Tea Gardens Of India Marathi हे चहाचे मळे आहेत पर्यटकांचं खास आकर्षण

Tea Gardens Of India Marathi 

भारतातील प्रसिद्ध चहाचे मळे/ चहाच्या बागा 

जर तुम्ही चहाचे कट्टर चाहते असाल आणि चहाशिवाय तुमचा दिवस सुरू करण्याचा विचारही करू शकत नसाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आपला भारत देश हा जगातील सर्वोच्च चहा उत्पादक देशांपैकी एक आहे हे तर आपल्याला माहितीच असेल. देशात मोठमोठे चहाचे मळे आहेत जिथुन आपल्यापर्यंत आणि परदेशात चहा पोहोचतो. हे चहाचे मळे फक्त चहा उत्पादनापुरतेच मर्यादित नसून देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळेही बनली आहेत. ही ठिकाणं म्हणजे भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन्स आहेत जिथं पर्यटक आवर्जुन हजेरी लावतात. तर आपण आज बघणार आहोत भारतातले ते प्रसिद्ध चहाचे मळे जे प्रत्येक चहाप्रेमींना व पर्यटकांना माहिती असायला हवेत.

Famous Tea Gardens Of India Marathi

१)दार्जिलिंग टी गार्डन्स- पश्चिम बंगाल (Darjeeling Tea Gardens)

हिमालयाच्या कुशीत वसलेले, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे प्रसिद्ध हिल स्टेशन भारतातील सर्वोत्तम चहाच्या ठिकाणांपैकी एक आहे. भल्यामोठ्या चहाच्या बागाच बागा, कांचनजंगा पर्वताचा अप्रतिम नजारा, चहा-उत्पादनाचा समृद्ध इतिहास आणि प्रसिध्द दार्जिलिंग हिमालयन रेल्वे यांनी या ठिकाणाला प्रसिद्धी मिळवुन दिली आहे. ब्रिटीश राजवटीत इथल्या मळ्यांतून चहाची वाहतूक करण्यासाठी या भागातील रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. मकाईबारी, ग्लेनबर्न आणि हॅप्पी व्हॅली सारख्या लोकप्रिय वसाहती इथं आहेत ज्या केवळ उत्तम दर्जाचा चहाच तयार करत नाहीत तर पर्यटकांना चहाची पाने तोडण्यापासून ते चहा बनवण्यापर्यंतचा उत्कृष्ट अनुभव देखील देतात. त्यामुळे पर्यटक इथं आवर्जुन हजेरी लावतात.

WhatsApp Group Join Now

दार्जीलिंगला कसे जायचे? ट्रेनने जायचे झाल्यास आधी कोलकाता इथल्या हावडा जंक्शन पर्यंत जाऊन तिथुन जलपाईगुडीला जाणारी ट्रेन पकडावी लागेल. तिथुन कॅबने दार्जीलिंगला जायला तीन तास लागतात. विमानाने जायचे झाल्यास बागडोगरा हे जवळचे विमानतळ आहे.

पुणे मुंबईपासून दार्जीलिंगचे अंतर- २२०० किमी

Tea Gardens Of India Marathi

 

२)आसाम टी गार्डन्स (Assam Tea Gardens)

आसाम राज्यात आपल्याला विस्तीर्ण अशा चहाच्या बागा बघायला मिळतात. आसाममध्ये उत्तरेकडे प्रवास करताना, अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या चहाच्या बागांसोबत विस्तीर्ण मैदाने आपल्याला आढळून येतात. हे पाहणं म्हणजे सुद्धा एक अविस्मरणीय अनुभव असतो. अड्डाबारी टी इस्टेट, हलमारी टी इस्टेट आणि मंजुश्री टी इस्टेट सारखी ठिकाणे पर्यटकांना इथल्या चहाच्या मळ्यांची भव्यता पाहण्याची अनोखी संधी देतात. अडबारी टी इस्टेट हे इथले प्रसिद्ध वाइल्ड महसीरचे घर आहे, जो एक ब्रिटीशकालीन बंगला आहे, जो पर्यटकांना चहाच्या बागेचा आणि सभोवतालच्या वन्यजीवांचा अनुभव घेण्याची उत्तम संधी देखील देतो.

आसामला कसे जायचे? कुठल्याही प्रमुख शहरांमधून आसामच्या गुवाहाटी शहरापर्यंत ट्रेन किना विमानसेवा आहे.

