‘हंपी’ आहे भारतातले सर्वात सुंदर ठिकाण Hampi Tourist Places

Hampi Tourist Places

हंपी हे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात असलेले एक अतिशय सुरेख आणि ऐतिहासिक गाव आहे, जे केवळ देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करते. हे गाव आणि इथली सुंदर मंदिरे इतकी जबरदस्त अन देखणी आहेत कि जगभरातील पर्यटक हंपीला भेट देण्यासाठी येत असतात. भारतीय इतिहासात सर्वात समृद्ध राज्य म्हणून गणल्या गेलेल्या विजयनगर साम्राज्याच्या अनेक खुणा, त्यांच्या मंदिरांचे अवशेष आपल्याला हंपीमध्ये बघायला मिळतात. हंपीमधील अनेक मंदिरांचा आणि स्मारकांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

हंपी शहर तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले आहे, आणि भव्य इतिहासाने समृद्ध आहे. इथे बरीच प्रसिद्ध मंदिरे आहेत. इथे असलेले विठ्ठल मंदिर हे प्रसिद्ध असुन इथला देव विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपूरात नेऊन लपवला अशी एक दंतकथा सांगितली जाते. त्यामुळेच ‘कानडा राजा पंढरीचा’ असं अभंगातून म्हटलं जातं. विजयनगरच्या साम्राज्यातील असलेली इथली मंदिरे वास्तुकलेचे उत्तम नमुने आहेत.

२०१९ साली न्यूयॉर्क टाईम्सच्या ‘मस्ट-व्हिजिट डेस्टिनेशन’ अर्थात ‘आवर्जून बघावं असं ठिकाण’ अशा यादीत हंपीला दुसरे स्थान मिळाले होते. Hampi Tourist Places

WhatsApp Group Join Now

 

Places To Visit In Hampi

१)विरुपाक्ष मंदिर Virupaksha Temple Hampi

विरुपाक्ष मंदिर हे हंपीमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हंपीला आलेले यात्रेकरू आणि पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. विरुपाक्ष मंदिर हे हंपी इथल्या बाजारात असून ७ व्या शतकात बांधले गेले होते. या मंदिराचा गोपुरम उंच असुन त्याच्या बाहेरील भागात प्लास्टरची काही शिल्पे बनवण्यात आली आहेत, त्यामुळे या मंदिराला एक विशेष ओळख प्राप्त झाली आहे. विरुपाक्ष मंदिरात सुरुवातीपासूनच पूजा अर्चा केली जायची. आणि आजही केली जाते.

Hampi Tourist Places

मंदिरात गर्भगृह आणि आंगण आहे. या अंगणात काही खांब आहेत. यापैकी १०० खांब असलेल्या मंदिरात काही खोल्या, एक मोठे गोपुरम आणि अनेक लहान मंदिरे आहेत. तसेच या मंदिरात एक स्वयंपाकघर आणि प्रशासकीय कार्यालय देखील आहे. या स्वयंपाकघरात खडकातून कोरलेल्या जलवाहिनीतुन पाणी येते. Hampi Tourist Places

विरूपाक्ष मंदिराच्या गाभाऱ्यात पितळाचा मुखवटा असलेले काही शिवलिंग आहेत. मुख्य गर्भागृहाच्या उत्तरेला देवी पार्वतीच्या पंपा आणि भुवनेश्वरी या दोन रूपांची छोटी मंदिरे आहेत. यांतील भुवनेश्वरी देवीचे मंदिर हे चालुक्यकालीन स्थापत्यशैलीत बांधलेले असून याच्या बांधणीत ग्रॅनाइटचा वापर मोठ्या प्रमाणात गेलेला आढळतो.

मंदिरात विविध प्रकारची शिल्पे कोरलेली बघायला मिळतात. राम सीता, शिवपार्वती विवाह, कामदेव इत्यादी शिल्पे इथे कोरलेली बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या खांबांवर घोडा, हत्त्ती, सिंह यासह विविध प्राण्यांची देखील शिल्पे दिसुन येतात.

