नागपुर देखील पर्यटनात कमी नाहीये, ही आहेत प्रसिद्ध ठिकाणे Tourist Places In Nagpur

नागपुरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे Tourist Places In Nagpur

नागपुर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असुन त्याच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर संत्री उत्पादनात अग्रेसर असुन ऑरेंज सिटी म्हणुनही ओळखले जाते. भारताच्या मध्य भागात वसलेलं नागपूर संत तुकडोजी महाराज नगरी म्हणुनही ओळखले जाते.

ऐतिहासिक वारसा लाभलेलं नागपूर शहर तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखलं जातं. आज आपण माहिती घेऊयात, उपराजधानीत फिरायला काय काय खास आहे त्याबद्दल.

Tourist Places In Nagpur City

 

WhatsApp Group Join Now

१)रामटेक किल्ला

Tourist Places In Nagpur

रामटेक हा नागपुरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेला एका डोंगरावर वसलेला किल्ला आहे. किल्ल्यात श्रीरामाचे मंदिर आहे. श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्याआधी या ठिकाणी विश्रांती घेतली होती अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. या भागात आणखी बरीच मंदिरे आहेत. रामटेक किल्ला आणि कालिदास स्मारक ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. येथील शांत वातावरण आणि धार्मिक महत्त्वामुळे हे ठिकाण भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी आवर्जून भेट देण्यासारखे आहे.

 

२)अंबाझरी तलाव

Tourist Places In Nagpur

अंबाझरी तलाव हा नागपूरमधील ११ तलावांपैकी एक असुन सर्वात मोठा तलाव आहे. हे नागपुरातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तलाव शहराच्या मध्यभागी असून येथे नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे. येथील सुंदर बाग आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण कुटुंबासहित भेट देण्यासाठी योग्य आहे. तलावाजवळ स्वामी विवेकानंद यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे.

 

३)दीक्षाभूमी

दीक्षाभूमी हे नागपुरातील एक प्रसिद्ध स्मारक आहे. दीक्षाभूमी हे बौद्ध धर्मियांसाठी पवित्र स्थळ असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर या जागेवर हे पवित्र स्मारक बांधण्यात आले. दरवर्षी लाखो लोक दीक्षाभूमीला भेट देतात.

Tourist Places In Nagpur

दीक्षाभूमीवर मोठ्या स्तूपाची निर्मिती २००१  साली करण्यात आली. दीक्षाभूमीवर असणारे स्तूप हे प्राचीन स्तुपांपेक्षा वेगळे आहे. प्राचीन काळात सम्राट अशोकाने अनेक स्तूप बांधले होते. ते सर्व स्तूप मात्र भरीव स्वरूपात होते. मात्र दीक्षाभूमीवर असणारा स्तूप आतून पोकळ आहे. स्तूपाच्या खालच्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थी कलश ठेवला गेला आहे. तर बाजूला गौतम बुद्धांची मोठ्या आकाराची मूर्ती आहे. मूर्तीच्या शेजारीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास दर्शवणारे चित्र प्रदर्शन आहे.

Tourist Places In Nagpur

 

४)फुटाळा तलाव

फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणारा एक मोठा आणि प्रसिद्ध तलाव आहे. या तलावाला ‘तेलंगखेडी तलाव’ असे देखील संबोधले जाते. तलावाची बांधणी भोसले राजवटीदरम्यान झाली. तलावाशेजारीच तेलंगखेडी बगिचा आहे. तलावाच्या बाजूला रस्ता असुन चौपाटी सारखी रचना इथे करण्यात आलेली आहे. इथे अनेक दुकाने असुन पर्यटक आणि सायंकाळच्या वेळी नागरिक गर्दी करतात.

Tourist Places In Nagpur

गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात नागपूर शहरातील अनेक मोठ्या गणपतींच्या मूर्तींचे व देवींच्या मूर्तींचे येथे विसर्जन करण्यात येते. तलावाच्या वायव्य दिशेस सातपुडा उद्यान व सेमिनरी हिल्स आहे.

