Travel Health Tips Marathi प्रवास करताना आरोग्याची घ्या अशी काळजी

Travelling Tips In Marathi प्रवासामध्ये उत्साही राहायला या टीप्स करतील मदत

Travel Health Tips Marathi 

दिवाळी, नाताळ या सणांबरोबरच गुलाबी थंडीचे दिवस सुरु आहेत. थंडीचा आनंद घेत प्रवास करण्याचे, फिरण्याचे हे दिवस आहेत.  बहुतांश लोक या काळात आपल्या कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत एखादी मोठी सहल प्लॅन करतात. पण पुरेशा नियोजनाअभावी, काळजीअभावी काही चुका घडतात आणि  नेमके फिरायला गेल्यावर आजारी पडतात. काहींना प्रवासाचा त्रास होतो तर काहींना बदललेल्या वातावरणाचा, पाण्याचा आणि खाद्यपदार्थांचा. यामूळे प्रवासाची मजाच निघून जाते. प्रवासाच्या उत्साहात बहुतेक जण आहाराकडे लक्ष देत नाहीत. म्हणूनच आम्ही काही खास ट्रॅव्हल हेल्थ टिप्स सांगणार आहोत, ज्या अवलंबून तुम्ही आजारी न पडता ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. आम्ही आपल्यासाठी या Travel Health Tips Marathi घेऊन आलो आहोत, ज्याने आपला प्रवास आणि सुट्टी सुखकर जाईल.

 

१)जास्त जेवण करु नका

लांबचा प्रवास असेल तर अशावेळी जास्त जेवण करण्याचं शक्यतो आपण टाळायला हवं. कारण जास्त जेवण केल्याने प्रवासादरम्यान आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. पोट फुगल्यासारखं वाटुन उलटी व संडासचा त्रासदेखील होऊ शकतो. हे टाळण्यासाठी हलकं-फुलकं जेवण करावं. Travel Health Tips Marathi 

WhatsApp Group Join Now

 

२)तेलकट खाणे नको

प्रवासाला बाहेर पडल्यावर वडापाव, भजी इत्यादी फास्ट फूड पदार्थ लांबच्या प्रवासात सहज उपलब्ध होतात आणि आपणही सहजतेने खातो. मात्र सतत या पदार्थांचे सेवन केल्याने आजारी पडण्याचा धोका असतो. या पदार्थांनी पित्त होऊन मळमळ, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे त्रास होऊ शकतात. म्हणूनच प्रवास करताना तेलकट पदार्थ कमी खाणे किंवा दूर राहणे चांगले. यासोबतच अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल हॉटेलात वापरले जाणारे तेल हे काय गुणवत्तेचे आणि किती चांगले वा खराब असेल याबाबत नक्की सांगता येत नाही. त्यामुळे बाहेरचे तेलकट पदार्त खाणे टाळणे हे कधीही उत्तमच.

 

३)ड्रायफ्रूट्स सोबत ठेवा Carry dryfruits for travelling

प्रवासादरम्यान एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आपल्याला पोषक अन्न खायला मिळेलच याची शाश्वती नसते. अशावेळी जेवणास एक पर्याय म्हणून आपल्यासोबत काहीतरी खाण्यासाठी असावं. ड्रायफ्रूट हा उत्तम पर्याय आहे. ड्रायफ्रूटमध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. ती खाऊन आपण आपली भूक भागवू शकतो.

ड्रायफ्रूटमध्ये आपण खजूर, बदाम, काजू या महागड्या पदार्थांसोबतच खारीक, खोबरे शेंगदाणे इत्यादी स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे पदार्थ सोबत ठेवू शकता.

Travel Health Tips Marathi 

 

४)शक्यतो शाकाहारी पदार्थ खा Eat light foods while travel

जे लोक मांसाहाराचे शौकीन असतात ते प्रवासाच्या ठिकाणच्या प्रसिद्ध मांसाहारी पदार्थाची चव घ्यायला उत्सुक असतात. पण प्रवासात मांसाहारी खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो. तसेच आपण जर बाहेर मिळणारे मांसाहारी पदार्थ खात असु तर ते किती काळजी घेऊन बनवले गेले आहेत याबाबत आपल्याला शाश्वती नसते. त्यामुळे प्रवासात तर मांसाहारी पदार्थ टाळाच. सहसा लोक समुद्र किनारी फिरायला गेल्यावर सी फुड मोठ्या प्रमाणावर खातात. पण पचन नाही झालं तर यासोबतच मळमळ आणि उलट्या होण्याचीही शक्यता असते. म्हणुन शक्यतो शाकाहारी पदार्थ खा.

