महाकुंभला जाताय? आधी हे वाचा. Mahakumbh Travel marathi mahiti
कुंभमेळ्याला जाण्याचा प्लॅन करताय का? जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. तब्बल १२ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे. १३ जानेवारी २०२५ ला सुरु झालेला हा कुंभमेळा २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. तब्बल १४४ वर्षानंतर आलेल्या या महाकुंभमेळ्यात स्नानासाठी भारतासह जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावत आहेत. महाकुंभसाठी देशभरातून नागा साधू तसेच इतर अनेक साधू संत प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. Mahakumbh Travel marathi mahiti
कुंभमेळ्यात जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात आणि गंगास्नानाचा आनंद घेतात. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४० कोटी भाविक इथे हजेरी लावतील असा अंदाज आहे. महाकुंभात सहभागी होण्यासाठी तुम्हीदेखील प्रयागराजला जाणार असाल तर हा लेख नक्की वाचा. तुमच्या साऱ्या शंका आणि प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
कुंभमेळ्याला जाणार असाल तर हा लेख नक्की वाचा. शाही स्नानासह तुम्हाला प्रयागराज मधील कोणत्या कोणत्या मंदिरांना भेट देता येईल याबद्दल आम्ही या लेखात माहिती देणार आहोत. प्रयागराजमध्ये १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून प्रशासनाने त्याची जय्यत तयारी केली आहे. इथल्या त्रिवेणी संगमावर साधू संतांबरोबरच जगभरातून अनेक भाविक भक्त दररोज मोठ्या संख्येने येत आहेत. जर तुम्हीही कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी सर्व माहिती घेऊन आलो आहोत.
महाकुंभला जाणार असाल तर या ५ गोष्टींकडे खास लक्ष द्या.
१)प्रवासाचं योग्य नियोजन करा. स्नानपर्वादिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे तुमच्या प्रवासाचं तिकीट, धर्मशाळा वा हॉटेलचे आगाऊ बुकिंग करून ठेवा.
२)स्वतःच्या आणि आपल्या सोबतच्या लोकांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी घ्या. गरजेच्या औषध-गोळ्या, मास्क, ओळखपत्र आणि इतर गोष्टी सोबत बाळगा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि गर्दीमध्ये सतर्क राहा.
३)आपल्यासोबत ओळखपत्र, पाणी बाटली, मोबाईल चार्जर आणि आगाऊ कपडे सोबत ठेवा. मौल्यवान साहित्य सोबत घेऊ जाऊ नका.
४)गंगा नदी आणि तिथल्या पवित्र ठिकाणांचे पावित्र्य जपा. स्नानावेळी नदी घाण करू नका. इतर भाविकांचा सन्मान करा. आणि नियमांचे पालन करा.
५)गरजेच्या वेळी प्रशासनाच्या आपत्कालीन सेवेचा लाभ घ्या. प्रशासनाने या सोहळ्यासाठी अनेक सेवा पुरविल्या असुन त्यांची माहिती आणि लाभ घ्या.
Mahakumbh Travel marathi mahiti
कुंभमेळ्यात या गोष्टी टाळा/ करू नका.
१)महाकुंभमध्ये असताना पोलिसांसोबत भांडून वाद उत्पन्न होईल अशी कृत्ये करू नका.
२)स्नानाला गेल्यास नदीत जास्त पुढे जाऊ नका.
३)गर्दीमध्ये धावपळ वा आरडाओरड करू नका. याने लोकांमध्ये भीती निर्माण होऊन चेंगराचेंगरी सारख्या घटना होऊ शकतात.
४)प्लास्टिकचा वापर टाळा. तिथे गेल्यावर कचरा करू नका.
५)अनोळखी वस्तूंना स्पर्श करू नका. पोलिसांना याबद्दल माहिती द्या. Mahakumbh Travel marathi mahiti
कुंभमेळ्याला कसे जाल? How To Reach Mahakumbh Prayagraj Marathi
भारतातल्या प्रमुख शहरांपासून प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. आपल्याला रेल्वेने आधी प्रयागराजला पोहोचावे लागेल. प्रयागराजपासुन महाकुंभ ११ किमी अंतरावर आहे. तिथुन कुंभमेळ्यापर्यंत जाण्यासाठी ऑटो किंवा टैक्सी मिळून जाईल. प्रयागराजमध्ये ९ रेल्वे स्थानक असुन प्रत्येक स्थानकापासून महाकुंभ २.५ किमी ते १८ किमी अशा अंतरावर आहे.
