पुणे आणि पिंपरी चिंचवड जवळ ट्रेकिंग साठी सोपे किल्ले Easy Beginner Treks near Pune Marathi
आपल्या महाराष्ट्र राज्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेलं आहे. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य देणगी आहे. आणि या सह्याद्रीतल्या डोंगरांवर शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले ही त्यावरची अनमोल रत्नेच जणू. महाराष्ट्रात जवळजवळ ३५० पेक्षाही जास्त किल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या कृपेनेच महाराष्ट्रातील जनतेला ट्रेकिंगचे वेड लागले आहे. चढाईला सोप्या श्रेणीपासून ते अतिशय अवघड श्रेणीत मोडणारे देखील किल्ले आपल्या इथे आहेत. आपण आज पुणे जिल्ह्यात असणाऱ्या आणि ट्रेकिंग साठी सोप्या श्रेणीत मोडणाऱ्या किल्ल्यांची माहिती घेणार आहोत. जेणेकरून सुरुवातीला ट्रेकिंग चालू करणाऱ्यांना याचा फायदा होईल. पुणे जिल्ह्यात एकूण ३८ किल्ले आहेत. मावळ, जुन्नर, भोर या भागांमध्ये सर्वाधिक किल्ले येतात. यातील सोप्या श्रेणीत मोडणारे काही किल्ले नव्याने ट्रेक करणाऱ्यांसाठी उत्तम आहेत.
Easy Beginner Treks near Pune Marathi
१)सिंहगड किल्ला Sinhagad Fort-
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाने पावन झालेला सिंहगड (कोंढाणा) किल्ला पुणे शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची कायम गर्दी असते. सिंहगडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग आणि भोवतालचा भलामोठा परिसर दिसतो.
सिंहगड किल्ल्याला कसे जाल?
पुण्याच्या नैऋत्येला ४० किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असल्याने गाड्या थेट किल्ल्यावर जातात. पायी ट्रेक करत जाण्यासाठी गडाच्या पायथ्याला असलेल्या आतकरवाडी गावात PMT बसने जाऊन तिथुन ट्रेक चालू करता येतो. आतकरवाडीतून मळलेली पायवाट आपल्याला १.३० तासात गडावर घेऊन जाते. के टू एस नावाने प्रसिद्ध असलेला कात्रज ते सिंहगड असा रात्रीचा ट्रेक बरेच ट्रेकर्स करतात.
काय पाहाल-
गडावर पुणे दरवाजा, खांद कडा, दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर, अमृतेश्वर भैरव मंदिर, देवटाके, कल्याण दरवाजा, उदेभानाचे स्मारक, झुंजार बुरुज, तानाजी कडा, राजाराम स्मारक इत्यादी ऐतिहासिक ठिकाणं आपण बघू शकता.
सिंहगडाकडे जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. तसेच सिंहगडाच्या पायथ्याला सिंहगड valley आहे, तिथे विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. पक्षीनिरीक्षक आणि फोटोग्राफर तिथं आवर्जुन हजेरी लावतात.
सिंहगडावर खाद्यपदार्थांचे विविध दुकानं आहेत. तिथं आपण वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
पुणे ते सिंहगड किल्ला अंतर- ३० किमी
Easy Beginner Treks near Pune Marathi
२)लोहगड किल्ला Lohgad Killa- Easy Trek near Pune and PCMC-
पवना मावळात असणारा लोहगड किल्ला पुणे – मुंबई रस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स आणि पर्यटकांची कायमच गर्दी असते. इथे जवळच भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत.
