Supwati Mountain Trek Talegaon Pune भटकंती मावळातल्या अवाढव्य सुपवती डोंगराची

सुपवती डोंगर (वाघजाई देवीचा डोंगर)- एक जबरदस्त ट्रेक Supwati Mountain Trek Talegaon Pune- Best Hill Trek Near Pune

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून जाताना तळेगावच्या डाव्या बाजूला तसेच एक्स्प्रेसवेवर उर्से टोलनाक्याजवळ असलेला भलामोठा उंच डोंगर आपलं लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात हा डोंगर ढगांच्या छायेखाली झाकून गेलेला असतो, त्यामुळे अजूनच सुंदर दिसतो.

जुन्या पुणे मुंबई हायवेवरून सोमाटणे फाट्याच्या पुढची खिंड पार करून पुढे गेलो की CRPF डोंगराच्या पुढे डाव्या बाजुला हा लांबलचक ‘सुपवती डोंगर’ दिसतो. तसेच एक्सप्रेसवेवर उर्से टोलनाका ओलांडला की ‘सुपवती डोंगर’ उजवीकडे दिसतो. घोरावडेश्वरचा डोंगर, लिंब फाट्यामागचा चौराई देवीचा डोंगर (हा डोंगरही नितांतसुंदर आहे) हे छोटे मोठे डोंगर बघून झाले असतील तर हा सुपवती डोंगर त्यापूढचा भारी ट्रेक आहे. Supwati Mountain Trek Talegaon Pune

असंच एका सुट्टीच्या दिवशी ह्या सुपवती डोंगरावर जायचं ठरलं. त्यानुसार आम्ही चौघे मित्र डोंगराच्या पायथ्याला सकाळी ६ ला पोहोचलो. पायथ्याला वरदायिनी मंदिरामागे गाड्या लावून चढायला सुरुवात केली. चढायला सुरुवात केल्यावर काही अंतरावरच उजवीकडे एक छोटीसी गुहा/कपार बघायला मिळते. जास्त आतमध्ये न जाता आल्या वाटेने परत येऊन वर चढायला चालू केलं. Supwati Mountain Trek Talegaon Pune

WhatsApp Group Join Now

डोंगरावर चढायला सोपी पायवाट आहे. सूर्योदय बघत, फोटो काढत अर्ध्या तासात आम्ही छोट्या पठारावर येऊन पोहोचलो. डोंगरावर आठ-दहा कौलारू घरांचं/झोपड्यांचं डोंगरवाडी हे छोटंसं गाव आहे. शाळकरी विद्यार्थीनी शाळेत जायला डोंगर खाली उतरत होत्या. आपण जरी चढता उतरताना अडखळत असलो तरी ही मुलं सराईतपणे इथुन वावरत असतात. डोंगरावरून खाली गावात शाळेत ये जा करणं हा त्यांचा नित्यक्रम असतो. दररोज वाडीतील लोक, लहान मुले इथून वावरतात. वाडीतील पुरुष मंडळी जनावराचं दुध विकण्यासाठी या वाटेवरून खाली गावात जातात.

डोंगराच्या पायथ्याला टोलेजंग इमारती आणि उच्चभ्रू जमात असली तरी इथं डोंगरवाडीत कुडाच्या भिंतीच्या झोपड्या आणि जुनं राहणीमान दिसतं. सध्याच्या जगात पटत नसलं तरी हे समाजातील विरुद्ध चित्र येथे दिसुन येतं.

Supwati Mountain Trek Talegaon Pune
सुंदर असं डोंगरवाडी गाव

 

डोंगरावरून एका बाजूला दूरवर पसरलेलं आणि विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत चाललेलं तळेगाव शहर आणि जुना पुणे मुंबई हायवे तर दुसऱ्या बाजूला लांबलचक पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि मागे उर्से एमआयडीसीतल्या कंपन्या दिसतात. तिथून उर्सेच्या दिशेनं थोडंसं खाली उतरून गेलं की एक छोटीशी सुंदर गुहा आणि त्यात महादेवाचं मंदिर दिसतं. ही गुहा छोटीशी असली तरी पूर्णपणे उघडी आणि हवेशीर आहे. इथे जरावेळ बसुन मन प्रसन्न होऊन जातं. तिथुन परत मागे वर चढून आलं की पुढे डोंगरवाडी लागते. गावातील गाई म्हशी इथल्या मोकळ्या रानात निवांत चरत बसलेले दिसतात. Supwati Mountain Trek Talegaon Pune

 

Supwati Mountain Trek Talegaon Pune
गुहेतील शिवमंदिर

 