पुणे मुंबईपासून आसामचे अंतर-२७०० किमी

Tea Gardens Of India Marathi

 

३)मुन्नार टी गार्डन्स केरळ (Munnar Tea Gardens)

पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ख्याती असलेल्या केरळ मधील मुन्नार हे एक प्रसिद्ध हिलस्टेशन आहे. केरळ मुख्यतः इथल्या बॅकवॉटर आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते, तर पश्चिम घाटात वसलेला मुन्नार प्रदेश हा चहाच्या मळ्यांचा खजिना आहे. मुन्नार हे निःसंशयपणे भारतातील सर्वात नयनरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे तसेच एक अतिशय लोकप्रिय हिल स्टेशन देखील आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक चहा ब्रॅंडचे उत्पादन मुन्नारमध्येच केलं जातं. मुन्नारमधील चहाचे मळे पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मुक्कामदेखील करू शकता. निसर्गरम्य डोंगर आणि तलावांसह तुम्हाला या ठिकाणी चहा संग्रहालय देखील पाहायला मिळतं. इथं येणारा पर्यटक बागांमधून फिरू शकतो व इथल्या स्वर्गीय सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो.

Tea Gardens Of India Marathi

मुन्नारला कसे जायचे? मुन्नारपासुनचे जवळचे विमानतळ कोचीन ११० किमी अंतरावर आहे. तसेच एर्नाकुलम हे जवळचे रेल्वे स्टेशन १३० किमी अंतरावर आहे.

पुणे मुंबईपासून मुन्नारचे अंतर-१४०० किमी

 

४)कांगडा व्हॅली टी गार्डन्स-हिमाचल प्रदेश (Kangra Valley)

हिमाचल प्रदेशातील कांगडा व्हॅली तिथल्या भौगोलिक स्थितीमुळे एक अतिशय नयनरम्य जागा म्हणून प्रसिद्ध आहे. उंचच उंच पर्वतराजींनी वेढलेली नयनरम्य कांगडा व्हॅली एक स्वप्नवत ठिकाण आहे. चहा उत्पादनासाठी देखील हे एक अनुकुल ठिकाण आहे आणि इथे वाह टी इस्टेट सारखे चहाचे मळे आहेत. हिमालयीन सुंदरता, इथली स्थानिक संस्कृती आणि इथला खास चहा या जागेला अजून खास बनवतात.

Tea Gardens Of India Marathi

कांगडा व्हॅलीला कसे जायचे? मुंबईपासून कांगडाला जाण्यासाठी मोहाली मार्गे विमान आहे. तसेच दिल्ली वरून बसेस उपलब्ध आहेत.

पुणे मुंबईपासून कांगडा व्हॅलीचे अंतर- १७०० किमी

 

५)उटी टी गार्डन्स Ooty Tea Gardens

तामिळनाडूमधील निलगिरी हिल्स मध्ये वसलेल्या उटीला ‘पर्वतांची राणी’ म्हणूनही ओळखलं जातं. डोडाबेट्टा टी फॅक्टरी आणि संग्रहालय तसेच विस्तीर्ण क्रेगमोर टी इस्टेट इथं बघायला मिळतात. उटीच्या निसर्गसौंदर्याचा एक महत्वाचा भाग असलेल्या या चहाच्या बागा खरोखरच खूप सुंदर आहेत. आणि उटीला येणारे बहुतेक पर्यटक नेमके याचकरिता इथं येतात. Tea Gardens And Hill Stations Of India Marathi

उटीला  कसे जायचे? कोईमतोर हे जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन ८८ किमी अंतरावर आहे.

पुणे मुंबईपासून उटीचे अंतर- १२०० किमी

 

६)कोलुकुमलाई तमिळनाडू Kolukumalai Tamilnadu Tea Garden-

केरळ राज्याच्या सीमेला लागुनच समुद्रसपाटीपासून ८००० फुट उंचीवर  तमिळनाडूमध्ये कोलुकुमलाई टी इस्टेट Kolukumalai Tea Estate हा चहाचा मळा स्थित आहे. तिथं पिकवल्या जाणाऱ्या चहाला येणाऱ्या उंची सुगंधामुळे आणि उत्कृष्ट चवीमुळे इथला चहा विशेष प्रसिद्ध आहे. केरळ पासुन हे ठिकाण जवळ असल्यामुळे इथे जीपने दोन तासात पोहोचता येते. हा दोन तासांचा प्रवास सभोवतालच्या नयनरम्य निसर्गामुळे एक अनोखा आनंद देऊन जातो. Famous Tea Gardens Of India Marathi

इथे असलेल्या चहाच्या मळ्याची स्थापना ब्रिटिशांनी सन १९०० च्या सुरुवातीला केली होती आणि तिथला चहाचा कारखाना चहासाठी अजूनही जुनी पद्धत वापरतो. इथे एका दिवसात भेट देणे सहज शक्य आहे. उत्तम अनुभव पाहिजे असेल तर इथल्या विश्रांतीगृहात किंवा डोंगरावर बनवलेल्या झोपड्यांमध्ये मुक्काम करता येऊ शकतो. तसेच इथल्या चहाच्या कारखान्यात फिरून तिथे बनविण्यात येत असलेल्या चहाची प्रक्रिया देखील बघता येते.

