Ayodhya Travel Information In Marathi अयोध्येला जाण्याआधी जाणून घ्या ही संपूर्ण माहिती

अयोध्येला जाण्याआधी ही संपूर्ण माहिती जाणून घ्या Ayodhya Travel Information In Marathi

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या भव्य सोहळ्यासाठी सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. देशभरातल्या हिंदुंसोबतच जगभरातल्या रामभक्तांसाठी हा मोठ्या आनंदाचा दिवस ठरला. अयोध्येत यादिवशी मोठी गर्दी होती, परंतु पुढचे कित्येक वर्षे अयोध्येत जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढतच जाणार आहे. आपण जर अयोध्येत राममंदिराला भेट देण्यासाठी जाणार असाल तर आम्ही आपल्याला तिथे आसपास बघण्याजोगी काय काय खास ठिकाणं आहेत, हे सांगणार आहोत. Ayodhya Travel Information In Marathi

अयोध्येत राम मंदिराशेजारी फिरण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणं Best Places To Visit Near Ram Mandir Ayodhya

१)हनुमान गढी Hanuman Gadhi-

अयोध्येतल्या साई नगर भागात असलेले हनुमान गढी हे मंदिर लोकप्रिय आहे. हे अयोध्येतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे आणि विक्रमादित्याने बांधले होते. राम मंदिरात जाण्यापूर्वी हनुमान गढीला जाऊन हनुमानाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. श्रीरामभक्त हनुमान इथल्या एका गुहेत राहतात आणि आपल्या भगवान रामाचे जन्मस्थान आणि रामकोटचे रक्षण करतात अशी आख्यायिका आहे.
हनुमान गढी मंदिर अयोध्या रेल्वे स्थानकापासून १ किलोमीटर अंतरावर आहे.

Ayodhya Travel Information In Marathi

WhatsApp Group Join Now

 

२)त्रेता ठाकूर Treta Thakur-

‘त्रेता ठाकूर’ या मंदिरात भगवान राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, भरत, सुग्रीव यांसह अनेक मूर्ती आहेत. हे मंदिर अयोध्येतल्या नया घाटाजवळ आहे. इथल्या मूर्ती काळ्या वाळूच्या दगडापासून बनवल्या गेल्याचे मानले जाते. त्रेता ठाकूर मंदिर ३०० वर्षांपूर्वी कुल्लू या राजाने बांधले होते. सन १७०० च्या दशकात मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची दुरुस्ती करून नवीन रूप दिले होते.

Ayodhya Travel Information In Marathi

हे देखील वाचा- Kharosa Caves Latur Maharashtra लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर -Hidden Beauty Of Latur 2024

३)तुलसी स्मारक इमारत Tulsi Smarak-

तुलसी स्मारकाची स्थापना १६ व्या शतकातील संत कवी गोस्वामी तुलसीदास यांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. याच ऐतिहासिक ठिकाणी संत तुलसीदासांनी रामचरित रचले. या स्मारकाची इमारत म्हणजे एक विशाल ग्रंथालयच आहे जिथे साहित्याचा खजिना पाहायला मिळतो. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. इथं असलेल्या साहित्यातून अयोध्येतल्या साहित्य, संस्कृती आणि अध्यात्माची संपूर्ण माहिती मिळून जाते. रामायणातील कला, हस्तकला यांना हे स्मारक प्रदर्शित करते.

 

४)नागेश्वरनाथ मंदिर Nageshwarnath Temple-

अयोध्या रेल्वस्थानकापासून ३ किमी अंतरावर थेरी बाजाराजवळ असलेले भगवान शिवाचे नागेश्वरनाथ हे मंदिर खूप लोकप्रिय आहे. मंदिराच्या गर्भगृहात एक सुंदर शिवलिंग स्थापित केलेले आहे. पौराणिक कथेनुसार या शिवमंदिराची स्थापना भगवान रामाचा पुत्र कुश याने केली होती. हे मंदिर पहाटे ५ ते रात्री ८.३० पर्यंत उघडे असते. मंदिरात दररोज सकाळी ५ आणि रात्री ८ वाजता आरती होते. Ayodhya Travel Information In Marathi

 

५)गुप्तर घाट Guptar Ghat-

शरयू नदीच्या काठावर असलेल्या या घाटाला ‘घग्गर घाट’ असेही म्हटले जाते. अयोध्येजवळ असलेले हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. पूर्वी गुप्तर घाटाच्या पायऱ्यांजवळ कंपनीची बाग होती, जी सध्या ‘गुप्तर घाट जंगल’ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी प्रभू रामाने ध्यान केले आणि जलसमाधी घेतली, त्यानंतर श्रीरामांना वैकुंठाची प्राप्ती झाली अशी आख्यायिका आहे. Ayodhya Travel Information In Marathi

 

६)गुलाबाची बाडी Gulab Bari-

गुलाबाची बाडी हे अयोध्येतील फैजाबाद इथल्या वैदेही नगर भागात असलेले एक थडगे आहे, जे अयोध्येतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अनेक प्रकारच्या गुलाब प्रजाती आणि हिरवळ येथे पाहायला मिळते, जी डोळ्यांना सुखावणारी आहे. गुलाबी बाडीची स्थापना अवधचा तिसरा नवाब शुजा-उद-दौला याने केली होती. पहाटे ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले असते.

