Sandhan Valley Dari Information In Marathi सांधण दरी- नगर जिल्ह्यातील एक अद्भुत आश्चर्य जे आहे जगभरात प्रसिद्ध

सांधण दरी- नगर जिल्ह्यातील एक अद्भुत आश्चर्य जे आहे जगभरात प्रसिद्ध

सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्नच जणु. सुट्टी मिळाली आणि फिरायला जायचं म्हटलं की निसर्ग प्रेमी आणि गिर्यारोहकांना सर्वात आधी सह्याद्री आठवतो. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणं नेहमीच ट्रेकर्सना, पर्यटकांना भूरळ घालत असतात. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे भटक्यांचा स्वर्गच म्हणावा लागेल. या सुंदर तालुक्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेलं आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई, अलंग मदन कुलंग हे त्रिकुट तसेच आजोबा डोंगर आणि यासोबतच आशिया खंडातील दुसरी मोठी दरी म्हणून प्रसिद्ध असलेली साम्रद येथील सांधण दरी ही ठिकाणं या भागाची प्रमुख ओळख आहेत. Sandhan Valley Dari Information In Marathi

 

आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी Sandhan Valley The Wonder Of Sahyadri/ Second Biggest Valley Of Asia 

ट्रेकर्स मध्ये सांधण दरी हे नाव खास असलं तरीही महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना अजूनही सांधण दरीबद्दल माहिती नाही. निसर्गाच्या कुशीत दडलेलं आणि आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी अशी ओळख असलेलं हे ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’ हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील साम्रद या गावातून पुढे दीड-दोन किमी पसरलेली ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते.

WhatsApp Group Join Now

भौगोलिक उलथापालथ झाल्यामुळे जमिनीला पडलेली विशाल भेग आणि त्यामुळे तयार झालेली ही २०० ते ४०० फुट खोल आणि सुमारे २ किमी लांब अशी ‘सांधण दरी’ निसर्गातील एक अनोखं आश्चर्य आहे. दोन्ही बाजूला उंचच उंच कातळ आणि त्यातून पाणी आणि अजस्र खडकांवरून मार्ग काढत हा २ किमीचा थरारक ट्रेक करणं म्हणजे निव्वळ जबरदस्त आहे.

Sandhan Valley Dari Information In Marathi

 

सांधण दरीला भेट देण्यासाठी योग्य वेळ Best Time To Visit Sandhan Valley

पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि दगड कोसळण्याचा धोका असल्यामुळे इथे जाणे अशक्य असते. उन्हाळा हा सांधण दरीला जाण्याचा उत्तम कालावधी आहे. दरीत पाणी कमी असते आणि इथला मोहक असा ऊन सावल्यांचा खेळ बघण्याजोगा असतो. दरीमध्ये दोन ठिकाणी पाण्याचे खड्डे बघायला मिळतात. उन्हाळ्यातही इथे ४ ते पाच फुट खोल पाणी असतं. तर हिवाळ्यात ही पातळी वाढलेली असते.

हे देखील वाचा- Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट या हिंदू मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी 2024

सांधण दरीला कसे पोहोचाल? How To Reach Sandhan Valley?

‘सांधण व्हॅली’ला पोहचण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या बाजुने जात साम्रद या गावी जावे लागते.

पुण्यावरुन जाण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी(भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. तर मुंबईकरांसाठी कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोहचता येते. तर नाशिकहूनही घोटीमार्गे येथे पोहचता येते.

Sandhan Valley Dari Information In Marathi

 

सांधण दरीत काय काय बघायला आहे? Activities To Do At Sandhan Valley In Marathi

साम्रद गावातून १० मिनिटात सांधण दरीला पोहोचता येते. दरीतून जाताना आपल्याला साचलेले दोन पाणवठे पार करत पुढे जावे लागते. इथे उन्हाळ्यात देखील ४-५ फुट खोल पाणी असते. जसजसे आपण पुढे जातो तसे दोन्ही बाजुंनी असणारे कातळकडे जवळ जवळ येऊ लागतात. सरासरी १५० फुट असणारे हे कडे काही ठिकाणी वरच्या बाजूस एकमेकांना चिकटलेले दिसतात.

दरीत अर्धा तास प्रवास केल्यावर आपण एका टोकावर येतो. इथून पुढे भलेमोठे खडकच खडक दरीत पडलेले दिसतात. या खडकांवरून रोमांचकरित्या उतरत साधारण तास दिड तासात आपण पहिल्या कातळटप्प्याजवळ पोहोचतो. इथे ४५ फुटांचा उभा कातळकडा आहे. इथून दोराच्या सहाय्याने rappeling करत खाली उतरावं लागतं. तांत्रिक बाबींची माहिती नसेल तर इथपर्यंत येऊन आपण माघारी फिरू शकतो. भर उन्हाळ्यात दरी पार करताना सोबत पुरेसं पाणी सोबत बाळगावे.

इथून खाली उतरून गेल्यावर असेच मोठ्ठाले खडक आणि दगडाच्या पोकळीतून थरारक प्रवास करत, कातळ उतरत आपण एका सपाट कातळावर येऊन पोहोचतो. ट्रेकर्स इथे रात्रीचा मुक्काम करतात. इथून खाली उतरत नदीच्या पत्रातून चालत जात करोली घाट चढत २ ते ३ तासात साम्रद गावात पोहोचता येते. Sandhan Valley Dari Information In Marathi

सांधण दरीत Cliff Camping, Giant Swing सारखे साहसी प्रकारदेखील अनुभवता येतात.