 

५)महालक्ष्मी जगदंबा मंदिर

Tourist Places In Nagpur

नागपूरपासुन १५ किमी अंतरावर असलेले महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे कोराडी तलावाच्या काठावर असलेले एक लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीत बांधलेले असुन वास्तूशिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराजवळ एक कुंड आणि गोमुख असुन त्यातून थंड पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहतो. मंदिराजवळ वेगवेगळ्या आकाराचे, रचनेचे दगड आढळतात. नवरात्रीच्या काळात इथे भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

 

६)सेंट्रल म्युझियम नागपूर

सेंट्रल म्युझियम नागपूर हे नागपुरातील एक प्रसिद्ध संग्रहालय आहे. १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या या संग्रहालयात प्राचीन काळापासूनच्या अनेक ऐतिहासिक वस्तू, कलाकृती आणि शिल्पे प्रदर्शित केली आहेत. हे ठिकाण इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आणि कला प्रेमींसाठी आवर्जून भेट देण्यासारखे आहे. हे केंद्रीय संग्रहालय अजब बांगला या नावाने देखील परिचित असुन भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित संग्रहालयांपैकी एक आहे.

Tourist Places In Nagpur

संग्रहालयात प्राचीन नाणी, शिलालेख, ऐतिहासिक काळातील शिल्पे, अनेक आदिवासी कलाकृती, अनेक दुर्मिळ प्राण्यांचे नमुने, प्राचीन काळातील शस्त्रे आदि ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात. Tourist Places In Nagpur

नागपुरातील हे ठिकाण प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी आकर्षक असुन छोट्यांपासून ते प्रौढांपर्यंत नागरिक या ठिकाणी भेट देतात.

 

७)कपूर बावडी

Tourist Places In Nagpur

Tourist Places In Nagpur रामटेक गडापासून काही किलोमिटरच्या अंतरावर ही कपूर बावडी आहे. जाणकारांच्या मते ही बावडी साधारण बाराशे वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. भारतात अशा बऱ्याच प्रसिद्ध बावड्या आहेत. त्यात कपूर बावडीचाही समावेश होतो. ही बावडी जैन मंदिराच्या मागच्या भागात आहे. तरुणांमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

८)आदासा गणेश मंदिर

Tourist Places In Nagpur

नागपूर शहरापासून आदासा गणेश मंदिर 45 किमी अंतरावर असुन खूप प्रसिद्ध आहे. हे पुरातन मंदिर एका छोट्या टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे. मंदिराला जाण्यासाठी ९० पायऱ्या चढुन जावे लागते. मंदिराच्या बाजूला गाव आहे. नागपूर शहरापासून हे ठिकाण दूर असुन निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. पर्यटक इथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच मंदिराच्या परिसरात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

९)ड्रॅगन पॅलेस

नागपूरचे ‘लोटस टेंपल’ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन पॅलेस मंदिर हे नागपूरच्या कामठी इथे असणारे एक प्रसिद्ध बौद्ध मंदिर आहे. सन १९९९ मध्ये एका जपानी धर्मादाय ट्रस्टच्या निधीतून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धांची एक चंदनाची मूर्ती कोरण्यात आली असुन बौद्ध धर्मियांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे. Tourist Places In Nagpur

Tourist Places In Nagpur

ड्रॅगन पॅलेस मंदिराची स्थापना १९९९ साली महापौर सुलेखा कुंभारे आणि एका जपानी कंपनीचे अध्यक्ष नोरिको ओगावा यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर करण्यात आली होती. ड्रॅगन पॅलेस मंदिराची स्थापना बौद्ध शिक्षण आणि ध्यानाचे ठिकाण तसेच भारत-जपानी मैत्रीचे प्रतीक म्हणून करण्यात आली होती. ४० एकरांवर पसरलेल्या या जागेत अनेक भारतीय तसेच विदेशी लोक शांततेचा अनुभव घेण्यासाठी येतात.

 

१०)उमरेडकऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य

 उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील भंडारा व नागपूर जिल्ह्यात पसरलेले आहे. हे अभयारण्य वैनगंगा नदीच्या जंगलातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी थेट जोडलेले आहे.

Tourist Places In Nagpur

हे अभयारण्य नागपूरपासून सुमारे ५८ किलोमीटर आणि भंडारापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. भंडारा जिल्ह्यातील पौनी तहसील तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यात हे अभयारण्य पसरले आहे. इथले वैविध्यपूर्ण नैसर्गिक वातावरण व समृद्ध जैवविविधतेसाठी ते ओळखले जाते.  या अभयारण्यात वाघ, कोळे, हरीण, जंगली कुत्री यांसह अनेक दुर्मिळ प्राणी आढळतात. वन्यजीवप्रेमींसाठी हे ठिकाण खास आवडते असुन अनेक पर्यटक इथे वर्षभर भेट देत असतात.

Tourist Places In Nagpur

११)महाराज बाग

१५ एकर परीसरात पसरलेली नागपूरची महाराज बाग ही सुमारे १२० वर्ष जुनी असुन बाग आणि सोबतच प्राणीसंग्रहालय असे तिचे स्वरूप आहे. १८९५ साली ‘पंजाबराव कृषी विद्यापिठाची’ स्थापना झाल्यावर त्या निमित्ताने या ठिकाणी अनेक दुर्मिळ वनस्पती लावण्यात आल्या. अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती या उद्यानात बघायला मिळतात. बागेच्या शेजारी आंब्याची मोठी बाग असुन नागीण जातीचे आंबे तिथे बघायला मिळतात. तसेच चिकू व फणस अशी झाडेही तिथे आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा असल्याने इथे अनेक जातींचे पक्षी बघायला मिळतात. इथल्या प्राणीसंग्रहालयात मोर, वाघ, अस्वल, हरीण, काळवीट, बदके आदि प्राणी व पक्षी बघायला मिळतात.

Tourist Places In Nagpur

वन्यप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणी असुन येथे सुटीच्या दिवशी भेट देणाऱ्यांची जास्त गर्दी असते.

Tourist Places In Nagpur

 

१२)रमण विज्ञान केंद्र

नागपुरात असलेले रमण विज्ञान केंद्र हे कोलकाताच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदचा एक महत्वाचा घटक असुन संस्कृती मंत्रालयाच्या अधीन आहे. तसेच हे केंद्र मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राशी देखील संलग्न आहे. विदर्भातील जनता आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी सन १९८९ मध्ये हे विज्ञान केंद्र स्थापित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील प्रथम भारतीय नोबेल पुरस्कार विजेते सर सी व्ही रमण यांच्या नावावरून या विज्ञान केंद्राला रमण विज्ञान केंद्र हे नाव मिळाले.

Tourist Places In Nagpur

विज्ञान केंद्र आठवड्यातले सातही दिवस सुरु असुन पर्यटकांसाठी माफक दरात ते बघण्यासाठी उपलब्ध आहे. Tourist Places In Nagpur

 

१३)पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प किंवा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवर वसलेले असुन त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. नागपूरपासून हे ठिकाण ८० किमी अंतरावर आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती तसेच प्राण्यांची व पक्ष्यांची विपुलता आहे. सन १९७७ साली या भागाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. आणि सन १९८३ मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान असा दर्जा देण्यात आला. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यानाला सन १९९९ मध्ये भारतातील २५ व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला.

Tourist Places In Nagpur

या जंगलात बंगाली वाघ, लांडगे, सांबर, अस्वल, बिबट्या, चितळ, गवा, नीलगाय आदि प्राणी तसेच २५० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती बघायला मिळतात.

 

१४)नॅरो गेज रेल्वे संग्रहालय नागपूर

Tourist Places In Nagpur

नॅरो गेज रेल्वे संग्रहालय हे नागपूरसह भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय आहे. रेल्वेचा गौरवशाली इतिहास या संग्रहालयात बघायला मिळतो. भव्य जागेत उभारलेल्या या ठिकाणी वाफेवरचे आणि डिझेलवरचे रेल्वे इंजिन्स बघायला मिळतात. तसेच रेल्वेचे नमुने आणि रेल्वेचे सुटे भाग देखील बघायला मिळतात. लहान मुलांसाठी छोटी रेल्वे तसेच झोका, घसरगुंडी आदि मनोरंजनात्मक खेळणी देखील इथे आहेत. एक दिवशीय कौटुंबिक सहलीसाठी हे संग्रहालय म्हणजे उत्तम पर्याय आहे.

 

Tourist Places In Nagpur

हेही वाचा- कमालीची सुंदर अशी भारतातील राष्ट्रीय उद्याने National Parks Of India In Marathi