Monuments Of India Marathi भारतातल्या प्रसिद्ध १० ऐतिहासिक वास्तू

भारतातल्या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू Monuments Of India Marathi. Best 10 Places To Visit In India In Marathi

भारत देशाला खुप मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. इथं आपल्याला ऐतिहासिक राजवाडे, किल्ले, स्मारके, वस्तुसंग्रहालये, लेण्या आणि पुरातन मंदिरं बघायला मिळतात. ज्यांची भुरळ परदेशी नागरिकांनासुद्धा पडलेली आपल्याला बघायला मिळते. आज आपण देशातील प्रसिद्ध १० ऐतिहासिक वास्तूंची माहिती बघणार आहोत.

१)ताजमहाल, आग्रा Tajmahal Information In Marathi

जगातील सात अद्भुत आश्चर्यांमध्ये समावेश असलेला ताजमहाल उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात यमुना नदीच्या तीरावर स्थित सर्वात सुंदर आणि देशातल्या प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे आणि निश्चितच भारताची शान आहे. हे पांढरे संगमरवरी स्मारक शहाजहान या मुघल सम्राटाने आपल्या प्रिय पत्नीच्या मुमताजच्या स्मरणार्थ बांधले होते. ज्यामुळे त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणूनही संबोधलं जातं. अप्रतिम वास्तुकला आणि त्यामागील इतिहासामुळे, ताजमहाल हे जागतिक वारसा स्थळ जगभरातील सर्व पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाले आहे.

पुणे मुंबई पासुन ताजमहाल अंतर- १२०० किमी

WhatsApp Group Join Now

हेही वाचा- Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.

 

२)सुवर्ण मंदिर (हरमंदिर साहिब), अमृतसर Golden Temple Information In Marathi

अमृतसरमध्ये स्थित सर्वात पवित्र तीर्थस्थान म्हणून सुवर्ण मंदिर (हरमंदिर साहिब) ओळखले जाते. हा भारतातील पंजाबमधील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र शीख गुरुद्वारा आहे. हे मंदिर स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणुनही ओळखले जाते. ह्या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा मोडतोड करण्यात येऊन हे मंदिर नष्ट करण्यात आले होते तरी देखील भक्तांसाठी शीख धर्मातील लोकांनी ह्या मंदिराला पुन्हा पुन्हा स्थापित केले आहे. जर तुम्हाला संस्कृती आणि इतिहासात रस असेल तर भारतातील या लोकप्रिय आकर्षणाला नक्की भेट द्या.

पुणे मुंबई पासुन सुवर्ण मंदिर अंतर- १८०० किमी

 

३)मीनाक्षी मंदिर, मदुराई Minakshi Temple Information In Marathi

मीनाक्षी मंदिर हे मदुराई शहरामधील वैगई नदीच्या दक्षिणेकडील तीरावर वसलेले एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पार्वती आणि शिव यांना समर्पित आहे आणि जगभरातील बहुतेक हिंदू आणि स्थापत्य प्रेमी इथं भेट देतात. असे मानले जाते की भगवान शंकराने सुंदरेश्वर चे रूप धारण केले आणि सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी पार्वती सोबत लग्न केले. हे दक्षिण भारतातील मुख्य आकर्षणांपैकी एक ठिकाण आहे आणि दररोज हजारो भाविक येथे गर्दी करतात. मदुराईच्या मध्यभागी असलेले हे मंदिर १४ एकरांवर पसरलेले असल्याने ते खूप मोठे क्षेत्र व्यापते. हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. जर तुम्ही कला आणि सांस्कृतिक इतिहासाने प्रभावित असाल तर हे एक सुंदर ठिकाण आहे यात शंकाच नाही.

