Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary हिवाळा जवळ आला की पक्षीनिरीक्षक, छायाचित्रकार यांची पाऊलं भिगवणकडे वळतात. याला कारणही तसेच आहे. हिवाळ्यात शेकडो परदेशी पक्षी भारताकडे स्थलांतर करीत उजनी जलाशयात दाखल होतात. सुमारे २०० प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची इथं नोंद करण्यात आली आहे. भिगवणमध्ये पक्षी निरीक्षण करण्यासाठी देशातल्या विविध राज्यांतून तसेच परदेशातूनही लोक इथे हजेरी लावतात. Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
Bhigwan Flamingos Bird Sanctuary In Marathi भिगवण पक्षी अभयारण्याची सुरुवात कधी झाली?
भीमा नदीवर १९८० साली उजनी हे धरण बांधण्यात आलं. सुमारे ३५७ चौ.किमी क्षेत्र असलेल्या ह्या भल्यामोठ्या जलाशयाचा परदेशी पक्ष्यांना सुगावा लागला. आणि तेव्हापासून प्रत्येक हिवाळ्यात इथं परदेशी पक्ष्यांनी हजेरी लावायला सुरुवात केली. इथे असणारे वातावरण हे या परदेशी पक्ष्यांसाठी अनुकूल असुन दरवर्षी लाखोंच्या संख्येने हे परदेशी पर्यटक इथे भेट देतात.
सोलापूर ट्रीप आयोजित करताय? मग हे नक्की वाचा.
Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary भिगवणला भेट देण्याची सर्वात उत्तम वेळ
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस इथं पक्षी यायला सुरुवात होते तर मार्च महिन्यापर्यंत इथं ते बघायला मिळतात. शेकडो प्रजाती इथं दाखल होत असल्या तरी लोकप्रिय होण्याचं भाग्य एकट्या फ्लेमिंगो (Flamingo) पक्ष्याला मिळालं. पांढरा रंग असलेला हा पक्षी त्याच्या लालसर गुलाबी पंखांमुळे आकर्षक दिसतो.
फ्लेमिंगो ह्या पक्ष्याचं मराठी नाव ‘रोहित’ असं आहे. हे पक्षी प्रामुख्याने युरोप, रशिया, मंगोलिया व आफ्रिका या प्रदेशांतुन खाद्याच्या शोधत इथं दाखल होतात. काही पक्षी भारतातल्या भारतात स्थलांतर करत असतात तर काही पक्षी दुसऱ्या देशांमधून इथं येतात. आणि एप्रिलच्या आसपास मायदेशी परततात. संपूर्ण भारतातून लोक इथं पक्षी निरीक्षण, त्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी करण्यासाठी येतात.
भिगवण हे पुणे सोलापूर महामार्गाला लागुन असलेलं छोटं शहर आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर भिगवण शहर आहे. उजनी धरणाच्या बॅकवॉटरला लागुन असलेल्या भिगवणला ‘मिनी भरतपुर’ म्हणुनही ओळखलं जातं. इथं फ्लेमिंगो, पांढऱ्या मानेचा करकोचा, स्पुनबिल, शेकाट्या, राखी बगळा, चित्रबलाक, आयबिस, ब्राम्हणी बदक, खंड्या, हेरॉन आणि विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात.
जलाशयाचं पाणी आटून चिखलमय झाले की इथं पक्षी गर्दी करू लागतात. चिखलाच्या डबक्यातुन मिळणारे मासे हे या पक्ष्यांचं प्रमुख खाद्य आहे. फ्लेमिंगो पक्षी मासे आणि शेवाळ खातात. या खाद्यामध्ये ‘बिटा कॅरोटिन’ या द्रव्याचं प्रमाण जास्त असतं आणि या द्रव्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांना लालसर गुलाबी रंग येतो.
भिगवण ला कसं जायचं? How to reach, go to Bhigwan?
