Beautiful Places Of India To Visit In Marathi भारतातील प्रमुख आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला एक विस्तृत देश आहे. संस्कृती, इतिहास, निसर्ग आणि लोकजीवन यांचं अनोखं मिश्रण असलेला भारत देश त्याच्या संस्कृतीसाठी साठी ओळखला जातो. भारतातील प्रत्येक राज्य व शहराला स्वतःची ओळख आहे जी त्या त्या प्रदेशाच्या भूगोल, इतिहास, लोकसंस्कृती व पारंपारिक जीवनशैलीवर आधारित आहे. भारत देश अनेक प्रकारच्या पर्यटन स्थळांनी परिपूर्ण आहे. ज्या पर्यटकांना भारताच्या सांस्कृतिक, भौगोलिक घटकांना अनुभवायचं आहे त्यांना भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी वेगळं आणि आकर्षक नक्कीच मिळून जाईल इतकं वैविध्य आपल्या देशात आहे.
आज आपण आपल्या भारतातील काही प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत जी भारतातल्या प्रत्येक पर्यटकांनी अवश्य पाहिली पाहिजेत. Beautiful Places Of India To Visit In Marathi
Famous Places Of India
१)दिल्ली Delhi
दिल्ली ही भारताची राजधानी असून सोबतच इतिहास आणि आधुनिकतेचा संगम असलेलं हे देशातील एक अत्यंत लोकप्रिय असे पर्यटन केंद्र आहे. दिल्लीमध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात. लाल किल्ला, कुतुब मिनार, इंडिया गेट व जामा मस्जिद अशी काही दिल्लीतील प्रमुख आकर्षण केंद्र आहेत. दिल्लीमध्ये चांदणी चौक आणि जनपथ मध्ये खरेदीसाठी अनेक पर्यटक भेट देतात. भारताची राजधानी असल्याने देशातील राजकीय घडामोडींचे दिल्ली हे प्रमुख केंद्र आहे.
२)आग्रा ताजमहाल Agra Tajmahal
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालामुळे आग्रा हे शहर देशात आणि जगात प्रसिद्ध लोक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पांढऱ्याशुभ्र संगमरावरी दगडांनी बांधलेला ताजमहाल त्याच्या भव्यता आणि आकर्षकतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. राजा शहाजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल ‘प्रेमाचे प्रतीक’ म्हणून ओळखला जातो.
३)जयपुर- राजस्थानची राजधानी आणि गुलाबी शहर Jaipur-Pink City, Rajsthan
‘पिंक सिटी’ अर्थात ‘गुलाबी शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर हे राजस्थान राज्याची राजधानी आहे आणि एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेलं आणि जपलेलं शहर आहे. व्यवस्थितरित्या जतन केलेले राजस्थानातील भव्य किल्ले पाहण्यासाठी अनेक देशी तसेच विदेशी पर्यटक येथे भेट देतात. आमेर किल्ला, हवा महल, सिटी पॅलेस आणि जंतर मंतर ही जयपुर आणि राजस्थान राज्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळं आहेत.
