पावसाळ्यात ट्रेकला जाताय? ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi Pavsala Trek

पावसाळ्यात ट्रेकला जाताय? ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

मान्सूनचे आगमन झालेय. आता काहीच दिवसांत सह्याद्रीतील गडकिल्ले, डोंगरदऱ्या हिरवाईने नटू लागतील. धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात होतील. भटक्या मित्रांचे पावसाळ्यात सह्याद्री फिरायचे प्लॅन्स तयारच असतील. पावसाळ्यात सह्याद्रीत फिरताना विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. सुरक्षेची काळजी आणि व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचा पावसाळी ट्रेक, ट्रीप नक्कीच सुखकर होणार यात शंका नाही. पावसाळी ट्रेक करताना काय काय काळजी घ्यावी हे आपण आज जाणून घेऊयात.

सह्याद्री पावसाळ्यात जितका सुंदर बनतो तितकाच तो रौद्ररूप देखील धारण करू शकतो हे सह्याद्रीत भटकताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

१)ठिकाणाची व्यवस्थित माहिती काढा Know Your Destination

पावसाळ्यात ट्रेकला जाणार आहात त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती काढा. पावसाळ्यात देवकुंडसारखे धबधबे किंवा इतर ठिकाणं सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात येतात. त्यामुळे त्या ठिकाणाची सध्याची स्थिती, तेथील वातावरण याबद्दल माहिती घ्या. अतिमुसळधार पावसामुळे सह्याद्रीतील ओढे, छोट्या नद्या यांना अचानक मोठा पुर येण्याची शक्यता असते.

WhatsApp Group Join Now

तसेच गडकिल्ल्यांचे नकाशे, पोहोचण्याच्या वाटा, घ्यावयाची विशेष काळजी याबद्दल इत्यंभुत माहिती ट्रेकक्षितीज सारख्या वेबसाईटवर मिळून जाते.

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

 

२)पावसाळी ट्रेकला जाताना या गोष्टी सोबत ठेवा. Best Trekking Shoes For Monsoon Treks. Carry These Things For Monsoon Trekking In Marathi

पावसाळी ट्रेकला जाताना पायामध्ये चांगल्या ग्रीपचे बुट असणं खूप गरजेचं आहे. CTR किंवा Action Trekkking चे बुट कमी दरात मिळतात शिवाय त्यांचा दर्जाही उत्तम असतो. CTR चे बुट ९०० ते १००० रुपयात मिळून जातात. सह्याद्रीत भटकणारे अनुभवी ट्रेकर्सदेखील बऱ्याच काळापासून हे बुट वापरत आले आहेत.

ट्रेकला जाताना पूर्ण बाह्याचे टी शर्ट आणि पॅन्ट घाला. यासोबतच रेनकोट, Sack Cover, कपड्यांचे जास्तीचे जोड, प्रथमोपचार पेटी, जळवांपासून बचावासाठी मीठ, जंतुनाशक मलम, सुका खाऊ, पाणी, डासांपासून बचावासाठी मलम इत्यादी गोष्टी सोबत ठेवा. यासोबतच मोबाईल भिजू नये म्हणून प्लास्टिकची पिशवी जवळ असु द्या. Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

३)अतिउत्साहीपणा किंवा वेडे साहस टाळा 

बरेच अतिउत्साही पर्यटक उत्साहाच्या भरात कड्यावर जाऊन सेल्फी घेणं, धबधब्याखाली जाणं असे उद्योग करतात. पावसाळ्यात बरेचदा दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. तसेच धबधब्याखाली गेल्यास वरून दगड पडू शकतात किंवा पोहण्यासाठी उतरल्यास वाहून जाण्याचे प्रकार सह्याद्रीत घडतात. अशा वेळी मग सरकार सरसकटपणे त्या ठिकाणावर बंदी आणते. त्यामुळे एक जबाबदार पर्यटक बना. निसरड्या वाटेवरून चालताना आणि ओढे ओलांडताना विशेष काळजी घ्या.

