Places To Visit In Satara
सातारा हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले जिल्ह्याचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले हे शहर आणि त्याच्या आजूबाजूचे प्रदेश पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचे केंद्र आहेत. सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरे, नैसर्गिक धबधबे, अभयारण्ये आहेत जी देशभर प्रसिद्ध आहेत. विशेष सुरात बोलली जाणारी गोडतिखट सातारी भाषा, साताऱ्याचे कंदी पेढे या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या साताऱ्याच्या प्रमुख गोष्टी. तसेच पर्यटनाच्या बाबतीत कायमच अग्रेसर असणाऱ्या साताऱ्यात काय काय बघायला आहे याबद्दल आपण माहिती घेऊयात.
Satara Tourist Places
१)सज्जनगड किल्ला Sajjangad Fort
समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड किल्ला पायथ्याशी असलेल्या परळी गावामुळे ‘परळीचा किल्ला’ म्हणुनही ओळखला जातो. सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर कायमच्या वास्तव्यासाठी आले होते. गडावर समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा आहेत. तिथे राहण्याची सोय होते. सज्जनगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १०८० मीटर उंचीवर आहे आणि येथून सातारा शहराचे आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे मनोरम दृश्य पाहायला मिळते.
सातारा शहरापासून सज्जनगड किल्ला १७ किमी अंतरावर आहे.
२)नटराज मंदिर Natraj Temple, Satara
सातारा जिल्ह्यातील नटराज मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या नटराज स्वरूपाला समर्पित आहे. हे मंदिर म्हणजे तमिळनाडूमधील चिदंबरम इथे असलेल्या प्रसिद्ध नटराज मंदिराची प्रतिकृती आहे.
मंदिराच्या आजूबाजूला सुंदर निसर्ग असुन इथे येणाऱ्या भाविकांना शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. नटराज मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना प्राचीन काळातील हिंदू संस्कृतीचा थेट अनुभव मिळतो. या मंदिराचे स्थापत्य हे तमिळनाडूमधील मंदिरांच्या स्थापत्यशैलीवर आधारित आहे. मंदिराचा गाभारा, भगवान शिवाची नटराज रूपातील मूर्ती आणि गाभाऱ्याभोवतालचे कलात्मक नक्षीकाम हे अतिशय भव्य आणि सुंदर आहे. नटराजाचे नृत्य मुद्रेतील रूप मंदिरात प्रतिष्ठापित केले गेले आहे, ज्यात भगवान शिवाच्या तांडव स्वरूपाचे दर्शन होते.
सातारा शहरापासून नटराज मंदिराचे अंतर- २.५ किमी
Places To Visit In Satara
३)अजिंक्यतारा किल्ला Ajinkyatara Fort
अजिंक्यतारा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला ‘सातारचा किल्ला’ म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरातून कुठूनही हा किल्ला नजरेस पडतो.
हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला होता आणि त्यांच्या साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अजिंक्यतारा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर आहे आणि येथून सातारा शहराचे आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे मनोरम दृश्य पाहायला मिळते. किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक इमारती आणि तटबंदी आहेत, ज्या त्याच्या भव्यतेची साक्ष देतात.
सातारा शहरापासून अंतर- ४ किमी
४)श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय Shivaji Museum, Satara
श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय हे सातारा शहरातील एक प्रसिद्ध संग्रहालय आहे. सन १९७० मध्ये बनवलेल्या या संग्रहालयात महाराष्ट्राच्या इतिहासामधील अनेक महत्त्वाच्या वस्तू आणि दस्तऐवज साठवलेले आहेत. संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर मराठा सरदारांच्या जीवनावरील प्रदर्शने आहेत. श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा थेट अनुभव बघायला मिळतो.
मराठा संस्कृती आणि महान शासकांना समृद्ध करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी हे संग्रहालय १९७० साली बांधण्यात आले होते. हे विशिष्ट संग्रहालय प्रामुख्याने दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे – मराठा आर्ट गॅलरी आणि प्रदर्शनी वस्तू. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, पोशाख, कलाकृती आणि इतर साहित्य देखील आपण या संग्रहालयात पाहू शकतो.
अतिशय माफक शुल्कात आपण या संग्रहालयाची सहल करू शकतो.
साताऱ्यापासून श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय हे अंतर २ किमी आहे.