गावात बायकांची सकाळच्या घरकामाची लगबग सुरु होती. काही तरुण झोपड्यांच्या बाहेर अजूनही साखरझोपेत होते. खुराड्यातल्या कोंबड्या बाहेर येऊन इकडेतिकडे पळत होत्या. कुत्री आमच्याकडे खुन्नस देऊन बघत होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे चालत राहिलो. वाडीतून पुढे गेलं की एक छोटीशी विहीर दिसली. खालून कुठुनतरी पाईपनं पाणी आणून ह्या विहिरीत सोडलं जातं. गावातल्या बायका इथेच बाजूला कपडे धुतात, तर जनावरं पाणी प्यायला इथेच येतात. तिथल्या म्हशींना पाणी पाजणाऱ्या तरुणाला रस्ता विचारुन आम्ही पुढे निघालो.

पुढे एका करवंदाच्या जाळीत एक हरीण निवांतपणे चरत होतं. आम्ही बराचवेळ दुरून बघत होतो. त्याला आमची चाहूल लागली आणि क्षणात त्यानं धूम ठोकली, पुढं जाऊन झुडपातून आमच्याकडे वळून बघून ते  झाडीत गायब झालं. इथे मोठ्या प्रमाणावर करवंदाच्या जाळ्या दिसतात. बाकीही बऱ्याच प्रकारची झाडी झुडपं इथं आढळतात. Supwati Mountain Trek Talegaon Pune

हे देखील वाचा- केंजळगड- कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा सुंदर किल्ला Kenjalgad Fort Trek Marathi 2024

पुढं जाऊन दोन छोटे डोंगर चढून गेलो की आपण एका मोठ्या विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचतो. डावीकडे लांबलचक एक्सप्रेस वे आणि मस्तपैकी पॅनोरमिक दृश्य दिसतं. पुढे थोडंसं खाली उतरून वर चढून गेलं की डोंगरमाथ्यावर छोटेखानी वाघजाई देवीचं मंदिर लागतं. फरश्या टाकून आणि पत्र्याचं शेड टाकून या मंदिराची व्यवस्था केली आहे. खालच्या आसपासच्या गावातल्या लोकांचं हे ग्रामदैवत आहे त्यामुळे यात्रेच्या दिवशी इथे मोठी गर्दी असते. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणावर ऐकू येत होता. फोटोग्राफीसाठी हा डोंगर म्हणजे एक जबरदस्त ठिकाण आहे. पावसाळ्यात सुंदर निसर्गदृश्ये आणि रानफुलांचा नजारा अनुभवायला इथं नक्की यावं असा हा मनमोहक परिसर आहे. Supwati Mountain Trek Talegaon Pune

Supwati Mountain Trek Talegaon Pune
सुपवती डोंगरावरून दिसणारा घोरावडेश्वर आणि चौराई डोंगर, एक्सप्रेसवे, उर्से टोलनाका व आजुबाजूचा परिसर

 

मंदिराच्या मागून झाडीतून थोडंसं वर चढून गेलं की आपण या डोंगराच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. पश्चिमेला दूरवर पवना धरण, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तुंग किल्ला ,तिकोना किल्ला, मोरगिरी किल्ला आणि वातावरण स्वच्छ असेल तर सिंहगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. तसेच मावळातले बरेच डोंगर इथुन नजरेस पडतात. थोडं थांबून, नाश्ता करून आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली. आणि दुपारच्या बारा वाजेपर्यंत आपापल्या घरी परत आलो. Supwati Mountain Trek Talegaon Pune

सुपवती डोंगराबद्दल एक खास गोष्ट म्हणजे दुर्गप्रेमी, आणि जेष्ठ साहित्यिक गो. नि. दांडेकर सर ज्यावेळी तळेगावात वास्तव्यास होते, तेव्हा त्यांनी आपल्या घरातुन सुपवती डोंगर नित्य दिसेल अशा ठिकाणीच घर घेतले होते. तिथे बसूनच त्यांनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलं होतं. त्यामुळे या डोंगराला एक विशेष महत्व आहे.

तर अशा प्रकारे सुपवती डोंगर हा एक मस्त आणि एखाद्या किल्ल्याच्या चढाईच्या तोडीचा सुंदर ट्रेक आहे. इथं मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आणि विविध प्रकारचे पक्षी देखील पाहायला मिळतात. हे सौंदर्य अनुभवायला एकदा तरी नक्कीच इथे भेट द्या.