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

 

४)सूचनांचे आणि नियमांचे पालन करा Follow Safety Rules While Trekking In Western Ghats In Monsoon

तुमचा ट्रेक लीडर सांगेल त्या सूचनांचे पालन करा. स्वतःहून नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू नका. ट्रेकला सुरुवात करण्याआधी शक्य असल्यास स्थानिक वाटाड्या सोबत घ्या. किंवा स्थानिकांना आपण जात असलेल्या ठिकाणाची कल्पना द्या. अडचणीत सोबत असावा म्हणून त्यांचा संपर्क क्रमांक सोबत असु द्या. सह्याद्रीत अथवा जंगलात भटकायचे ज्ञान असल्याशिवाय नव्या वाटा शोधायचा प्रयत्न करू नका. सोबतीला स्थानिक वाटाड्या किंवा गाईड घेणे कधीही उत्तमच.

 

५)वाट चुकल्यास वा अपघात झाल्यास या गोष्टी करा. Contact numbers for emergency In Trekking In Maharashtra

ट्रेकिंग करताना वाट चुकल्यास घाबरून जाऊ नका. शक्य तितके शांत राहून आपल्या सोबतच्या मित्रांना आवाज द्या. वाट शोधण्याचा प्रयत्न करा. मोबाईलवरून संपर्क करत राहा. Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

ट्रेकला अपघात झाला आणि मदतीची गरज असल्यास आपण सह्याद्रीतील आपत्ती निवारण यंत्रणा किंवा रेस्क्यू संस्थांशी संपर्क करू शकतो. पुढे दिलेल्या क्रमांकांवर त्यांना संपर्क साधा. त्यांच्याशी संपर्क करून लोकेशन शेअर करा आणि रेस्क्यू होईपर्यंत मोबाईलची बॅटरी जपून वापरा.

Maharashtra Mountaineers Rescue Coordination Center (MMRCC)- 7620230231

या २४ तास कार्यरत असणाऱ्या क्रमांकावर संपर्क करा.

यासोबतच आपण शिवदुर्ग मित्र- लोणावळा, निसर्गमित्र- पनवेल, महाबळेश्वर ट्रेकर्स- सातारा इत्यादी गिर्यारोहण आणि रेस्क्यू संघटनांशी संपर्क साधू शकता. या संस्था आणि त्यांचे सदस्य सह्याद्रीत होणाऱ्या अपघातांमधील रेस्क्युमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालुन मोलाची भूमिका बजावत आहेत. बऱ्याचदा पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळे अपघात होतात, पण याचा फटका या रेस्क्यू करणाऱ्या ट्रेकर्सना बसतो. रात्री अपरात्री हे लोक जीवाची पर्वा न करता अशा ठिकाणी जीवाची बाजी लावून मदतीसाठी दाखल होतात. त्यामुळे पर्यटकांनी जबाबदारीने पर्यटन करणे गरजेचे आहे.

 

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

६)पावसाळ्यात ही ठिकाणं टाळा Avoid These Places In Monsoon trekking In sahyadri. Devkund waterfall, kataldhar waterfall are risky in monsoon

पावसाळ्यात सह्याद्रीतील काही ठिकाणी हमखास गर्दी होते. सोशल मिडीयावरील व्हिडियो बघून ट्रेकला, पर्यटनाला जाणाऱ्या लोकांची संख्या हल्ली वाढत आहे. पण यासोबतच पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे सह्याद्रीतील ठिकाणांवर ताण वाढतो आहे. आणि सह्याद्रीतील अपघातांचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. लोकांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी एक जबाबदार ट्रेकर, पर्यटक म्हणून अशी ठिकाणं पावसाळ्यात किंवा सुट्टीच्या दिवशी टाळू शकतो.

देवकुंड धबधबा, कातळधार धबधबा, अंधारबन जंगल ट्रेक, ढाक बहिरी किल्ला इत्यादी ठिकाणं पावसाळ्यात फिरणं धोकादायक बनत चाललं आहे.

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

 

७)अज्ञात ठिकाणं अज्ञातच राहु द्या Do Not Disclose Unknown Locations On Social Media

सह्याद्रीत आडवाटेवर भटकंती करताना बरेचदा ट्रेकर्सना काही अज्ञात निसर्गसौंदर्य दिसतं. एखादा सुंदर धबधबा, गुहा किंवा काही सुंदर ठिकाणं मोहात पडतात. अशी ठिकाणं जर लोकांना जास्त ज्ञात नसतील तर तिथल्या लोकेशनबद्दल सोशल मिडियावर माहिती देऊ नका. एकदा ती जागा जगाला माहिती झाली कि तिथे गर्दी वाढत जाते आणि मग तिचे सौंदर्य धोक्यात येते.

