Kerala Tourist Places
दक्षिण भारतातील केरळ हे राज्य पर्यटनाच्या बाबतीत देशात अव्वल आणि प्रसिद्ध आहे. देवभूमी या नावाने ओळख असलेल्या केरळातील निसर्गसौंदर्य खरोखरच स्वर्गासम सुंदर आहे. केरळातील निसर्ग पाहून पर्यटक केरळच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तर दरवर्षी देशासह विदेशातूनही इथे पर्यटक फिरण्यासाठी, हनीमूनसाठी दाखल होतात. केरळ राज्यातील मुन्नार तसेच इतर हिल स्टेशनला भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे येतात. केरळ राज्य तिथल्या आयुर्वेदिक उपचारांसाठी देखील जगभर लोकप्रिय आहे. केरळमध्ये फिरण्यासाठी खूप सारी पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी काही मोजकी आणि सुंदर स्थळे आपण आज पाहूयात.
Best Places To Visit Kerala
१)मुन्नार, केरळ Munnar, Kerala
मुन्नार हे केरळमधील एक प्रसिद्ध ठिकाण असुन स्वर्गीय सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन आहे. मुन्नार हे खासकरून इथे असणाऱ्या विस्तीर्ण चहा बागांसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. मुन्नारमध्ये उन्हाळ्यातही हवामान आल्हाददायक आणि थंड असते. या ठिकाणी असणारे चहाचे मळे, वसाहतींचे बंगले, नद्या, धबधबे, डोंगर आणि थंड हवामान ही या हिल स्टेशनची खरी ओळख आहे. ट्रेकिंग तसेच माउंटन बाइकिंगसाठी मुन्नार हे एक उत्तम ठिकाण मानले जाते. चहाच्या बागा तसेच मसाले आणि सुगंधी वस्तूंच्या उत्पादनासाठी देखील मुन्नार खूप प्रसिद्ध आहे.
मुन्नारमध्ये पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे
चहाच्या बागा, वंडरला मनोरंजन पार्क, कोची किल्ला, गणपती मंदिर, हाऊस बोट, अनामुडी शिखर, मट्टुपेट्टी, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेले पल्लिवसल, धबधब्यांसाठी प्रसिद्ध असे चिन्नाकनाल. Kerala Tourist Places
मुन्नारला कसे जायचे?
मुन्नार पासुन जवळचे रेल्वे स्टेशन थेनी (तामिळनाडू) हे सुमारे ६० किमी, तर चेंगनचेरी हे सुमारे ९३ किमी अंतरावर आहे. जवळचे विमानतळ मदुराई (तामिळनाडू) हे सुमारे १४० किमी अंतरावर तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून १९० किमी अंतरावर आहे.
२)पद्मनाभ मंदिर, केरळ Padmanabham Temple
केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरूवनंतपुरम येथील हे मंदिर भगवान विष्णूच्या १०८ पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. पद्मनाभ मंदिर हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. मध्यंतरी या मंदिराच्या काही तळघरांमध्ये सापडलेल्या अब्जावधी रूपयांच्या जडजवाहीरांनी ते प्रकाशझोतात आले. त्रावणकोर शाही परिवाराकडे या मंदिराचे सर्व व्यवस्थापन आहे. प्राचीन द्रविड शैलीचे बांधकाम असलेल्या या प्रचंड मंदिरात भगवान विष्णुची विशाल मूर्ती आहे.
पद्मनाभ मंदिराला कसे जायचे?
केरळच्या राजधानीच्या शहरात असलेले हे मंदिर तिरुवनंतपुरम रेल्वे स्टेशनपासुन १ किमी तिरुवनंतपुरम विमानतळापासून ६ किमी अंतरावर आहे.
३)कोची Kochi Kerala Tourist Places
केरळमधील कोची हे शहर कोचीन या नावाने देखील ओळखले जाते. कोची हे एक प्रसिद्ध बंदर आहे. पूर्वी येथे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यामुळे तिथे आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात चालत होती आणि आजही चालते. इथे खरेदीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या ठिकाणी उत्तम कपडे, सोनं आणि इतर दागिन्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. पोर्तुगिजांचा इतिहास असल्याने इथे त्यांच्या काळातील बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात.
कोचीमध्ये पाहण्यासारखी ठिकाणं–
कोची किल्ला, मत्तान चेरी पॅलेस, चेराई बीच Kerala Tourist Places
मराठवाड्यात फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे Travel Places Of Marathwada In Marathi
४)अलप्पी Alleppey, Kerala Tourist Places
केरळमधील अलप्पीचे सौंदर्य खूपच मनमोहक आहे. येथे हजारो हाऊसबोटी आहेत, ज्यामध्ये पर्यटक राहू शकतात. नारळाच्या झाडांमधून फिरण्याची आणि बोटींग करण्याची संधी इथे मिळू शकते. पुन्नामाडा तलाव तसेच अलप्पी बॅकवॉटरमध्ये हाऊस बोट राइडसाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. या बोटहाऊसमध्ये राहण्यासाठी आधीच बुकिंग करून जावे लागते. सुंदर निसर्गरम्य वातावरण असलेल्या या ठिकाणी राहण्यासाठी खाजगी घरांचे देखील पर्याय आहेत. केरळचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर या सुंदर बोटीतून नक्कीच आनंद घ्या.
पाहण्यासारखी ठिकाणे-
अलप्पी समुद्रकिनारा वगळता तुम्हाला या ठिकाणी अन्य काही ठिकाणंही पाहता येतील. वेंबानंड बीच, मरारी बीच, पथारीमनाल बेट ही इथली काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
५)वायनाड Wayanad Kerala Tourist Places
पश्चिम घाटावर पसरलेले आणि जैव-विविधतेने भरलेले सुमारे २१३२ चौ.किमीवर पसरलेले वायनाड हे क्षेत्र केरळमधील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. इथला निसर्ग पर्यटकांना थक्क करून सोडतो. इथे असलेल्या जंगलात प्राचीन काळापासून आधुनिक जगाशी अलिप्त राहून जगणारे आदिवासी आहेत. इथली संस्कृती प्राचीन असुन तिची मुळे मध्यपाषाण काळापर्यंत जातात. विलक्षण सुंदर असलेला हा प्रदेश आपल्या उष्णकटिबंधीय गवताची पठारे, रम्य हिल स्टेशन, विस्तीर्ण मसाल्याची लागवड, घनदाट जंगले तसेच इथली समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे.
वायनाडमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत ज्यांना भेट देऊन पर्यटक आपली सुट्टी आनंदी बनवू शकतात.
वायनाडमध्ये भेट देण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणे
चेंब्रा शिखर हे ट्रेकिंग साठी योग्य आणि थरारक ठिकाण आहे. निलीमला शिखर आणि धबधबे, मीनमुट्टी धबधबा, पक्षीपाथालम इत्यादी.
६)थेक्कडी Thekkady, Kerala
हे ठिकाण म्हणजे वन्यजीव आणि निसर्ग प्रेमींसाठी स्वर्ग आहे. हा प्रदेश केरळमधील थंड हवामान, हिरवळ, वन्यजीव अभयारण्य तसेच चहा, कॉफी आणि सुगंधी मसाल्यांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. इथे असलेले पेरियार वन्यजीव अभयारण्य ७७७ चौ.कि.मी. मध्ये पसरलेले आहे आणि थेक्कडी मधील हे एक प्रमुख ठिकाण आहे. या जंगलात अर्धा भाग हा घनदाट सदाहरित जंगल आहे. पेरियार जंगल हे वन्यजीवांसाठी राखीव क्षेत्र असुन इथे हत्ती, वाघ, सिंह, हरीण, बिबट्या आणि इतरही प्राणी आढळतात. पंबा आणि पेरियार या नद्या इथल्या घनदाट जंगलातून वाहतात. प्राण्यांसोबतच या जंगलात पक्ष्यांच्या विविध प्रजाती देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात.
वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात वावर आणि सुंदर निसर्ग यामुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. इथे असलेल्या ट्री हाऊस रिसॉर्टमध्ये राहून पर्यटक वन्यजीव आणि हिरवाईचा आनंद घेऊ शकतात. Kerala Tourist Places
७)कुमारकोम Kumarakom, Kerala
कुमारकोम हे केरळमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथे मोठ्या प्रमाणात खारफुटीची जंगले आहेत तसेच हिरवी भातशेती आणि नारळाच्या बागांनी हा परिसर व्यापलेला आहे. इथल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केरळ सरकारने कुमारकोमला ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. इथले वातावरण अतिशय नयनरम्य असुन पर्यावरणप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. हाऊसबोट राइड हे कुमारकोममधील एक प्रमुख आकर्षण आहे. इथे १४ एकरांवर पसरलेले पक्षी अभयारण्य असुन पक्षीप्रेमी इथे पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. इथे विविध प्रजातींचे पक्षी आढळुन येतात.
इथे असणारा प्रसिद्ध अरुविक्कुझी धबधबा हे कुमारकोमचे प्रमुख आकर्षण आहे. इथे असणारे बे आयलंड ड्रिफ्ट म्युझियम हे इतिहासप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. भेट देऊ शकतात.
८)त्रिशूर Thrissur Kerala Tourist Places
केरळमधील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी त्रिशूर हे एक आहे. या ठिकाणी असणारे चावक्कड बीच, नट्टिका बीच, वदनप्पल्ली बीच, स्नेहाथीराम बीच आणि पेरियाम्बलम बीच हे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी हे ठिकाण आहे. संपूर्ण केरळमध्ये असणाऱ्या दागिन्यांपैकी सर्वाधिक दागिन्यांचे उत्पादन इथे होते. इथे असणारे भव्य वडाकुन्नाथन मंदिर हे नक्कीच भेट देण्याजोगे आहे. प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. भगवान परशुरामाने या मंदिराची स्थापना केली होती असे मानले जाते. Kerala Tourist Places
यासोबतच इथे असणारे गुरुवायूर मंदिर हे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे मंदिर आहे.
गोव्यातील या सुंदर ठिकाणांना भेटी द्या…. Best Places To Visit Goa In Marathi
९)पूवर बेट Poovar, Kerala
उत्तम समुद्रकिनारा असलेले पूवर बेत हे ठिकाण तिथे असणाऱ्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी नदी समुद्राला मिळते. पूवर बेट हे तिरुवनंतपुरमपासून ३० किमी अंतरावर असुन केरळमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथला समुद्र सुंदर असुन राहण्यासाठी देखील पाण्यात तरंगणारे कॉटेज आहेत, तसेच जमिनीवरचे देखील कॉटेज आहेत. इथे असणाऱ्या घनदाट खारफुटीच्या जंगलातून छान बोटिंग करता येते. हनीमून साठी गेलेली जोडपी इथे आवर्जून भेट देतात.
१०)कोझिकोड Kozhikode Kerala Tourist Places
कोझिकोड (कालिकत) हे एक प्राचीन बंदर आहे. वास्को द गामाने याठिकाणी प्रथम पाऊल ठेवले आणि भारताचा शोध लावला होता. इथल्या ऐतिहासिक आणि व्यावसायिक महत्त्वासोबतच, या ठिकाणी शांत समुद्रकिनारे, वन्यजीव अभयारण्ये, संग्रहालये, धबधबे, नद्या आणि टेकड्या आहेत. पर्यटनाच्या बाबतीत हा परिसर खूप सुंदर असुन पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. नारळ, मिरपूड, रबर, कॉफी, लेमनग्रास तेल तसेच काजू इत्यादीचे इथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कोझिकोड हे केरळमध्ये असणाऱ्या सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे.
इथे असणाऱ्या समुद्रकिनारी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक भेट देत असतात. इथल्या समुद्रात अनेक प्रकारचे साहसी खेळ खेळता येतात. या ठिकाणी अनेक मंदिरे, मशिदी आणि प्रसिद्ध चर्च आहेत. कडलुंडी पक्षी अभयारण्य हे एक मोठे अभयारण्य असुन पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. येथे जवळपास १०० स्थानिक आणि जवळपास ६० स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आढळुन येतात.
११)तिरुअनंतपुरम Thiruvananthapuram, Kerala Tourist Places
तिरुअनंतपुरम किंवा त्रिवेंद्रम ही केरळची राजधानी असुन केरळातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. इथे असणाऱ्या मोहक समुद्रकिनाऱ्यांसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे. प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर हे या शहरातच आहे. महाराजा स्वाती बलराम वर्मा यांनी बांधलेले कुथीरामलिका पॅलेस म्युझियम या ठिकाणी आहे. या संग्रहालयात राजघराण्यातील मौल्यवान संग्रह बघायला मिळतात. नेपियर म्युझियम हे संग्रहालय देखील इथे असुन अनेक प्राचीन शिल्पे आणि नाणी इथे बघायला मिळतात. वेल्लायनी तलाव हा त्रिवेंद्रममधील सर्वात मोठा तलाव आहे आणि तिरुअनंतपुरमला भेट देण्यासाठी असणाऱ्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथे एका टेकडीच्या शिखरावर असलेला कनकाकुन्नू पॅलेस हा राजवाडा नक्की भेट देण्यासारखा आहे.