गोव्यातील प्रसिद्ध ठिकाणे Best Places To Visit Goa In Marathi. Best Beaches Of Goa In Marathi
भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून गोव्याची ओळख आहे. जरी हे इतर राज्यांपेक्षा छोटी असले तरी पर्यटनाच्या बाबतीत ते देशात अव्वल स्थानी आहे. पर्यटनासाठी तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात पसंती गोव्याला मिळते. भारतासह परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्याला भेट देतात.
आज आपण गोव्यातील प्रसिद्ध आणि काही अनवट ठिकाणांबद्दल माहिती घेणार आहोत. हिवाळा सुरू झाला आहे आणि गोव्याला जाण्यासाठी बऱ्याच जणांचं नियोजन सुरू झालं असेल. तर अशा लोकांना ही माहिती उपयोगी पडेल अशी आशा आहे.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे गोव्याचे दोन भाग पडतात. जर तुम्हाला पार्ट्या पब आणि फुल धमाल मस्ती करायची असेल तर उत्तर गोवा (North Goa) हे आपल्यासाठी उत्तम ठिकाण आहे. उत्तर गोव्यामधील बऱ्याच बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि जर तुम्हाला शांतता अनुभवायची असेल आणि गोव्याची दुसरी आणि सुंदर बाजू बघायची असेल तर दक्षिण गोवा (South Goa) फिरणं हा उत्तम पर्याय आहे.
Best Places To Visit Goa In Marathi
उत्तर गोव्यातील प्रसिद्ध ठिकाणे Best Places To Visit In North Goa In Marathi. Tourist Attractions Of Goa In Marathi
१) कलंगुट बीच Calangute Beach
खूप सुंदर आणि स्वच्छ अशा या समुद्रकिनाऱ्यावर भारतासोबतच परदेशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणावर भेट देतात. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला खूप सारे हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकान आहेत. या किनाऱ्यावर आपण पाण्यातील अनेक साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. वॉटर बोटिंग वॉटर पॅराग्लायडिंग अशा अनेक खेळांचा इथे आनंद घेता येईल. सायंकाळी कलंगुट मार्केटमध्ये आपण तिथल्या स्थानिक पदार्थ आणि खरेदीचा आनंद घेऊ शकता. तसेच इथे डिस्को आणि पब मध्ये जाऊन आपण धमाल करू शकता.
२) बागा बीच Baga Beach
बागा बीच गोव्यातील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. इथे असणाऱ्या निळ्याशार पाण्यासोबतच हा किनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. समोर अथांग समुद्र आणि मागे टेकडी असा सुंदर नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. फोटोशूट साठी हा उत्तम समुद्रकिनारा आहे. येथे देखील किनाऱ्यावर हॉटेल्स असून आपण तिथे जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. आपण किनाऱ्यावरील खुर्च्यांवर झोपून समुद्र बघू शकता किंवा पाण्यातील साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.
३) अंजुना बीच Anjuna Beach
हा समुद्रकिनारा उत्तर गोव्यातील एक प्रसिद्ध किनारा आहे. इतर किनाऱ्यांप्रमाणे इथेदेखील पाण्यातील साहसी खेळांचा आनंद घेता येतो. हा किनारा लांबीने कमी असून सीझनमध्ये तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
४)कॅंडोलिम बीच Candolim Beach
हा देखील एक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा असून आपण इथे देखील भेट देऊ शकता. हा किनारा लांब असून तेथील शांत वातावरणामुळे ओळखला जातो. हनिमून कपल्स मध्ये हा बीच प्रसिद्ध आहे.
५) वेगेटर बीच Vegator Beach
हा किनारा देखील गोव्यातील प्रसिद्ध किनाऱ्यांपैकी एक आहे. इथल्या पांढऱ्याशुभ्र वाळूसाठी व स्वच्छतेसाठी हा किनारा ओळखला जातो.
Best Places To Visit Goa In Marathi
६) अगोडा किल्ला Aguada Beach
कॅंडोलिम बीच पासून हा किल्ला चार किलोमीटर अंतरावर आहे. सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला खूप सुंदर आहे. किल्ल्यावरून पुढील समुद्राचा नजारा आणि सायंकाळी सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासाठी इथे पर्यटक गर्दी करतात.
दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध ठिकाणे BestPlaces To Visit In South Goa In Marathi
गोव्याचा दक्षिण भाग हा तेथील शांततेसाठी आणि सुंदर व कमी वर्दळीच्या ठिकाणांसाठी ओळखला जातो. अनेक पर्यटकांना तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्याला भेट देणं आवडतं.
१) कोला बीच Cola Beach
कोला बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. कोला बीच ला भेट देणं तिथे असणाऱ्या खराब रस्त्यामुळे थोडसं आव्हानात्मक आहे. बाहेर गाड्या पार्क करून आपण 20 ते 30 मिनिटे चालत जाऊन बीचवर पोहोचू शकता. किंवा खराब रस्त्यावर गाड्या चालून आपण किनाऱ्यावर जाऊ शकता. इथे बऱ्या प्रमाणात कमी गर्दी असते. या किनाऱ्यावर आपण कयाकिंग चा आनंद घेऊ शकता. किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नारळाची झाड असून तिथे निसर्गरम्य वातावरण आहे. अत्यंत कमी वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी कमी हॉटेल्स आणि खाण्यापिण्याचे पर्याय आहेत. आपण आपल्या सोबत खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊन जाऊ शकता.
Best Places To Visit Goa In Marathi
२) काबो दे रामा बीच Cabo De Rama Beach
अत्यंत कमी वर्दळ, आणि अनवट वाटेवर असणारा हा किनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. इथे सुंदर हॉटेल असून तिथल्या पदार्थांचा नक्की आनंद घ्या.
३) बटरफ्लाय बीच Butterfly Beach
या बीचवर आपण बोटीने किंवा ट्रेकिंग करत जाऊ शकता. समुद्रकिनारा अत्यंत छोटा असून इथला नजारा अतिशय स्वर्गीय असा आहे. इतर बीचेस वरून या ठिकाणी जायला बोटी मिळतात. या बीचवर कुठलेही हॉटेल वगैरे नसून आपण आपले खाद्यपदार्थ आणि पाणी सोबत घेऊन जावे.
४) नेत्रावली अभयारण्य Netrawali Wildlife Sanctuary
गोवा वन विभागातर्फे संरक्षित असलेलं नेत्रावली अभयारण्य हे एक सुंदर जंगल आहे. अभयारण्यात प्लास्टिक बंदी असून आपण आत मध्ये प्लास्टिक तसेच दारू घेऊन जाऊ शकत नाही. अभयारण्यात मैनापी धबधबा आणि सावरी धबधबा असे दोन सुंदर धबधबे आहेत. दोन्ही धबधब्यांना भेट देण्यासाठी आपल्याला जंगलातून ट्रेक करत जावं लागतं. अभयारण्य वनविभागातर्फे अतिशय सुंदर व्यवस्थापित आहे.
Best Places To Visit Goa In Marathi
५) बुडबुड तलाव Bubbling Beach
हे एक छोटे कुंड असून पाण्यातून निघणाऱ्या बुडबुड्यांमुळे तलावाला बुडबुड तलाव किंवा बबलिंग लेक असं नाव पडलं आहे. कुंडाच्या बाजूला गोपीनाथ मंदिर आहे.
६) गलगीबागा बीच Galgibaga Beach
हा किनारा गोव्यातील सर्वात स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक आहे. इथे कासवांची घरटी असल्यामुळे या किनाऱ्याला कासवांचा किनारा म्हणून देखील ओळखले जाते.
७) पालोलेम बीच Palolem Beach
दक्षिण गोव्यातील हा किनारा अतिशय सुंदर आणि स्वच्छ असून येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. पाण्यातील साहसी खेळांचा येथे आनंद घेता येतो. खरेदीसाठी हा भाग प्रसिद्ध असून पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी करतात.
८) दूधसागर धबधबा Dudhsagar Waterfall
भगवान महावीर अभयारण्यात असलेला दूध सागर धबधबा हा गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेजवळ आहे. दूध सागर धबधबा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. इथे भाड्याने मिळणाऱ्या जीपने प्रवास करत किंवा ट्रेक करत आपण दूधसागर पाशी पोहोचू शकता.
Best Places To Visit Goa In Marathi
गोव्यामध्ये राहायची सोय. गोव्यामध्ये कुठे राहाल?? Where To Stay In Goa? Hotels In Goa In Marathi
गोव्यामध्ये राहण्यासाठी आपल्या बजेटनुसार पुष्कळ पर्याय मिळून जातात. इथे आपल्याला पाचशे ते हजार रुपये पर्यंत हॉस्टेल्स मिळून जातात. तसेच दोन ते तीन हजार रुपये या बजेटमध्ये आपल्याला उत्तम पद्धतीचे हॉटेल, रिसॉर्ट किंवा व्हिला उपलब्ध होऊ शकतात. यासोबतच 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत आपल्याला महागड्या हॉटेलात राहायची सोय होऊ शकते.
गोव्यामध्ये काय काय खाल? प्रसिद्ध खाद्यपदार्थ Famous Food In Goa
गोव्यामध्ये जेवणासाठी आपल्याला दोनशे ते चारशे रुपये पर्यंत थाळी मिळून जाते. इथे आपण दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय अशा बरेच प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. तसेच आपण मांसाहारी असाल तर इथे मिळणाऱ्या सीफुड्सचा नक्की आस्वाद घ्या.
गोव्यामध्ये फिरण्यासाठी किती बजेट लागेल?? Budget Of Goa Trip In Marathi
जर आपण आपल्या बजेटमध्ये गोवा फिरणार असाल तर आपण नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने सोडून बाकीच्या महिन्यात गोव्याला भेट द्यावी. नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात येथे देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे अशावेळी येथे राहण्या खाण्याचे दर वाढलेले असतात. गोव्यामध्ये तीन दिवस राहण्यासाठी प्रति व्यक्ती कमीत कमी पाच हजार रुपये अशा बजेटमध्ये आपण गोव्याला भेट देऊ शकता. आणि आपण जर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणार असाल तर त्याचे पंधराशे ते दोन हजार रुपये असे वेगळे दर आपल्या बजेटमध्ये वाढू शकतात.
Rent Bike Car In Goa
गोव्यामध्ये फिरण्यासाठी आपल्याला तिथे मोटरसायकल आणि कार भाड्याने मिळतात. मोटरसायकल प्रति दिवस 400 ते 700 रुपये आणि कार प्रतिदिवस 1200 ते 2000 अशा दराने आपल्याला गाडी भाड्याने मिळते.
गोव्याला कसे पोहोचाल? How To Reach Goa In Marathi
विमानाने
विमानाने गोव्याला जायचे असल्यास वास्को-द-गामा विमानतळ हे दक्षिण गोव्यातील विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ आहे.
रेल्वेने
आपण जर रेल्वेने जाणार असाल तर थिविम रेल्वे स्टेशन हे उत्तर गोव्यामधील रेल्वे स्टेशन आहे. आणि मडगाव तसेच वास्को-द-गामा रेल्वे स्टेशन ही दक्षिण गोव्यातील रेल्वे स्थानकं आहेत.
तसेच आपण मोटर सायकल आणि स्वतःच्या कारणे देखील प्रवास करत गोव्याला पोहोचू शकता.
पुणे ते गोवा अंतर- ४४५ किमी
मुंबई ते गोवा अंतर-५९० किमी
Best Places To Visit Goa In Marathi
कधी निघताय मग गोव्याला? नेहमी रद्द होणाऱ्या प्लान्स मध्ये गोवा जरी एक नंबरला असलं तर यंदा गोव्याचा प्लान यशस्वी करूनच दाखवा. सारी माहिती दिली आहे. काही वेगळं लागलं तर गुगल आहेच. google Map लावा आणि गोवा गाठा. ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा आणि त्यांना गोवा प्लानची आठवण करून द्या.
हेही वाचा- महाबळेश्वर मधील प्रसिद्ध ठिकाणे