उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ठिकाणे Best Places To Visit In Summer In Maharashtra

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ठिकाणे

लवकरच शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. महाराष्ट्रातील अशी ठिकाणे जिथे वाढत्या उन्हाचा देखील काही परिणाम होणार नाही अशा ठिकाणांबद्दल आपण आज माहिती घेऊयात. तुम्ही देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेची ठिकाणे शोधत असाल, तर महाराष्ट्रात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या लेखात आपण महाराष्ट्रातील काही सुंदर आणि थंड हवेची ठिकाणे बघुयात. जी तुम्ही या उन्हाळ्यात नक्कीच बघितली पाहिजेत. Best Places To Visit In Summer In Maharashtra

Cool Places In Maharashtra

१)महाबळेश्वर Mahabaleshwar

सातारा जिल्ह्यात असलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर असलेले महाबळेश्वर तिथले आल्हाददायक थंड वातावरण, उंच डोंगर दऱ्या, आणि स्वर्गीय नैसर्गिक सौंदर्य यामुळे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. उन्हाळ्यातही येथील हवामान सुखद आणि थंड असते, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण आहे.

Best Places To Visit In Summer In Maharashtra

WhatsApp Group Join Now

महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध असुन परवडणाऱ्या ते महाग अशा किंमतीमध्ये सीझननुसार इथे हॉटेल्स उपलब्ध आहेत. महाबळेश्वरमध्ये राहायचे नसेल तर जवळ पाचगणी हा देखील उत्तम पर्याय आहे.

महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणे-

महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इथून जवळच असलेल्या प्रतापगड किल्ल्यालाही भेट देता येते. वेण्णा तलाव, एलिफंट पॉइंट, सनसेट पॉइंट, ऑर्थर सिट पॉइंट, लिंगमळा धबधबा इत्यादी ठिकाणांना भेट देता येते. तसेच जवळच असलेल्या पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी आणि वाई, सज्जनगड, अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणांनादेखील भेट देता येते. तसेच कास पठार देखील इथून जवळ आहे.

यासोबतच महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथली स्ट्रॉबेरी ही महाराष्ट्र तसेच देशभरात खास प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरमध्ये असलेल्या मॅप्रो गार्डनमध्ये पर्यटक स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकतात तसेच स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त इथे तयार होणाऱ्या मध, गुलकंद, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी पासुन बनलेल्या इतर बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच मार्च एप्रिलमध्ये इथे साजरा होणाऱ्या ‘स्ट्रॉबेरी महोत्सवात’ देखील पर्यटक सहभागी होऊ शकतात.

महाबळेश्वरला कसे जायचे? How To Reach Mahabaleshwar?

पुणे हे महाबळेश्वर पासुन जवळचे विमानतळ हे पुणे असुन जवळचे रेल्वे स्टेशन सातारा हे आहे. पुणे, मुंबई वा सातारा इथून महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्य परिवहन बसेस असुन खासगी गाड्यांची देखील सोय आहे.

पुणे ते महाबळेश्वर अंतर-१२० किमी

हे देखील वाचा- Famous Honeymoon Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.

 

२)पाचगणी Panchgani

पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन आणि थंड हवेचे ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहर तिथल्या थंड वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. राज्यभरातून बरेच जण हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात देखील पाचगणी, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी आपली सुट्टी घालवण्यासाठी येतात. Best Places To Visit In Summer In Maharashtra

Best Places To Visit In Summer In Maharashtra

पाचगणी हे पाच पठारांमध्ये वसलेलं एक सुंदर गाव आहे. ही पठारं आशिया खंडातील दुसऱ्या मोठ्या क्रमांकाची पठारं आहेत. पाचगणी गावासोबतच इथे आसपास फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

टेबल लँड पॉईंट, सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, मॅप्रो गार्डन, राजापुरी लेणी, देवराई आर्ट व्हिलेज, चीज फॅक्टरी, कमळगड किल्ला, धोम धरण , कास पठार, महाबळेश्वर यासह अनेक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणे इथे बघायला मिळतात.

 

३)लोणावळा Lonavala

पुण्या मुंबईपासून जवळ असल्यामुळे लोणावळा हे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय असे थंड हवेचे ठिकाण आहे. तेथील उंचच उंच डोंगर दऱ्या, उंच धबधबे आणि गडकिल्यांमुळे ते पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. लोणावळा हे ठिकाण पुणे मुंबई महामार्गावरच असल्याने इथं पोहोचणं खूप सोपं आहे. तसेच इथे सर्व सुविधा असलेले हॉटेल्स, रिसोर्ट्स सहज उपलब्ध होतात. WaterPark, adventure पार्क, मेणाच्या पुतळ्यांचे प्रसिद्ध संग्रहालय या आणि अशा अनेक गोष्टी लोणावळ्यात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आहेत.

Best Places To Visit In Summer In Maharashtra

 

लोणावळ्यात टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, मंकी पॉइंट, भुशी धरण, तुंगार्ली तलाव, ड्युक्स नोज, खंडाळा घाट अशी प्रसिद्ध ठिकाणे असुन त्यांना भेट देऊन सुट्टीचा मनमुराद आनंद घेता येतो. इथून जवळच असलेले पवना धरण देखील प्रसिद्ध असुन तिथे धरणाच्या बाजूला कॅम्पिंग सुविधा देखील आहेत. तसेच जवळच असलेल्या कामशेत इथे असलेल्या पॅराग्लायडिंगचा देखील आनंद घेता येतो.

लोणावळ्यात असलेल्या निसर्गरम्य वातावरणासोबतच इथली चिक्की देखील खूप प्रसिद्ध आहे. लोणावळ्यातील विविध दुकानांतून विविध चवींच्या चिक्की खरेदी करू शकता. Best Places To Visit In Summer In Maharashtra

लोणावळ्याजवळ असलेले गडकिल्ले/लेण्या- कोरीगड, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ला, राजमाची किल्ला या सोप्या श्रेणीतील किल्ल्यांवर पर्यटक एका दिवसात फिरून येऊ शकतात. तसेच कार्ला, भाजे, बेडसे या इथून जवळ असलेल्या प्रसिद्ध लेण्या आहेत.

कसे जाल? How To Reach Lonavala?

पुण्यापासून लोणावळा ६० किमी अंतरावर असुन पुणे ते लोणावळा अशी लोकल ट्रेन उपलब्ध आहे. तसेच मुंबईला जाणाऱ्या कुठल्याही ट्रेनने आपण लोणावळ्यात उतरू शकतो. पुणे मुंबई महामार्गावर असल्याने लोणावळा इथे खाजगी गाडीने देखील सहज पोहोचता येते.

 

४)माथेरान Matheran

पुणे व मुंबईपासून माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जवळ असुन पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. माथेरानचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे आशिया खंडातील एकमेव हिल स्टेशन आहे जिथे कुठल्याही वाहनांना प्रवेश नाही. माथेरानला भेट देण्यासाठी पर्यटक माथेरानपर्यंत खाजगी वाहनाने जाऊ शकतात पण तिथुन पुढे माथेरान शहरात फिरण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या सायकल, घोडागाडी, ई रिक्षा अशा प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर करावा लागतो. वाहनांना प्रवेश नसल्यामुळे माथेरान हे प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ व सुंदर असे हिल स्टेशन आहे. Best Places To Visit In Summer In Maharashtra

Best Places To Visit In Summer In Maharashtra

माथेरानमधील प्रसिद्ध ठिकाणे-  

माथेरानमध्ये लुईसा पॉइंट, शार्लोट लेक, माथेरान लॉर्ड पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट,  इको पॉइंट, सनसेट पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, हनिमून हिल पॉइंट, माथेरान मार्केट, खंडाळा पॉइंट, आणि किंग जॉर्ज पॉइंट ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.  तसेच इथे प्रसिद्ध शिवसंग्रहालय देखील आहे.

माथेरानच्या जवळच ट्रेकिंगसाठी पेबचा विकटगड हा किल्ला एक उत्तम पर्याय आहे. माथेरानमधील टॉय ट्रेन हे पर्यटकांचं नेहमीच एक खास आकर्षण राहिलं आहे. डोंगरातून फिरणारी ही टॉय ट्रेन पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणांचे सुंदर दर्शन घडवते.

माथेरानला कसे जाल? How To Reach Matheran?

नेरळ हे माथेरानच्या पायथ्याशी असलेले रेल्वे स्टेशन आहे. मुंबई तसेच पुण्यावरून नेरळला पोहोचून तिथुन माथेरानला जाता येते.

हे देखील वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

 

५)चिखलदरा Chikhaldara

चिखलदरा हे विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात असलेले सातपुडा पर्वतरांगेतील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भातील हे एकमेव पर्यटनस्थळ तिथल्या थंड वातावरणामुळे तसेच जवळ असलेला मेळघाट व्याघ्रप्रकल्प यामुळे खास प्रसिद्ध आहे. सन १८२३ साली एका ब्रिटीश अधिकाऱ्याने चिखलदऱ्याचा शोध लावला होता. मेळघाट व्याघ्रप्रकल्प जवळच असल्याने इथे वाघासह इतर अनेक जंगली प्राण्यांचे दर्शन होते. पावसाळ्यात या भागात अनेक मोठेमोठे धबधबे कोसळू लागतात. त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. उन्हाळ्यात देखील हा भाग चांगलाच थंड राहत असल्याने उन्हाळी सुट्टीसाठी हे एक चांगले ठिकाण आहे.

Best Places To Visit In Summer In Maharashtra

महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन चिखलदरा इथे होते. इथे फिरण्यासाठी विविध ठिकाणे असुन लहान मुलांसाठी छोट्या रेल्वेची देखील सोय आहे. जवळ बहामनी आणि गाविलगड हे किल्ले देखील आहेत.

चिखलदरा इथे राहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असुन MTDC चे रिसॉर्ट देखील आहे. तसेच अनेक हॉटेल्सची देखील सोय आहे.

चिखलदऱ्याला कसे जाल? How To Reach Chikhaldara?

अमरावती इथून चिखलदरा ९० किमी अंतरावर आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या तसेच खाजगी गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. ट्रेनने जायचे असल्यास मुंबई कोलकाता मार्गावर बडनेरा हे रेल्वे स्टेशन आहे. तिथुन अमरावती आणि त्यापुढे चिखलदरा असा प्रवास करता येतो. नागपूर हे येथील जवळचे विमानतळ आहे. Best Places To Visit In Summer In Maharashtra

पुणे ते चिखलदरा अंतर- ६९० किमी

 

६)आंबोली Amboli

आंबोली हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि तेथील थंड वातावरणासाठी ओळखले जाते. येथील हिरण्यकेशी मंदिर, आंबोली फॉल्स, आणि निसर्गरम्य वातावरण ही ठिकाणे प्रसिद्ध असुन पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आंबोली हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. आंबोली इथे असणारे घनदाट जंगल हे तिथल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असुन पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यायोग्य आहे. यासोबतच उन्हाळ्यात देखील इथले वातावरण आल्हाददायक आणि थंड असते.

Best Places To Visit In Summer In Maharashtra

पुण्यापासून आंबोली ३५० किमी अंतरावर आहे.

Best Places To Visit In Summer In Maharashtra

 

७)इगतपुरी, नाशिक Igatpuri, Nashik

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण मुंबई पासुन जवळ असल्याने पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. अनेक डोंगरदऱ्यांच्या आणि गडकिल्ल्यांच्या सानिध्यात असलेल्या इगतपुरीला पर्यटक खासकरून पावसाळा आणि हिवाळ्यात भेट देतात. परंतु हे ठिकाण उन्हाळ्यात देखील भेट देण्यासारखे आहे. इथे जवळच असलेल्या माळशेज घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देखील पर्यटक भेट देतात.

इगतपुरीला कसे जाल? How to reach Igatpuri?

मुंबईहून इगतपुरीला जाण्यासाठी ट्रेन हा सोपा पर्याय आहे. ट्रेनने जायला मुंबईहून तीन तास लागतात. तर पुण्याहून जायचे असल्यास कल्याणला जाऊन तिथुन ट्रेनने जाता येईल.

पुणे ते इगतपुरी अंतर-२४० किमी

Best Places To Visit In Summer In Maharashtra

मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली?? आवडली असेल तर आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पाठवा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा प्लान बनवा. आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मिळवा आमच्या नवनवीन पोस्ट्स तसेच भटकंतीच्या जगातील अशाच नवनव्या माहितीचा खजिना, तेही आपल्या मोबाईलवर.