Kaas Pathar Plateau Information In marathi कास पठार कधी फुलते?
Flower Valley किंवा Valley of Flowers म्हणुन प्रसिद्ध असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार हे सुप्रसिद्ध ठिकाण आता फुलांनी बहरायला सज्ज झालंय. अनेक पर्यटक पावसाळा सुरू झाल्यापासूनच कास पठाराकडे लक्ष ठेवून असतात. आणि या पठारावर विविध प्रजातींची फुलं कधी फुलतील याची वाट बघत असतात. कास हे सह्याद्रीच्या डोंगररांगेतील एका पर्वतावर वसलेले सातारा जिल्ह्यातील ठिकाण आहे. कास इथे फुलणाऱ्या विविध प्रजातींच्या फुलांची नोंद घेत युनेस्को या जागतिक संघटनेने सन २०१२ मध्ये सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे आयोजित केल्या गेलेल्या जागतिक वारसा समितीच्या सभेत आपल्या महाराष्ट्रातल्या कास पठाराची ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ’ (World Natural Heritage Site) म्हणून घोषणा केली. २०१२ पर्यंत फार काही लोकांना माहिती नसलेल्या या स्थळाला नंतर प्रसिद्धी लाभत गेली.
Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठारावरील असलेल्या जैवविविधतेमुळे इथे अभ्यास करायला शास्त्रज्ञ, तसेच निसर्गप्रेमी आवर्जून हजेरी लावतात. तसेच फोटोग्राफर्स देखील इथल्या फुलांचे, कीटकांचे फोटो काढण्यासाठी आवर्जून भेट देतात.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले हे कास पठार १२०० मीटर उंचीवर असून सुमारे १० चौ.किमी क्षेत्र व्यापते.
महाराष्ट्रातल्या ७ देखण्या आणि अद्भुत आश्चर्यांमध्ये कास पठाराचा देखील समावेश आहे.
महाराष्ट्रातील ती सात आश्चर्ये कोणती आहेत? Wonders Of Maharashtra
१)VT स्टेशन, मुंबई
२)दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ला
३)अजिंठा लेणी
४)रायगड किल्ला
५)लोणार सरोवर
६)विश्व विपश्यना पॅगोडा, मुंबई
७)कास पठार सातारा
ही आपल्या महाराष्ट्रातील ७ आश्चर्ये आहेत.
कास नाव कसे पडले? कास पठाराचा इतिहास History of Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठाराला कास हे नाव इथे आजूबाजूला जंगलात आढळणाऱ्या कास या वनस्पतीवरून देण्यात आलं असं समजतं. तसेच कासा या शब्दाचा प्रादेशिक भाषेतील अर्थ तलाव असा होतो. तर कास पठारावरील कास तलावाच्या नावावरूनही कास हे नाव पडले असावे.
ज्वालामुखी पासुन बनलेला खडक आणि त्यावरच्या अतिशय पातळ मातीच्या थरामुळे तसेच आजूबाजूच्या पोषक हवामानामुळे इथे हे आश्चर्य आपल्याला बघायला मिळत असावं असं अनुमान काढलं जातं. Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठाराला भेट देण्याची उत्तम वेळ/कालावधी Best time to visit Kaas Pathar Kaas Plateau
साधारण ऑगस्ट पासूनच इथे फुलं फुलायला सुरुवात होत असली तरी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी कास पठाराला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन फुलांचा चांगला बहर बघायला मिळतो.
कास पठारावर कसे पोहोचाल? How To Reach Kaas Pathar/ Kaas Plateau?
मुंबई, पुणे या शहरांपासून येत असाल तर सातारा इथे पोहोचावे. साताऱ्यापासून कास पठार हे २५ किमी अंतरावर आहे. आपल्या खासगी वाहनाने येत असाल तर साताऱ्याहून थेट कासकडे जाऊ शकता. साताऱ्याहून भाड्याने गाडी करूनही आपण कासला जाऊ शकता. ST बसने जाणार असाल तर सातारा बस स्थानकातून बामणोली ST बस आपल्याला कास पठारावर घेऊन जाते. बामणोलीची बस साताऱ्याहून अंदाजे दीड दोन तासांनी असते.
Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठारावर प्रवेश Entry At Kaas Pathar
कास पठाराला भेट देण्यासाठी दिवसभरातून तीन बॅचेसमध्ये प्रत्येकी १००० पर्यटकांना आत सोडण्यात येते. सकाळी ७ ते ११, ११ ते ३ आणि दुपारी ३ ते ६ अशा तीन वेगवेगळ्या वेळांमध्ये इथे भेट देता येते. अशा रितीने दिवसभरातून ३००० पर्यटकांना आत सोडण्यात येते.
पार्किंगची सोय Parking At Kaas Pathar
कास पठारावर गाडी पार्किंगची चांगली सोय आहे. कास पठारावर असलेल्या पार्किंग विभागात आपण आपल्या गाड्या लावल्यावर तिथून पुढे आपण चालत कास पठाराकडे जाऊ शकतो किंवा त्यांची मोफत बससेवा देखील उपलब्ध आहे.
कास पठारावर भेट देण्यासाठी ४ प्रवेशद्वार आहेत.
पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधा कास पठारावर उपलब्ध आहे. Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठाराला भेट देण्यासाठी शुल्क आणि ऑनलाईन बुकिंग कसे करावे? Online Booking For Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठाराला भेट देण्यासाठी प्रतिव्यक्ती ₹१५० इतके शुल्क आकारले जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे बुकिंग स्वीकारले जाते. पण बहराच्या कालावधीत इथे होत असलेल्या गर्दीमुळे आपण online बुकिंग करूनच जावं. तसेच online बुकिंग केल्यावर त्यांची प्रिंट देखील सोबत बाळगावी. मोबाईलमधील स्क्रीनशॉट ग्राह्य धरण्यात येत नाहीत. १२ वर्षांखालील मुलांना तिकीटाची गरज नाही.
विद्यार्थ्यांसाठी खास सवलत Discounts For Students At Kaas
कास पठाराला भेट देण्यासाठी शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास सवलत उपलब्ध आहे. सोमवार ते शुक्रवार अशा पाच दिवसांसाठी विद्यार्थी आपल्या शाळा कॉलेजचे पत्र दाखवून प्रति व्यक्ती ₹४० याप्रमाणे लाभ घेऊ शकतात. तर शनिवार व रविवारी विद्यार्थ्यांसाठी ही सवलत नसून त्यांना ₹१५० याप्रमाणेच शुल्क द्यावे लागेल.
Website For Kaas Pathar Online Booking–
www.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता.
आपण कास पठारावरील खालील व्यक्तींना संपर्क करू शकता. Contact Numbers For Kaas Pathar-
Kas Pathar Office – 8830857494, 8149772422
सोमनाथ जाधव: 9422592035
दत्तात्रय किरदत: 8698993553
ज्ञानेश्वर आखाडे: 8600523113
विठ्ठल कदम: 8459876484
रामचंद्र उंबरकर: 9422608996
Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठारावर आकारण्यात येणारे इतर शुल्क Charges at Kaas Pathar
कास पठारावरील प्रवेश शुल्क ₹१५० सोडल्यास आपल्याला इथे ₹१०० प्रति तास याप्रमाणे गाईडची सेवा देखील मिळू शकते. तसेच शनिवार रविवारी आपल्याला इथे गाईड ची सुविधा मिळत नाही.
-कास पठारावर फिरण्यासाठी सायकलसेवा भाडेतत्त्वावर ₹५० प्रति तास या दराने इथे उपलब्ध आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सायकल सुविधा देखील आपल्याला मिळणार नाही.
कास पठार अंतर Distance Of kaas pathar From Pune Mumbai
कास पठार हे पुण्याहून १३५ तर मुंबईहून २५५ किमी अंतरावर आहे. पुणे हे कास पठारापासून जवळ असलेले विमानतळ आहे.
Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठारावर कुठली फुलं आहेत? Flowers Species At Kaas Pathar/ Plateau
सुमारे ६५० जातींची फुलं आपल्याला कास पठारावर बघायला मिळतात. त्यापैकी ३० प्रजातींची फुलं अशी आहेत जी आपल्याला फक्त आणि फक्त कास पठारावरच बघायला मिळू शकतात. तसेच फुलं आणि वनस्पती मिळून सुमारे ८५० प्रजाती इथे बघायला मिळतात.