लोहगड किल्ल्याला कसे जाल?मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे चालत अथवा खाजगी गाडीने जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत. काय पाहाल-गडावर जाण्यासाठी पायथ्याच्या लोहगड वाडीमधून सोपा पायरीमार्ग आहे. गडावर एक सुंदर शिवमंदिर असुन जवळच जवळच एक छोटा तलाव आहे. तिथुन पुढे गडावरील मुख्य आश्चर्य म्हणजेच विंचूकाटा ही लांबच लांब माची आहे. भाजे गावातून लोहगडाकडे जाताना वाटेतच भाजे लेण्या लागतात. भाजे लेणी पाहून पुढे लोहगड किल्ला एका दिवसात आरामात बघून होतो. गडावरून जवळच असलेला विसापूर किल्ला, तुंग, तिकोना, आणि मावळातला परिसर नजरेस पडतो. लोहगड विसापूर हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहून होतात. गडावर बारमाही पिण्याचे पाणी असुन गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड वाडीमध्ये जेवणाची सोय होते. पायथ्याशी गावात हॉटेल्स असून पार्किंग साठी मोठी जागा देखील आहे. पुणे ते लोहगड किल्ला अंतर- ६० किमी Easy Beginner Treks near Pune Pimpri Chinchwad Maharashtra Marathi
३)विसापूर किल्ला Visapur Fort-मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच लोहगड दिसतो. परंतु डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावर नजरेस पडतो. लोहगड विसापूर हे दोन्ही किल्ले जवळ असल्याने एका दिवसात बघून होतात. विसापूर किल्ल्याचा पसारा भलामोठा असुन किल्ल्याला मोठी आणि चांगल्या स्थितीतली तटबंदी बघायला मिळते. विसापूर किल्ल्याला कसे जाल?लोणावळ्याच्या अलीकडच्या मळवली गावातून भाजे गावाकडे जावे. वाटेतच भाजे लेण्या आहेत. इथून अवाढव्य असा विसापूर किल्ला दिसतो. भाजे लेण्यांपासून किल्ल्याकडे जायला वाट असली तरी वाट चुकण्याचा धोका आहे. त्यामुळे तिकडून न जाता लोहगडाच्या दिशेने जात घाट चढून वर जावे. घाट चढुन गेल्यावर आपण गायमुख खिंडीपर्यंत येतो. इथून उजवी वाट लोहगडाकडे तर डावी वाट विसापूर कडे जाते. इथुन गडावर जायला एक तास लागतो. Easy Beginner Treks near Pune Marathi काय पाहाल-गडावर जाताना मारुतीचे एक मंदीर लागते. बाजूला दोन गुहा आहेत. इथे राहण्याची सोय होऊ शकते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावर लांबच लांब अशी मोठी तटबंदी आहे. इथून शेजारीच असणारा लोहगड, तिकोना, तुंग, मोरगिरी हे किल्ले आणि मावळातला परिसर नजरेस पडतो. तसेच विसापूर किल्ल्याला लागूनच असणारा अवाढव्य असा भातराशी डोंगर इथुन नजरेस पडतो. जेवायची सोय खाली भाजे गावात अथवा लोहगडवाडीमध्ये होऊ शकते. पुणे ते विसापूर किल्ला अंतर- ५८ किमी Easy Beginner Treks near Pune Pimpri Chinchwad Maharashtra Marathi
४)तिकोना किल्ला Tikona Fort- Easy Trek Near Pimpri Chinchwadतिकोना किल्ला पवना धरणाला लागुनच आहे. या गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नसला तरी देखरेखीसाठी याचा वापर होत असावा. चढायला सोप्या श्रेणीत असलेला हा किल्ला बघायला एक तास लागतो. तिकोना किल्ल्याला कसे जाल?-कामशेत वरून पवना धरणाच्या दिशेने जात काळे कॉलनी या गावामध्ये यावे. इथून पुढे धरणाच्या बाजूने जात तिकोनापेठ या पायथ्याच्या गावी यावे. इथपर्यंत यायला बस अथवा खाजगी गाड्या देखील उपलब्ध आहेत. पायथ्यापासुन सोप्या वाटेने चढत अर्ध्या तासात आपण गडावर दाखल होतो. Easy Beginner Treks near Pune Marathi काय पाहाल-गड छोटा असल्यामुळे तसा एका तासात बघून होतो. गडावर पाण्याची टाकी, गुहा, मारुती मंदिर, महादेव मंदिर, मंदिरामागे मोठा खंदक, ध्वजस्तंभ इत्यादी गोष्टी आहेत. गडावरून लोहगड, विसापूर, तुंग, भातराशी डोंगर, पवना जलाशय इत्यादी ठिकाणं दिसतात. Easy Beginner Treks near Pune Marathi कामशेत वरून तिकोना कडे जाताना वाटेत बेडसे लेण्या लागतात. तसेच तिकोना पासुन पुढे गेलेली वाट हडशी मंदिराकडे जाते. तिकोना आणि तुंग हे दोन्ही किल्ले एका दिवसात आरामात बघून होतात. जेवणाची सोय खाली गावात होऊ शकते. तसेच खाली हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. पुणे ते तिकोना किल्ला अंतर- ५० किमी Easy Beginner Treks near Pune Pimpri Chinchwad Maharashtra Marathi
५)तुंग किल्ला Tung Fort-घाटरक्षक म्हणून वापरात असणारा तुंग किल्ला चढायला सोपा आहे. गडाचा बालेकिल्ला अतिशय छोटा असुन माथ्यावरून पवना धरणाचा सुंदर जलाशय आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य दिसते. तसेच माथ्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, मोरगिरी आणि आसपासचे सुंदर दृश्य दिसते. तुंग किल्ल्याला कसे जाल?लोणावळ्याहुन भांबुर्डे एसटी बस पकडून अथवा खाजगी वाहनाने जात घुसळखांब फाट्यावर यावे. एसटी बसने गेल्यास घुसळखांब इथे उतरून तिथून ८ किमीवर असलेल्या तुंग किल्ल्याला जाण्यासाठी चालत किंवा खाजगी वाहनांचा वापर करावा. Easy Beginner Treks near Pune Marathi किंवा तिकोना किल्ला हा ट्रेक करून ब्राम्हनोली गावातून बोटीने तुंगवाडीत उतरावे. तिथून तुंग किल्ला जवळ आहे. काय पाहाल-गडमाथा छोटा असल्यामुळे एका तासात बघून होतो. गडावर गणेश मंदिर, पाण्याचा खंदक, असुन माथ्यावर देवीचे मंदिर आहे. इथून मोरगिरी किल्ला, तिकोना आणि आसपासचा परिसर दिसतो. तुंग आणि तिकोना हे दोन्ही किल्ले एका दिवसात आरामात बघून होतात. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. पुणे ते तुंग किल्ला अंतर- ७० किमी Easy Beginner Treks near Pune Pimpri Chinchwad Maharashtra Marathi
६)कोरीगड (कोराईगड) किल्ला Korigad Fortलोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड किल्ला आहे. कोरीगड किल्ल्याची भक्कम तटबंदी आजही शाबूत आहे. कोरीगड किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावानेही ओळखतात. तर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड असा सुंदर ट्रेकही आपण करू शकतो. Easy Beginner Treks near Pune Marathi कोरीगड किल्ल्याला कसे जाल?लोणावळा मधून भुशी धरण मार्गे पुढे गेल्यास २० किमी अंतरावर पेठ शहापूर हे गाव लागते. गावाला लागुनच कोरीगड किल्ला आहे. काय पाहाल?किल्ला चढताना एक गुहा आणि नंतर गणेश दरवाजा लागतो. किल्ल्याला साधारण दीड किमी लांबीची तटबंदी बघायला मिळते. किल्ल्यावर मोठ्या तोफा सुस्थितीत असलेल्या बघायला मिळतात. गड माथ्यावर कोराई देवीचे मंदिर आहे. संपूर्ण गड पाहण्यासाठी एक तास लागतो. पुणे ते कोरीगड किल्ला अंतर- ९० किमी
वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग हेही वाचा-भटकंती मावळातल्या अवाढव्य सुपवती डोंगराची Easy Beginner Treks near Pune Marathi
|
1 thought on “Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले”
Comments are closed.