Travel Health Tips Marathi

५)दूध अंडी टाळा

काही लोक हेल्दी डाएट फॉलो करण्याकरिता प्रवास करताना अंडी आणि दूधाचे सेवन करतात. पण प्रवास करताना या गोष्टी पचवणे सर्वांनाच सोपे नसते. तसेच दुधाचे पदार्थ खाल्यावर बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास देखील होतो.  म्हणूनच प्रवासादरम्यान जलद पचण्याजोगे व हलके अन्न खाणे चांगले. Travel Health Tips Marathi 

 

६)प्रवास करताना व गाडी चालवताना मद्यपान टाळा Don’t drink and drive

काही लोक सहलीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मद्यपान करतात. मात्र गाडी चालवताना अथवा प्रवासात असताना मद्यपान टाळा. ज्याने अपघाताचा धोका संभवतो. मद्यपान करून गाडी चालवणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे तर आहेच पण रस्त्यावर वावरणाऱ्या इतरांचा जीव धोक्यात असतो हे लक्षात ठेवा.

लक्षात असुद्या, मद्यपान करून गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कडक शिक्षेची आणि दंडाची तरतूद देखील आहे.

 

७)खाण्यापिण्याकडे लक्ष द्या Eating habbits for good life

प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास विसरू नका. अनेकदा वॉशरुमला जावे लागेल म्हणून आपण पाणी पिणे टाळतो. पण असे न करता प्रवासात दर थोडा वेळाने घोट घोट पाणी प्यायला हवे. तसेच, शक्य असल्यास ज्यूस आणि नारळपाणीही प्या. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होणार नाही आणि प्रवासातही तुम्हाला फ्रेश वाटेल.

Travel Health Tips Marathi

८)प्रथमोपचार साहित्य जवळ ठेवा  First aid kit for travelling

प्रवास करत असताना आपल्या गोळ्या औषधं सोबत बाळगा. तसेच कुठली ॲलर्जी असेल तर त्या गोळ्या जवळ ठेवा. प्रथमोपचार साहित्यामध्ये जखमेसाठी मलम, बँडेज, पट्टी इत्यादी साहित्य जवळ असु द्या. आपण जिथे जाणार आहोत तिथल्या एखाद्या चालू साथीच्या आजाराबद्दल माहिती मिळाली तर त्यावरच्या गोळ्या, औषधेही आवर्जून सोबत घ्यावीत. डासांसाठी odomos क्रीम सोबत ठेवावी. तसेच ऊन, घाम, धूळ किंवा ओलाव्यामुळे फंगल इंफेक्शन/ गजकर्ण होऊ शकतं. अशा वेळी फर्स्ट एड बॉक्समध्ये असलेली अँटीफंगल क्रिम, गोळ्या किंवा घामोळ्याची पावडर उपयुक्त ठरते. मात्र यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

प्रवासात काही साहसी गोष्टी करत असताना किंवा धावताना मुका मार लागल्यास किंवा स्नायू दुखावला असेल तर त्यावर मसल्स क्रिम किंवा स्प्रे चा वापर तुम्ही करु शकता. तसेच स्नायू दुखावले असल्यास पायदुखी, कंबरदुखी यांसारखी दुखणी केव्हाही उद्भवू शकतात. अशावेळी झटपट आराम मिळवण्यासाठी पेनकिलर गोळी कामी येते. म्हणूनच फर्स्ट एड बॉक्समध्ये क्रोसीन, कॉम्बीफ्लेम, पॅरासिटामॉल यांसारख्या गोळ्या जरूर ठेवा. मात्र वारंवार पेनकिलर्स घेणे योग्य ठरत नाही. सततच्या दुखण्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.ही सर्व माहिती इथे दिली असली तरी कुठल्याही गोळ्या औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Travel Health Tips Marathi 

