Hill Stations In Maharashtra महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं
सह्याद्रीच्या रूपाने आपल्या लाडक्या महाराष्ट्राला एक अन मोल नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. ही पश्चिम घाटांची रांग जी ‘सह्याद्री’ या नावाने महाराष्ट्रात ओळखली जाते, अनेकविध दुर्गम, राकट गडकिल्ले, लेण्या तसेच कित्येक मोठमोठे डोंगर, सुळके, दऱ्या, धबधबे आणि थंड हवेची ठिकाणं अर्थात हिल स्टेशन्स या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. सह्याद्रीमुळे आपल्याला हिल स्टेशन्सला भेट देण्यासाठी शिमला, मनाली वगैरे ठिकाणीच जावं अशी काही गरज नाही. आपल्या महाराष्ट्रात देखील एकापेक्षा एक भारी हिल स्टेशन्स बघायला मिळतात.
आता हिवाळा सुरु झालाय, आणि भटकंतीप्रेमी जनता भटकण्यासाठी नवनवी ठिकाणं शोधत आहेत. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणं या गोष्टी हिवाळ्यात फिरण्यासाठी एकदम बेस्ट ठिकाणं आहेत. आपणही अशा हिल स्टेशन्सला फिरायला जायचं नियोजन करताय आणि तेही आपल्या महाराष्ट्रातच? तर आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं आणि हिल स्टेशन्स याबद्दल ही खास माहिती. Hill Stations In Maharashtra
Thand Havechi Thikane- Best Hill Stations In Maharashtra
१)लोणावळा हिल स्टेशन Lonavala Hill Station
पुण्या मुंबईपासून जवळ असल्यामुळे लोकप्रिय असलेले लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण तेथील डोंगर दऱ्या, धबधबे आणि गडकिल्यांमुळे पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. लोणावळा हे ठिकाण पुणे मुंबई महामार्गावर असल्यामुळे इथं पोहोचणं खूप सोपं आणि सहज आहे. तसेच सर्व सुविधा असलेले हॉटेल्स, रिसोर्ट्स इथे सहज उपलब्ध आहेत. वाटर पार्क, adventure पार्क, मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय या आणि अशा असंख्य गोष्टी लोणावळ्यात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सहज उपलब्ध आहेत.
Hill Stations In Maharashtra
लोणावळ्यात असलेले टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, मंकी पॉइंट, भुशी धरण, तुंगार्ली तलाव, ड्युक्स नोज, खंडाळा घाट अशा लोणावळा शहरातील ठिकाणी आपण भेट देऊन लोणावळ्यातील सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. तसेच जवळच असलेले पवना धरण ज्या ठिकाणी कॅम्पिंग सुविधा देखील आहेत तसेच कामशेत इथे असलेल्या पॅराग्लायडिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
लोणावळ्यात निसर्गरम्य वातावरणासोबतच इथे असलेली एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे ‘लोणावळा चिक्की’. लोणावळ्यात असलेल्या मगनलाल चिक्की आणि इतर दुकानांतून आपण विविध चवींच्या चिक्की खरेदी करू शकतो.
लोणावळ्याजवळ असलेले गडकिल्ले/लेण्या- लोणावळ्यात असताना तिथे जवळच असलेले गडकिल्ले जे एका दिवसात आरामात फिरून होतात तिथे नक्की भेट द्यायला हवी. कोरीगड, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ला, राजमाची किल्ला या सोप्या श्रेणीतील किल्ल्यांवर पर्यटक फिरू शकतात, ट्रेक करू शकतात. तसेच कार्ला, भाजे, बेडसे या प्रसिद्ध लेण्या देखील फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
लोणावळ्याजवळ असलेले धार्मिक ठिकाणे/मंदिरे- कार्ला इथे असलेले एकविरा आईचे मंदिर, हडशी येथील सत्यसाई मंदिर, प्रतिशिर्डी, प्रतिपंढरपुर, खोपोली येथील गगनगिरी आश्रम इथे फिरून येऊ शकता.
Hill Stations In Maharashtra
लोणावळ्याला कसे जायचे?
मुंबईपासून पुण्याला येणाऱ्या कुठल्याही ट्रेनने वाटेत लोणावळ्याला उतरता येते. तसेच पुण्यापासून लोणावळा ६० किमी अंतरावर असुन पुणे ते लोणावळा अशी लोकल ट्रेन आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून लोणावळ्याला येण्यासाठी प्रथम पुणे वा मुंबई गाठून तिथुन लोणावळ्याला जाणं अगदी सोपं आहे.