डिसेंबरमध्ये इथल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाचा विवाह देवी पंपाशी झाल्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी हजारो लोक इथे भेट देतात. वसंत ऋतूमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विरूपाक्ष आणि देवी पंपा यांच्या विवाहाचा मोठा उत्सव आणि रथयात्रा असते. हा वार्षिक रथउत्सव मोठ्या थाटात साजरा होतो यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

 

२)विठ्ठल मंदिर Vitthal Temple Hampi

विठ्ठल मंदिर हे हंपीतील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात असणारा दगडी रथ हे येथील सर्वात प्रसिद्ध आकर्षण आहे. हंपीमधील इतर मंदिरांच्या तुलनेत येथील कला आधुनिक समजली जाते. या मंदिराची बांधणी १६व्या शतकाच्या पूर्वार्धात केल्याचे मानले जाते. सन १५६५ मध्ये हंपी शहराच्या विनाशात इथल्या परिसराचाही नाश झाला. इथे असलेल्या शिलालेखांवर असलेल्या नावांवरून हा परिसर अनेक लोकांच्या साहाय्याने बांधला गेला असल्याचे कळते. Hampi Tourist Places

Hampi Tourist Places

या भागातील मुख्य मंदिर विठ्ठलाचे आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याचा आराखडा हा आयताकृती आकाराचा आहे आणि दोन्ही बाजूंच्या गोपुरांसह इथे प्रवेशाचे गोपुर देखील आहे. मुख्य मंदिराच्या पूर्व दिशेस अनेक मंदिरे एका रांगेत आहेत. ५००x३०० फूट आकाराचे असलेले हे मंदिर खांबांच्या तिहेरी रांगेने वेढले गेले आहे. विठ्ठल मंदिराला सभामंडप, अर्धमंडप व गाभारा असे तीन भाग आहेत. एकमजली असलेले हे मंदिर साधारण २५ फूट उंचीचे आहे.

विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातच असलेले गरुड मंदिर ही हंपीमधील सर्वात प्रसिद्ध आणि छायाचित्रित वास्तू आहे. इमारत आहे. दगडात कोरलेले हे गरुड मंदिर रथाच्या स्वरुपात असून याच्याभोवती मोठे प्रांगण आहे. या रथावरील एक बुरुज १९४० च्या दशकात बनवला गेला. रथासमोरील प्रांगणात मोठा सभामंडप आहे. यातील दोन भागांतून गेल्यास मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाता येते. सभामंडपात एकूण ५६ कोरीव दगडी तुळके आहेत. यांच्यावर आघात केल्यास त्यातून वेगवेगळे स्वर निघतात. हा मंडप त्याकाळी संगीत आणि नृत्याच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरला जात असे. हा रथ या सार्वजनिक उत्सवांदरम्यान मंदिराभोवती फिरवत असल्याची आख्यायिका आहे.

विठ्ठल मंदिराच्यान बाहेर पूर्वेस १ किमी लांबीची बाजारपेठ आहे. हा रस्ता उध्वस्त स्थितीत असुन उत्तरेला असलेली अजून एक बाजारपेठ तसेच येथे एक दक्षिणाभिमुख देवस्थान देखील आहे. हा रस्ता पुढे रामानुजाचार्यांच्या मंदिरासमोर जाऊन संपतो.

हेही वाचा- Ancient Famous Temples Of India भारतातील प्राचीन मंदिरे

 

३)हेमकुटा टेकड्या Hemkuta Hills

हेमकुटा टेकड्या या हंपीच्या मध्यभागी आहेत आणि संपूर्ण हंपीचे नजारे पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अत्यंत मनमोहक असते. हेमकुटा टेकडीवर आपल्याला मोठाले दगड आढळतात. हंपी गावाच्या दक्षिणेला असलेल्या या छोट्या टेकडीवर बरीच मंदिरे आढळुन येतात. आणि ही मंदिरे हंपीमधील सर्वात जुनी मंदिरे आहेत. हेमकुटा टेकडी तसेच या टेकडीच्या माथ्यावर वसलेली मंदिरे ही हंपीत येणाऱ्या पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत. इथली बरीच मंदिरे ९ व्या ते १४ व्या शतकातील आहेत. इथली जवळपास बहुसंख्य मंदिरे ही भगवान शंकराची आहेत. Hampi Tourist Places

Hampi Tourist Places

हेमाकुटा टेकडीवर ३५ पेक्षा जास्त मंदिरे आहेत. यापैकी सर्वात मोठी आणि सुशोभित केलेली मंदिरे टेकडीच्या उत्तरेला व विरुपाक्ष मंदिराच्या आवारात वसलेली आहेत. इथल्या मंदिरांपैकी बरीच मंदिरे भग्नावस्थेत असलेली बघायला मिळतात.

 

४)मातंगा टेकडी Matang Hills

Hampi Tourist Places मातंगा टेकडी ही हंपीतील सर्वोच्च बिंदू आहे. येथून हंपी शहराचे ३६० अंशांचे दृश्य पाहायला मिळते. ट्रेकिंगची आवड असलेल्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. ही टेकडी मोठमोठ्या खडकांनी व्यापली असुन हे खडक पिवळ्या रंगाचे आहेत. या टेकडीचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो. ही टेकडी रामायणातली पवित्र भूमी असल्याचे मानले जाते. टेकडीवरून बरीच मंदिरे तसेच हंपी शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते. टेकडीच्या सभोवताली सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे.

