‘लक्षद्वीप’ हे उजळले घरी… जाणून घ्या लक्षद्वीपबद्दल सर्व काही

 ‘लक्षद्वीप’ हे उजळले घरी… जाणून घ्या लक्षद्वीपबद्दल सर्व काही

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली आणि लक्षद्वीप जगाच्या प्रकाशझोतात आले. मोदींच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मिडियाद्वारे जगभर तुफान व्हायरल झाले आणि गुगलवर सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या शब्दांमध्ये लक्षद्वीपचा समावेश झाला. मालदीवच्या तोडीस तोड असलेले हे सुंदर बेट आपल्या भारत देशात आहे याची भारतीयांना कल्पनाच नव्हती. आता लक्षद्वीप च्या विकासाकरिता नक्कीच प्रयत्न होतील आणि भारतीयांना सुट्ट्यांसाठी मालदीवला वगैरे जायची गरज पडणार नाही. Lakshadweep Travel Guide Information In Marathi

 

कुठे आहे लक्षद्वीप? Where Is Lakshadweep? Lakshadweep Travel Guide Trip Planning Information In Marathi

लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरुन लक्षद्वीप बेट २०० ते ४४० किमी अंतरावर आहे. लक्षद्वीप हे बेट म्हणजे एकूण ३६ छोट्या छोट्या बेटांचा एक समूहच आहे. पण याठिकाणी लोक फक्त १० बेटांवरच राहतात. येथील ९६ टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे.

कावरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या ६४००० आहे. येथील साक्षरता दर हा ९२% आहे, जो भारतातील अनेक मोठ्या शहरांपेक्षा देखील जास्त आहे. Lakshadweep Travel Guide Information In Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. निळाशार सुंदर समुद्र आणि  धाडसी खेळ ज्यांना आवडतात, त्यांच्यासाठी लक्षद्वीप हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे. सुट्ट्या घालवण्यासाठी नक्कीच लक्षद्वीप हा उत्तम पर्याय आहे.

हे वाचा-Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary In Marathi भिगवण मध्ये होतंय परदेशी पक्ष्याचं आगमन

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

लक्षद्वीप भारताचा भाग कसा बनले? How Lakshadweep Became Indian Part?

स्वातंत्र्यानंतर लक्षद्वीप भारत किंवा पाकिस्तान या दोन्हींचा भाग नव्हते. कारण दोन्ही देश मुख्य भूमीतील भागांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत होते. तत्कालीन भारतीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लक्षद्वीप लवकरात लवकर हस्तगत करून तिथं तिरंगा झेंडा फडकावण्याचे निर्देश भारतीय सैन्याला दिले. दुसरीकडे पाकिस्तानी लष्करही याच मार्गावर होते. अखेर भारतीय सैन्य प्रथम लक्षद्वीपमध्ये पोहोचले आणि तिरंगा फडकावण्यात आला. पाठोपाठ पाकिस्तानची युद्धनौकाही तेथे पोहोचली. मात्र भारताचा तिरंगा ध्वज पाहून ते आल्या पावली परतले. तेव्हापासून लक्षद्वीप हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षद्वीप हे भारतासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. येथून हिंदी महासागर व अरबी समुद्र या दोन्हींवर लक्ष ठेवता येते. लष्करी आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही लक्षद्वीपला खूपच महत्त्व आहे. भारतीय नौदलाचा तळ ‘आयएनएस दीपरक्षक’ लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती येथे २०१२ पासून कार्यरत आहे. Lakshadweep Travel Guide Information In Marathi

 

लक्षद्वीपला भेट देण्याची उत्तम वेळ (Best Time To Visit Lakshadweep In 2024)

लक्षद्वीपमध्ये तसे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते, परंतु लक्षद्वीपला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान मानला जातो. या काळात हवामान चांगले व प्रवासासाठी अतिशय अनुकूल असते. तसेच मार्च ते मे दरम्यान, म्हणजे उन्हाळ्यातही तुम्ही लक्षद्वीपला जाऊ शकता.

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

 

लक्षद्वीपला कसे जायचे? (How To Reach Lakshadweep)

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या लक्षद्वीपला फक्त जलवाहतूक किंवा विमानमार्गाने जाता येते. जहाजाने कोची ते लक्षद्वीप या प्रवासासाठी १५ ते २० तास लागतात. किंवा विमानाने जायचे असेल तर कोचीहून विमानाने अगात्ती विमानतळापर्यंत थेट जाऊ शकता. अगात्ती हे लक्षद्वीपमधील एकमेव विमानतळ आहे. अगात्ती बेटावरून तुम्ही बोटीने मिनिकॉय बेट, काल्पेनी बेट आणि इतर बेटांवर जाऊ शकता. तुम्ही अगात्ती ते कवरत्ती बेटापर्यंत हेलिकॉप्टर राईडचा देखील आनंद घेऊ शकता. Lakshadweep Travel Guide Information In Marathi

या हिवाळ्यात भेट द्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनला. हे वाचा-Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.

लक्षद्वीपमध्ये काय काय करावे? (Things To Do In Lakshadweep)

लक्षद्वीपचे सुंदर समुद्रकिनारे आणि स्वच्छ निळाशार पाण्याखालील आश्चर्यकारक समुद्री जीवन पर्यटकांना अनेक रोमांचक गोष्टींचा आनंद घेण्याची संधी देतात. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि समुद्राखाली चालणे (Undersea Walking) यांसारखे साहसी खेळ तिथं करता येतात. यासोबतच कयाकिंग, कॅनोइंग, जेट-स्कीइंग, काइटसर्फिंग आणि पॅरासेलिंगचा देखील आनंद घेऊ शकतात. तुम्ही बोटीने तेथील अनेक बेटांना भेट देऊ शकता आणि सर्व बेटांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. लक्षद्वीपमधील डॉल्फिन पाहण्यासाठी अगात्ती आणि बंगाराम बेटे ही उत्तम ठिकाणे आहेत.

