Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ बंगळुरू मधील या आकर्षक गोष्टी माहिती आहेत का?

भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ बंगळुरू मधील या आकर्षक गोष्टी माहिती आहेत का? Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

देशाची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकातील बंगळुरू हे भारतातील एक महत्त्वाचे शहर आहे. कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बंगळुरू एक मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. पश्चिम घाटाच्या सानिध्यात असल्यामुळे कर्नाटक राज्य हे नैसर्गिकरीत्या सुंदर आहेच परंतु इथला सांस्कृतिक वारसा सुद्धा या राज्याला एक अनोखं सौंदर्य बहाल करतो. कर्नाटकमध्ये सर्वात जास्त मंदिरे बंगळुरू शहरात पाहायला मिळतात. देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या बंगळुरूमध्ये अनेक मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. त्यामुळेच पूर्वी ‘गार्डन सिटी’ अशी ओळख असलेल्या या शहराला आता ‘सिलिकॉन व्हॅली’ अशी ओळख प्राप्त झाली आहे.

 

बहुतांश तरुण वर्ग या शहरात वास्तव्यास असून अतिशय वेगाने वाढणारे शहर म्हणून बंगळुरू कडे पाहिलं जातं. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग असल्याने शहरात त्यांना हव्या असलेल्या आकर्षक सुविधा पाहायला मिळतात. मोठमोठाले हॉटेल्स, पब्स, उद्याने, तलाव या शहरात आहेत. खुप सारी उद्याने आणि हिरवाई असल्याने बंगळुरू शहराला ‘उद्यानाचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शहरात विविध भाषा बोलणारे वेगळ्या वेगळया राज्यातून आलेले लोक अगदी मिळून मिसळून राहतात. त्यामुळे एक संमिश्र सांस्कृतिक वातावरण आपल्याला या शहरात पाहायला मिळते.

राहण्यासाठी आकर्षक असणाऱ्या या शहरात फिरण्यासाठी खुप सारे पर्याय उपलब्ध आहेत. तर या शहरात असणारे काही आकर्षक मंदिरे आणि उद्याने याबद्दल आपण माहिती घेऊयात. Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

 

१)शृंगगीरी शनमुख मंदिर Shrungagiri Sri Shanmukha Temple In Marathi

गणपती बाप्पा चा भाऊ असलेला कार्तिकेय स्वामी च हे मंदिर साधारणतः २४० फूट उंचीवर एका छोट्या टेकडीवर वसले आहे. बंगळुरू शहरापासून १६ किमीवर असलेल्या राजराजेश्वरी नगर या भागात हे मंदिर आहे. कार्तिकेय स्वामी यांना सुब्रमण्यम या नावानेही ओळखले जाते. मंदिराच्या कळसावर मुरुगन देवाचे वेगवेगळ्या दिशेला ६ मुख बनवले आहेत. तसेच वर मुख्य मंदिराकडे जाताना एक कृत्रिम गूहा आहे त्या मध्ये शिवलिंग आहे.

 

येथील वातावरण फार आल्हादायक आणि शांत असून तिथे मोठे त्रिशूळ, डमरू आपणास पाहायला मिळतात. सायंकाळच्या वेळी इथुन शहरातील सुंदर दृश्य पाहायला आणि व्यायामाच्या दृष्टीने नागरिक इथे गर्दी करतात.

 

२)लालबाग botanical गार्डन Lalbagh Botanical Garden In Marathi

बंगळुरू शहर हे ‘गार्डन सिटी’ म्हणून ओळखले जाते आणि ‘लालबाग botanical गार्डन’ हे इथलं मुख्य आकर्षण आहे. जर तुम्हाला विविध रंगांची फुलं पाहण्याची आवड असेल तर तुम्ही येथे अवश्य भेट द्यायलाच हवी. शहराच्या मध्यभागी जवळपास २४० एकर क्षेत्रात पसरलेल्या या उद्यानात वृक्षांच्या जवळजवळ १८०० जाती आढळतात.