तसेच आपल्या खाजगी वाहनाने अथवा बसने देखील आपण प्रयागराजला पोहोचू शकता.
महाकुंभमध्ये किती पायी चालावे लागेल?
इतर दिवशी ५ किमी ते शाही स्नानादिवशी १० किमीपर्यंत पायी चालावे लागेल. शाही स्नानादिवशी खाजगी वाहनांना १० किमी क्षेत्राच्या बाहेरच थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
महाकुंभमध्ये राहायची सोय कुठे होईल? Stay Facility At Mahakumbh
महाकुंभमध्ये आलेल्या लोकांच्या राहण्याची सोय प्रशासनाने केली असुन १० लाख लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मोफत आणि सशुल्क अशा दोन्ही पर्यायांचा समावेश आहे.
जर आपल्याला लक्झरी सुविधा पाहिजे असेल तर संगमाच्या बाजूलाच सोय करण्यात आली आहे. ज्याचे भाडे ८० हजार ते १ लाख रुपये प्रतिदिन अशा प्रमाणात आहे.
तसेच इथे आसपास २००० तंबू ठोकण्यात आले असुन त्यासाठी ३००० ते ३०,००० रुपये अशा प्रमाणात शुल्क आहे. यासाठी आधी बुकिंग करावी लागेल. Mahakumbh Travel marathi mahiti
यासोबतच शहरात हॉटेल्स असुन आपण online द्वारे आगाऊ बुकिंग करू शकता.
यासोबतच मेळ्यात आश्रयस्थाने बनविण्यात आली असुन प्रत्येक ठिकाणी २५० बेड आहेत.
तसेच शहरात धर्मशाळा आणि होमस्टे यासारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
महाकुंभ प्रयागराजला जाण्यासाठी किती खर्च येईल? Budget For Mahakumbh Travel
महाकुंभमधील तुमच्या प्रवासाचा खर्च हा तुम्ही प्रवास कसा करणार, कुठे राहणार आणि कुठे खाणार या गोष्टींवर अवलंबून असला तरी साधारणपणे दिवसाचे १००० ते २००० रुपये अशा प्रमाणात खर्च होऊ शकतो. हा आकडा एक अंदाज आहे. खर्चाची बचत करायची असेल मोफत राहण्याच्या आणि जेवणाच्या पर्यायांचा विचार करा.
महाकुंभ मध्ये किती शाही स्नान अमृत स्नान होणार आहेत? Amrut snan In Marathi
पौष पोर्णिमा, मकर संक्रांति, मौनी अमावास्या, वसंत पंचमी (३ फेब्रुवारी), माघ पोर्णिमा (१२ फेब्रुवारी) आणि महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी) या पवित्र दिनांदिवशी महाकुंभमध्ये शाही स्नानाचा आनंद घेता येणार आहे. अमृत स्नानाच्या दिवशी इथे प्रचंड प्रमाणात गर्दी होते त्यामुळे भाविकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
Mahakumbh Travel marathi mahiti
हे देखील वाचा- Ayodhya Travel Information In Marathi अयोध्येला जाण्याआधी जाणून घ्या ही संपूर्ण माहिती
महाकुंभमध्ये काय काय बघाल? Places To Visit In Prayagraj
महाकुंभमध्ये स्नानासोबातच भाविक आणि पर्यटक प्रयागराजमध्ये असलेल्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन आध्यात्मिक प्रवास अधिक सुखद करू शकतात. इथल्या मंदिरांना मान्यता मिळण्याबरोबरच प्राचीन इतिहास देखील आहे.
प्रयागराज अनेक धार्मिक कारणांनी खास आहे. येथे अनेक प्रमुख धार्मिक संस्था तसेच धार्मिक स्थळे आहेत. त्रिवेणी संगमामुळे हे प्रयागराज, ज्याला तीर्थराज असेही म्हटले जाते जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. महाकुंभात सहभागी होणारे बहुतांश भाविक भक्त हनुमानजींचे दर्शन घेतात. याशिवाय येथे असलेली अनेक प्राचीन मंदिरे तुमची कुंभयात्रा अधिक आनंददायी आणि सुंदर बनवतील. चला तर मग जाणून घेऊयात या मंदिरांबद्दल. ही सारी मंदिरे त्रिवेणी संगमापासून मोजक्याच अंतरावर असल्याने टी आरामात बघून होतात.