Places To Visit In Satara
५)पाटेश्वर मंदिर आणि लेणी Pateshwar Temple, Satara
सातारा शहरापासून १४ किमी अंतरावर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पाटेश्वर हे महादेवाचे अप्रतिम मंदिर व लेण्या आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरामध्ये विविध आकारांच्या तसेच विविध प्रकारच्या असंख्य महादेवाच्या पिंडी इथे बोटाच्या आकारापासून ते ४ फुट उंचीच्या आकाराच्या बघायला मिळतात. या पिंडीच्या कोरीव कामात देखील बरीच विविधता आढळते. Places To Visit In Satara
हे ठिकाण सातारा शहरापासून जवळ असले तरी इथे जास्त वर्दळ नसते. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आणि परिसर असुन प्रत्येकाने एकदातरी नक्कीच भेट द्यावी असा आहे. मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा असल्याने इथे विविध प्रकारचे पक्षी देखील आढळतात.
साताऱ्यापासून पाटेश्वर मंदिर हे अंतर १४ किमी आहे.
६)संगम माहुली Sangam Mahuli, Satara
Places To Visit In Satara सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर स्थित असलेले हे संगम माहुली म्हणजे वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या तीर्थक्षेत्राला ‘दक्षिण काशी’ या नावानेही ओळखले जाते. महाबळेश्वरच्या पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी कृष्णा नदी तीन राज्यांमधून वाहत जात पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेत ज्या ज्या ठिकाणी कृष्णेचा संगम होतो तिथे मोठी तीर्थक्षेत्रे बघायला मिळतात. यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे संगम माहुली. इसवी सन १८६५ साली हा घाट आणि या मंदिराची बांधणी करण्यात आली. संपूर्ण दगडात बांधलेले हे मंदिर म्हणजे मराठा स्थापत्यशैलीचे एक सुंदर उदाहरण आहे.
घाटाच्या दोन्ही बाजूला मिळून १०-१२ मंदिरे आहेत. दीडशे वर्षांनंतर देखील हा घाट आणि मंदिरे सुस्थितीत आढळतात. मंदिराच्या आसपास राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या दिसतात. यातील बऱ्याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. एका कुत्र्याची समाधी देखील इथे बघायला मिळते. वाघापासून शाहू महाराजांचे रक्षण केले म्हणून ‘खंड्या’ नावाच्या कुत्र्याची समाधी इथे बांधण्यात आली आहे. इथे असणारा रथ आजही कृष्णा वेण्णा यात्रेच्या वेळी वापरला जातो. या रथयात्रेला ३०० वर्षांची परंपरा आहे. इथे देखणे असे काशी विश्वेश्वराचे मंदिर देखील बघायला मिळते.
या तीर्थक्षेत्राला बराच ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. अतिशय सुंदर असे हे ठिकाण खरोखर बघण्याजोगे आहे.
साताऱ्यापासून संगम माहुली हे अंतर ४ किमी आहे.
७)कास पठार Kaas Pluteau, Satara
एका विशाल ज्वालामुखी पठारावर वसलेलं कास पठार हे ठिकाण ‘फुलांचं नंदनवन’ किंवा ‘फुलांचे पठार’ म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेलं कास पठार हे ठिकाण खूप प्रसिद्ध असून इथे प्रत्येक वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.
इथे विविध प्रकारची व दुर्मिळ प्रकारची फुले आपल्याला बघायला मिळतात. तसेच अनेक औषधी वनस्पती देखील इथं बघायला मिळतात.
साताऱ्यापासून कास पठार २४ किलोमीटर अंतरावर आहे.
८)महाबळेश्वर Mahabaleshwar
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तसेच देशातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून दरवर्षी हिवाळ्यामध्ये इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. महाबळेश्वर मधील मनमोहक निसर्ग आणि आल्हाददायक थंड वातावरण यामुळे महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते असे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रतापगड किल्ला, वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा इत्यादी पर्यटन स्थळे आपल्याला महाबळेश्वर मध्ये बघायला मिळतात.
साताऱ्यापासून महाबळेश्वर हे अंतर ५६ किलोमीटर आहे. Places To Visit In Satara
९)प्रतापगड किल्ला Pratapgad Fort
शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आणि स्वराज्यामध्ये महत्वाची ऐतिहासिक भूमिका बजावलेला एक प्रमुख किल्ला म्हणून प्रतापगड ओळखला जातो. प्रतापगड किल्ला हे सातारा जिल्ह्यातील आणि महाबळेश्वर मधील एक ऐतिहासिक आणि प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये गडाच्या पायथ्याशी युद्ध झाले होते. ज्याठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. अनेक इतिहास प्रेमी प्रतापगडाला आवर्जून भेट देतात.