या उद्यानात फ्रेंच, फारसी आणि अफगाणी मुळ असलेल्या दुर्मिळ वृक्षांचा संग्रह आहे. दाट झाडी असल्याने या उद्यानात बऱ्याच प्रकारच्या पक्ष्यांच्या जातीही आपल्याला पाहायला मिळतात. इथले बरेच वृक्ष १०० वर्षांहून अधिक जुने आहेत. जे या उद्यानाला एक अलौकिक सौंदर्य बहाल करतात. उद्यानात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघता येतात त्यासोबतच प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशी इथे पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जातं.
खुप सारे लोक इथे सकाळी संध्याकाळी वॉक करताना आपल्याला दिसतात. बंगळुरू शहरापासून हे उद्यान ४ किमी अंतरावर आहे. निसर्गप्रेमी आणि वनस्पती प्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे.

प्रवेश शुल्क Entry Fees In Lalbagh Botanical garden-

उद्यानात प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते, तसेच सोबत कॅमेरा असेल तर कॅमेऱ्यासाठी देखील माफक शुल्क आकारले जाते.

Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

 

३)बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान Bannerghatta National Park In Marathi

बंगळुरू शहरापासून २२ किमीवर असलेले बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान विविध प्राणी आणि वनस्पतींचे घर आहे. जवळजवळ १०४ चौ किमी क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानाची स्थापना १९७१ मध्ये झाली होती. या भल्यामोठ्या उद्यानात आपल्याला जंगल सफारी, प्राणिसंग्रहालय, फुलपाखरू उद्यान बघायला मिळते. आपल्या देशाचे हे पहिलेच ‘फुलपाखरू उद्यान’ (butterfly park) म्हणुन ओळखले जाते. येथे तुम्हांला ४८ प्रकारचे फुलपाखरू पाहायला मिळतील. यासोबतच मासे, मगरी, साप या प्राण्यांसाठी आरक्षित संग्रहालये देखील पाहायला मिळतात.

Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

या उद्यानात हत्ती, अस्वल, हरीण, सिंह, वाघ, कोब्रा साप यासोबतच बरेच प्राणी बघायला मिळतात. हत्तीवर बसून फेरफटका मारण्याचा विलक्षण अनुभव देखील आपल्याला घेता येतो. सर्पोद्यानात विविध प्रजातीचे साप पाहायला मिळतातं. लहान मुलांना दाखवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे कारण येथे त्यांना आपल्याला प्राण्याची ओळख करून देता येतेच तसेच खूप सारे साहसी खेळ देखील इथे खेळता येतात. येथील तलावात बोटिंगचा सुद्धा आनंद आपण घेऊ शकतो.

प्रवेश शुल्क Entry Fees In Bannerghatta National Park-

मोठ्यांसाठी २६० रुपये तर लहान मुलांसाठी १३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी १५० रुपये शुल्क आहे.

हेही वाचा- ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

४)शिवम मंदिर Shivoham Shiva Temple In Marathi

शिवम मंदिर हे बंगळुरू शहरामध्येच असून येथे शंकराची ६५ फुट उंच संगमरवरी मूर्ती बघायला मिळते. हे एक पूर्णतः आर्टिफिशियल असे मंदिर आहे विशेष म्हणजे मंदिरात जाण्यासाठी आपणाला गुहेसारखा प्रवेश करावा लागतो. प्रवेशशुल्क भरले की आपल्याला १०८ रुद्राक्ष एका वाटी मध्ये दिले जातात, ते आपण देवाचे नामस्मरण करत तिथे असणाऱ्या पात्रात टाकायचे. पुढे गेल्यास आपणाला इच्छाशक्ती वृक्ष दिसतो. आपली इच्छा व्यक्त करून त्या वृक्षाला लाल रंगाचा धागा बांधायचा. असं केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी समजूत आहे.

