Kharosa Caves Latur Maharashtra लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर -Hidden Beauty Of Latur 2024

खरोसा लेण्या, लातूर

Kharosa Caves Latur Maharashtra महाराष्ट्रात जवळजवळ ८०० विविध छोट्या मोठ्या लेण्या बघायला मिळतात. काळ्या बसाल्ट खडकात कोरलेल्या या लेण्या म्हणजे तत्कालीन कलाकारीचा एक अद्भुत नमुना आहेत. बहुतांश लेण्या प्राचीन काळात बौद्ध भिक्खुंच्या तसेच प्रवाशांच्या विश्रांतीकरिता कोरल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध लेण्यांमध्ये अजिंठा, वेरुळ, कार्ला, भाजे, घारापुरी यासारख्या लेण्या अग्रस्थानी आहेत. याव्यतिरिक्त बऱ्याच अप्रसिद्ध आणि दुर्लक्षित लेण्याही आपल्याला बघायला मिळतात. आज आपण लातुरजवळ असलेल्या लाल जांभ्या दगडात कोरलेल्या खरोसा या अपरिचित लेण्यांबद्दल जाणुन घेणार आहोत. Caves Of Maharashtra

Kharosa Caves Latur Maharashtra

 

खरोसा लेण्या कुठे आहेत आणि कशा तयार झाल्या? Where Are Kharosa Caves And How They Are Made?

लातूरपासून अवघ्या ४५ किमी अंतरावर लातूर निलंगा रस्त्यावर खरोसा ह्या औसा तालुक्यातल्या गावी ह्या प्राचीन हिंदू लेण्या आहेत. एका जांभा खडकाच्या डोंगरावर ही लेणी कोरण्यात आली आहेत. साधारणतः आपण बसाल्ट खडकातल्या लेण्या सर्वत्र बघतो, परंतु इथं मात्र जांभा खडक आपल्याला बघायला मिळतो. जांभा खडक सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी निकृष्ट प्रतीचा असतो. त्यामुळे जांभा दगडात लेणी खोदलेली सहसा दिसत नाहीत. Kharosa Caves Latur Maharashtra 

लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीच्या पोटात झालेल्या प्रचंड उलथापालथीमुळे या ठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली.

खरोसा लेण्या जांभ्या दगडात कोरलेल्या असल्यामुळे इथे कोरलेली शिल्पं ही अर्धवट आणि ओबडधोबड असलेली आपल्याला बघायला मिळतात. बारा लेण्यांचा हा लेणीसमूह असून काही लेण्यांत मोठ्या आकाराची शिवलिंगं आहेत. तर डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुका मातेचे मंदिर आहे.

 

खरोसा लेण्यांचा इतिहास History Of Kharosa Leni Latur Maharashtra In Marathi

सर्वात आधी जेम्स बर्जेस या स्कॉटिश अधिकाऱ्याने या लेण्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले. कल्पसमूह या प्राचीन मराठी ग्रंथामध्ये रसविद्येला उपकारक ठरणाऱ्या काही स्थानांमध्ये ‘खरोसा’ या स्थानाचा एक संदर्भ दिलेला आहे. खरोसा येथील लेण्यांची रचना व सामान्य वैशिष्ट्ये पाहता हे लेणे कर्नाटकातल्या बदामी येथील हिंदू लेण्यांसारखेच आहे. त्यामुळे जेम्स बर्जेस यांनी खरोसा लेण्यांचा कालखंड हा सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा लेणी सुमारे इ. स. ५०० ते ७०० या कालखंडात खोदण्यात आली असावीत. त्यादरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराण्याचे राज्य होते. Kharosa Caves Latur Maharashtra 

Kharosa Caves Latur Maharashtra

खरोसा लेण्यांची सद्यस्थिती- Current Condition Of Kharosa Caves Latur Maharashtra In Marathi

इथल्या मुख्य लेणीत रामायणातील दृश्ये कोरलेले बघायला मिळतात. एका लेणीमध्ये हिरण्यकशिपुचे नरसिंह रूपातल्या विष्णुने पोट फाडल्याचे शिल्प आहे. दुसऱ्या एका लेणीत भगवान बुद्धांची मूर्ती आहे तर दुसऱ्या लेणीत शिवलिंग आहे. इथल्या बऱ्याच लेण्यांमध्ये अशी मोठ्या आकाराची शिवलिंगं आढळुन येतात. तसेच इथे बाहेरच यक्षाची मूर्ती कोरलेली बघायला मिळते.

Kharosa Caves Latur Maharashtra

येथील सर्वात मोठी लेणी ही दुमजली आहे. तिथल्या भिंतीवर शिव, विष्णू, ब्रम्हा, व्दारपाल आणि शिवलिंगं कोरलेली आढळतात. दुसरी लेणी ही शैव लेणी आहे. यात गाभार्‍यात शिवलिंग आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल व नाग अशी शिल्पं कोरलेली आहेत. मुख्य सभामंडप अनेक खांबांवर तोललेला आहे. यातील काही खांबांची पडझड झालेली दिसुन येते. सभामंडपाच्या भिंतीवर विविध प्रकारची शिल्पं कोरलेली आहेत. तसेच इथल्या काही लेण्या या अपूर्ण अवस्थेत आहेत. जांभा हा खडक फार मजबूत नसल्यामुळे इथल्या बऱ्याच लेण्यांची झीज झालेली आपल्याला दिसुन येते. Kharosa Caves Latur Maharashtra 

 

 

खरोसा लेणींचा परिसर सद्यस्थितीत दाट झाडीच्या सानिध्यात असुन बऱ्यापैकी निर्मनुष्य असा आहे. हा परिसर सध्या मद्यपींचा आणि प्रेमी युगुलांचा अड्डा बनल्याचं दिसुन येतं. एक अतिशय चांगला ऐतिहासिक वारसा प्रशासन आणि स्थानिकांच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित राहिला आहे. हे नक्कीच खेदजनक आहे. Kharosa Caves Latur Maharashtra 

खरोसा गावातच एक खरोसा किल्ला (Kharosa Fort) म्हणून एक गढीवजा किल्ला आहे. ज्याबद्दल इथल्या स्थानिकांनाही पुरेशी माहिती नाही. सध्या या गढीच्या आतील वास्तुंची पडझड झालेली असुन केवळ पडक्या भिंती शिल्लक असलेल्या बघायला मिळतात. गढीच्या आत वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे आतील अवशेष पाहता येत नाहीत. या गढीबद्दल अधिक वाचण्यासाठी https://durgbharari.in/kharosa/  या साईटला भेट द्या.

Kharosa Caves Latur Maharashtra

खरोसा लेणीला कसे जायचे? – How To Reach To Kharosa Caves Of Latur Maharashtra India In Marathi

रस्तामार्गे By Road-

लातूर-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर लातुरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा हे छोटंसं गाव लागतं, गावापासून डाव्या बाजूला २ किमी अंतरावर ह्या लेण्या आहेत. या महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस नियमितपणे उपलब्ध आहेत. स्वतःच्या गाडीने जात असाल तर अगदी लेण्यांच्या जवळ गाडीने जाता येतं.

रेल्वे मार्गे By Train-

खरोसा लेणीला भेट देण्यासाठी लातूर किंवा हरंगुळ रेल्वे स्थानक हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. तिथे उतरून बसने अथवा खासगी गाडीने आपण इथे भेट देऊ शकता.

पुण्यापासून खरोसा लेणीचे अंतर ३७१ किमी आहे.

Kharosa Caves Leni Latur Maharashtra 

 

Kharosa Caves Latur Maharashtra

 

Kharosa Caves Latur Maharashtra

 

हे देखील वाचा- केंजळगड- कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा सुंदर किल्ला Kenjalgad Fort Trek Marathi 2024

खरोसा लेण्यांजवळ भेट देण्याजोगी ठिकाणे Places To Visit Near Kharosa Caves-

खरोसा लेण्या पाहून झाल्या कि आपण लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या इतर ठिकाणांना देखील भेटी देऊ शकतो. Kharosa Caves Latur Maharashtra 

औसा किल्ला (Ausa Fort), उदगीरचा किल्ला (Udgir Fort) हे दोन्ही भुईकोट किल्ले लातूर जिल्ह्यात आहेत.

१)औसा किल्ला Ausa Fort-

औसा किल्ला लातुरातील औसा शहराच्या दक्षिणेस उभा असलेला एक भुईकोट किल्ला आहे. बहामणी राजवटीत सन १४६६ साली महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजीर म्हणुन नियुक्ती झाली होती. आपल्या वजिरीच्या काळात त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असल्यामुळे किल्याचा मुख्य भाग जवळ गेल्याशिवाय दिसुन येत नाही. किल्यातील काही वास्तु व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसुन येतो. Kharosa Caves Latur Maharashtra 

भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत औसा आणि उदगीर हे दोन्ही भुईकोट किल्ले किल्ले निजामाच्या संस्थानात असल्यामुळे चांगल्या स्थितीत होते. निजाम संस्थानाची सरकारी कार्यालये किल्ल्यात असल्याने या किल्ल्यांवरील बहुतेक इमारतींचा वापर बदलला तरी त्या सुस्थितीत आहेत. तसेच हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी डागडुजी केल्याने किल्ल्यांची शान आजही टिकून आहे. भूईकोट किल्ल्यांची असलेली सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर मोर आढळतात. किल्ल्यावरील झाडी, आजूबाजूची शेती व माणसांचा अल्प वावर यामुळे या किल्ल्यात अनेक मोर पहायला मिळतात. स्वत:चे वाहन असल्यास औसा किल्ल्याबरोबरच खरोसा येथील लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर व उदगीरचा भुईकोट किल्ला ही ठिकाणे एका दिवसात पाहुन होतात.

खरोसा लेणींपासून औसा किल्ला २५ किमी अंतरावर आहे.

Kharosa Caves Latur Maharashtra 

२)उदगीरचा किल्ला Udgir Fort-

उदगीर हा एक सुंदर भूईकोट किल्ला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत हा किल्ला निजामांच्या ताब्यात होता. त्यामूळे किल्ल्यातील अवशेष आजही अस्तित्वात असलेले बघायला मिळतात. किल्ल्यात उदागिरबाबाची समाधी आहे. त्यावरून गावाला उदगीर हे नाव पडले असावे असे म्हटले जाते. बालाघाट डोंगरांगांच्या कुशीत उदगीर हे गाव वसलेले आहे. उदगीर हे कर्नाटक सीमेला लागुन असल्यामुळे येथे कानडी भाषिक लोक मोठ्या संख्येत आढळुन येतात.

खरोसा लेणींपासून उदगीर किल्ला ७० किमी अंतरावर आहे. Kharosa Caves Latur Maharashtra 

स्वतःची गाडी असल्यास खरोसा लेणी, औसा किल्ला आणि उदगीरचा किल्ला ही तिन्ही ठिकाणे एका दिवसात बघून होतात.

३)वडवळ नागनाथ बेट Wadwal Nagnath Bet

वडवळ नागनाथ बेट (टेकडी) हे ठिकाण अत्यंत दुर्मिळ प्रजातीच्या आयुर्वेदिक झुडुपे आणि वनस्पतींच्या निर्मितीसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे गाव चाकूरपासून १६.५ किमी आणि लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे.

ही टेकडी जमिनीपासून ६००-७००  फूट उंचीची असून वडवळ-नागनाथ या गावाजवळ ३ किमी अंतरावर आहे. आयुर्वेदिक वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती इथे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे वनस्पती आणि आयुर्वेद अभ्यासक इथे भेट देत असतात.

कसे पोहोचणार? वडवळ हे इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. चाकूर हे इथले जवळचे मोठे शहर असुन १६ किमी अंतरावर आहे.

लातूरपासून वडवळ नागनाथ ३९ किमी तर औसा शहरापासून ५४ किमी अंतरावर आहे. जर तुम्हाला वनस्पतीशास्त्र, आयुर्वेद यात रस असेल तर खरोसा लेणीसोबतच, औसा किल्ला, उदगीर किल्ला आणि वडवळ नागनाथ टेकडी ही सारी ठिकाणे एका दिवसात बघून होतील.

हे देखील वाचा- Best Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.

तर वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आमच्या firastaa.blog@gmail.com यावर कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग

हेही वाचा भारतातल्या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू

1 thought on “Kharosa Caves Latur Maharashtra लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर -Hidden Beauty Of Latur 2024”

Comments are closed.