Famous Treks In Maharashtra In Marathi

ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील किल्ले Famous Treks In Maharashtra In Marathi 

 

महाराष्ट्र, भारतातील एक प्रमुख राज्य, केवळ इथल्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासासाठीच नव्हे तर त्याच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. राज्यात अनेक किल्ले आहेत जे केवळ ऐतिहासिक महत्त्वाचेच नाहीत तर ट्रेकिंगच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहेत. या किल्ल्यांपैकी बहुतेक सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहेत आणि त्यांच्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील काही मोजकेच किल्ले आणि त्यावरचे अवशेष बऱ्यापैकी टिकून असले तरी इतर बहुतांश किल्ले डोंगरी भागात असुन दुर्गम प्रकारात मोडतात.

 

WhatsApp Group Join Now

या लेखात आपण महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ले जे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

 

Famous Treks In Maharashtra In Marathi

Famous Forts Of Maharashtra In Marathi

 

१)रायगड किल्ला

रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. रायगड ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती आणि त्याच्या भव्यतेसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २९०० मीटर उंचीवर आहे आणि चहूबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. सागरी दळणवळणासाठी जवळ असल्याने रायगडाची राजधानीसाठी निवड करण्यात आली होती. त्याच्या शिखरावरून अप्रतिम नजारा दिसतो. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पायरीमार्ग हा सोपा मार्ग असुन या मार्गाने २ तासात किल्ल्यावर पोहोचता येते. तसेच रोपवेने देखील किल्ल्यावर जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

रायगड किल्ल्यावर पोहोचल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक स्मारके गडावर बघू शकतो. महादरवाजा, जगदीश्वर मंदिर, हत्ती तलाव, नगारखाना, राजसभा यासारखे अनेक ऐतिहासिक वारसे आपण रायगडावर बघू शकतो.

रायगडावरून लिंगाणा, कोकणदिवा, राजगड, तोरणा, प्रतापगड आणि वासोटा यासारखे भव्य किल्ले आणि आजुबाजूचा निसर्गरम्य परिसर नजरेस पडतो.

गडावर राहायची सोय नसून जेवणाची सोय पायथ्याशी स्थानिकांकडे करता येऊ शकते.

Famous Treks In Maharashtra In Marathi

 

२)सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला हा पुणे शहराजवळ स्थित असलेला एक प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता आणि त्यांनी या किल्ल्याचे नाव कोंढाणा किल्ल्यापासून सिंहगड असे बदलले. सिंहगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंचीवर आहे. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने प्रभावित कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले अशी आख्यायिका प्रसिध्द आहे.

सिंहगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला पायथ्याच्या हातकरवाडीत पोहोचावे लागते. तिथुन मळलेल्या पायवाटेने दीड तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असल्याने खाजगी गाडीने देखील किल्ल्यावर पोहोचता येते.

गडावर पाहण्यासाठी पुणे दरवाजा, खांद कडा, दारूचे कोठार, टिळकांचा बंगला, शिवमंदिर, अमृतेश्वर भैरव मंदिर, देवटाके, कल्याण दरवाजा, तानाजी कडा, तानाजी स्मारक यासारखी ऐतिहासिक स्मारके आहेत.

सिंहगडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर आणि तुंग हे किल्ले दिसतात.

गडावर राहायची सोय नसून जेवणाची सोय किल्ल्यावर असलेल्या हॉटेल्समध्ये करता येऊ शकते.

 

३)प्रतापगड किल्ला

प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता आणि त्यांच्या साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. प्रतापगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता.

प्रतापगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी महाबळेश्वरवरून जाता येते. तसेच पोलादपूरवरून आंबेनळी घाटातूनही जाता येते.

गडावर महाद्वार, बुरुज, तोफा, वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वर मंदिर, घोरपडीचे चित्र असलेली राजपहार्‍यांची दिंडी, कडेलोट, सूर्यबुरुज आदि ठिकाणे पाहता येतात. संपूर्ण गड पाहण्यासाठी २-३ तास लागतात.

गडावर असलेल्या विश्रामगृहात राहण्याची सोय होते. हॉटेल्समध्ये जेवणाची सोय होते.