 

पावसाळ्यात ट्रेकिंग साठी उत्तम आणि सोपे असलेले किल्ले- Easy Treks For Monsoon

१)तिकोना किल्ला

पिंपरी चिंचवडपासुन जवळ असलेलें हा किल्ला पवना धरणाला लागुनच आहे. चढाईला सोपा असलेला हा किल्ला एका तासात बघून होतो. पावसाळ्यात किल्ल्यावर धुक्याची चादर पसरलेली असते. इथून छान नजारा दृष्टीस पडतो. पायथ्याशी गाव असल्यामुळे आणि वर्दळ असल्यामुळे हा किल्ला ट्रेक करणं सुरक्षित आहे. Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

२)कोरीगड किल्ला

कोरीगड किल्ला त्याच्या लांबच लांब आणि सुस्थितीत असलेल्या तटबंदीमुळे ओळखला जातो. पावसाळ्यात गडाचे सौंदर्य बहरते. लोणावळा शहरापासून भुशी धरण ओलांडुन गेलं कि पुढे २० किमीवर हा किल्ला लागतो. चढाईला सोपा असलेलें हा किल्ला सुरक्षित आहे.

३)घनगड किल्ला

घनगड हा छोटासा किल्ला आणि त्याच्या आसपासचा सह्याद्री पावसाळ्यात स्वर्गासमान सुंदर बनून जातो. लोणावळा पासुन ६० किमी असलेला हा किल्ला त्याच्या आसपासच्या डोंगर, सुळके आणि निसर्गामुळे फिरायला मजा येते. जवळच तैलबैला, सुधागड यासारखे सुंदर किल्ले आहेत.

४)कैलासगड किल्ला

घनगडच्या पुढे जात आडवाटेवर असलेला हा कैलासगड किल्ला बघून होतो. किल्ला छोटा असुन आडवाटेवर आहे. किल्ल्यावर फारशी वर्दळ नसते. Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

५)विसापूर किल्ला

विसापूर हा किल्ला एक मोठा आणि सुंदर किल्ला आहे. भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला पावसाळ्यात बघायला भारी मजा येते. जवळच लोहगड असुन हे दोन्ही किल्ले एका दिवसात बघून होतात. पायथ्याशी गाव आणि गावात हॉटेल्स वगैरे सोयी असुन हा किल्ला ट्रेक करणं सोपं आणि सुरक्षित आहे.

६)लोहगड किल्ला

चढायला अगदीच सोपा, सुंदर पायऱ्या आणि विंचूकाटा माची यामुळे लोहगड पर्यटकांमध्ये लोकप्रिय असुन शनिवार रविवारी इथे प्रचंड गर्दी असते. गडाच्या पायथ्याशी गावात हॉटेल्सची चांगली सोय असुन राहण्या खाण्याची सोय होते.

७)जीवधन किल्ला

जुन्नरच्या पुढे असणारा जीवधन किल्ला म्हणजे भटक्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात हा किल्ला खऱ्या अर्थाने सह्याद्रीची सुंदरता दाखवतो. किल्ल्याच्या पायथ्याशी दाट जंगल असुन आसपास अधूनमधून बिबट्याचा वावर बघायला मिळतो.

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

८)कोकणदिवा किल्ला

खडकवासलाच्या पुढे जात पानशेत धरणाच्या बाजुने जात पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या सांदोशी गावाजवळ कोकणदिवा हा सुंदर किल्ला उभा आहे. आसपास असणाऱ्या दुर्गम सह्याद्रीत सह्याद्रीत असणारे कोकणदिवा हे रत्न खरोखरच सुंदर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणदिवा किल्ल्यावरून पुढे रायगड किल्ला स्पष्ट दिसतो. तसेच आसपास लिंगाणा वगैरे सुळकेही नजरेस पडतात. इथून रायगड बघून मनाला समाधान मिळते. कोकणदिवा किल्ल्याला जाणारा रस्ताही अशक्य सुंदर असुन पावसाळ्यात एकदा तरी हा आनंद नक्कीच घ्यायला पाहिजे.

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

ट्रेकर्स मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

हे देखील वाचा ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

Firastaa- Marathi Travel And Trekking Blog

Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi

1 thought on “पावसाळ्यात ट्रेकला जाताय? ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा Monsoon Trekking Tips In Maharashtra Marathi Pavsala Trek”

Comments are closed.