हे देखील वाचा- ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

९)वैद्यकीय तपासणी करा Medical Checkup before travel

वैद्यकीय तपासणी हा प्रकार आपल्याकडे जवळजवळ अस्तित्वातच नाही असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. काहीही त्रास होत नसताना डॉक्टरांकडे जाणे खरंतर बहुतेकांना पटतच नाही. सहलीला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्याचा उद्देश एवढाच असतो की आपल्या नकळत आपल्या शरीरात एखादा ‘लक्षणविरहित विकार’ दडला तर नाही ना, याचा शोध घेणे आणि असलाच तर त्यावर डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन घेणे. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

Travel Health Tips Marathi 

१०)चांगल्या आरोग्यविषयक सवयी आणि स्वच्छता Healthy Habbits and Hygeinic Disciplines

लांबच्या प्रवासात शक्यतो गाडीतच अथवा वाटेतच खाणेपिणे करावे लागते. अशा वेळेस हात न धुता जेवणे निक्षून टाळावे. हात धुण्याचा महिमा सांगण्याची तसं तर गरज नाही. पोटाच्या बहुतांश तक्रारी या केवळ हात स्वच्छ धुण्याची काळजी घेतल्यास टाळता येतात.

प्रवासात थंड पेये, आईस्क्रीम तसेच वेगवेगळे चमचमीत पदार्थ आपल्याला सतत मोहात पाडत असतात. विशेषत: लहान मुलांना जास्त प्रमाणात बाहेरचे पदार्थ मोहात पडतात. या उघड्यावरच्या पदार्थांच्या शुद्धतेविषयी आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे ते टाळणे आवश्यकच आहे. आपण विकत घेतलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, त्यांचा दर्जा, स्वच्छता या गोष्टी पडताळून पाहाव्यात. या संदर्भात घरूनच केलेले थोडेसे नियोजन फार उपयोगी पडते. शक्य असल्यास खाण्यापिण्याचे पदार्थ घरूनच सोबत घेऊन जावेत. फळेही सोबत असु द्यावीत. Travel Health Tips Marathi 

अन्न आणि पाणी या बाबतीत काळजी न घेतल्यास अन्न विषबाधा, जुलाब, उलटय़ा, कावीळ, टायफॉइड असे अनेक पोटाचे विकार होऊ शकतात. दूषित अन्नपाण्यामुळे होणारा आजार काही आठवडय़ांपर्यंत केव्हाही होऊ शकतो.  पिण्यासाठी शक्यतो उकळलेले पाणीच वापरावे. हॉटेलमध्ये विनंती केल्यास अशी सोय होऊ शकते. पाणी शुद्ध करण्यासाठी गाळलेल्या पाण्यात क्लोरिनच्या गोळ्या टाकणे वा ड्रॉप्सचा वापर करणे हासुद्धा चांगला पर्याय आहे. तसेच उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यावे, पाणी असलेली फळे भरपूर खावीत आणि त्याचबरोबर उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल व गॉगलचा वापर करावा.

Travel Health Tips Marathi 

अशा प्रकारे वरील गोष्टी केल्या तर आपण प्रवासादरम्यान वा प्रवासानंतर होणारा त्रास टाळू शकतो. प्रवासादरम्यान काही त्रास झाला नाही तर आपण त्या प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो. तसेच अनेक गोष्टी शिकू शकतो. प्रवास हा केवळ प्रवास नसतो. तर ती एक आठवण देखील असते. छान प्रवास झाला तर पुढे कधी त्या प्रवासाच्या आठवणीत रमून जाण्याचा आनंदही घेता येतो. Travel Health Tips Marathi 

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर कराच. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक व इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाचे आमचे पेज शोधून आम्हाला follow करा. आणि आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. अशाच भटकंतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला नियमित भेट द्या. प्रवास करताना काय काय काळजी घ्यायची यासोबत कुठे आणि काय फिरणार याबद्दल आम्ही आपल्यापर्यंत योग्य ती माहिती पोचवत राहू.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग

हे वाचा-थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी

1 thought on “Travel Health Tips Marathi प्रवास करताना आरोग्याची घ्या अशी काळजी”

Comments are closed.