Places To Visit In Solapur Marathi महाराष्ट्राच्या आग्नेय भागात वसलेले, सोलापूर हे सीना आणि भीमा खोऱ्यात वसलेले ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. या शहराच्या नामकरणामागे अनेक कथा आहेत. सुरुवातीला असे मानले जात होते की हे शहर सोळा वेगवेगळ्या खेड्यांमध्ये पसरलेले आहे, तर काही जुन्या शिलालेखांवरून सनलपूर आणि संदलपूर ही याची मूळ नावे असल्याचं दिसुन येतं.
सोलापूर जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागात येत असुन जिल्हा मुख्यालय सोलापूर इथे आहे. सोलापूरच्या उत्तरेस अहमदनगर, उत्तर व पूर्वेला धाराशिव, दक्षिणेस कर्नाटक राज्य, दक्षिण पश्चिमेस सांगली तर पश्चिमेस पुणे व सातारा हे जिल्हे आहेत.सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत. सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ व पंढरपुर हे तालुके सोलापूर जिल्ह्यात येतात.
सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी भीमा असुन पंढरपुरात तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. याशिवाय बोरी, सीना, मान इत्यादी नद्या आहेत. यातील भीमा नदीवर उजनी हे धरण बांधण्यात आलेले आहे.
आज महाराष्ट्रातील हे मुख्य शहर कापूस उत्पादक गिरण्या आणि यंत्रमागांचे प्राथमिक केंद्र आहे आणि कापडासाठी प्रसिद्ध आहे आणि ते व्यावसायिकांसाठी मुख्य प्रवासाचे ठिकाण बनले आहे. सोलापूर शहर टॅनिंग, लोकर विणकाम, सुतारकाम, तेल गिरण्या, बांबू, दोरी, मातीची भांडी तसेच चामड्याच्या कामासाठी ओळखले जाते. आज आपण पाहणार आहोत सोलापूर मधील काही प्रसिद्ध ठिकाणं जी तुम्ही सोलापुरात गेल्यावर नक्कीच पाहायला हवीत.
Places To Visit In Solapur Marathi
१)सिद्धेश्वर मंदिर Siddheshwar Temple, Solapur
सिद्धेश्वर मंदिर ही सोलापूरची एक प्रमुख ओळख आहे. जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते. संक्रातीच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो. या कालावधीत जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यांमधील अनेक भाविकही इथं मोठी गर्दी करतात. सिद्धेश्वर मंदिराचा परिसर हा १४ व्या शतकात पूर्ण केला असावा. तसंच सध्याचे मंदिर हे पेशवेकालीन आहे, असे मानले जाते. या मंदिरातील कमानी, शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मुर्ती आणि काही प्रमाणात कोरीव काम हे सर्व पेशवेकालीन मंदिरांमध्ये आढळते. Places To Visit In Solapur Marathi
मंदिराला लागून असलेला सिद्धेश्वर तलाव हे इथलं प्रमुख आकर्षण आहे. या तलावाचे सौंदर्य पाहणे, तलावात नौकानयन करणे आणि सायंकाळी तलावात फुललेली कमळे आणि मुक्त विहार करणारे मासे पाहणे, हा एक आगळावेगळा अनुभव असतो. या तलावामुळे या परिसराच्या सौंदर्यात अनोखी भर पडली आहे.
सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अंतर – २ किमी
२)सोलापूर भुईकोट किल्ला Solapur Fort
सोलापुरात भुईकोट किल्ला असुन भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर १९३० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींचे राज्य उद्ध्वस्त झाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपला वेगवेगळा कारभार सुरू केला. या पाचही राजवटींच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणून सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले. Places To Visit In Solapur Marathi
सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अंतर-२ किमी
३)ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य Great Indian Bustard Sanctuary
१९७९ मध्ये स्थापित हे अभयारण्य, महाराष्ट्राचे जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते. हे अभयारण्य माळढोक पक्ष्यांसाठी एक वन्यजीव अभयारण्य आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्ये माळढोक अभयारण्याची घोषणा केली. या अभयारण्यात सोलापूर जिल्ह्याचे उत्तर सोलापूर, माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्याचे काही क्षेत्र व अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत, श्रीगोंदा व नेवासा तालुक्यातील काही क्षेत्राचा समावेश आहे.
सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अंतर- २३ किमी Places To Visit In Solapur Marathi
हे देखील वाचा- दुष्काळी मराठवाड्यातील पावसाळी पर्यटन, मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
४)सोलापूर विज्ञान केंद्र Solapur Science centre
२०१० मध्ये या सायन्स सेंटरची येथे सुरुवात झाली असली तरी याची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. येथे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून काही उत्सुकतावर्धक अशा विज्ञान खेळांची माहितीही दिली जाते. ५ वर्षांच्या आतील मुलांना पूर्णत: मोफत तर शालेय विद्यार्थ्यांना अर्ध्या किमतीत आणि इतरांना प्रत्येकी ४० रुपये इतके माफक शुल्क आहे.
सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अंतर-१० किमी
Places To Visit In Solapur Marathi
५)अक्कलकोट स्वामी मंदिर Akkalkot Swami Temple
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट शहर प्रसिध्द आहे. अक्कलकोट सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्ताचा अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पुजली जाते. दर वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकभक्त नित्य नेमाने इथे भेट देतात.
सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अक्कलकोटचे अंतर- ३८ किमी
यासोबतच हिप्परगा तलाव हा तलाव सोलापुरातील एक प्रमुख स्थळ आहे. या तलावाचे पाणी सोलापूर शहरासाठी वापरले जाते. स्मृती उद्यान हे उद्यान देखील सोलापूर शहरातील प्रसिद्ध उद्यान आहे.
Places To Visit In Solapur Marathi
तसेच तुळजापूर आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्र इथून जवळ असल्यामुळे आपण तीही नक्कीच बघू शकता.
यासोबतच सोलापूर हे जैन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. पारसनाथ जैन मंदिर, मल्लिकार्जुन जैन मंदिर आणि आदिनाथ जैन मंदिर ही इथली प्रसिद्ध जैन मंदिरं आहेत.
सोलापूरची सीमा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला लागून आहे. अशाप्रकारे, हे मिश्र संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते आणि पर्यटक आणि प्रवाशांचे खुले हात आणि आदरातिथ्य सह स्वागत करते. कर्नाटक सीमा लागून असल्यामुळे इथं मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषा आपल्याला पाहायला मिळतात.
कपडे आणि दागिन्यांसाठी लोकप्रिय असलेल्या या शहरात तुम्ही जात असाल तर खरेदी करणे आवश्यक आहे. सोलापूरी चादर ही जगप्रसिद्ध आहे हे तर आपल्याला माहितीच आहे.
हे देखील वाचा- लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर
खादाडी- सोलापुरात प्रसिद्ध असणारे खाद्यपदार्थ Famous Food In Solapur-
सोलापुरात कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी खुप प्रसिद्ध आहे. सोलापुरात आल्यावर स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये सहज उपलब्ध असलेले खारा मटण, शेंगदाण्यापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या चटण्या आवर्जुन खाव्यात.
यासोबतच सोलापूर शहराच्या आजूबाजूला देखील फिरण्यासाठी बरीच प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणं Places To Visit Near Solapur In Marathi
१)तुळजापूर Tuljapur-
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले तुळजाभवानी मातेचे मंदिर तुळजापूर इथे असुन भाविक भक्त इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. सोलापूर पासुन जवळ असल्यामुळे सोलापूरला येणारे पर्यटक/भाविक तुळजापूरला देखील जातात.
सोलापूर पासुन तुळजापूर अंतर Distance Of Tuljapur From Solapur- ४६ किमी
२)पंढरपुर Pandharpur-
विठ्ठल रुक्मिणी मंदिर असलेल्या पंढरपुरात आषाढी व कार्तिकी एकादशी दिवशी राज्यभरातून वारकरी भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून दर्शनासाठी येतात. तसेच वर्षभर सतत भाविक आणि वाऱ्या इथे येतच असतात. पंढरपुर हे भारताची दक्षिण काशी आणि महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुनही प्रसिद्ध आहे.
सोलापूर पासुन पंढरपुर अंतर Distance Of Pandharpur From Solapur- ७० किमी
३)अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर Akkalkot Swami Samarth Temple-
स्वामी समर्थांचे स्थान असलेले अक्कलकोट खूप प्रसिद्ध आहे. दत्ताचे अवतार मानल्या गेलेल्या स्वामी समर्थांची समाधी इथे असुन राज्यभरातून स्वामी भक्त गर्दी करतात. दर वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यावेळी राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त भेट देतात.
सोलापूर पासुन अंतर Distance Of Akkalkot From Solapur- ३८ किमी
४)करमाळ्याची कमला देवी Kamala Devi Temple Karmala-
श्री कमला देवीच्या मंदिरामुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे शहर प्रसिध्द झाले आहे. मंदिरात ९६ संख्येला विशेष महत्व बघायला मिळते. श्री रावराजे निंबाळकर यांनी सन १७२७ साली श्री कमला भवानीचे मंदिर बांधले. करमाळ्याच्या कमला देवीच्या मंदिराला तुळजापूरच्या तुळजा भवानी देवीचे दुसरे पीठ म्हणून संबोधले जाते. हेमाड पंथी शैलीत बांधलेल्या या मंदिराला दक्षिणपूर्व व उत्तरेला प्रवेशद्वार आहेत. या मंदिराची विशेषता म्हणजे मंदिरासमोर असलेल्या विहिरीला ९६ पायऱ्या आहेत. तसेच मंदिरात ९६ ओवऱ्या आहेत. मंदिरातील छतावर ९६ चित्र रेखाटले गेले आहेत आणि मंदिरात एकूण ९६ खांब देखील आहेत.
सोलापूर पासुन अंतर Distance Of Karmala From Solapur- १२५ किमी
५)सयाजीराजे पार्क अकलुज Sayajiraje water Park Akluj
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ख्याती असलेल्या अकलुज इथे सयाजीराजे वाटरपार्क आहे. इथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची सोय आहे. पाण्यातील विविध मनोरंजक खेळांसोबतच झोपाळे, खेळणी इत्यादी गोष्टी आहेत.
सोलापूर पासुन अकलुज अंतर- ११५ किमी
Places To Visit In Solapur Marathi
वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर मेल द्वारे कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये आवर्जून शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.
टीम Firastaa- Marathi Travel Blog
हेही वाचा- पुण्यातील प्रसिद्ध १० ठिकाणं
मस्त