हे देखील वाचा- Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary In Marathi भिगवण मध्ये होतंय परदेशी पक्ष्याचं आगमन

सुपवती डोंगरावर कसे जाल? How To Reach At Supawati Mountain Trek Talegaon Pune

जुन्या पुणे मुंबई हायवेवर सोमाटणे फाटा टोलनाका ओलांडुन ८ किमी पुढे गेलं कि डाव्या बाजूला भेगडे मंगल कार्यालय आणि त्यापुढे समर्थ मावळ मिसळ लागते. (वडगावचे प्रसिद्ध शिवराज हॉटेल याच्या बरोबर पुढेच आहे.) तिथुन डाव्या बाजूला आत वळून गेल्यावर गावातून रस्त्याने एक दीड किमी अंतरावर जात आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो. इथेच गाड्या लावुन चढायला सुरुवात करावी. मोटारसायकली लावण्यासाठी इथे पुरेशी जागा आहे तसेच चारचाकी लावण्याकरिता देखील मोजकी जागा उपलब्ध आहे. बाजूलाच गावातील घरं आहेत, तिथे बोलून आपण आपल्या चारचाकी गाड्या पार्क करू शकता.

Supwati Mountain Trek Talegaon Pune

खादाडी-

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून सुपवतीला जाण्यासाठी आत वळताना त्याच ठिकाणी ‘मावळची प्रसिद्ध समर्थ मिसळ आणि मटकी भेळ’ हे छोटंसं हॉटेल आहे. इथे मिसळ आणि मटकी भेळ चांगली मिळते. तर त्याच्या बरोबर पुढेच मावळातला मांसाहारासाठी आणि बुलेट थाळी साठी प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध शिवराज ढाबा आहे. इथे मांसाहार प्रेमी आवर्जून हजेरी लावतात. तसेच थोडे पलीकडेच ‘तांबडा पांढरा’ हे हॉटेल देखील चांगले आहे.

Supawati Mountain Trek Talegaon Maval Pune

Supawati Mountain Chourai Hills, Ghorawadeshwar Mountain, Bhatrashi Mountain ही मावळात असलेली डोंगर रत्ने आवर्जून भेट देण्याजोगी आहेत.

 

१)चौराई डोंगर- Chourai Hill/ Temple

चौराई डोंगर ही छोटी टेकडी तळेगावला जुन्या मुंबई पुणे रस्त्याला लागुन असुन टेकडीवर ग्रामदेवता चौराई देवीचे छोटे सुंदर असे मंदिर आहे. डोंगरावर जायला दोन वाटा असुन दोन्ही सोप्या आहेत. आसपासचे लोक शनिवारी रविवारी इथे आवर्जून भेट देतात.  नगरपरिषदेने देवीच्या मंदिराशेजारी पाण्याची वगैरे उत्तम सोय केलेली असुन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे. तसेच निसर्गप्रेमींनी देखील डोंगरावर झाडे लावलेली असुन ते त्यांची खास काळजी घेतात.

Supwati Mountain Trek Talegaon Pune

२)घोरावडेश्वर मंदिर Ghorawadeshwar Hill/ Temple

घोरावडेश्वर हा उंचच उंच डोंगर जुन्या मुंबई पुणे रस्त्याला लागुन सोमाटणे टोल नाक्याच्या बाजूला उभा आहे. डोंगरावर जायला दोन-चार बाजूंनी वाटा असुन शनिवारी रविवारी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. डोंगरावर गुहेत शंकराचं सुंदर मंदिर असुन बाजूला काही गुफेंमध्ये अर्धवट लेण्या पाहायला मिळतात. डोंगरावर विविध निसर्गप्रेमी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले असुन त्यांची काळजी देखील घेतली जाते.

मागील काही वर्षांपूर्वी या डोंगरावर मागच्या बाजूस असलेल्या अग्निजन्य गुहेचा शोध लागला असुन तीही नक्की भेट देण्याजोगी आहे. डोंगरावरून मावळचा मोठा परिसर तसेच मागील बाजुने गहुंजे इथे असलेले क्रिकेट स्टेडीयम दिसते.

 

कामशेतच्या बाजूला असलेल्या भातराशी डोंगराला भेट द्यायची असेल तर हे वाचा- Bhatrashi Mountain Pune भाताच्या राशीसारखा दिसणारा भातराशी डोंगर

तर वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. जेणेकरून अशी दुर्मिळ आणि सुंदर भटकंती विषयक माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत जाऊ. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाच्या पेजवर आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील नक्की जॉईन व्हा.

Supwati Mountain Trek Talegaon Pune

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग

 

1 thought on “Supwati Mountain Trek Talegaon Pune भटकंती मावळातल्या अवाढव्य सुपवती डोंगराची”

Comments are closed.