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

 

लक्षद्वीपमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ (Best Food To Try In Lakshadweep)

लक्षद्वीपमधील खाद्यपदार्थांमध्ये केरळचा उल्लेख नक्कीच येतो. इथल्या बहुतेक घरांच्या स्वयंपाकघरात मलबार खाद्यपदार्थ राज्य करतात. प्रत्येक डिशमध्ये खोबरेल तेल आणि कढीपत्ता हमखास वापरला जातो. तांदूळ हे इथलं मुख्य अन्न असुन विविध प्रकारच्या सीफुड्सचा भातासोबत आनंद घेतला जातो. किलांजी नावाची अंडी व भाताची डिश लग्नसमारंभ वा इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. मिनिकॉय बेटावरचा प्रसिद्ध ‘मूस कबाब’ हा पदार्थ टूना फिशपासून बनवला जातो. ऑक्टोपस फ्राय हा एक अनोखा पदार्थ आहे जो फक्त लक्षद्वीपमध्येच उपलब्ध आहे. सीफूड प्रेमींसाठी हे खास आश्चर्यकारक आहे. मास पोडीचथु, बटाला अप्पम, अवियल, बिर्याणी इत्यादी स्वादिष्ट पदार्थ लक्षद्वीप मध्ये प्रसिद्ध आहेत. Lakshadweep Travel Guide Information In Marathi

ट्रेकिंग सुरु करणार असाल आणि कुठे जावं कळत नसेल तर हे वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

 

लक्षद्वीपला भेट देण्यासाठी येणारा खर्च (Budget Or Cost To Visit Lakshadweep In 2024)

लक्षद्वीप टूर पॅकेज ४ दिवस आणि ३ रात्रीसाठी सुमारे ₹२३,००० (प्रति व्यक्ती) पासून सुरू होते. मात्र हे पॅकेज लक्षद्वीपला अगात्ती इथं पोहोचल्यानंतरच्या खर्चाचे आहे. लक्षद्वीपला जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागते. कमी खर्चात लक्षद्वीपला जायचे असेल तर जहाजाने जाणे हा उत्तम पर्याय आहे. कोची ते लक्षद्वीप हा २० तासांचा जहाज प्रवास २०००-५०००रु तर विमान प्रवासाचे भाडे ५५०० रुपयांपासून सुरू होते. (टुर पॅकेज source- Make My Trip.Com)

इथे पोहोचल्यावर तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी आपण तिथे उपलब्ध असलेल्या रिक्षा, टॅक्सी या साधनांचा वापर करू शकतो. तसेच तिथे फिरण्यासाठी बाईक देखील भाड्याने मिळतात. अगदी २००-३०० रुपयांपासून देखील इथे बाईक भाड्याने मिळतात. तसेच इथे वेगवेगळ्या बेटांवर फिरण्यासाठी खाजगी बोटींचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

लक्षद्वीपला भेट देण्याआधी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा (Keep This In Mind Before Visiting Lakshadweep)

लक्षद्वीपमध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे आणि केरळातील कोची स्थित लक्षद्वीप प्रशासनाने जारी केलेलं परमिट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे परमिट मिळविण्याकरिता, तुम्ही क्लिअरन्स सर्टिफिकेट डाऊनलोड करून तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमधुन ते क्लिअर करून घेणं आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि पासपोर्ट आकारामधील तीन फोटो सादर करावे लागतील. मंजुरी प्रमाणपत्रानंतर, प्रवेश परमिट डाउनलोड करावे लागेल किंवा विलिंग्डन आयलंड, कोची येथील लक्षद्वीप प्रशासन कार्यालयातून घ्यावे लागेल. लक्षद्वीपला पोहोचल्यावर हे एंट्री परमिट लक्षद्वीपच्या स्टेशन हाउसमधील अधिकाऱ्याकडे जमा करावे लागते.

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

हे देखील वाचा-Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट या हिंदू मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी 2024

भारत सरकारची लक्षद्वीप बेटांसाठी मोठी घोषणा-

नुकतीच पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भारत सरकारने लक्षद्वीप बेटांसाठी ३६०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांची घोषणा केली आहे. या योजनांमध्ये Androth, Kalpeni आणि कदमत बेटांवर बंदर सुविधा तसेच kadamat बेट, आगात्ती बेट आणि कावरत्ती बेटावरील रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी त्यांच्या मुलाखतीत बजेट २०२४ च्या भाषणात देशांतर्गत पर्यटन व रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी लक्षद्वीपसह बंदर जोडणी, टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर आणि इथल्या बेटांवरील सुविधा विकसित करण्यावर भर देण्याची घोषणा केली आहे. यामुळे पुढील काही काळात लक्षद्वीपमधील पर्यटन व्यवसाय वाढीसोबतच एका अनोख्या नव्या रुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? याप्रमाणेच आम्ही आपल्यापर्यंत भारतातील व जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांची माहिती पोचवत राहू. जेणेकरून आपल्याला आपल्या ट्रीपची प्लानिंग करणं सोपं जाईल. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग

Lakshadweep Travel Guide Information In Marathi

हेही वाचा-भारतातली सुंदर हिल स्टेशन्स

5 thoughts on “‘लक्षद्वीप’ हे उजळले घरी… जाणून घ्या लक्षद्वीपबद्दल सर्व काही”

Comments are closed.