 

शंकरा बरोबरच इथे गणपतीचे ही सुंदर असे मंदिर आहे. तिथल्या एके गुहेमध्ये १२ ज्योतिर्लिंगाचे देखावे सादर केलेले आहेत. सायंकाळी येथे छान आरती होते आणि लाईट शो ही पाहायला मिळतो.

Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

५)कब्बन पार्क- Cubbon Park In Marathi

 

३०० एकरात पसरलेले कब्बन पार्क हे निसर्गरम्य उद्यान बंगळुरू शहरातील एक प्रमुख आकर्षण आहे. लॉर्ड कब्बन यांच्या स्मरणार्थ हे उद्यान तयार करण्यात आले होते. सुमारे ६००० हून अधिक वृक्ष येथे आहेत. हे एक नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळ असण्यासोबतच, शहरातील काही मुख्य वास्तू जसे की अटारा कचेरी, कब्बन पार्क संग्रहालय आणि शेषाद्री अय्यर मेमोरियल पार्क सुद्धा याठिकाणीच आहेत. यासोबतच इथे भारतातील सर्वात मोठे मत्स्यालय देखील आहे.
सकाळी ६ ते सायंकाळी ६ अशी उद्यानाची वेळ असून प्रवेश मोफत आहे.

 

६)बेंगलोर पॅलेस Benglore Palace In Marathi

महान वास्तुकला आणि सुंदरतेचे प्रतीक असलेला बेंगलोर पॅलेस बंगळुरू शहरातील एक महत्त्वाचं आकर्षण आहे. सन १८७३ साली बनलेला हा राजवाडा शहरातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सोहळे आणि शाही विवाह यांच्यासाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे.

राजवाडा सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पर्यटकांसाठी उघडा असतो. आत जाण्यासाठी २३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

 

७)नंदी हिल्स Nandi Hills In Marathi

बंगळुरू शहरापासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेले नंदी हिल्स हे ठिकाण निसर्गरम्य असुन ट्रेकिंगची आणि निसर्गाची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. नंदी बैलाच्या आकाराच्या या टेकडीवर योगानंदेश्वर मंदिरात नंदीची एक मूर्ती देखील पाहायला मिळते. हे ठिकाण खूप प्रसिद्ध असुन पर्यटक कायम गर्दी करत असतात.

Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

यासोबतच बंगळुरू शहरातील इतर मुख्य आकर्षणे Attractions Of Bengaluru

इस्कॉन मंदिर, इनोव्हेटिव्ह फिल्म सिटी, जवाहरलाल नेहरू तारांगण, टिपू सुलतान राजवाडा, चुन्नी धबधबा, देवनाहल्ली किल्ला, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, रॉक पार्क, snow सिटी अशी इतर आकर्षक ठिकाणे देखील बंगळुरू शहरात आपण पाहू शकतो.

 

बंगळुरू मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ Famous Food In Bengaluru In Marathi

 

आधुनिक शहर असले तरी बंगळुरू शहरात सांस्कृतिक स्थानिक उडुपी पदार्थ आणि भारतीय डिशेस प्रसिद्ध आहेत. डोसा, इडली, पोंगल यासोबतच तंदुरी चिकन, शेक कबाब, बंगळुरू स्पेशल बिर्याणी, आदी पदार्थांचा आपण आस्वाद घेऊ शकतो.

Places To Visit In Bengaluru Karnataka In Marathi

बंगळुरू ला कसं जाल? How To Reach Bengaluru In Marathi

देशातील एक प्रमुख शहर असल्याने बंगळुरू कडे जायला देशातल्या सर्वच प्रमुख शहरांतून बसेस, रेल्वे आणि विमान मार्ग देखील उपलब्ध आहेत. यासोबतच खाजगी वाहनाने देखील आपण बंगळुरू शहर गाठू शकतो.

हेही वाचा-अयोध्येला जाण्याआधी जाणून घ्या ही संपूर्ण माहिती

 

भटक्या वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया किंवा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर कळवू शकता. ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये देखील नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग