कोल्हापूरातील प्रसिद्ध ठिकाणे Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूरातील प्रसिद्ध ठिकाणे Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेला एक जिल्हा आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेले कोल्हापूर हे प्राचीन शहर असुन पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. कोल्हापूरची रांगड्या मातीतली माणसं, तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला, कोल्हापुरी चप्पल आणि खास शैलीत बोलली जाणारी कोल्हापुरी भाषा यासोबतच अनेक खास कारणांसाठी कोल्हापूर महाराष्ट्रासोबतच देशभरात प्रसिद्ध आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी इथूनच सुरुवात केली होती.

सर्वांच्या कायमच औत्सुक्याचा विषय राहिलेले कोल्हापुर आणि तिथले पर्यटन याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

 

WhatsApp Group Join Now

Famous Travel Places Of Kolhapur

 

१)महालक्ष्मी मंदिर Mahalakshmi Ambabai Mandir

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे एक महत्वाचे शक्तीपीठ असुन महाराष्ट्राची ‘दक्षिण काशी’ म्हणुनही ओळखले जाते. हे मंदिर कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण आहे. मंदिराच्या वास्तुशास्त्राला कर्नाटकातील चालुक्य साम्राज्याचा वारसा आहे. मंदिर हे सातव्या शतकात बांधले गेले असुन त्यानंतर त्याचे अनेकदा नुतनीकरण झाले आहे. महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असुन दरवर्षी लाखो भाविक इथे भेट देतात.

फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात इथे होणाऱ्या वार्षिक रथोत्सवाला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसेच नवरात्राच्या काळात इथे विशेष समारंभ आणि प्रार्थना होतात. Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- ३ किमी

 

२)रंकाळा तलाव Rankala Talav

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

हिरवाईने वेढलेला रंकाळा तलाव हे कोल्हापुरातील एक आकर्षक ठिकाण असुन पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. अडीच चौ.किमी क्षेत्रात पसरलेल्या या तलावाच्या बाजूला बागा, मंदिरे आदि ठिकाणे आहेत. तलावात नौकाविहाराची देखील सोय आहे. तलावाच्या काठाने अनेक स्वादिष्ट लोकल पदार्थांचे स्टॉल्स आहेत. कौटुंबिक सहलीसाठी हे एक योग्य ठिकाण आहे. या तलावाच्या मध्यभागी एक मंदिर आहे आणि त्याच्या भोवताली उद्यान आहे. संध्याकाळच्या वेळी इथे नागरिक व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी येतात.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- ४ किमी

 

३)पन्हाळा किल्ला Panhala Killa

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळा किल्ला हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्त्वाचा किल्ला होता. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत येणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासुन ४०० मीटर उंचीवर आहे. शिवाजी महाराजांच्या काळात पन्हाळा किल्ला हा युद्धकलेच्या दृष्टीने महत्वाचा किल्ला होता. किल्ल्याच्या आत अनेक इमारती, तलाव आणि गुप्त मार्ग आहेत. येथून आजूबाजूच्या परिसराचे नयनरम्य दृश्य दिसते. पावसाळ्यात येथे भेट देणे विशेष आनंददायी असते.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- २२ किमी

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

 

४)कन्हेरी मठ Kanheri Math

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कान्हेरी मठ हे कोल्हापूरमधील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असुन कोल्हापूरपासुन १२ किमी अंतरावर आहे. गावात सिद्धगिरी नावाचे एक वस्तूसंग्रहालय आहे. आहे. या संग्रहालयात प्राचीन ऋषीमुनींचे पुतळे आणि त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. यासोबतच गुहेच्या बाहेर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिकृती तसेच गाई म्हशी या जनावरांसोबतच ग्रामीण जीवनाचे सुंदर देखावे उभे केलेले दिसतात. येथे एक मोठा प्रार्थना मंडप आहे आणि येथे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मठाच्या आसपासचे वातावरण शांत आणि धार्मिक आहे.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- १४ किमी

 

५)शालिनी पॅलेस Shalini Palace

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

शालिनी पॅलेस हा कोल्हापूरमधील एक भव्य राजवाडा आहे. सन १९३१ साली या भव्य राजवाड्याला राजकुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आले. हा राजवाडा रंकाळा तलावाच्या पश्चिमेला असुन उंच पाम वृक्षांनी तसेच हिरव्यागार बागांनी घेरलेला आहे. हा राजवाडा काळ्या पाषाण तसेच इटालियन मार्बल पासुन बनवला गेला आहे. हे पॅलेस कोल्हापूरच्या छत्रपतींचे निवासस्थान होते. येथील वास्तुकला आणि सजावट अत्यंत आकर्षक आहे. १९८७ सालापासून ते २०१४ पर्यंत या राजवाड्यात हॉटेल चालवले जात होते. नंतर ते बंद करण्यात आले. आता ही इमारत कोल्हापूर नगरपालिकेच्या अंतर्गत येते. हा राजवाडा पर्यटकांसाठी खुला आहे.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- ५ किमी

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

 

६)ज्योतिबा मंदिर Jyotiba Mandir

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूरच्या वायव्येला ज्योतिबाचा डोंगर असुन डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतीबाला केदारेश्वर किंवा केदारलिंग या नावानेही ओळखले जाते. या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी या नावाने ओळखले जाते.

इथले मंदिर हेमांडपंथी शैलीचे असुन मराठा वास्तूशैलीचा प्रभाव त्यावर दिसुन येतो. मंदिराच्या बांधकामाला काळ्या बसाल्ट दगडांचा वापर केला गेला आहे.

चैत्री पौर्णिमेला मंदिरात भव्य यात्रा भरते. महाराष्ट्रासह कर्नाटकातून इथे लाखो भाविक येतात. याकाळात इथे मोठा उत्सव साजरा होतो. मंदिराच्या आसपासचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- १८ किमी

 

७)शाहू पॅलेस Shahu Palace/ New Palace

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

शाहू पॅलेस हा कोल्हापुरातील भव्य राजवाडा असुन कोल्हापूरसह महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी एक संग्रहालय आहे जिथे छत्रपतींच्या काळातील अनेक वस्तूंचे जतन करून ठेवण्यात आले आहे. शाहू पॅलेसलाच ‘न्यू पॅलेस’ या नावाने देखील ओळखले जाते. सन १८७७ ते १८८४ दरम्यान बांधल्या गेलेल्या या राजवाड्याचे बांधकाम करवीर संस्थानाचे चौथे राजे छ. शिवाजी राजे यांच्या कालखंडात झाले. ब्रिटिश वास्तूशिल्पकार चार्ल्स मान यांनी या वास्तूची रचना केली होती. या वास्तूत युरोपियन आणि भारतीय वास्तुशास्त्राचे मिश्रण आढळते. आणि वास्तूशिल्पकलेचा तो एक उत्तम नमुना आहे.

राजवाड्यात संग्रहालय, राजवाड्याबाहेर बाग आणि प्राणीसंग्रहालय बघायला मिळते. राजवाड्याच्या आजुबाजूचे वातावरण अतिशय निसर्गरम्य असुन पर्यटकांना सुखावणारे आहे. शाहू महाराजांच्या आयुष्यातील बऱ्याच घटनांचा हा राजवाडा साक्षीदार आहे.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- ३ किमी

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

हेही वाचा-Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट या हिंदू मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी 2024

 

८)खासबाग मैदान Khasbag Maidan

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूर हे कुस्ती, मल्लविद्येसाठी प्रसिद्ध आहे हे आपण जाणतोच. देशाला अनेक चांगले चांगले मल्ल कोल्हापूरच्या मातीने दिलेले आहेत. छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या अनेक महत्वाच्या योगदानांपैकी एक महत्वाचे योगदान म्हणजे खासबाग मैदान. शाहू महाराजांनी १९०२ साली इंग्लंड आणि युरोपातील देशांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तिकडे असलेल्या प्रचंड भव्य कुस्त्यांचे आखाडे बघून ते भारावून गेले. आणि असाच आखाडा आपल्या मातीत बांधायचा निर्णय घेतला. १९१२ साली कोल्हापुरात हा आखाडा बांधायचे काम पूर्ण झाले होते.