४)केरळ- देवाचा देश आणि निसर्गरम्य प्रदेश Kerala
‘ईश्वराचा स्वतःचा देश’ अशी खास ओळख असलेलं केरळ राज्य हे तिथल्या स्वर्गीय नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखले जाते. उंच उंच डोंगर रांगा आणि त्यात पसरलेल्या चहाच्या बागा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. केरळ राज्यातील मुन्नार आणि इतर हिल स्टेशनला भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे गर्दी करतात. केरळ हे राज्य तिथल्या आयुर्वेदिक उपचारांसाठी जगभर लोकप्रिय आहे. Beautiful Places Of India To Visit In Marathi
५)महाराष्ट्र- सह्याद्री, ऐतिहासिक गड किल्ले आणि संस्कृती Maharashtra, Historical Places Of India
सह्याद्रीचा प्रचंड मोठा नैसर्गिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात अनेक ऐतिहासिक गड किल्ले, लेण्या, वास्तू आणि मंदिरं बघायला मिळतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. बॉलीवूड हे भारतीय सिनेमाचं केंद्र मुंबईत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असून जगभरातून नागरिक येथे नोकरीसाठी आणि पर्यटनासाठी भेट देतात. रायगड, राजगड आणि इतर ऐतिहासिक गड किल्ले तसेच अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या, गेटवे ऑफ इंडिया ही महाराष्ट्रातील काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
६)गोवा- पर्यटनातील अव्वल राज्य Goa, Beach Beauty
भारतातील सर्वात छोटे राज्य असलेले गोवा राज्य तिथले समुद्रकिनारे, नैसर्गिक सुंदरता, चर्च, ऐतिहासिक किल्ले आणि जगभरातून येणारे पर्यटक यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. कॅंडोलीम बीच, बागा बीच व अंजना बीच हे सर्व लोकप्रिय समुद्रकिनारे गोव्यात असून जगभरातून पर्यटक येथे भेट देतात. गोव्यातील चर्च, किल्ले हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून पर्यटक तिथे हमखास भेट देतात. समुद्रकिनाऱ्यावर चालणाऱ्या जलक्रीडा, गोव्यातील नाईट लाईफ, कॅसिनो, बार आणि आधुनिक जीवनशैली यासाठी गोवा प्रसिद्ध आहे.
७)लडाख- जगातले सर्वात उंचावरचे पर्यटन स्थळ Ladakh
लडाख हे हिमालयात वसलेलं सर्वात उंचावरचं एक आकर्षक ठिकाण आहे. लांबच लांब पसरलेल्या पर्वतरांगा आणि तिथल्या सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी लडाख जगभर प्रसिद्ध आहे. अनेक जागतिक गिर्यारोहक लडाखमध्ये गिर्यारोहणासाठी दाखल होतात. अनेक भारतीय बाईक रायडर्स बाईक रायडिंग चा थरारक अनुभव घेण्यासाठी लडाखला प्रवास करतात. लेह, पेंगोंग लेक आणि नुब्रा व्हॅली ही लडाखमधील काही नैसर्गिक सुंदरता असलेली पर्यटन स्थळं आहेत.
८)वाराणसी- भारताचे आध्यात्मिक केंद्र Varanasi, Devotional Centre Of India
वाराणसी किंवा काशी म्हणून ओळखले जाणारे हे उत्तर प्रदेशातील शहर भारतातील सर्वात प्राचीन शहर आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले वाराणसी शहर आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. काशी विश्वनाथ मंदिर, दशाश्वमेध घाट आणि पंडित रविशंकर संगीत महल इत्यादी स्थळांना भेट देण्यासाठी देशभरातून अनेक धार्मिक भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात.
Beautiful Places Of India To Visit In Marathi
९)उदयपूर- राजस्थानचे व्हेनिस Udaipur, Rajasthan
‘राजस्थानचे व्हेनिस’ अशा नावाने प्रसिद्ध असलेलं राजस्थानातील उदयपूर हे शहर देशातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अनेक सुंदर महाल आणि तलाव असलेल्या या शहरात देशभरातून तसेच जगभरातून पर्यटक भेट देतात. सिटी पॅलेस, पिछोला लेक आणि फतेहसागर लेक ही उदयपूर मधील प्रमुख आकर्षण केंद्र आहेत. उदयपूरचे शांत आणि रोमँटिक वातावरण पर्यटकांना एक सुंदर अनुभव देते.
१०)हिमाचल प्रदेश- शिमला, मनाली आणि धर्मशाळा Himachal Pradesh
हिमालयात वसलेलं हिमाचल प्रदेश हे राज्य तिथल्या उंच व बर्फाच्छादित पर्वतांसाठी ओळखले जाते. शिमला, मनाली आणि धर्मशाळा ही हिमाचल प्रदेशातील काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. शिमला व मनाली हे हिल स्टेशन्स भारतातील अनेक जोडप्यांसाठी हनिमून हिल स्टेशन्स म्हणून प्रसिद्ध आहेत.