भिगवण गाव पुणे सोलापूर महामार्गावर असल्यामुळे इथं आपण ST बस, स्वतःची गाडी किंवा रेल्वेनेही येऊ शकतो. दौंड हे जवळचे रेल्वे स्थानक भिगवण पासुन ५० किमी अंतरावर आहे. Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
Bhigwan Distance From Pune, Mumbai and Solapur
पुण्यापासून भिगवण अंतर Pune To Bhigwan Distance-१०० किमी
मुंबईपासून भिगवण अंतर Mumbai To Bhigwan Distance-२५० किमी
सोलापूर पासून भिगवण अंतर Solapur To Bhigwan Distance-१५० किमी
भिगवण मध्ये पक्षी कुठे बघायचे? Where to see Flamingo birds in Bhigwan? Boat Timings In Bhigwan
भिगवण पासुन १० किमीवर कुंभारगाव नावाचं गाव आहे. तिथं जायला भिगवण पासुन बोटी असतात. बोटींच्या दिवसभरात मोजक्याच ट्रिप असतात. त्यामुळे जायच्या आधी चौकशी करून जावे. एका बोट राईडला ८०० ते १००० रुपये आकारले जातात. तसेच पुण्या-मुंबईतल्या काही संस्थांकडून भिगवण पक्षी निरीक्षण सफारी आयोजित केल्या जातात. आपण त्यांच्यासोबतही जाऊ शकता. सकाळी सहा साडेसहा पासुन या बोटी निघायला सुरुवात होते. दिवसभर बोटी सुरु असल्या तरी सकाळी आणि संध्याकाळी पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी चांगल्या पद्धतीने करता येते. Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
हे देखील वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय
फ्लेमिंगो पक्षी माहिती Flamingos Bird Information In Marathi-
-गुलाबी रंगांचे पंख, निमुळते होत गेलेले लांबलचक पाय, व इंग्रजी एस आकाराची मान असलेला फ्लेमिंगो पक्षी त्याच्या सुंदरतेमुळे साहजिकच लक्ष वेधून घेतो. अटलांटिक समुद्राजवळच्या बहामाज देशाचा राष्ट्रीय पक्षी अशी ओळख असलेल्या फ्लेमिंगोच्या जगभरात १४० पेक्षाही जास्त जाती आढळतात.
-फ्लेमिंगो हा एकत्र कळपाने राहणारा पक्षी आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो आपल्याला दिसतात.
-त्याचं वजन साधारण चार किलो आणि ते सरासरी ४७ वर्षे जगतात.
-दिवसापेक्षा ते रात्रीच्या वेळेस जास्त सक्रीय असतात. ते नेहमी एका पायावर उभे असलेले दिसतात. त्यांना चव आणि वासाचं ज्ञान नसतं.
फ्लेमिंगोंमध्ये आढळणाऱ्या जाती Types Of Flamingos In Marathi-
१)Greater Flamingo-
सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या या प्रजातीतील फ्लेमिंगोची उंची चार ते पाच फुटांपर्यंत असून ते चार किलो वजनाचे असतात. त्यांच्या पंखांचा विस्तार चार ते सहा फूट इतका असतो.
ते आफ्रिका, युरोप आणि दक्षिण आशिया भागात आढळतात. Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
२)Lesser Flamingo-
आकाराने लहान असणाऱ्या या फ्लेमिंगोची उंची ३ फुटांपर्यंत असते तर वजन १-२ किलो इतके असते. यांच्या पंखांचा विस्तार ३-५ फूट इतका असतो.
ते प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात.
३)Chilean Flamingo-
मोठ्या फ्लेमिंगो सारखेच दिसणाऱ्या या प्रजातीतील फ्लेमिंगोचा पंखांचा रंग गडद गुलाबी असतो. यांची उंची चार फूट आणि वजन ३ किलो असते. Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
४)जेम्स फ्लेमिंगो James Flamingo-
निसर्ग शास्त्रज्ञ असलेल्या हॅरी जेम्स यांनी शोधल्यामुळे त्यांच्या नावावरून या प्रजातीला जेम्स फ्लेमिंगो हे नाव हे नाव दिले गेले. यांची उंची ३ किलो आणि वजन साधारण २ किलो इतके असते.
