Best Places To Visit In Nashik नाशिकमध्ये ही आहेत भारी ठिकाणं

नाशिकमध्ये ही आहेत भारी ठिकाणं Best Places To Visit In Nashik

नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याच्या खुणा असलेली ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे इथे बघायला मिळतात. यासोबतच शहराची औद्योगिक शहर अशी देखील ओळख आहे. प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम सुद्धा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन होतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर शिव मंदिर नाशिक येथेच आहे.

मागील काही वर्षात नाशिकने औद्योगिक क्षेत्रात चांगलीच आघाडी मारली आहे. द्राक्षांच्या उत्पादनासोबतच वाईन उद्योगामध्ये नाशिक अग्रेसर आहे. Best Places To Visit In Nashik 

यासोबतच नाशिकमध्ये पर्यटनाच्या बाजुने देखील खूप सारी अशी पर्यटनस्थळे आहेत जी पर्यटकांनी नक्कीच पाहायला हवीत. ऐतिहासिक मंदिरे, नदी, गड किल्ले इत्यादी पर्यटनस्थळे नाशिक शहरात आणि जिल्ह्यात बघायला मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त आणि सुंदर किल्ले नाशिक जिल्ह्यात बघायला मिळतात.

WhatsApp Group Join Now

आज आपण नाशिक मधील त्या पर्यटनस्थळांची माहिती घेणार आहोत, जी प्रत्येकाने नाशिक भेटीत बघायलाच हवीत.

 

Tourist Places Of Nashik

 

१)श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Trimbakeshwar Temple

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर अत्यंत पवित्र आणि धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे. देशभरासह परदेशातूनही भाविक इथे दर्शन घ्यायला येतात. नाशिकपासून २८ किमी अंतरावर असलेले हे मंदिर नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून ४० किमी अंतरावर आहे. सध्या असलेले मंदिर हे सन १७४० ते १७६० या काळात तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले होते. भारतातील सर्वात मोठी नदी असलेली गोदावरी इथेच उगम पावते.

Best Places To Visit In Nashik 

भगवान शिव याठिकाणी प्रकाशस्तंभाच्या रुपात प्रकट झाले होते असे मानले जाते. नाशिकचा कुंभमेळा या मंदिराच्या भोवतीच भरतो. मंदिराच्या आसपासचे रम्य वातावरण भाविकांसह पर्यटकांना मोहात पाडते. वर्षाचे बाराही महिने इथे भाविक येत असले तरी महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

 

 २)कुशावर्त तिर्थ Kushawart Teerth

कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी असुन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून जवळच वसलेले आहे. हे पवित्र कुंड १७५० साली बांधण्यात आले होते.

Best Places To Visit In Nashik 

गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरून लुप्त होते आणि याठिकाणी कुंडात प्रकट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. कुशावर्त तीर्थात स्नान करून त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्याची जुनी प्रथा असुन भाविक ती आजही पाळतात.

कुंडात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत. कुंडात उतरण्यासाठी चारही बाजुंनी दगडी पायऱ्या आहेत. कुंडाच्या बाजूला काही छोटी मोठी मंदिरे बघायला मिळतात. गौतम ऋषींनी इथे गंगेला अडवले होते अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

 

३)रामकुंड Ramkund

गोदावरी नदीच्या पत्रात असलेले रामकुंड हे ठिकाण नाशिक नाशिक बसस्थानकापासुन २ किमी अंतरावर आहे. या कुंडात प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना स्नान केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कुंडाला पवित्र मानले जाते. या कुंडाच्या जवळच अस्थीविलय तीर्थ असुन अनेक लोक तिथे आपल्या नातेवाईकांच्या अस्थींचे विसर्जन करतात. महात्मा गांधी, नेहरु, इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या अस्थी याठिकाणी विसर्जित करण्यात आल्या आहेत.

Best Places To Visit In Nashik 

रामकुंडाचे बांधकाम १६९६ साली करण्यात आले तर त्यानंतर पेशव्यांच्या काळात त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.

नाशिकला आलेले पर्यटक इथे आवर्जून भेट देण्यासाठी येतात. Best Places To Visit In Nashik 

४)पंचवटी Panchwati

नाशिक शहरामध्ये मध्यभागी पंचवटी हा परीसर गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. याठिकाणीच सुप्रसिद्ध काळाराम मंदीर आहे. मंदिराजवळ पाच वादाची झाडे आहेत. पाच वटवृक्षांचा समूह असल्याने या परिसराला पंचवटी या नावाने संबोधले जाते.

Best Places To Visit In Nashik 

पंचवटी परिसरात आपल्याला खूप सारी मंदिरे बघायला मिळतात. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काट्यामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक यासह अनेक मंदिरे पंचवटी व आसपासच्या भागामध्ये बघायला मिळतात. यामुळेच नाशिकला ‘पश्चिम भारताची काशी’ असे म्हटले जाते. Best Places To Visit In Nashik 

 

५)पांडव लेणी Pandav Leni Caves

नाशिक शहरापासून ५ किमी अंतरावर एका मोठ्या टेकडीवर पांडवलेण्या आहेत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या असलेल्या ह्या लेण्या खूप सुंदर असुन इतिहासाच्या साक्षीदार आहेत. या प्राचीन लेण्या नाशिकमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असुन पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. लेण्यांमध्ये पाली भाषेतील एक शिलालेख आहे ज्यावरून या लेण्या २००० वर्षांपूर्वीच्या असल्याचे समजते. या लेण्यांमध्ये २४ मुख्य लेण्या असुन बुद्ध्स्तूप तसेच बौद्ध भिक्षूंची निवासस्थाने यासोबतच देवीदेवतांच्या मुर्त्या आढळतात. या लेणीमधील काही मुर्त्या खंडित झाल्या असल्या तरी काही अजुन चांगल्या अवस्थेत असलेल्या बघायला मिळतात.

Best Places To Visit In Nashik 

 

हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

 

 ६)श्री सोमेश्वर मंदीर Someshwar Temple

श्री सोमेश्वर हे महादेवाचे मंदिर नाशिक ते गंगापूर रस्त्यावर ८ किमी च्या अंतरावर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य वातावरणात असुन इथे नदीमध्ये बोटिंग देखील करता येते. या ठिकाणी चित्रपटाच्या शुटींग देखील होतात. इथे महादेव आणि हनुमानाची मूर्ती आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

Best Places To Visit In Nashik 

 

७)सुला वाईन यार्ड Sula Wine Yard

नाशिक शहर हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. इथे मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन होते. सन १९९९ साली राजीव सामंत यांनी नाशिकच्या भागात सुला वाईन यार्ड या वाईनच्या कंपनीची सुरुवात केली. तेव्हापासून इथे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले. सुला वाईन यार्ड हे नाशिक शहरापासून १२ किमी अंतरावर आहे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सुला वाईन यार्ड हा भारतातील आघाडीचा वाईन निर्मिती ब्रँड आहे. नाशिकच्या डोंगराळ भागात गंगापूर धरणाच्या काठावर ही कंपनी वसलेली आहे. Best Places To Visit In Nashik 

Best Places To Visit In Nashik 

पर्यटनाच्या बाजुने विचार करता कंपनीने पर्यटकांसाठी कंपनीचा परिसर खुला केला आहे. यामध्ये पर्यटक द्राक्ष भागांमध्ये फिरू शकतात. तसेच विविध प्रकारच्या आणि चवीच्या वाईनची चव चाखू शकतात. कुटुंबासोबत फिरण्यासाठी देखील हा परिसर उत्तम पर्याय आहे. Best Places To Visit In Nashik 

इथे रेस्टॉरंट देखील आहे. तसेच हा भारतातील पहिला वायनरी रिसॉर्ट आहे जिथे पर्यटक राहू देखील शकतात.

 

८)श्री सप्तश्रृंगी गड Saptshrungi Temple

श्री सप्तश्रृंगी गड हे ठिकाण नाशिक पासुन  ६० किमी अंतरावर कळवण तालुक्यात आहे. सप्तश्रृंगी देवीचे मंदिर ७ शिखरांनी वेढलेले असुन ते समुद्रसपाटीपासुन ४६५९ फुट उंचावर आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. देवीची मूर्ती ८ फुट उंचीची असुन पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला १८ हात असुन हातांमध्ये विविध शस्त्रे कोरलेली आहेत.

Best Places To Visit In Nashik 

सात शिखरे असल्याने गडाला सप्तश्रुंगी असे संबोधले जाते. शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळुन येतात.

गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्रय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पूर्वेला खोल दरीने विभागला गेलेला ‘मार्कंडेय डोंगर’ आहे. या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते असे मानले जाते. या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली होती. चैत्र तसेच आश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.

 

९)मांगी तुंगी Mangi Tungi

 मांगी तुंगी मंदीर नाशिक पासुन १२५ किमी अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासुन चार हजार फुट उंचीवर ही शिखरे असुन ते एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. Best Places To Visit In Nashik 

Best Places To Visit In Nashik 

मांगी

मांगी हे शिखर जास्त उंचावर नसले तरी येथे निष्णात गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव आदिंच्या ३५६ कोरीव मुर्त्या आहेत. इथल्या गुफांमध्ये कोरीव काम केलेले आढळते. या ठिकाणी ‘मांगीगिरी मंदीर’ आहे.

तुंगी

तुंगी शिखर हे मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला भाविक प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुफा असुन एका गुफेत ‘तुंगीगिरी मंदीर’ आहे. इथे भगवान बुध्दांच्या ९९ कोरीव मुर्त्या आढळुन येतात.

 

१०)गोंदेश्वर मंदिर Gondeshwar Temple

हेमांडपंथी शैलीचे असलेले गोंदेश्वर हे प्रसिद्ध मंदिर नाशिक शहरापासून ४० किमी अंतरावर सिन्नर जवळ स्थित आहे. भगवान महादेवाचे असलेले हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर सध्या चांगल्या स्थितीत असुन पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी येतात.

Best Places To Visit In Nashik 

Best Places To Visit In Nashik 

 

११)काळाराम मंदिर kalaram Temple

काळाराम मंदीर हे प्रभू श्रीरामाचे मंदिर सन १७८२ साली सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते असे मानले जाते.

Best Places To Visit In Nashik 

या मंदिराच्या बांधकामासाठी २००० कारागीर सतत १२ वर्षे राबत होते. पश्चिम भारतातील प्रभु श्रीरामांच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे. मंदिराच्या सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. तर मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील २ फुट उंचीच्या मुर्त्या आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो.

Best Places To Visit In Nashik 

हेही वाचा- Sandhan Valley Dari Information In Marathi सांधण दरी- नगर जिल्ह्यातील एक अद्भुत आश्चर्य जे आहे जगभरात प्रसिद्ध