Beautiful Places Of India To Visit In Marathi
११)उत्तराखंड Uttarakhand
नैनिताल, ऋषिकेश, हरिद्वार व केदारनाथ यासारख्या शांत निसर्गरम्य आणि अध्यात्मिक स्थळांचा वारसा लाभलेलं उत्तराखंड राज्य जगभर प्रसिद्ध आहे. ऋषिकेश, हरिद्वार व केदारनाथ या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी देशभरातून भाविक व पर्यटक येथे दरवर्षी गर्दी करतात. अत्यंत सुंदर भौगोलिक वारसा लाभलेला उत्तराखंड तिथल्या नैसर्गिक दृश्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
१२)सिक्कीम- पर्वतांची राणी Sikkim, Queen Of Hills
हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले सिक्कीम राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे असणाऱ्या कांचनजुंगा पर्वतावर गिर्यारोहणासाठी भारत तसेच जगभरातून गिर्यारोहक भेट देतात.
१३)तमिळनाडू- नैसर्गिक आणि धार्मिक वारसा Tamilnadu
तमिळनाडू हे दक्षिण भारतातील एक प्रमुख राज्य असून तिथल्या नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उटी, कोडाईकनाल यासारखी निसर्गरम्य ठिकाणे इथे असून देशभरातून पर्यटक येथे भेट देतात. तमिळनाडूमधील प्राचीन संस्कृतीने नटलेली मंदिरे, विविध शिवालये आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतात. आणि यामुळेच तमिळनाडूला ‘देवांची भूमी’ म्हणून ओळखले जाते.
Beautiful Places Of India To Visit In Marathi
१४)कर्नाटक- ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा असलेले राज्य Karnataka
पश्चिम घाटाचा अर्थात सह्याद्रीचा मोठा वारसा लाभलेलं कर्नाटक राज्य तिथे असणाऱ्या अनेक नैसर्गिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसुर, कुर्ग व हम्पी यासारखी अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक सुंदर स्थळे कर्नाटकात बघायला मिळतात. देशाचे ‘आयटी हब’ म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू हे शहर कर्नाटकाची राजधानी आहे. कर्नाटकातील हम्पी हे ‘युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असणारे शहर’ तिथल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले
१५)गुजरात Gujarat
भारतातील एक समृद्ध आणि विविधतेने भरलेले राज्य म्हणून गुजरातची ओळख आहे. इतिहास, संस्कृती, कला व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ आपल्याला गुजरात राज्यामध्ये बघायला मिळतो. ऐतिहासिक व नैसर्गिक सौंदर्यासोबतच गुजरात तिथल्या खाद्यसंस्कृतीसाठी देखील देशभरात प्रसिद्ध आहे.
१६)मध्य प्रदेश- परंपरा व सांस्कृतिक वारसा असलेले राज्य Madhyapradesh
देशाच्या मध्यस्थानी असलेलं मध्य प्रदेश हे राज्य तिथल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारशांसाठी प्रसिद्ध आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंग आपल्याला मध्य प्रदेशात बघायला मिळतात. यासोबतच सातपुडा व विंध्य या पर्वतरांगा, तसेच नर्मदा आणि कावेरी नद्यांचा संगम, भेडाघाट व पंचवटी अशी काही प्रमुख पर्यटन स्थळं मध्य प्रदेशात आहेत.
Beautiful Places Of India To Visit In Marathi
तर मित्रांनो, ही होती भारतातील काही प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या राज्यांची व शहरांची माहिती. या प्रमुख पर्यटन स्थळांसोबतच भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला काही ना काही नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा बघायला मिळतो. देशाच्या सांस्कृतिक जीवनात मोठ्या प्रमाणावर विविधता आढळते. भारताच्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक भागात बोलली जाणारी वेगळी बोली आणि वेगळी भाषा तसेच तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतीसाठी भारत प्रसिद्ध आहे. आपला देश हा जगभरात एक प्रमुख लोकशाही प्रणित देश म्हणून ओळखला जातो.
आपण जर पर्यटक असाल तर भारताच्या या प्रमुख पर्यटन स्थळांना तसेच इतरही अनेक पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.
ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन व आकर्षक भटकंती विषयक माहितीसाठी आमच्या साइटवर असलेले इतरही अनेक लेख आपण वाचू शकता. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आमच्या मेल आयडीवर आपण कळवू शकता.