पुणे मुंबई पासुन मीनाक्षी मंदिर अंतर- १२०० किमी

Best And Famous Monuments Of India Marathi

 

४)म्हैसूर पॅलेस, कर्नाटक Mysore Palace Information In Marathi

म्हैसूर पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर शहरातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक राजवाडा आहे. आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत जतन केला गेला आहे. दूरवरूनच दिसणारे राजवाड्याचे घुमट, प्रचंड मोठी भिंत राजवाड्याकडे आपल्याला खेचून घेतात असे म्हटले तर खोटे ठरू नये. राजवाड्यात आत जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. कोरीव कामाने नटलेले खांब, छत, दरवाजे आणि जगभरातून गोळा केलेल्या कलात्मक वस्तूंचे संग्रह अक्षरश: डोळे दिपवतात. सुरुवातीला हा राजवाडा पूर्ण लाकडातच बांधला होता. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हा नवा राजवाडा सन १९११-१२ मध्ये पुन्हा बांधण्यात आला. ब्रिटीश आर्किटेक्ट हेन्सी आयर्विन यांनी या राजवाड्याचा आराखडा तयार केला होता. ही वास्तूरचना हिंदू आणि मुघल शैलीचे मिश्रण असून घुमट, कमानी, प्रशस्त व्हरांडे ही याची खास वैशिष्ट्ये आहेत.

पुणे मुंबई पासुन म्हैसूर पॅलेस अंतर- ९०० किमी

Monuments Of India Marathi

 

५)गेटवे ऑफ इंडिया, मुंबई Gateway Of India Information In Marathi

मुंबई जरी बॉलीवूड कलाकार आणि चित्रपटांसाठी अत्यंत प्रसिद्ध असली तरी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जवळच ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल यांसारखी पंचतारांकित हॉटेल्स असल्यामुळे गेटवे ऑफ इंडिया पर्यटक, छायाचित्रकार यांच्यासाठी कायमच एक लोकप्रिय ठिकाणं राहिले आहे. दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आणि एका बाजूला डोळे दिपवणारी मुंबई महानगरी यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या बॉम्बे भेटीच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक बांधण्यात आले होते. पावसाळ्यात इथल्या अंगावर येणाऱ्या महाकाय लाटांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात.

पुणे पासुन गेटवे ऑफ इंडिया अंतर- १५० किमी

Monuments Of India Marathi

 

६)लाल किल्ला, नवी दिल्ली Red Fort Information In Marathi

लाल किल्ला हा राजधानी दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. लाल संगमरवरी दगडात बांधकाम  केलेले असल्याने या किल्ल्याचे नाव ‘लाल किल्ला’ असं प्रचलित झालं. लाल किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधलेला आहे. Monuments Of India Marathi

लाल किल्ला इसवी सन १६४८ मध्ये मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता तर २००७ साली युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये लाल किल्ल्याचा समावेश केला. प्रत्येक वर्षीच्या स्वातंत्र्य दिनादिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात. देशातील एक महत्वाचे ठिकाण असल्यामुळे इथं लाखो पर्यटक गर्दी करतात.

पुणे मुंबई पासुन लाल किल्ला अंतर- १४०० किमी

हेही वाचा- Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary In Marathi भिगवण मध्ये होतंय परदेशी पक्ष्याचं आगमन

Best And Famous Monuments Of India Marathi

७)हवा महल, जयपूर Hawa Mahal Information In Marathi

राजस्थान हे पर्यटकांचे एक आवडते राज्य आहे. येथील किल्ले, महाल, शहरे, वाळवंट यांची अनोखी शान आहे. राजस्थानची राजधानी जयपूरला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ‘गुलाबी शहर’ अशी ओळख असलेल्या या शहरात असणारा त्याच्या अद्भूत वास्तुकला, इतिहास आणि सुंदर रचनेमुळे मुळे पर्यटकांना आकर्षित करतो. गुलाबी रंगाचे सज्जे, जाळीच्या खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा संगम हा महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. पाच मजली इमारत असलेल्या या हवामहालाला भक्कम पाया नाही. त्यामुळे पायाशिवाय बांधला गेलेला हा जगातील सर्वात उंच महाल मानला जातो. पाया नसल्याने हा महाल घुमावदार आणि ८७ अंशात झुकलेला आहे. या महालाला ९५३ खिडक्या आहेत. यातूनच राजघराण्यातील स्त्रिया रस्त्यावर चाललेली नृत्ये, लोककला पाहू शकत आणि शहराचा नजराही पाहू शकत.