२)माथेरान हिल स्टेशन Matheran Hill Station (Top 5 Hill Stations In Maharashtra)
पुण्यामुंबईपासून माथेरान हे थंड हवेचे ठिकाण देखील खूप जवळ असुन पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे आशिया खंडातील एकमेव हिल स्टेशन आहे ज्या ठिकाणी वाहनांना प्रवेश नाही. माथेरानला भेट देण्यासाठी पर्यटक माथेरानपर्यंत स्वतःच्या वाहनाने जाऊ शकतात पण तिथुन पुढे माथेरान शहरात फिरण्यासाठी सायकल, घोडागाडी, ई रिक्षा अशा प्रदूषणमुक्त पर्यायांचा वापर करावा लागतो. वाहने नसल्यामुळे माथेरान हे प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ व सुंदर हिल स्टेशन आहे. Hill Stations In Maharashtra
माथेरानमधील प्रसिद्ध पॉइंट्स-
माथेरानमध्ये फिरण्यासाठी लुईसा पॉइंट, शार्लोट लेक, माथेरान लॉर्ड पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, इको पॉइंट, सनसेट पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, हनिमून हिल पॉइंट, माथेरान मार्केट, खंडाळा पॉइंट, आणि किंग जॉर्ज पॉइंट ही इथली प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. तसेच इथे शिवसंग्रहालय देखील आहे.
माथेरानच्या आसपास ट्रेकिंगसाठी पेबचा विकटगड हा किल्ला उत्तम पर्याय आहे. माथेरानमधील टॉय ट्रेन हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे. डोंगरातून फिरणारी ही ट्रेन पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणांचे सुंदर दर्शन घडवते.
माथेरानला कसे जायचे?
नेरळ हे माथेरानच्या पायथ्याशी असलेले रेल्वे स्टेशन आहे. मुंबई आणि पुण्यावरून नेरळला पोहोचून तिथुन माथेरानला जाता येते.
पुणे व मुंबईहून माथेरानचे अंतर-
पुणे ते माथेरान अंतर- १२० किमी
मुंबई ते माथेरान अंतर- ८५ किमी
Hill Stations In Maharashtra
३)महाबळेश्वर हिल स्टेशन Mahabaleshwar Hill Station- Best Winter Travel Place In Marathi
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर असलेले महाबळेश्वर तिथले आल्हाददायक थंड वातावरण, डोंगर दऱ्या, आणि जबरदस्त नैसर्गिक सौंदर्य यामुळे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी मुबलक सोयी उपलब्ध असुन कमी ते जास्त अशा किंमतीमध्ये सीझननुसार इथे हॉटेल्स उपलब्ध आहेत. महाबळेश्वरमध्ये राहणार नसाल तर जवळ पाचगणी हा देखील उत्तम पर्याय आहे.
महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध फिरण्यासारखी ठिकाणे-
महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असुन जवळच असलेल्या प्रतापगड किल्ल्यालाही भेट देता येते. वेण्णा तलाव, एलिफंट पॉइंट, सनसेट पॉइंट, ऑर्थर सिट पॉइंट, लिंगमळा धबधबा इत्यादी ठिकाणांना पर्यटक भेटी देऊ शकतात. तसेच जवळच असलेल्या पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी देखील भेट देता येते. यासोबतच वाई, सज्जनगड, अजिंक्यतारा किल्ला ही ठिकाणे देखील जवळ आहेत. कास पठार देखील इथून जवळ आहे. Hill Stations In Maharashtra
स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध
महाबळेश्वरच्या वातावरणात पिकलेली स्ट्रॉबेरी ही महाराष्ट्र तसेच देशभरात खास प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरमध्ये असलेल्या मॅप्रो गार्डनमध्ये पर्यटक स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकतात. स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त इथे तयार होणाऱ्या मध, गुलकंद, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी पासुन बनलेल्या इतरही अनेक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच मार्च एप्रिलमध्ये इथे साजरा होणाऱ्या स्ट्रॉबेरी महोत्सवात देखील सहभागी होऊ शकतात.
महाबळेश्वरला कसे जायचे?