Famous Treks In Maharashtra In Marathi

 

४)लोहगड किल्ला

लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध किल्ला आहे. पवना मावळात असणारा हा लोहगड किल्ला जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून नजरेस पडतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवडपासुन जवळ आणि वाटेवर असल्याने या किल्ल्याला पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी असते. समुद्रसपाटीपासुन ३४०० फुट उंचीवर असलेला लोहगड चढण्यासाठी सोप्या श्रेणीत मोडतो. शहरापासून जवळ असल्याने सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत.

लोहगडला पोहोचण्यासाठी लोणावळाजवळच्या मळवली स्टेशनपासुन आत गेल्यावर गायमुख खिंडीतून जात किल्ल्यावर पोहोचता येते.

गडावर प्रवेशासाठी चार दरवाजे असुन आत गेल्यावर एक दर्गा लागतो. जरा बाजूला शिवमंदिर असुन जवळ एक पाण्याचे टाकेदेखील आहे. पुढे गेल्यावर गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे विंचूकाटा माची लागते. विंचूकाटा माची ही १५०० मीटर लांबीची डोंगराची सोंड असुन टेहळणीसाठी तिचा वापर होत असावा.

लोहगडाच्या बाजूलाच विसापूर किल्ला असुन वाटेतच भाजे गावात प्रसिद्ध अशा भाजे लेण्यादेखील आहेत.

गडावरील लक्ष्मी कोठीत ३०-४० लोकांच्या राहण्याची सोय होते. जेवणाची सोय गडाच्या पायथ्याशी लोहगडवाडीत होते.

 

५)तोरणा किल्ला

तोरणा किल्ला उर्फ प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला किल्ला असुन समुद्रसपाटीपासुन १४०० मीटर उंचीवर आहे. हा भव्य किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर असुन ट्रेकर्सच्या आवडीचं आहे. वेल्हे गावाच्या बाजूलाच असलेला तोरणा किल्ला चढाईसाठी मध्यम श्रेणीत मोडतो. तोरणा किल्ल्यावरून बाजूलाच असलेला राजगड, सिंहगड, पुरंदर, रायगड आदि किल्ले दिसतात. किल्ल्याचा आवाका प्रचंड असल्याने शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले होते.

तोरणा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पायथ्याच्या वेल्हे गावातून मार्ग आहे. तसेच राजगड किल्ला करून मागच्या बाजूच्या वाटेने तोरणा किल्ल्यावर प्रवेश करता येतो. वेल्हे गावातून किल्ल्यावर जायला अडीच तास तर राजगड मार्गे ७-८ तास लागतात.

गडावर मेंगाई देवीचे मंदिर, झुंजार, बुधला आणि विशाळा या माच्या दिसतात.

गडावरील देवीच्या मंदिरात १०-१५ जणांच्या राहण्याची सोय होते. जेवणाची सोय पायथ्याशी गावात आहे.

Famous Treks In Maharashtra In Marathi

 

६)राजगड किल्ला

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेला राजगड हा किल्ला बेलग, बळकट आणि तितकाच सुंदर आहे. तीन माच्या आणि बालेकिल्ला असलेला हा गड १२ कोस पसरलेला आहे. १३९४ मीटर उंचीवर असलेला राजगड किल्ला शिवाजी महाराजांचे राजकीय केंद्र होता. गडावरून बाजूलाच असलेला तोरणा, सिंहगड, पुरंदर आणि दूरवर रायगड हे किल्ले दिसतात.

राजगडावर पोहोचण्यासाठी ४-५ वाटा असुन गुंजवणे गावातून मळलेली पायवाट गडावर जाते तर दुसऱ्या बाजुने पाली गावातून पायरीमार्गाने गडावर पोहोचत्या येते. अंदाजे २ तासात गडावर जाता येते.

गडाचा आवाका मोठा असुन पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या आहेत. तर मधोमध उंचावर बालेकिल्ला आहे.

गडावरील पद्मावती मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. तर जेवणाची सोय गुंजवणे गावात होते.

Famous Treks In Maharashtra In Marathi

 

७)शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात असुन शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. सुमारे ३५०० फुट उंचीवर असलेला शिवनेरी किल्ला जुन्नर शहराला लागुनच आहे.

गडावर पोहोचण्यास तीन वाटा असुन जुन्नर शहरातून मुख्य वाटेने गेल्यास एक तासात गडावर पोहोचता येते.