कोलुकुमलाईला कसे जायचे? इथून जवळचे विमानतळ कोचीन १३३ किमिया अंतरावर आहे. तसेच जवळचे रेल्वे स्टेशन बोडीनायाक्कानुर ५० किमी आणि सिवाकासी ८६ किमी अंतरावर आहेत. तसेच मुन्नार वरून रस्तामार्गे ११० किमी अंतर आहे.

पुणे मुंबईपासून कोलुकुमलाईचे अंतर- १५०० किमी

 

७)निलगिरी पर्वतरांगा Nilgiri Mountains Tamilnadu Tea Gardens-

दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील डोंगराळ निलगिरी जिल्हा तिथल्या चहाच्या गडद आणि तीव्र सुगंधासाठी ओळखला जातो. इथला चहा हा सुमारे १०० वर्षांहून अधिक काळापासून पिकवला जातो तसेच चहा उद्योग हा या प्रदेशातील सर्वात महत्वाचा उद्योग आहे. Tea Gardens And Hill Stations Of India Marathi

निलगिरी चहाच्या कारखान्याला भेट देण्यासाठी कुन्नूर Kunnur हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कारण १९ व्या शतकात इथल्या चहाची लागवड सर्वप्रथम याच ठिकाणी केली होती. इथे भेट दिल्यावर चहाची संपूर्ण प्रक्रिया बघता येते तसेच इथल्या खोल्यांमध्ये राहायची सोय देखील होऊ शकते. एक उत्तम आदरातिथ्याचा अनुभव देखील इथे मिळतो.

निलगिरीला कसे जायचे? जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन कोईम्बतूर १०५ किमी अंतरावर आहे .

पुणे मुंबईपासून निलगिरीचे अंतर- १२०० किमी

 

८)वायनाड केरळ चहा इस्टेट Wayanad Kerala Tea Gardens-

देशातला स्वर्ग समजल्या जाणाऱ्या केरळ मधील वायनाड या निसर्गरम्य डोंगराळ भागात चहाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. इथे असणारे बहुतेक चहाचे मळे हे काल्पेता Kalpetta च्या दक्षिणेस, व्यथिती Vythiti आणि मेपाडी Meppadi इथे स्थित आहेत. इथल्या चेंब्रा शिखराकडे जाणारा रस्ता हा इथे असणाऱ्या खाजगी चहा इस्टेटीमधुन घेऊन जातो, जो नक्कीच पाहण्याजोगा आहे. इथल्या चहाच्या मळ्याला सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे. इथल्या चहाच्या मळ्यात राहण्यासाठी आकर्षक सोयी उपलब्ध आहेत. Tea Gardens And Hill Stations Of India Marathi

वायनाडला कसे जायचे? विमानाने किंवा रेल्वेने कोझिकोड इथे जाऊन तिथुन ६५ किमी अंतर असलेल्या वायनाड इथे पोहचता येते.

पुणे मुंबईपासून वायनाडचे अंतर- ११०० किमी

 

९)पालमपूर हिमाचल प्रदेश Palampur Himachal Pradesh Tea Gardens-

पेशावर इथल्या वनस्पती उद्यानाचे अधीक्षक डॉक्टर जेम्सन यांनी १९ व्या शतकाच्या मध्यात हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्यातील धर्मशाळेपासुन सुमारे एक तासाच्या अंतरावर असलेल्या पालमपूर इथल्या चहाच्या बागांची सुरुवात केली होती. पालमपूर इथला सहकारी चहा कारखाना आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याबरोबरच त्यांना कारखान्याची टूर देखील करवतो.

वाह टी इस्टेट हे कांगडा खोऱ्यातील ईशान्येकडील चहाचे मळे सन १८५७ पासुन इथे कार्यरत आहेत. इथे उत्पादित होणारा चहा सेंद्रिय आणि पूर्णपणे कीटकनाशक मुक्त आहेत. इथल्या कॉटेजेस मध्ये आलेल्या पाहुण्यांची चांगली सोय केली जाते.

पालमपूरला कसे जायचे? कांगडा इथे रेल्वे किंवा विमानाने जाऊन तिथुन पालमपूरला जाता येते.

पुणे मुंबईपासून पालमपूरचे अंतर- १९०० किमी

 

Tea Gardens Of India Marathi

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया किंवा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर नक्की कळवा. तसेच आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक व इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग

Tea Gardens And Hill Stations Of India Marathi

हेही वाचा- भारतातली सुंदर हिल स्टेशन्स

1 thought on “Tea Gardens Of India Marathi हे चहाचे मळे आहेत पर्यटकांचं खास आकर्षण”

Comments are closed.