महाबळेश्वर पासुन जवळचे विमानतळ हे पुणे असुन रेल्वे स्टेशन सातारा हे आहे. पुणे, मुंबई वा सातारा इथून महाबळेश्वरला जाण्यासाठी ST बसेस असुन खाजगी गाड्यांची देखील सोय आहे.
पुणे ते महाबळेश्वर अंतर-१२० किमी
मुंबई ते महाबळेश्वर अंतर-२२० किमी
सातारा ते महाबळेश्वर अंतर-६० किमी
Hill Stations In Maharashtra
४)इगतपुरी, नाशिक Igatpuri Hill Station
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण मुंबई पासुन जवळ असल्याने लोकप्रिय आहे. अनेक डोंगरदऱ्यांच्या आणि गडकिल्ल्यांच्या सानिध्यात असलेल्या इगतपुरीला पर्यटक पावसाळा आणि हिवाळ्यात भेट देतात. पर्यटनाबरोबरच इगतपुरी येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रात देशभरातून लोक विपश्यनेसाठी भेट देत असतात. इथे आसपास माळशेज घाट तसेच अनेक धबधबे असुन पावसाळ्यात याठिकाणी पर्यटक खासकरून भेट देत असतात. Hill Stations In Maharashtra
इगतपुरीला कसे जाल?
मुंबईहून इगतपुरीला जाण्यासाठी ट्रेनने जाणे हा सोपा पर्याय आहे. ट्रेनने जायला मुंबईहून ३ तास लागतात. तर पुण्याहून जायचे असल्यास कल्याण मार्गे ट्रेनने जाता येईल.
पुणे ते इगतपुरी अंतर-२४० किमी
मुंबई ते इगतपुरी अंतर-१२० किमी
नाशिक ते इगतपुरी अंतर-४५ किमी
५)चिखलदरा, अमरावती Chikhaldara Hill Station
चिखलदरा हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत असलेले एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भातील हे एकमेव पर्यटनस्थळ तिथल्या थंड वातावरण तसेच जवळ असलेला मेळघाट व्याघ्रप्रकल्प यामुळे खास लोकप्रिय आहे. सन १८२३ मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याने चिखलदऱ्याचा शोध लावला होता. मेळघाट व्याघ्रप्रकल्प जवळच असल्याने इथे वाघासह अनेक जंगली प्राण्यांचे दर्शन होते. पावसाळ्यात या भागात अनेक धबधबे कोसळू लागतात त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
महाराष्ट्रातील एकमेव कॉफीचे उत्पादन चिखलदरा इथे घेतले जाते. इथे फिरण्यासाठी विविध पॉइंट/ठिकाणे असुन लहान मुलांसाठी छोट्या रेल्वेचीही सोय आहे. जवळ बहामनी, गाविलगड हे किल्ले देखील आहेत. Hill Stations In Maharashtra
चिखलदरा इथे राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असुन MTDC चे रिसॉर्ट देखील उपलब्ध आहे.तसेच अनेक हॉटेल्सची सोय आहे.
चिखलदऱ्याला कसे जायचे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून राष्ट्रीय महामार्ग ६ वर असलेल्या अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी यावे. अमरावती इथून चिखलदरा ९० किमी अंतरावर असुन ST बस तसेच खाजगी गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. ट्रेनने जायचे झाल्यास मुंबई-कोलकाता मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तिथुन अमरावती आणि पुढे चिखलदरा असा प्रवास करता येतो. नागपूर हे इथून जवळचे विमानतळ आहे.
पुणे ते चिखलदरा अंतर- ६९० किमी
मुंबई ते चिखलदरा अंतर- ७०० किमी
अमरावती ते चिखलदरा अंतर- ९० किमी
नागपूर ते चिखलदरा अंतर- २२० किमी
चला तर मंडळी, वाट कसली बघताय? हिवाळा सुरु झालाय. या हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत आपल्या प्रियजणांसह या प्रसिद्ध हिल स्टेशन्सला/ थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देऊन सुंदर सुंदर आठवणी तयार करा. ही माहिती इथून whatsapp वा फेसबुकद्वारे आपल्या कुटुंबासोबत/मित्रांसोबत शेअर करा.
Hill Stations In Maharashtra
आपल्याला हा लेख कसा वाटला? काही सूचना, अभिप्राय असल्यास आमच्या मेल आयडी firastaa.blog@gmail.com वर संपर्क करू शकता.