गडावर प्रवेश करताना आपण सात दरवाजांमधून वर चढतो. गडावर शिवाई देवीचे मंदिर, अंबरखाना, शिवकुंज, पाण्याची टाकी आदि वास्तू दिसतात. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी २ ते ३ तास लागतात.

शिवनेरी किल्ल्यावरून चावंड, जीवधन आणि नाणेघाट परिसर दिसतो.

गडावर १०-१५ जणांच्या राहण्याची सोय होते. पाणी उपलब्ध आहे. तर जेवणाची सोय खाली गावात करता येते.

Famous Treks In Maharashtra In Marathi

 

८)हरिश्चंद्रगड किल्ला

हरिश्चंद्रगड किल्ला हा नगर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला एक अजस्र किल्ला आहे. अग्निपुराण, मत्स्यपुराणाचा संदर्भ असलेला हा किल्ला खूप प्राचीन असुन गडाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गड भौगोलिकदृष्ट्या खूप महत्वाचा असुन दोन ते तीन दिवस सवड काढून बघावा असा मोठा किल्ला आहे.

गडावर पोहोचण्यासाठी बऱ्याच वाटा असुन खिरेश्वर आणि पाचनई या गावातून स्पोया वाटा आहेत. तर नळीची वाट ही सर्वात कठीण वाट आहे. Famous Treks In Maharashtra In Marathi

गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वराची गुहा, तारामती शिखर आणि गडावरील सर्वात मोठे आकर्षण असलेला कोकणकडा ही ठिकाणे आहेत. अर्धगोलाकार आकारात पसरलेला थरारक कोकणकडा ही हरिश्चंद्रगडाची सर्वात मोठी ओळख आहे. गिर्यारोहक आणि पर्यटकांच्या आवडीचा असा हा किल्ला आहे.

गडावर ५०-६० जणांच्या राहण्याची सोय होते तर जेवणाची देखील सोय होते.

गडाचे सर्वात उंच शिखर असलेल्या तारामती शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाइची खिंड , आजोबा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हे जबरदस्त किल्ले दिसतात.

हरिश्चंद्रगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे खिरेश्वर मार्ग. हा मार्ग सुमारे २-३ तासांचा आहे आणि तो ट्रेकर्ससाठी सोपा आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊ शकता. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण केलेले आहे.

 

९)तिकोना किल्ला

तिकोना किल्ला हा पुणे जिल्ह्यात पवना धरणाला लागुन असलेला एक छोटेखानी आणि चढाईसाठी सोपा असा किल्ला आहे. त्रिकोणी आकारामुळे किल्ल्याला तिकोना हे नाव पडले. तिकोना उर्फ वितंडगड हा किल्ला ३८५० फुट उंचीवर आहे.

गडावर पोहोचण्यासाठी पायथ्याच्या तिकोनापेठ या गावी पोहोचावे लागते. तिथुन गडावर पोहोचायला तास लागतो.

गडाचा घेरा फार मोठा नसून तासाभरात गड पाहून होतो. गडावर महादेवाचे मंदिर, मोठा खंदक अशा वास्तू लागतात. गडावरून तुंग, लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. तर पायथ्याशी पवना धरणाचा विशाल जलाशय नजरेस पडतो.

गडावरील गुहेत १०-१२ जणांच्या राहण्याची सोय होते. जेवणाची सोय खाली गावात होते.

 

१०)कोरीगड (कोराईगड) किल्ला

लोणावळ्यापासुन २० किमी अंतरावर असलेला कोरीगड किल्ला पोहोचायला तसा सोपा असुन चढाईसाठी देखील सोपा असल्याने पर्यटक इथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात. ३००० फुट उंचीवर असलेला हा किल्ला त्याच्या अखंड तटबंदीमुळे ओळखला जातो.

गडावर पोहोचण्यासाठी पायथ्याच्या पेठशहापूर या गावी पोहोचावे लागते. गावातून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्यावरून मोरगिरी, तुंग आणि तिकोना हे किल्ले दिसतात.

किल्ल्यावर गुहा, गणेशमूर्ती, पाण्याचे टाके, हनुमान मंदिर आणि एक छोटा तलाव आदि अवशेष दिसतात.

गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय नसून खाली गावात सोय करता येऊ शकते.

Famous Treks In Maharashtra In Marathi

चला तर मग, कधी निघताय ट्रेकिंगला??

हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले