Best Summer Destinations In India
मित्रांनो, थंडी केव्हाच संपलीय आणि कडक उन्हाने अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात झालीये. काही दिवसांतच पोरांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि मग उन्हाळ्याच्या सुट्टीचे बेत ठरायला सुरुवात होईल. आपल्यापैकी बरेच जण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच त्या आजोळी अथवा ठराविक ठिकाणांना भेटी देतो. पण यापेक्षा अशी ठिकाणे फिरा जी तुम्हाला उन्हाळ्याची तीव्रता जाणवू देणार नाहीतच परंतु तुमचा उन्हाळा थंड करून टाकतील. आम्ही आपल्याला देशातल्या थंड हवेच्या प्रसिद्ध ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत जी उन्हाळ्यात फिरण्यासाठी एकदम भारी ठिकाणे आहेत. Best Summer Destinations In India
चला तर मग, हे वाचा आणि फिरायचा प्लान बनवा. भारतात अशी बरीच सुंदर ठिकाणे आढळतात. त्यातील काही मोजक्या आणि प्रमुख ठिकाणांबद्दल ही माहिती…
Places To Visit In Summer In India
१)शिमला, हिमाचल प्रदेश Shimla, Himachal Pradesh
शिमला हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी असलेले शिमला हे हिवाळ्यात फिरण्यासाठी आणि थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसांशिवाय आपण इथे उन्हाळ्यात देखील जाऊ शकतो. येथील मॉल रोड, रिज, जाखू टेकडी, आणि कुफरी सारख्या ठिकाणी फिरायला मजा येते. शिमला येथे ब्रिटिश काळातील वास्तुकलेचे सुंदर उदाहरणे पाहायला मिळतात. भारतातील अनेक पर्यटक इथे खास भेट देण्यासाठी येतात.
मनमोहक हिरवाईने वेढलेले शिमला शहर ‘सात टेकड्यांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यातही येथील कमाल तापमान २५ अंशांच्या वरच असते. इथे स्नो स्कीइंगसाठी सर्वोत्तम वेळ जानेवारी ते मार्च दरम्यान आहे. मासेमारी आणि गोल्फसोबतच तुम्ही इथे येऊन ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकता. शिमला-किन्नौर या भागात नारकंडा ते बंजार आणि सराहन ते सांगला हे प्रसिद्ध ट्रेक मार्ग आहेत. दोन्ही मार्ग सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर आहेत.
द मॉल, तारादेवी मंदिर, समर हिल आणि शिमला स्टेट म्युझियम सारखी येथे भेट देण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. द मॉल हा शिमलाचा एक प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट आहे ज्यामध्ये अनेक हॉटेल्स, क्लब, बँक, बार, पोस्ट ऑफिस आणि पर्यटन कार्यालये आहेत.
दिल्लीपासून शिमला ३४५ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने कारने सहज पोहोचता येते. दिल्ली ते शिमला विमान प्रवासाची सुविधा देखील आहे. जर तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर कालका ते शिमल्यापर्यंत नॅरोगेज रेल्वे लाइन जाते. Best Summer Destinations In India
२)मनाली, हिमाचल प्रदेश Manali, Himachal Pradesh
हनिमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेले मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक सुरम्य हिल स्टेशन आहे, जे उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात फिरण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. येथे सोलंग व्हॅली, रोहतांग पास, हिडिंबा देवी मंदिर, आणि ओल्ड मनाली सारख्या ठिकाणी भेट देऊन निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. मनाली हे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, आणि रॉक क्लायम्बिंगसाठीही प्रसिद्ध आहे.
मनाली शिमल्यापासून साधारण २७५ किलोमीटर अंतरावर आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले मनाली शहर पाहून रोमांचक अनुभव येतो. साहसप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. येथे येणारे पर्यटक इथल्या गावातच राहतात आणि येथे ट्रेकिंग, स्कीइंग आणि राफ्टिंगचा आनंद घेतात. मनालीपासून सुमारे ५३ किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध रोहतांग पास इथे पर्यटकांना हिमनद्या, शिखरे आणि दऱ्यांचे साहसी आणि चित्तथरारक दृश्ये यांचा अनुभव घेता येतो.
