भारतातील राष्ट्रीय उद्याने: नैसर्गिक सुंदरता आणि जैवविविधतेचा अनमोल खजिना National Parks Of India In Marathi
आपला भारत देश एक अत्यंत विविधतापूर्ण देश आहे. भारतातला निसर्ग, भूगोल आणि जैवविविधता ही संपूर्ण जगातील इतर देशांपेक्षा भिन्न प्रकारची आहे. भारतातल्या निसर्गात विविध प्रकारच्या हवामानाचे व विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे महत्वाचे स्थान आहे. या अद्वितीय निसर्गाच्या संवर्धनासाठी भारतात सुमारे १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय उद्याने (National Parks) आढळुन येतात. भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व भागात ही उद्याने विस्तारलेली दिसुन येतात. या उद्यानांचा मुख्य उद्देश निसर्गातील जैवविविधतेचे संरक्षण करणे, प्राण्यांचे संरक्षण करणे व त्यांच्या प्रजननासाठी योग्य वातावरण तयार करणे, तसेच पर्यावरणीय शिक्षण आणि पर्यटनाला चालना देणे आहे.
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची महत्त्वपूर्ण भूमिका जैवविविधतेच्या संरक्षणात आहे. ही राष्ट्रीय उद्याने निसर्गप्रेमी, वन्यप्राणीप्रेमी, निसर्ग व प्राणी अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करत असतात. या लेखात, आपण भारतातील काही प्रमुख राष्ट्रीय उद्यानांची माहिती घेणार आहोत.
Bharatatil Rashtriya Udyane Mahiti
१)जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (Jim Corbett National Park)
उत्तराखंड राज्यातील जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. १९३६ मध्ये स्थापन झालेल्या या राष्ट्रीय उद्यानाची प्रमुख ओळख वाघांच्या जतनाशी जोडली जाते. तसेच येथे इतरही वन्यप्राणी, विविध पक्षी आणि वनस्पतींच्या शेकडो प्रजाती सापडतात.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश रॉयल बंगाल टायगर अर्थात बंगाली वाघ यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करणे हा होता. त्यामुळे बंगाली वाघ हा इथला प्रमुख प्राणी आहे. या अभयारण्यात सध्या १६४ वाघ असून ६०० च्या आसपास हत्ती, बिबटे, अस्वल व इतर ५० प्रकारचे सस्तन प्राणी, ५८० प्रजातींचे पक्षी व २६ प्रकारचे सरपटणारे जीव देखील पाहायला मिळतात.
कसे जाल?
जिम कॉर्बेट हे उत्तराखंड राज्यातील रामनगर इथे असुन रामनगर पर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. पंतनगर हे येथुन जवळचे विमानतळ आहे. रामनगर पासुन पर्यटक जीप सफारी बुक करून जंगलाची सफारी करू शकतात.
पर्यटक online साईटद्वारे उद्यानात जाण्याचे प्रवेशशुल्क, जिप्सीचे पैसे आदि सर्व गोष्टींची आगाऊ बुकिंग करू शकतात.
२)काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (Kaziranga National Park)
आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान विशेषतः काळ्या गेंड्यासाठी (One-Horned Rhino) साठी प्रसिद्ध आहे. या उद्यानाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला असून, जगात आढळणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.
यासोबतच काझीरंगामध्ये भारताच्या इतर उष्ण कटिबंधीय प्रदेशातील वन्यजीवांचीही समृद्ध विविधता दिसुन येते. हे उद्यान आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्याला लागून आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने गेंडे, वाघ, हत्ती, अस्वल आणि वाघ दिसुन येतात. या जंगलांमध्ये पक्ष्यांच्या देखील खूप साऱ्या प्रजाती आढळतात, ज्यामुळे पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षण आहे.
कसे जाल?
आसाम मधील गुवाहाटी पर्यंत जाऊन पर्यटक तिथुन खासगी बस, जीप या वाहनांचा प्रवास करून काझीरंगा उद्यानात पोहोचू शकतात.