पुणे मुंबई पासुन हवा महल अंतर- १२०० किमी

Monuments Of India Marathi

 

८)कुतुबमिनार, नवी दिल्ली Kutubminar Information In Marathi

जगातील सर्वात उंच आणि प्राचीन मनोऱ्यांपैकी एक असलेला आणि भारतातील दुसरा सर्वात उंच मनोरा कुतुबमिनार राजधानी नवी दिल्ली इथे सन ११९३ पासून उभा आहे. ७२.५ मीटर उंच असलेला आणि सुमारे ३७९ पायऱ्यांचा समावेश असलेला कुतुबमिनार भारताच्या समृद्ध वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करतो. जगभरातील प्रवासी भारतातील हा सर्वात प्रसिद्ध टॉवर पाहण्यासाठी येतात. कुतुबमिनारचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे. Monuments Of India Marathi

पुणे मुंबई पासुन कुतुबमिनार अंतर- १३५० किमी

हेही वाचा- Best Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.

९)चारमिनार हैद्राबाद Charminar Information In Marathi

चारमिनार ही हैद्राबाद शहराच्या मध्यभागी असलेला भव्य मिनार आहे आणि सुलतान मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी सन १५९१ मध्ये बांधला होता. चारमिनार ही चौकोनी आकाराची रचना असुन त्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम असलेले चार खांब आहेत. पर्शियन प्रभाव असलेले आणि इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा अभिमान बाळगणारे चारमिनार हे पाहण्यासारखे आहे. चारमिनाराची चारही बाजूंनी २० मीटर लांबी आहे. हे चुनखडी, संगमरवर, ग्रॅनाइट आणि मोर्टार वापरून बांधले गेले होते. मशिदीच्या कोपऱ्यांवर चार उंच मिनार आहेत, प्रत्येक मिनार हा ५६ मीटर उंच आहे.

पुणे मुंबई पासुन चारमिनार अंतर- ५०० किमी

Monuments Of India Marathi

१०)अजिंठा आणि वेरुळ लेणी छ. संभाजीनगर Ajanta Ellora Caves Information In Marathi

ही लेणी भारतातील प्राचीन वास्तूंपैकी एक आहेत आणि औरंगाबादमधील (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) सर्वात जुनी दगडी लेणी आहेत. वेरुळ लेण्यांमध्ये दगडी कोरीवकाम, बौद्ध मठ आणि मंदिरे आहेत, तर अजिंठा लेणी बौद्ध वास्तुकला, चित्रे आणि शिल्पे प्रदर्शित करतात. कैलाश मंदिर नावाचे शिवमंदिर देखील आहे आणि ते गुहा क्रमांक १६ मध्ये पाहायला मिळते. या लेण्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूप लोकप्रिय असून परदेशी पर्यटक इथं आवर्जुन हजेरी लावतात.

पुणे मुंबई पासुन अजिंठा वेरूळ लेणीचे अंतर- ४०० किमी

Monuments Of India Marathi

हेही वाचा- Tea Gardens Of India Marathi

मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आम्ही आपल्यापर्यंत अशीच सविस्तर आणि खास माहिती घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या ब्लॉगला भेट देत चला. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर देखील कळवू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी या साईटवर whatsapp किंवा फेसबुकचा आयकॉन दिसेलच.

तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

Top 10 best places of india To Visit In 2024

1 thought on “Monuments Of India Marathi भारतातल्या प्रसिद्ध १० ऐतिहासिक वास्तू”

Comments are closed.