वर्तुळाकार असलेल्या या मैदानात सर्व सुविधा असुन २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीत बसू शकतात.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- ३ किमी

 

९)भवानी मंडप Bhavani Mandap

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

भवानी मंडप हे कोल्हापूरमधील एक ऐतिहासिक आणि आकर्षक पर्यटनस्थळ आहे. हा मंडप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला होता. अनेक पर्यटक, भाविक महालक्ष्मीच्या दर्शनानंतर इथे भेट देतात. मंडपाची इमारत दोन मजली असुन मध्यभागी एक दिवाणखाना आणि पटांगणात सहा चौक आहेत. यातल्या भवानी चौकात आई भवानीची प्रतिष्ठापना केली आहे. गाभाऱ्यात शिवाजी महाराजांच्या हाताचे चांदीचे ठसे आहेत. तसेच चौकामध्ये शाहू महाराजांचा लाकडी पुतळा असुन प्राण्यांचे प्रदर्शन देखील आहे. Best Places To Visit In Kolhapur In Marathi

नवरात्रात इथे महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. येथे अनेक ऐतिहासिक कलाकृती आणि शिलालेख आहेत, जे कोल्हापूरच्या इतिहासाची ओळख करून देतात.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- ३ किमी

 

१०)टाऊन हॉल संग्रहालय Town Hall Sangrahalay

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली टाऊन हॉल संग्रहालयाची इमारत सन १८७२ ते १८७६ या दरम्यान बांधण्यात आली. ही इमारत गोथेक या पद्धतीने बांधण्यात आली होती. प्रवेशद्वारात दोन दगडी हत्ती आणि एक मोठी तोफ आहे. प्रवेशद्वार लाकडी असुन आत भव्य असे सभागृह आहे. सभागृहाच्या बाजूला दोन खोल्या असुन वरच्या बाजूला गच्ची आहे. सभागृहात ५०० माणसे बसतील एवढी व्यवस्था आहे.

संग्रहालयाच्या बाजूला महादेव मंदिर असुन समोर शिवाजी महाराजांची सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आहे. ब्रम्हपुरी इथल्या उत्खननात सापडलेल्या अनेक पुरातन मूर्ती, भव्य भित्तीचित्रे, कलात्मक वस्तू, प्राचीन नाणी, बंदुका, तलवारी आणि अनेक ऐतिहासिक वस्तू इथे बघायला मिळतात.

कोल्हापूर बस स्थानकापासून अंतर- २ किमी

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

 

या मुख्य ठिकाणांसोबतच कोल्हापुरात अनेक प्रसिद्ध मंदिरे, संग्रहालये आहेत. जी कोल्हापूर भेटीत नक्की पाहायला पाहिजेत.

संग्रहालये- Museums Of Kolhapur

छत्रपती शहाजी वस्तूसंग्रहालय, शाहू जन्मस्थळ आणि संग्रहालय, पंतप्रतिनिधी बावडेकर संग्रहालय, चंद्रकांत मांडरे कलादालन, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर कलादालन, वि.स. खांडेकर स्मृतीदालन

 

पर्यटनस्थळे- Travel Destinations Of Kolhapur

विशालगड, पन्हाळगड, पावनखिंड आदि किल्ले आणि पर्यटनस्थळे आणि सोबतच दाजीपुर अभयारण्य, राधानगरी धरण आदि पर्यटनस्थळे आहेत. जी नक्कीच पाहण्याजोगी आहेत.

Best Places To Visit In Kolhapur In Marathi

कोल्हापूर हे एक बहुआयामी पर्यटनस्थळ आहे, जेथे धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण आहे. येथील प्रत्येक स्थळाचा स्वतःचा एक वेगळा इतिहास आणि महत्त्व आहे. कोल्हापूरला भेट देणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती आणि इतिहासाचा साक्षात्कार घेण्यासारखे आहे.

 

हेही वाचा-Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi महाबळेश्वर मधील प्रसिद्ध ठिकाणे

 

ही माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या मित्रांना लिंक पाठवा. आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मिळवा ताजे अपडेट्स…..