Mahakumbh Travel marathi mahiti
प्रयागराजमधील प्रसिद्ध मंदिरे Famous Temples in Prayagraj
१)आदि शंकर विमान मंडपम्
हे मंदिर संगमापासून १ किमी अंतरावर आहे. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिरात चार स्तंभ आहेत. या ठिकाणी भेट दिल्याने आध्यात्मिक शांती तर मिळेलच, पण हे मंदिर कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. कामाक्षी देवीला समर्पित असलेले हे तीन मजली मंदिर पाहण्यास अतिशय सुंदर आहे. भगवान शिव आणि श्री विष्णू देखील येथे पहावयास मिळतात. Mahakumbh Travel marathi mahiti
२)आलोप शंकरी मंदिर
प्रयागराजमध्ये तुम्ही अलोप शंकरी मंदिराला देखील भेट देऊ शकता. या मंदिराची विशेषता म्हणजे यात कोणतीही मूर्ती स्थापित नाहीये. आलोपशंकरी मातेचे हे मंदिर एक शक्तिपीठ मानले जाते जिथे देवीच्या नावाने पाळणाघराची पूजा केली जाते. या पाळणाघरावर चुनार आणि पॅरासोल बसविण्यात आले आहे. या प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी अनेक लोक येतात.
३)श्री वेणी माधव मंदिर
प्रयागराजमधील श्री वेणी माधव मंदिर देखील प्रसिद्ध आहे. हे मंदिर संगम परिसरात दारगंज येथे आहे. मंदिरामध्ये भगवान विष्णूचे माधव रूप दिसते. संगमात स्नान केल्यानंतर या मंदिराला अवश्य भेट द्यावी, अशी मान्यता आहे.
४)मनकामेश्वर महादेव मंदिर
मनकामेश्वर हे महादेव मंदिर यमुना नदीच्या किनाऱ्यावर आहे. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात काळ्या पाषाणापासुन बनलेल्या भगवान शिव, गणपती आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. तसेच हनुमानाची भव्य दक्षिणाभिमुख मूर्ती पाहायला मिळते. Mahakumbh Travel marathi mahiti
५)नागवासुकी मंदिर
प्रयागराजमधील महाकुंभात सहभागी होणार असाल तर संगम किनाऱ्यापासुन ३ किमी अंतरावर असलेल्या ‘नागवासुकी मंदिरा’ला भेट द्या. प्राचीन वास्तुशास्त्र आणि आधुनिक सौंदर्य यांचा योग्य मिलाफ इथे बघायला मिळेल. तसेच या सुंदर मंदिराची भव्यता तुमचे मन मोहून टाकेल.
६)निद्रावस्थेतील हनुमान मंदिर
संगमापासून १ किमी अंतरावर हे झोपलेल्या मारुतीचे मंदिर आहे. संगमावर आलेले भाविक इथे आवर्जून भेट देतात. जमिनीवर झोपलेल्या अवस्थेतील मारुतीचे हे देशातील एकमेव मंदिर आहे.
७)पाताळपुरी मंदिर
देशातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला वैदिक काळाचा इतिहास असुन अनेक भाविक इथे खास भेट देतात.
८)श्री अक्षयवट मंदिर
हे मंदिर संगमाजवळच असलेल्या अकबराच्या किल्ल्यात आहे. पौराणिक कथांनुसार इथल्या वटवृक्षाच्या खाली राम लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासात असताना आराम केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
Mahakumbh Travel marathi mahiti
तर अशा पद्धतीने महाकुंभबद्दलची ही सारी माहिती आहे. आपण जाणार असाल किंवा मित्र जाणार असतील तर त्यांना ही पोस्ट शेअर करा म्हणजे त्यांनाही नियोजन करायला मदत होईल. अशाच नवनवीन माहितीपर लेखांसाठी आमच्या ब्लॉगला भेट देत राहा. यासोबतच आपण आम्हाला फेसबुकवर follow करू शकता. तसेच आमच्या whatsapp ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. जेणेकरून प्रत्येक नवीन आणि उपयोगी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. whatsapp ग्रुपची लिंक वर पोस्टमध्ये मिळून जाईल.
-टीम फिरस्ता
Marathi Travel Blog