व्यास नदी, जोगिनी धबधबा, हडिंबा देवी मंदिर, मणिकरण गुरुद्वारा, सोलांग व्हॅली, व्यास कुंड, रोहतांग पास आणि हिमवॅली मनाली ही मनालीमध्ये पाहण्यासाठी खास ठिकाणे आहेत. Best Summer Destinations In India
३)दार्जिलिंग, पश्चिम बंगाल Darjeeling, West Bengal
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. दार्जिलिंगमध्ये उन्हाळ्यातही थंड हवा असते, ज्यामुळे ते उन्हाळी सुट्टीसाठी उत्तम ठिकाण आहे.
‘टेकड्यांची राणी’ म्हणून ओळखले जाणारे दार्जिलिंग एक सुंदर हिल स्टेशन आहे. एकेकाळी सिक्कीमचा भाग असलेल्या या हिल स्टेशनची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील दूरवर पसरलेल्या चहाच्या बागा. दार्जिलिंग एकेकाळी मसाल्यांसाठी प्रसिद्ध होते, परंतु आता ते चहासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
पश्चिम बंगालच्या या भव्य हिल स्टेशनचं सौंदर्य म्हणजे फक्त इथल्या चहाच्या बागाच नाहीत तर इथल्या दऱ्याखोऱ्या देखील खूप सुंदर आहेत. सुंदर बर्फाच्छादित पर्वतरांगा, पाइन वृक्षांची जंगले, नैसर्गिक सौंदर्य, कोसळणारे धबधबे सर्वांनाच भुरळ घालतात. त्याच्या सौंदर्यामुळेच, त्याला ‘पर्वतांची राणी’ म्हटले जाते आणि जगभरातील प्रसिद्ध आणि सुंदर हिल स्टेशन्समध्ये दार्जीलिंगची गणना होते.
दार्जिलिंगचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या टॉय ट्रेनने पर्यटक दऱ्या खोऱ्यातून आणि पर्वतरांगांमधून प्रवास करत इथले चहाचे मळे, जंगले, नद्या आणि इथले स्वर्गीय सौंदर्य अनुभवू शकतात. Best Summer Destinations In India
टायगर हिल या १३ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी पर्यटक कांचनगंगा पर्वताच्या मागून सूर्योदयाचे रंगीत दृश्य पाहण्यासाठी जमतात. हवामान स्वच्छ असताना इथून जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टही दिसते.
दार्जिलिंग येथुन जवळचे विमानतळ बगडोगरा हे ९० किमीवर आहे. तर सिलीगुरी शहर ८० किमी अंतरावर आहे. जिथुन तुम्ही स्वतःच्या गाडीने अथवा Taxi करून देखील जाऊ शकता.
४)नैनिताल, उत्तराखंड Nainital, Uttarakhand
नैनिताल हे उत्तराखंडमधील एक सुंदर सरोवर शहर आहे, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील नैनी सरोवर, नैना देवी मंदिर, स्नो व्यू पॉइंट, आणि टिफिन टॉप सारख्या ठिकाणी फिरायला मजा येते. नैनितालमध्ये उन्हाळ्यातही हवामान सुखद आणि थंड असते, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे.
नैनितालला नैना देवी मंदिर आणि प्रसिद्ध तलाव असल्यामुळे त्याला नैनिताल हे नाव पडले. बर्फाच्छादित पर्वतांमध्ये सुंदर तलावांनी वेढलेले नैनिताल हे उत्तराखंड राज्यातील एक प्रसिद्ध हनिमून स्पॉट आणि पर्यटनस्थळ आहे.
नैनिताल तलाव, नैना देवी मंदिर, नैना पीक, गव्हर्नर हाऊस, टिफिन टॉप आणि पंडित जीबी पंत प्राणी उद्यान ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. खरेदीसाठी इथे मॉल रोड हे प्रसिद्ध मार्केट आहे.