सांधण दरी इथे राहण्याची व जेवणाची सोय Stay And Food Facility At Sandhan Valley In Marathi-

सांधण दरीत एका कातळावर मुक्काम करता येतो. टेंट लावून इथे राहण्याची सोय होऊ शकते. तर साम्रद गावात स्थानिकांच्या घरात अथवा उघड्यावर तंबू लावून मुक्कामाची सोय करता येते. तसेच गावातील शाळेत आणि मंदिरात देखील सोय होऊ शकते.

साम्रद गावात मोठे हॉटेल्स नसले तरी जेवणाची उत्तम सोय होते. गावात वाटाडे/गाईड मिळतात. आपण त्यांच्या मदतीने जेवणाची आणि ट्रेकची सोय करू शकतो.

हेही वाचा-काजवा महोत्सव २०२४ झाला सुरु

Sandhan Valley Dari Information In Marathi

 

सांधण दरीच्या आसपास बघण्यासारखी ठिकाणे Places To Visit Near Sandhan Valley Akole In Marathi-

साम्रद गावातून आणि सांधण दरीपासून रतनगड, आजोबा डोंगर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा धरण, बाण सुळका, रंधा धबधबा, अलंग मदन कुलंग ही ठिकाणं जवळ आहेत. Sandhan Valley Dari Information In Marathi

१)अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी Amruteshwar Temple, Ratanwadi In Marathi

साम्रद गावाला जायच्या आधी रतनवाडी लागते. तिथे अमृतेश्वर नावाचे सुंदर शिवमंदिर आहे. हे मंदिर १२०० वर्षांहून अधिक जुने आहे. हे सुंदर मंदिर शिलाहार वंशाच्या शासकांनी ९ व्या शतकात बांधले होते. झांज राजाने बांधलेल्या बारा शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर सांधण दरीपासून ४ किमी अंतरावर आहे.

Sandhan Valley Dari Information In Marathi

२)रतनगड किल्ला Ratangad Fort In Marathi

रतनगड हा सह्याद्रीतील एक नितांतसुंदर किल्ला आहे. निसर्गाने मनसोक्त उधळण केलेल्या या किल्ल्याला भेट देणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभव असतो.

रतनगड किल्ला सांधण दरीपासून ३ किमी अंतरावर आहे.

३)भंडारदरा धरण Bhandardara Dam In Marathi

प्रवरा नदीवर असलेले भंडारदरा धरण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सुंदर निसर्ग बघण्यासाठी पर्यटक इथे कायम गर्दी करतात. विविध मराठी, हिंदी चित्रपटांचे येथे चित्रीकरण झालेले आहे. तसेच इथला निसर्ग कॅमेऱ्यात टिपण्यासाठी फोटोग्राफर्स आवर्जून हजेरी लावतात. रंधा धबधबा, अम्ब्रेला धबधबा असे प्रसिद्ध धबधबे देखील इथे पाहता येतात.

सांधण दरीपासून भंडारदरा २५ किमी अंतरावर आहे.

Sandhan Valley Dari Information In Marathi

४)कळसुबाई शिखर Kalsubai Peak In Marathi

महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर ‘कळसुबाई’ अकोले तालुक्यात असुन समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. पायथ्याच्या गावातून शिखरावर जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

भंडारदरा धरणापासून कळसुबाई १५ किमी तर सांधण दरीपासून ३२ किमी अंतरावर आहे.

५)अलंग मदन कुलंग किल्ले Alang madan Kulang Forts In Marathi

अलंग मदन कुलंग अर्थात AMK म्हणून ट्रेकर्स मध्ये प्रसिद्ध असलेले हे त्रिकुट सह्याद्रीतील दुर्गम भागात असुन ट्रेकिंग साठी अत्यंत कठीण श्रेणीत मोडते. आपण अनुभवी असाल तरच या किल्ल्यांना भेटी द्या.

सांधण दरीपासून हे ९ किमी अंतरावर आहे.

Sandhan Valley Dari Information In Marathi

६)हरिश्चंद्रगड किल्ला Harishchandragad Fort In Marathi

ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड किल्ला सह्याद्रीतील दुर्गम भागात असुन त्यावरील अर्धगोलाकार आकारात असलेल्या कोकणकड्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे. माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला हरिश्चंद्रगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यांच्या सीमेवर हा किल्ला वसलेला आहे. या जिल्ह्यांच्या सीमा एकत्र येतात तिथुन सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते. या रांगेला हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या  असलेल्या या सह्याद्रीच्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड किल्ला आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४००० फुट असुन हा किल्ला चढाईच्या बाबतीत मध्यम श्रेणीत मोडतो. इथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा अप्रतिम आहे.

हरिश्चंद्रगड किल्ला सांधण दरीपासून ७० किमी अंतरावर आहे.

Sandhan Valley Dari Information In Marathi

 

चला तर मग भटक्या मित्रांनो, कधी करताय सांधण दरीचा ट्रेक? पावसाळ्यात मात्र हे ठिकाण टाळा. पण अकोले तालुक्यात वर दिल्याप्रमाणे भरपूर सुंदर ठिकाणं आहेत, ती आवर्जून बघा.

हेही वाचा- Kharosa Caves Latur Maharashtra लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर -Hidden Beauty Of Latur 2024

मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आम्ही आपल्यापर्यंत अशीच सविस्तर आणि खास माहिती घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या ब्लॉगला भेट देत चला. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर देखील कळवू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी या साईटवर whatsapp किंवा फेसबुकचा आयकॉन दिसेलच.

तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

Sandhan Valley Dari Information In Marathi

1 thought on “Sandhan Valley Dari Information In Marathi सांधण दरी- नगर जिल्ह्यातील एक अद्भुत आश्चर्य जे आहे जगभरात प्रसिद्ध”

Comments are closed.