हे फ्लेमिंगो अर्जेंटिना, पेरू, चीली आणि बोलिव्हिया या भागात आढळून येतात.
५)अँडीयन फ्लेमिंगो Andean Flamingo
तीन साडेतीन किलो वजन असलेल्या या फ्लेमिंगोचे वजन जवळजवळ ५ किलो इतके असते. अतिशय वेगाने प्रवास करणारे फ्लेमिंगो म्हणून यांची ओळख आहे. हे प्रामुख्याने पेरू, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या काही भागात आढळतात.
Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
हेही वाचा-भारतातल्या प्रसिद्ध १० ऐतिहासिक वास्तू Monuments Of India Marathi
फ्लेमिंगोंचे स्थलांतर Migration Of Flamingos In Marathi-
प्रजननाच्या दरम्यान फ्लेमिंगो एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करत असतात. गुजरात मधील कच्छ भागात फ्लेमिंगो जास्त प्रमाणत स्थलांतर करून येतात. त्यानंतर ते पावसाळ्यात मुंबई भागात येऊन मार्च पर्यंत इथे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असतात.
हे देखील वाचा- आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.
खादाडी-
भिगवण मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ Famous Food In Bhigwan In Marathi
भिगवणचे मासे Bhigwan Fish-
भिगवण पक्षी निरीक्षणासोबतच इथं मिळणाऱ्या चिलापी माशांसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथल्या गोड्या पाण्यात चिलापी हा मासा बीज सोडुन वाढविण्यात येतो. इथले मासे खाण्यासाठीही लोक इथं आवर्जुन भेट देतात.
Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
पुणे भिगवण मार्गावर लागणारी इतर प्रसिद्ध ठिकाणं Places to visit near Bhigwan-
१)भुलेश्वर मंदिर- यवत गावाजवळ असलेलं हे प्रसिद्ध मंदिर शिल्पकलेचा एक अनोखा नमुना असून खुप प्रसिद्ध आहे. पुण्यापासून हे मंदिर ५० किमी अंतरावर असून आवर्जुन भेट देण्यासारखं आहे.
२)पळसनाथ मंदिर- उजनी धरण झाल्यावर हे मंदिर पाण्याखाली गेलं. उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते तेव्हा या मंदिराचं दर्शन घडतं. हेमांडपंथी बांधकाम शैलीचा आविष्कार असलेलं हे मंदिर वर्षातुन फार कमी काळ पाहता येतं. भिगवन पासुन हे मंदिर अवघ्या १५ किमी अंतरावर आहे. उन्हाळ्यात जेव्हा हे मंदिर दिसू लागतं, तेव्हा हे आश्चर्य पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक, छायाचित्रकार इथे आवर्जून भेट देतात.
३)सिद्धटेक मंदिर- अष्टविनायकांपैकी एक असलेलं सिद्धिविनायक मंदिर हे भिगवण पासून पुढे ४० किमी अंतरावर आहे.
४)पेडगावचा बहादूरगड किल्ला- छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असलेलं ऐतिहासिक बहादूरगड किल्ला इथून ४० किमी अंतरावर आहे.
तर मंडळी, पाहुणे पक्षी येताहेत, व्यवस्थित नियोजन करा, भरपूर फोटो काढा आणि भरपूर खा-प्या.
Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary In Marathi
हेही वाचा- महाराष्ट्रातले सुंदर समुद्रकिनारे
वाचक मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com मेल वर कळवू शकता.
आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. whatsapp किंवा फेसबुक या माध्यमांवर ही माहिती आपण थेट इथून देखील शेअर करू शकता. आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थातच फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील Join व्हा. आम्ही आपल्यापर्यंत अशीच चांगली माहिती आणत राहणार आहोत.
टीम Firastaa- Marathi Travel Blog
Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary
👌