‘गुलाबी शहर’ जयपुर मधील प्रसिद्ध ठिकाणं Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
भारतातील राजस्थान मधील ‘पिंक सिटी’ अर्थात गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर हे ऐतिहासिक शहर राजस्थानची राजधानी देखील आहे. हे शहर तेथील बाजारपेठ, किल्ले, मंदिरे, राजवाडे आणि राजस्थानी संस्कृती साठी खुप प्रसिद्ध आहे. जयपुर शहराचा खूप वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी, तेथील संस्कृती अनुभवण्यासाठी आणि येथील सौंदर्य आपल्या आठवणीत साठवून ठेवण्यासाठी देशभरातून तसेच जगभरातून देखील पर्यटक मोठ्या संख्येने जयपुरला येत असतात. तर चला, आपण या ऐतिहासिक शहरातील काही महत्वाच्या ठिकाणांबद्दल माहिती घेऊयात. Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
जयपूर या शहराला भेट देण्यासाठी आपल्याला भारतातील कुठल्याही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरून थेट जयपूर साठी रेल्वे मिळू शकते. तसेच देशातल्या प्रमुख शहरांतून सरकारी आणि खाजगी बसेस देखील उपलब्ध आहेत. तसेच आपण विमानाने देखील येऊ शकता. जयपूर रेल्वे स्थानक पासून मुख्य बाजारपेठ ६ किमी अंतरावर आहे. रेल्वे स्थानकावरून जयपुर मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी बस, टॅक्सी उपलब्ध आहेत. जयपूर हे शहर पूर्ण फिरण्यासाठी आपल्याला अंदाजे २ ते ३ दिवस लागतात. जयपुरमध्ये राहण्यासाठी आपल्याला हॉटेल बुकिंग करावे लागेल. जयपूरला जाण्यापूर्वी आपण हॉटेल ऑनलाईन पद्धतीने देखील बुक करू शकता. Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
खाली दिलेली ठिकाणे ही जयपूरमधील प्रमुख आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत, जिथे देशी, विदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात.
१)सिटी पॅलेस City palace, Jaipur In Marathi
याची निर्मिती साधारण सन १७२९ ते १७३२ च्या दरम्यान झाली. येथील राजा सवाई जयसिंग यांनी बरेच वर्ष जयपूर या शहरावर राज्य केले. आज देखिल या राजाचे वंशज या पॅलेस मध्ये वास्तव्यास आहेत. हे ठिकाण या शहरातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. सिटी पॅलेस पूर्ण पाहण्यासाठी ३०० रु प्रवेश फी आकारली जाते. या महालातील भिंतीवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटली आहेत. आतमध्ये एक प्रशस्त सभामहल आहे. येथे पूर्वीच्या काळात राजा महाराजांच्या सभा व्हायच्या. त्या सभांचे फोटो आज देखील इथे पाहावयास मिळतात. मात्र इथे फोटो काढण्यास मनाई आहे. Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
२)जंतर मंतर Jantar Mantar, Jaipur In Marathi
जंतर मंतर हे ठिकाण सिटी पॅलेस पासून जवळच आहे. जगातील सगळ्यात मोठी खगोलीय वेधशाळा म्हणून याची ओळख होती. खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जयपूर चे महाराजा जयसिंग यांनी याची निर्मिती केली होती. यामागचा उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण करणे हा होता. शालेय विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण नक्कीच बघण्यासारखे आहे. इथे त्यांना शिकण्यासारखे खूप काही आहे.
३)जलमहाल Jalmahal, Jaipur In Marathi
याची निर्मिती राजा जयसिंग यांनी त्यांच्या राणीसाठी केली होती. जलमहाल हे राजपूत स्थापत्यकलेचे एक आदर्श उदाहरण आहे. या जलमहालाची पाच मजली उंच सममितीय रचना आहे. हा राजवाडा भारतातील मानसागर तलावाच्या मध्यभागी आहे. या महालाचे तीन मजले पाण्याखाली आहेत. त्यामुळे हा महाल पाण्यावर तरंगताना दिसतो. जलमहाल पाहण्याची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत आहे. Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
४)अल्बर्ट हॉल संग्रहालय Albert Hall Museum, Jaipur In Marathi
हे ठिकाण मुख्य बाजारपेठेपासून २.५ किमी अंतरावर आहे. हे विविध प्रकारच्या संग्रहासाठी १९ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयापैकी एक मानले गेले. २००८ साली याचे नूतनीकरण करण्यात आले होते. संग्रहालयाच्या भिंतींवर कुराण, बायबल आणि भारतीय महाकाव्ये यांसारख्या धार्मिक ग्रंथातील उतारे कोरलेले दिसतात. महाभारत आणि रामायणातील काही दृश्ये देखील चित्रांच्या स्वरूपात येथील भिंतींवर पाहावयास मिळतात. या संग्रहालयात राजस्थानी लघुचित्रे, गालिचे, दगड, हस्तिदंत, धातूची शिल्पे, शस्त्रे आणि वाद्ये यांचा अप्रतिम संग्रह देखील आहे. Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
५)चोखी धानी Chokhi Dhani, Jaipur In Marathi
हे जयपूर मधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे प्रवेश करण्यासाठी १००० रु च्या आसपास फी आकारली जाते(जेवणासहित). आतमध्ये प्रवेश करताच तुमचे राजस्थानी पद्धतीने स्वागत केले जाते. इथे गेल्यानंतर तुम्हाला पारंपारिक राजस्थानी ग्रामीण संस्कृतीचा अनुभव येतो. सर्वत्र मातीची घरे, प्राण्यांची सवारी, राजस्थानी खाद्यपदार्थ, राजस्थानी संगीत पाहावयास मिळते. येथे तुम्हाला राजस्थानी लोकनृत्य, संगीत सादरीकरण, कठपुतली लोककथा, जादुई कार्यक्रम, ज्योतिषीय वाचन आणि विविध खेळांसह अमर्याद मनोरंजनाचा अनुभव घेता येतो. येथे भेट देण्याची वेळ सायं ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत आहे.
Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
६)आमेर किल्ला (अंबर पॅलेस) Amer Palace Amber Fort, Jaipur In Marathi
जयपूर मधील आमेर क्षेत्रात उंच टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला जयपूर मधील प्रमुख आकर्षण आहे. भव्य आमेर किल्ला हा एक विस्तृत राजवाडा आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे फिकट पिवळ्या आणि गुलाबी वाळूच्या दगडाने व पांढऱ्या संगमरावरमध्ये केले गेले आहे. या किल्ल्यावर दररोज सायंकाळी ध्वनी शो आणि प्रकाश शो (Light and Sound Show) सादर केला जातो.
मुख्य बाजारपेठेपासून हा किल्ला ११ किमी अंतरावर आहे. जयपूर वरून या किल्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस सुटतात.
७)गलता मंदिर Galtaji Temple, Jaipur In Marathi
गलता मंदिर हे इथे असलेल्या नैसर्गिक झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरमध्ये भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मंदिर परिसरामध्ये अनेक माकडं आहेत. हे मंदिर दिल्ली-आग्रा महामार्गावर असुन खूप शांत असे ठिकाण आहे. गलताजी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी छोट्याश्या डोंगरावर चढाई करावी लागते. हे मंदिर आजुबाजुला पर्वतांनी वेढलेले आहे. या ठिकाणी एक सुंदर तलाव देखील आहे. Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
८)चांदलाई तलाव Chandlai, Jaipur In Marathi
चांदलाई तलाव हे राजस्थानातील एक अप्रसिद्ध ठिकाण आहे. इथे एक सुंदर तलाव आहे. दरवर्षी काही स्थलांतरित पक्षी इथे भेट देतात. या तलावावरील सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे जयपूरमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. चांदलाई तलाव हा कोटा-जयपूर महामार्गावरील टोंक रस्त्यावर आहे. शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या या तलावाला भेट देणे हा जयपूरमधील एक अनोखा अनुभव ठरतो.
Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
९)आमेर सागर Amer Sagar, Jaipur In Marathi
जर तुम्ही जयपूर मधील काही अनोख्या ठिकाणांच्या शोधात असाल तर आमेर सागर ला जाऊ शकता. हे सतराव्या शतकातील सरोवर असुन ते आमेर आणि जयगड या किल्ल्यांना पाणी पुरवठा करते. हे आमेर किल्ल्याजवळ खीरी गेट व अनोखी संग्रहालयाच्या दरम्यान स्थित आहे. पावसाळा हा या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
१०)चुलगिरी जैन मंदिर Chulgiri Jain Temple, Jaipur In Marathi
अरावलीने वेढले गेलेले हे सुंदर असे जैन मंदिर जयपूरमधील अप्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. दिल्ली-आग्रा महामार्गावर असलेले हे एक सुंदर असे ठिकाण आहे. या मंदिरात जाण्याकरिता सुमारे एक हजार पायऱ्या आहेत. हे ठिकाण खुप सुंदर असुन मंदिराच्या आजुबाजूचा निसर्ग पाहण्यासारखा आहे.
Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
११)बडी चौपार Badi Choupar, Jaipur (Shopping At Jaipur) In Marathi
जर तुम्हाला खरेदीची आवड असेल तर तुम्ही जयपूरच्या या जगप्रसिद्ध मार्केटला भेट दिलीच पाहिजे. हे मार्केट खास इथे असलेल्या वैविध्यपूर्ण राजस्थानी पोशाखांसाठी ओळखले जाते. इथे राजस्थानी पोषाख स्वस्तात आणि उत्तम दर्जाचे मिळतात. विशेष म्हणजे हे मार्केट जयपूर रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळच आहे.
१२)हवामहाल, जयपुर Hawamahal, Jaipur In Marathi
हवामहाल हे जयपूरमधील सर्वात खास आकर्षण आहे. गुलाबी रंगांचे सज्जे, जाळीदार खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा सुरेख संगम हा महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. पाच मजली इमारत असलेल्या या हवामहालाला भक्कम असा पाया नाही. त्यामुळेच पायाशिवाय बांधला गेलेला हा जगातील सर्वात उंच महाल समजला जातो. पाया नसल्याने हा महाल घुमावदार आणि ८७ अंश कोनात झुकलेला दिसतो. या महालाला ९५३ खिडक्या असुन यातुन राजघराण्यातील स्त्रिया रस्त्यावर चाललेली नृत्ये, लोककला या गोष्टी आणि शहराचा नजारा पाहू शकत.
Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi
जयपूरमध्ये आवर्जुन खावेत असे प्रसिद्ध पदार्थ Famous Best Food In Jaipur In Marathi
कांदा कचोरी, पंचमेलची भाजी, गट्टेची भाजी आणि दाल बाटी चुरमा असे राजस्थानातील प्रसिद्ध पदार्थ आपण जयपूरमध्ये नक्की खाऊ शकतो.
अयोध्येला जाण्याआधी जाणून घ्या ही संपूर्ण माहिती
भटक्या मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडीवर कळवू शकता. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर, म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन होऊ शकता.
टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग
Places To Visit In Jaipur Rajasthan In Marathi