाण असून तिथला समुद्रकिनारा तितकाच सुंदर आणि स्वच्छ आहे. दिवेआगर हे छोटे सुंदर गाव असून सध्या प्रसिध्द झाल्यामुळे तिथं पर्यटकांची पाऊले वळत आहेत. मुंबई पुण्यापासून जवळ असल्याने दिवेआगर लोकप्रिय आहे. दिवेआगरमध्ये प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर असून ज्याची सोन्याची मूर्ती आणि सोनं २०१२ साली चोरीला गेलं होतं आणि त्यानंतर दहा वर्षांनी तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गावात राहण्यासाठी विविध प्रकारचे होमस्टे असून खानावळी देखील आहेत जिथं स्वादिष्ट जेवण आणि उकडीचे मोदक प्रसिद्ध आहेत. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-१९० किमी

पुण्यापासून अंतर-१६० किमी

८)गुहागर बीच Guhagar Beach Ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनारा हा कोकण विभागातील सर्वात लांब समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असुन स्वच्छ आणि पांढर्‍या वाळूने भरलेला आहे. गुहागर ही भगवान परशुरामांची पवित्र भूमी आहे. गुहागर नारळी आणि सुपारीच्या बागांसाठीही प्रसिद्ध आहे. श्री व्याडेश्‍वर हे शहराच्या मधोमध असलेलं भगवान शंकराचं प्राचीन मंदिर. भगवान परशुरामांचे शिष्य व्याड मुनींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केल्यामुळं, हे मंदिर व्याडेश्‍वर या नावानं प्रसिद्ध झालं.

गुहागर बीचवर जलक्रीडा सुविधा देखील उपलब्ध झाल्या आहेत. हा समुद्रकिनारा पोहण्यासाठी सुरक्षित मानला जातो.

या परिसरात फिरण्यासारखी अनेक स्थळं आहेत. उफराटा गणपती, श्री व्याडेश्‍वर, गाव-मळण, वेळणेश्‍वर, हेदवी, बामणघळ, रोहिला, तवसाळ आणि गोपाळगड ही त्यापैकीच काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-३०० किमी

पुण्यापासून अंतर-२५० किमी

९)वेळास बीच Velas Beach Ratnagiri

श्रीवर्धन पासून जवळ असणारा वेळास हा समुद्रकिनारा सुंदर आणि शांतताप्रिय आहे. तुम्हाला जर धावपळीच्या आयुष्यात निवांत आराम करायला आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायला जायचं असेल तर तुम्ही वेळासच्या किनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी. पोहण्यासाठी हा समुद्रकिनारा उत्तम असून इथे छानपैकी फिरताही येतं. तसंच सकाळची सूर्याची किरणं अंगावर घेत सनबाथिंग घेण्याची देखील मजा घेता येते. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival-

वेळास गावाचं एक खास प्रसिद्ध असलेलं आकर्षण म्हणजे इथं प्रत्येक वर्षी मार्च ते एप्रिल यादरम्यान जगप्रसिद्ध असा ‘कासव महोत्सव’ साजरा होतो. कासवांच्या संवर्धनासाठी हा महोत्सव ग्रामपंचायत, वनविभाग आणि निसर्गप्रेमींकडून राबविण्यात येतो.

मुंबईपासून अंतर-२०० किमी

पुण्यापासून अंतर-१८० किमी

१०)श्रीवर्धन बीच Shrivardhan Beach Raigad

अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर पासून हा समुद्रकिनारा जवळच आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो.

मुंबईपासून अंतर-१९० किमी

पुण्यापासून अंतर-१६० किमी

११)गणेशगुळे बीच Ganeshgule Beach Ratnagiri

हा समुद्रकिनारा रत्नागिरीपासून २० किमी अंतरावर गणेशगुळे या गावात आहे. अतिशय शांत आणि सुंदर असलेला हा बीचचा परिसर शांतताप्रिय लोकांसाठी आवडीचं ठिकाण आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा गणेशगुळेचा परिसर आहे. त्यामुळे इथला सूर्यास्त पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. किनाऱ्यापासुन दीड किमी अंतरावर गणेशगुळे हे गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-३६६ किमी

पुण्यापासून अंतर-३१५ किमी

१२)रेवदंडा बीच Revdanda Beach Alibag

पोर्तुगीजांच्या काळापासून असणाऱ्या अलिबागमधील रेवदंडा समुद्रकिनाऱ्याला इतिहास लाभलेला आहे. समुद्रकिनाऱ्यासह इथला किल्ला देखील तितकाच प्रसिद्ध आहे. काळ्या वाळूने या समुद्रकिनाऱ्याला अधिक शोभा येते. इतकंच नाही तर किनाऱ्यालगत असणारा हा किल्ला अधिक सुंदर दिसतो.

किनाऱ्यावरच रेवदंडा हा प्राचीन पोर्तुगीज किल्ला आहे. आणि तो सध्या जीर्ण अवस्थेत आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-११० किमी

पुण्यापासून अंतर-१६० किमी

१३)आरेवारे बीच Aareware Beach Ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यातील हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ व सुंदर असून निळशार पाणी हे इथलं वैशिष्ट्य आहे. इथे जास्त गर्दी होत नसल्यामुळे शांतता आजही टिकून आहे. सुरूच्या झाडांनी वेढलेला हा किनारा तुम्हाला तुमच्या धावपळीच्या आयुष्यात नक्कीच शांतता मिळवून देतो. इथून दिसणारा नयनरम्य नजारा हे इथले खास वैशिष्ट्य आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-३५० किमी

पुण्यापासून अंतर-३०० किमी

१४)आंजर्ले बीच Anjarle Beach Dapoli

दापोलीपासून २३ किमीवर असलेला आंजर्ले बीच हा एक सुंदर आणि  स्वच्छ वाळुचा समुद्रकिनारा आहे. आंजर्ले हा पांढऱ्या वाळुच्या समुद्रकिनाऱ्यासाठी आणि नारळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. कमी भरतीच्यावेळी या समुद्रकिनारी अनेक पक्षी आकर्षित होतात ज्यामुळे पक्षीप्रेमींसाठी हा परिसर नंदनवन बनून जातो.

इथं कड्यावर असलेलं प्राचीन गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

मुंबईपासून अंतर-२३० किमी

पुण्यापासून अंतर-२०० किमी

१५)मुरुड बीच Murud Beach Alibag

अलिबागमधील मुरूड हा समुद्रकिनारा जवळच असलेल्या जंजिरा या अभेद्य किल्यामुळे लोकप्रिय आहे. समुद्रामध्ये मधोमध असणारा जंजिरा हा किल्ला हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून या किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलं आहे. या समुद्रकिनाऱ्यावरील काळी व मऊशार वाळू पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. मुंबई पुण्यापासून जवळच असल्यामुळे मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असते.

मुंबईपासून अंतर-१४० किमी

पुण्यापासून अंतर-१६० किमी

Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra

 

हेही वाचा – परदेशी पाहुणे येताहेत, तुम्ही जाणार आहात का? best time to visit bhigwan bird sanctuary

4 thoughts on “Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय”

Comments are closed.