इथला प्रसिद्ध तलाव नैना तलाव आहे ज्याला ताल देखील म्हणतात. तलावातील बदकांचे कळप, रंगीबेरंगी होड्या आणि वरून वाहणारी थंडगार वाऱ्याची झुळूक असे विलोभनीय दृश्य याठिकाणी दिसते. इथल्या तलावाचे पाणी उन्हाळ्यात हिरवे, पावसाळ्यात गढूळ आणि हिवाळ्यात हलके निळे दिसते. Best Summer Destinations In India
NH ८७ हा राष्ट्रीय मार्ग संपूर्ण देशाला नैनितालशी जोडतो. नैनितालमध्ये रेल्वे आणि हवाई सेवा नाही, परंतु जवळचे रेल्वे स्टेशन काठगोदाम ३४ किमी अंतरावर आहे. काठगोदाम ते नैनिताल अशा राज्य परिवहन बसेस दिवसाच्या प्रत्येक वेळी उपलब्ध असतात. तुम्ही येथून टॅक्सी देखील घेऊ शकता. हे ठिकाण दिल्लीपासून ३२० किमी अंतरावर आहे.
५)ऊटी, तमिळनाडू Ooty, Tamilnadu
तमिळनाडूचे जगप्रसिद्ध शहर उटी हे भटकंतीसाठी तसेच हनिमूनसाठी सर्वात योग्य ठिकाण आहे. उटीला ‘पर्वतांची राणी’ असेही म्हणतात. इथे दूरवर पसरलेली हिरवाई, चहाच्या बागा आणि विविध प्रकारच्या वनस्पती, जंगले तुम्हाला मंत्रमुग्ध करतात.
उटीमध्ये निलगिरी पर्वत रांगा आहेत. दोडाबेट्टा शिखर, लँब्स रॉक, कोडनाडू व्ह्यू पॉइंट, बोटॅनिकल गार्डन, अप्पर भवानी तलाव, निलगिरी माउंटन रेल्वे, सेंच्युरी अव्हलांच आणि उटी तलाव ही इथली काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पर्यटक इथल्या उटी तलावात नौकाविहार किंवा मासेमारी देखील करू शकतात. याशिवाय येथे सुंदर कॉटेज, कुंपणाच्या फुलांच्या बागा, चर्च आणि सुंदर रस्ते आहेत. येथे सगळीकडे तुम्हाला हिरवाईने वेढलेल्या निसर्गाचे दर्शन घडते. येथे डेरेदार वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. उटीच्या आसपास पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ऊटी हे त्याच्या शांत वातावरणासाठी आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मेट्टुपालयम हे ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन इथून जवळ आहे. तसेच कोईम्बतूर हे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ इथून १०० किमी अंतरावर आहे. Best Summer Destinations In India
हे देखील वाचा- Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.
६)मुन्नार, केरळ Munnar, Kerala
मुन्नार हे केरळमधील एक प्रसिद्ध असलेले आणि स्वर्गीय सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन आहे, जे त्याच्या चहा बागांसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. मुन्नारमध्ये उन्हाळ्यातही हवामान सुखद आणि थंड असते. चहाची शेती, वसाहतींचे बंगले, नद्या, धबधबे आणि थंड हवामान ही या हिल स्टेशनची खरी ओळख आहे. ट्रेकिंग आणि माउंटन बाइकिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते. चहाच्या बागा आणि सोबतच मसाले आणि सुगंधी वस्तूंच्या उत्पादनासाठी देखील मुन्नार प्रसिद्ध आहे.
चहाच्या बागा, वंडरला मनोरंजन पार्क, कोची किल्ला, गणपती मंदिर आणि हाऊस बोट ही प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय अनामुडी शिखर, मट्टुपेट्टी, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेले पल्लिवसल, धबधब्यांसाठी प्रसिद्ध असे चिन्नाकनाल, चहाच्या बागा ही इथे पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
इथून जवळचे रेल्वे स्टेशन थेनी (तामिळनाडू) हे सुमारे ६० किमी दूर तर चेंगनचेरी हे सुमारे ९३ किमी अंतरावर आहे. जवळचे विमानतळ मदुराई (तामिळनाडू), सुमारे १४० किमी अंतरावर तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ १९० किमी अंतरावर आहे.
ही सर्व भारतातील प्रमुख आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. इथे पोहोचण्यासोबतच इथे राहण्याची सोय देखील आरामात होऊ शकते. स्वस्तातल्या हॉटेल्स पासुन ते महागड्या हॉटेल्स पर्यंत विविध पर्याय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. चला तर मग, या ठिकाणांना भेट द्या आणि तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना खऱ्या अर्थाने ‘कुल’ बनवा. Best Summer Destinations In India
आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करा. आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा आणि मिळवा भटकंतीविषयक अशीच रंजक माहिती.
Best Summer Destinations In India
टीम फिरस्ता