साताऱ्यापासून प्रतापगड किल्ला ७५ किलोमीटर अंतरावर आहे.
१०)लिंगमळा धबधबा Lingmala Waterfall, Satara
लिंगमळा या गावाच्या नावावरून या धबधब्याला लिंगमळा धबधबा असे म्हटले जाते. लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी २५ रुपये प्रत्येकी व्यक्ती असं शुल्क आहे. लिंगमळा धबधबा हा देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. या ठिकाणी आपल्याला लिंगमळा धबधबा आणि एक छोटा धबधबा समूह देखील बघायला मिळतो. वेण्णा नदीवर असलेले हे छोटे धबधबे बघणं म्हणजे एक सुंदर अनुभव आहे.
साताऱ्यापासून लिंगमळा धबधबा अंतर ५६ किलोमीटर आहे.
Places To Visit In Satara
११)वजराई धबधबा Vajrai Waterfall, Satara
सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या पुढे असणारा हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो.
साधारण १८०० ते १९०० फुटांच्या उंचीवरून वजराई धबधबा तीन टप्प्यात कोसळतो. कास पठारापासून हा धबधबा ५ किमी अंतरावर असलेल्या भांबवली गावाजवळ आहे. वजराई धबधब्याजवळ कास सरोवर, कास पठार, भांबवली फ्लॉवर Valley इत्यादी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. या देखण्या धबधब्याला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी. मुसळधार पावसात शक्यतो इथे जाणे टाळावे. Places To Visit In Satara
साताऱ्यापासून वजराई धबधबा २९ किमी अंतरावर आहे.
१२)वाई Wai, Satara
सातारा जिल्ह्यातील वाई हे छोटे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. अठराव्या व एकोणीसाव्या शतकात वाई हे गाव महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. त्याच्या खुणा आजही वाई मध्ये आपल्याला बघायला मिळतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू व लक्ष्मी यांची मंदिरे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. नाना फडणीस यांचा वाडा आणि प्रसिद्ध मेणवली घाट वाईपासुन जवळच आहे.
साताऱ्यापासून वाई ३६ किमी अंतरावर आहे.
१३)पाचगणी Panchgani, Satara
Places To Visit In Satara पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन अर्थात थंड हवेचे ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील असलेले पाचगणी शहर तिथल्या थंड वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. राज्यभरातून पर्यटक हिवाळ्यात पाचगणी, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी आपली सुट्टी घालवण्यासाठी येतात.
पाचगणी, वाई या सातारा जिल्ह्यातील ठिकाणी असलेली प्राचीन मंदिरे, सांस्कृतिक वारसा आणि स्वर्गीय निसर्गसौंदर्य यामुळे याठिकाणी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांचं चित्रिकरण होत असतं. बरेच सेलिब्रिटी लोक इथे सुट्या घालवण्यासाठी कायम येत असतात.
साताऱ्यापासून पाचगणी ४८ किमी अंतरावर आहे.
१४)वासोटा किल्ला Vasota Fort, Satara
वासोटा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला असुन जावळीच्या घनदाट अरण्यात वसलेला आहे. वासोट्याला जाण्यासाठी कोयना नदीवर बांधलेल्या शिवसागर जलाशयाला पार करत जावे लागते. घनदाट अरण्य आणि कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे किल्ल्याची दुर्गमता अजूनच वाढली आहे.
वासोट्याला जाण्यासाठी सातारा कास बामणोली अशा गाडी रस्त्याने बामणोली या शेवटच्या गावी जावे लागते. तिथुन बोटीने शिवसागर जलाशय ओलांडत किल्ल्यावर पोहोचता येते.
साताऱ्यापासून वासोटा किल्ला ४० किमी अंतरावर आहे.
ही झाली मोजक्या ठिकाणांची यादी. पण सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे अशी एका लेखात बसणारी नाहीयेत. यासोबतच कोयना धरण, कोयना अभयारण्य, ठोसेघर धबधबा, बारा मोटेची विहीर आणि यासोबतच असंख्य सुंदर ठिकाणे सातारा जिल्ह्यात बघायला मिळतात.
हेही वाचा- Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride मराठमोळा तरुण बाईकवरून पोहोचला थेट लंडनला
Places To Visit In Satara