३)सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (Sundarban National Park)
पश्चिम बंगाल राज्यात असलेले सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान बांगलादेशच्या सीमेलगत असुन जगातील सर्वाधिक वाघांची संख्या इथे आढळून येते. सुंदरबन जंगलातील मुख्य आकर्षण वाघ असले तरी चितळ, हरीण, माकड, विविध प्रजातींचे विषारी आणि बिनविषारी साप इत्यादी प्राणी देखील इथे मोठ्या संख्येने आढळून येतात.
समुद्रालगत असल्याने या खाडीत दलदलीचे वातावरण असुन इथे खारफुटीचे जंगल आढळून येते. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरी नावाची वनस्पती इथे मोठ्या प्रमाणावर दिसुन येते. त्यामुळेच या जंगलाचे नाव सुंदरबन असे पडले आहे. National Parks Of India In Marathi
कसे जाल?
सर्वप्रथम कोलकाता इथे पोहोचून परायात्क तिथुन कॅनिंग रेल्वे स्टेशनला पोहोचून तिथुन सुंदरबनला भेट देऊ शकतात.
४)बांदीपुर राष्ट्रीय उद्यान (Bandipur National Park)
कर्नाटक राज्यातील बांदीपुर राष्ट्रीय उद्यान हे एक प्रमुख टायगर रिझर्व्ह आहे. १९७४ मध्ये संरक्षित करण्यात आलेले हे उद्यान निसर्गप्रेमी आणि वन्यप्राण्यांच्या प्रेमींसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. या उद्यानात वाघ, हत्ती, चितळ, माकडे, हरण आणि अस्वल यासारख्या वन्यप्राण्यांची मोठी संख्या दिसुन येते. कर्नाटक व तामिळनाडू राज्यांच्या सीमेलगत असलेल्या या उद्यानात वन्यप्राण्यांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध आहे.
कसे जाल?
कर्नाटकातील म्हैसूर हे इथले जवळचे शहर असुन रेल्वेने पर्यटक म्हैसूरला पोहोचुन तिथुन खासगी वाहनाने बांदीपूरला पोहोचू शकतात.
National Parks Of India In Marathi
५)हेमिस राष्ट्रीय उद्यान (Hemis National Park)
हेमिस राष्ट्रीय उद्यान जम्मू कश्मीर राज्यातील लेह-लडाख क्षेत्रात स्थित आहे. हे उद्यान विशेषतः हिमालयीन बिबट्यासाठी (Himalayan Snow Leopard) विशेष प्रसिद्ध आहे. या उद्यानातील निसर्ग आणि पर्यावरण प्रचंड विविधतेने समृद्ध आहे. येथील कठीण भूप्रदेश, उंच पर्वत, आणि थंड वातावरण इथल्या वन्यजीवांसाठी अत्यंत आदर्श आहे. हेमिस राष्ट्रीय उद्यान लडाखच्या संस्कृतीचे आणि अत्यंत सुंदर निसर्गाचे एक सुंदर उदाहरण आहे.
कसे जाल?
जम्मू हे येथुन जवळचे रेल्वे स्थानक असुन लेह हे जवळचे विमानतळ आहे. तिथे पोहोचून खासगी वाहनाने हेमिस उद्यानात पोहोचता येते.
National Parks Of India In Marathi
६)नंदनकानन राष्ट्रीय उद्यान (Nandankanan National Park)
ओडिशा राज्यातील नंदनकानन राष्ट्रीय उद्यान हे प्रमुख राष्ट्रीय उद्यानांमध्ये आहे. हे उद्यान विशेषतः पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध आहे. नंदनकानन राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे, येथे साप, गवा, वनस्पती आणि पक्ष्यांच्या विविध प्रजाती सापडतात. यामध्ये एक पक्षी प्रजनन केंद्रही आहे, जिथे पर्यटक विविध पक्ष्यांच्या प्रजातींना पाहू शकतात.
कसे जाल?
भुवनेश्वर, कटक आणि बरंग ही जवळची रेल्वे स्थानके असुन भुवनेश्वर हे जवळचे विमानतळ आहे. तिथुन खासगी वाहनाने काही मिनिटात उद्यानात पोहोचता येते. National Parks Of India In Marathi
७)ताडोबा राष्ट्रीय उद्यान (Tadoba Tiger Reserve)
ताडोबा अंधारी व्याघ्र राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. भारतातील काही सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट वाघांच्या उद्यानांपैकी एक, ताडोबा हे वाघांचे घर म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती आहेत. ताडोबा जंगलात वाघ, जंगली कुत्रा, अस्वल आणि साप या प्रजातींचे संरक्षण करण्यात येते. ताडोबा अंधारी क्षेत्रातील जैवविविधता आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
कसे जाल?
नागपूर विमानतळ ताडोबापासून १०० किमी तर चंद्रपूर रेल्वे स्टेशन ५० किमी अंतरावर आहे. तिथुन खासगी वाहनाने ताडोबाला पोहोचता येते.
National Parks Of India In Marathi
८)रणथंभोर राष्ट्रीय उद्यान (Ranthambore National Park)
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानातील सवाई माधोपुर जिल्ह्यात स्थित आहे. ऐतिहासिक रणथंभोर किल्ल्याच्या नावावरून या उद्यानाला रणथंभोर हे नाव ठेवण्यात आले. अरावली आणि विंध्य पर्वतरांगांच्या सानिध्यात वसलेल्या या उद्यानाला बनास आणि चंबळ नदीचा वेढा आहे. वाघ हा इथला मुख्य प्राणी आहे. या राष्ट्रीय उद्यानात बंगाली वाघ, अस्वल, चित्ता, नीलगाय, सांबर आदि वन्यप्राणी आढळुन येतात. तसेच २७० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती इथे आढळुन येतात.
कसे जाल?
जयपूर हे रणथंभोर पासुन जवळचे विमानतळ असुन १६० किमी अंतरावर आहे. सवाई माधोपुर हे इथून जवळचे रेल्वे स्थानक असुन देशातील प्रमुख शहरांतून इथे यायला रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. तसेच रस्त्याने यायचे झाल्यास कोटा, जयपुर किंवा उदयपुर या शहरांतून तुम्ही रणथंभोर उद्यानाकडे पोहोचु शकता.
National Parks Of India In Marathi
९)पेंच राष्ट्रीय उद्यान (Pench National Park)
पेंच व्याघ्र प्रकल्प किंवा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवर वसलेले असुन त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्यात हे उद्यान असुन ‘पेंच’ या नदीच्या नावावरून उद्यानास ‘पेंच’ हे नाव पडले आहे. तसेच या उद्यानाला ‘पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान’ म्हणूनही ओळखले जाते. पेंच राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती तसेच प्राण्यांची व पक्ष्यांची विपुलता आहे. सन १९७७ मध्ये या भागाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. आणि सन १९८३ मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यानाला सन १९९९ मध्ये भारतातील २५ व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला.
या जंगलात बंगाली वाघ, लांडगे, सांबर, अस्वल, बिबट्या, चितळ, गवा, नीलगाय आदि प्राणी तसेच २५० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती बघायला मिळतात.
कसे जाल?
विमान मार्गाने जायचे झाल्यास नागपुर विमानतळ हे पेंचला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळ पेंचपासून १०० किमी अंतरावर आहे. तसेच रेल्वेने गेल्यास पेंचला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे.