‘सीतेची आसवे’ (युट्रिक्युलेरिया) निळा रंग, हबे आमरी (हॅबेनेरिया) पांढरा रंग, तेरडा (इम्पेटिएन्स) गुलाबी रंग, सोनकी (सेनेशिया) पिवळा रंग, मंजिरी (पोगोस्टेमन) जांभळा रंग अशी विविध रंगांची फुले वेगवेगळ्या वेळी बहरल्यामुळे कास पठाराचा रंग सतत बदलत राहतो. येथे तेरड्याच्या (बाल्समिनेसी) कुळातील प्रजाती विपुल प्रमाणात आढळतात.
‘वायतुरा’ (ॲपोनोजेटोन सातारेन्सिस) ही ॲपोनोजेटोनेसी कुलातील वनस्पती जगात फक्त कास पठारावरच सापडते. हिच्या देठाला इंग्रजी ‘वाय’सारखे (‘Y’सारखे) दोन फाटे फुटून प्रत्येक फाट्यावर छोटी गुलाबी फुले येतात. मात्र जमिनीतील याचे कंद विनाकारण उपटले गेल्यामुळे अलीकडे कास परिसरातही ही वनस्पती फारशी आढळत नाही.
कास पठारावर फुलणारी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे ‘टोपली कारवी’ (प्लिओकॉलिस रिची). याचे झुडूप उपडी ठेवलेल्या टोपलीसारखे दिसते. याला दर आठ वर्षांनी फुलं येतात. याच्या पानांचा रस पोटाच्या विकारांवर गुणकारी समजला जातो.
याशिवाय जंगली हळद, नरक्या इत्यादी वनस्पती देखील इथे आढळून येतात. कास पठारावरील अनेक वनस्पती औषधी असल्याचे आढळून आले आहे.
Kaas Pathar Plateau Information In marathi
कास पठाराजवळ बघण्यासारखं काय काय आहे? Places to visit near Kaas Pathar In Marathi
कास तलाव, कुमुदिनी तलाव, वासोटा किल्ला, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, तापोळा, कोयना अभयारण्य, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, पाचगणी आणि महाबळेश्वर इत्यादी ठिकाणं आपण बघू शकता.
कास पठारावर राहण्याची सोय Places to Stay At Kaas Pathar
कास पठारावर राहण्याची तसेच कॅम्पिंग वगैरे साठी परवानगी नसली तरी इथे जवळपास आपल्याला राहण्यासाठी हॉटेल, कॉटेज तसेच होमस्टे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इथे राहणार नसाल तर जवळच्या सातारा किंवा वाई गावांमध्ये राहायची उत्तम सोय होते.
हेही वाचा-थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी
कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना
इथे उघड्या पठारावर फुलं बघताना उन्हाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सोबत टोपी किंवा छत्री असावी.
-कास पठारावर आपल्याला खाण्याचे विविध प्रकार मिळतात. ज्यामध्ये नाचणीची भाकरी, पिठलं, ठेचा इत्यादी पदार्थ मिळतात.
-कास पठारावर कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका. आपला कचरा आपल्यासोबत परत आणा.
-कास पठारावर फिरताना आपल्या पायाखाली फुलं, झाडं तुडवली जाणार नाहीत याची दक्षता घ्या. तो एक मौल्यवान ठेवा आहे हे लक्षात असु द्या.
-फुलं, पानं तोडू नका. इकडेतिकडे थुंकू नका.
-फोटोग्राफीसाठी फुलांच्या अति जवळ जाणं टाळा.
कास पठाराला भेट देण्यासाठी शनिवार व रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीचे दिवस टाळा.
सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळेत याठिकाणी गर्दी कमी असते, तसेच उन्हाचा त्रास होत नाही.
शक्यतो ऑनलाईन बुकींग करूनच जा. जेणेकरून तिथे गेल्यावर ऐनवेळेस निराशा व्हायला नको.
कास व्यवस्थापन अतिशय कडक शिस्तीचे असून तिथे योग्य ती शिस्त पाळा आणि त्यांना सहकार्य करा.
Kaas Pathar Plateau Information In marathi
हेही वाचा-भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.