Hampi Tourist Places

 

५)हजारा राम मंदिर Hajara Ram Temple Hampi

हजारा राम मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या राजवटीत बांधले गेलेले एक छोटे, परंतु सुंदर मंदिर आहे. या मंदिरातील भिंतींवर रामायणातील घटनांचे सुंदर कोरीव काम केलेले आहे. हजारा राम मंदिर हे हंपीमधील प्रमुख ठिकाण आहे. विजयनगरच्या राजांचे आणि राजघराण्याचे हे खाजगी मंदिर होते.

Hampi Tourist Places

या मंदिराच्या दगडी भिंतींवर रामायणाची कथा कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरील भिंती या राम आणि कृष्णाच्या मूळ अवशेषांनी सजवलेल्या दिसतात. यासोबतच घोडे, हत्ती, सैनिक आणि नृत्ये करणाऱ्या महिलांच्या मिरवणुकीचे चित्र इथल्या भिंतींवर कोरलेले आहे.

Hampi Tourist Places

६)कमळ महाल (लोटस महाल) Lotus Palace Hampi

कमळ महाल हा भव्य आणि सुंदर राजवाडा ‘चित्रांगिनी महाल’ या नावाने देखील ओळखला जातो. हा महाल १६ व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राणीसाठी बनवला होता. महालाची रचना कमळासारखी असल्याने याला कमळ किंवा लोटस महाल या नावाने ओळखले जाते. राजवाड्याची इमारत दुमजली असुन आधारासाठी २४ खांबावर तोललेली आहे. इथल्या भिंतींवर आणि खांबांवर प्राणी आणि पक्ष्यांची चित्रे कोरलेली आहेत.

Hampi Tourist Places
Renowned Lotus Mahal near Queens’ Palace at Hampi, Karnataka, India, Asia

७)तुंगभद्रा धरण Tungabhadra Dam Hampi

हंपीपासुन १३ किमी अंतरावर असलेल्या होस्पेट येथे असलेले तुंगभद्रा धरण हंपीला पिण्याचे तसेच शेतीचे पाणी पुरवते. हे धरण प्रसिद्ध तुंगभद्रा नदीच्या एका टोकावर बांधले असुन त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार बागा आहेत.

Hampi Tourist Places

Hampi Tourist Places

हे देखील वाचा- Harishchandragad Fort Trek In Marathi हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्सची पंढरी का म्हणतात?

 

हंपीला कसे जायचे? How To Reach Hampi?

हुबळी विमानतळ हे हंपीपासून सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे सुमारे १६६ किमी अंतरावर आहे. बेळगाव विमानतळ इथून २७० किमी अंतरावर आहे. तसेच सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट जंक्शन हे १३ किमी अंतरावर आहे. याशिवाय, कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (KSRTC) च्या बससेवेने पर्यटक हंपीला पोहोचू शकतात.

 

हंपीमध्ये राहण्याची सोय कुठे करायची? Where To Stay In Hampi?

हंपीमध्ये विविध प्रकारच्या resorts तसेच हॉटेल्सची सोय उपलब्ध आहे. अगदी ५०० रुपयांपासून ते महागातले हॉटेल्स देखील इथे आहेत. हंपीमध्ये फिरण्यासाठी पर्यटक तिथे सायकल भाड्याने घेऊ शकतात.

 

हंपीचा प्रवास करताना काही टिप्स Hampi Tourist Guide

हंपी प्रवासाचा उत्तम काळ- हंपीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम आहे. कारण या काळात हवामान आल्हाददायक आणि आनंददायी असते. Hampi Tourist Places

वाहन सोय- हंपी हे ठिकाण सगळीकडून वाहतुकीच्या सेवांशी जोडले गेलेले आहे. कर्नाटकातील कुठल्याही प्रमुख शहरांतून हंपीला पोहोचणे सोपे आहे. स्वतःच्या खाजगी वाहनाने तसेच बसने इथे पोहोचता येते.

फोटोग्राफी साठी परफेक्ट ठिकाण- हंपी मध्ये फोटोग्राफीसाठी अनेक संधी आहेत. जगभरातून अनेक फोटोग्राफर्स हंपीमध्ये फोटोग्राफीसाठी येतात.

 

प्रमुख शहरांपासून हंपीचे अंतर Distance To Hampi From Main Cities

मुंबईपासुन हंपी अंतर- ७१२ किमी

पुण्यापासून हंपी अंतर-५६६ किमी

बेंगळूरू पासुन हंपी अंतर-३४० किमी

बेळगाव पासुन हंपी अंतर-२७० किमी

गोव्यापासून हंपी अंतर-३२४ किमी

Hampi Tourist Places