National Parks Of India In Marathi
१०)कान्हा राष्ट्रीय उद्यान (Kanha National Park/ Kanha Tiger Reserve)
भारतातील व्याघ्रप्रकल्पांची सुरुवात कान्हा राष्ट्रीय उद्यानापासून झाली. इथे राबवला गेलेला व्याघ्रप्रकल्प सर्वाधिक यशस्वी ठरला. सुप्रसिद्ध लेखक व नोबेल पारितोषिक विजेते रुडयार्ड किपलींग यांना त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी ‘जंगल बुक’ ही साहित्यकृती याच उद्यानावरुन त्यांना सुचली. ‘मोगली’ या पात्रावर आधारित ही कादंबरी खूप गाजली.
कान्हा उद्यानाची स्थापना १ जून १९५५ मध्ये करण्यात झाली. मध्यप्रदेशातील मंडला आणि बालाघाट या जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या कान्हा उद्यानाचे क्षेत्रफळ १००९ चौ.किमी आहे. व्याघ्र प्रकल्प असल्याने पिवळा पट्टेरी वाघ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतर प्रकल्पांच्या तुलनेत कान्हा अभयारण्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते.
वाघांव्यतिरिक्त या जंगलात अस्वल, बाराशिंगे, हरणे, रानकुत्री, रानकोंबड्या, बिबट्या, चितळ, सांबर, गवे, रानडुक्कर, कोल्हे, खोकड, माकडे, पाणमांजर, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, तरस, खवलेमांजर, साळिंदर, नीलगाय, काळवीट हे इतर प्राणीदेखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. याशिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कोब्रा, नाग, मण्यार, घोणस, मगर, घोरपड हे प्राणी आढळतात.
कसे जाल?
रेल्वेने जायचे झाल्यास गोंदिया (१४५ किमी) आणि जबलपूर (१६० किमी) ही रेल्वे स्थानके कान्हा उद्यानापासून जवळ आहेत. विमानाने जाणार असाल तर जबलपूर, रायपुर आणि नागपूर ही विमानतळे जवळ आहेत. खासगी वाहनाने जाणार असाल तर जबलपूर, रायपुर ही शहरे जवळ आहेत.
११)बांधवगड राष्ट्रीय उद्यान (Bandhavgarh National Park Information In Marathi)
बांधवगढ राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातल्या उमरीया जिल्ह्यात स्थित असलेले एक अभयारण्य आणि भारताचे एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. ७१६ चौ.किमी क्षेत्रफळात वसलेल्या या उद्यानास १९६८ साली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. पुढे १९९३ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याला दर्जा मिळाला. बांधवगड हे नाव राम आणि लक्ष्मण यांच्या बंधुत्वावरून ठेवण्यात आले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
बांधवगड हे वाघासाठी म्हणून खास प्रसिद्ध आहे. वाघांसाठी खास प्रसिद्ध असले तरी हत्ती, बिबट्या, सांबर, भुंकणारे हरीण आणि इतर प्राणी आणि पक्षी बहुसंख्येने आढळतात.
कसे जाल?
जबलपूर हे येथुन २०० किमी अंतरावर असलेले प्रमुख शहर आहे. विमान किंवा रेल्वेने जबलपूरला जाऊन तिथुन खासगी वाहनाने बांधवगड उद्यानात पोहोचता येते.
हेही वाचा- Ancient Famous Temples Of India Marathi भारतातील प्राचीन मंदिरे
राष्ट्रीय उद्यानांचे महत्त्व
भारतातील राष्ट्रीय उद्याने जैवविविधतेचे संरक्षण, वन्यप्राण्यांचे जतन आणि पर्यावरण शुद्धतेचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. या उद्यानांमध्ये असलेल्या वनस्पती, प्राणी आणि विविध निसर्ग घटक पर्यावरणाच्या संतुलनास महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच या राष्ट्रीय उद्यानांमधून मोठ्या प्रमाणात होणारा पर्यटन व्यवसाय स्थानिक समुदायांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला आहे. भारतातील विविध राज्यांतून तसेच परदेशातून पर्यटक या उद्यानांमध्ये जंगल सफारी, निसर्ग, प्राणी-पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी येतात.
National Parks Of India In Marathi