 

७)सूर्य कुंड Surya Kund-

जेव्हा प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक होत होता तेव्हा सारे देवदेवता तिथं हजर होते. त्यांच्यासोबत सूर्यदेव देखील होते. सूर्य देव ज्या दर्शन नगराजवळ राहिले होते, ते ठिकाणं आज सूर्यकुंड म्हणून प्रसिद्ध आहे. इथे एक सूर्यदेवाचं मंदिर आहे. सध्या उत्तर प्रदेश सरकारतर्फे विविध पर्यटन विकास कामांतर्गत सूर्यकुंडाचं देखील नूतनीकरणाचं काम जोरात चालू आहे. असं म्हणतात की अयोध्या दर्शन सूर्यकुंडाशिवाय पूर्ण होत नाही.

रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण ५ किमी अंतरावर आहे.

Ayodhya Travel Information In Marathi

 

अयोध्येमध्ये कुठे राहाल? Where To Stay In Ayodhya. Ayodhya Travel Guide Information In Marathi. Hotels In Ayodhya

राम मंदिराच्या निर्माणासोबतच अयोध्येत हॉटेल्स क्षेत्रामध्येही चांगला विकास होत असुन जगभरातून भेट देणाऱ्या भाविक, पर्यटकांसाठी इथे राहण्यासाठी चांगले पर्याय विकसित होत आहेत. अयोध्येमध्ये राहण्यासाठी अगदी ५०० रुपयांपासून ते महागडे पर्याय देखील उपलब्ध आहेत. तिथे जाण्याआधी online websites च्या माध्यमातून आपण आपल्या आवडीप्रमाणे रूम बुक करू शकता. अयोध्येत असणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी अयोध्येत जाण्यापूर्वीच आपली online हॉटेल बुकिंग करून ठेवणं कधीही चांगलंच. Ayodhya Travel Information In Marathi

हे देखील वाचा- Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट या हिंदू मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी 2024

अयोध्येमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ Famous And Best Street Foods In Ayodhya

१)दाल कचोरी

दाल कचोरी आणि पूरी हा अयोध्येतील लोकांचा आवडता नाश्ता आहे. विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा या दाल कचोरीमध्ये समावेश असतो. मूग आणि उडीद डाळ यांच्यापासून बनवलेली कचोरी इथं खूप प्रसिद्ध आहे. ही कचोरी चटणी वा भाजीसोबत आवडीने खाल्ली जाते.

अयोध्येत गेल्यावर या खास दाल कचोरीचा आस्वाद नक्की घ्या.

Ayodhya Travel Information In Marathi

 

२)चाट

उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये विविध प्रकारचे चाटचे प्रकार पाहायला मिळतात. जे कि इथे विशेष लोकप्रिय आहेत. चाट बनवण्यासाठी गोड-आंबट चटणी, मसालेदार चणे, कोथिंबीर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या खास चाटची चव देखील वाढते. आलू टिक्की, पाणीपुरी, कचोरी, समोसा या पदार्थांचा नक्की आनंद घ्या.

३)रबडी

गोड पदार्थ आवडणाऱ्या लोकांसाठी अयोध्येमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जिलेबी, लाडू यासहीत विविध प्रसिद्ध मिठाईचे भन्नाट पर्याय इथं मिळतात.

यासोबतच इथल्या खास रबडीचा देखील आवर्जुन आस्वाद घ्या. अयोध्येतील स्पेशल रबडी खूप प्रसिद्ध असून यात विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा आणि केशरचा वापर केला जातो. Ayodhya Travel Information In Marathi

हे देखील वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

४)दही वडा

दही वडा हा इथला आवडीने खाल्ला जाणारा खास पदार्थ आहे. या दही वड्यांची चव इतकी अप्रतिम असते की, तुम्ही विसरूच शकणार नाहीत. विविध प्रकारच्या  डाळींपासून हे दही वडे बनवले जातात. तसेच यामध्ये दह्याचा वापर करून ते गोड-आंबट चटणीसोबत खाल्ले जातात. Ayodhya Travel Information In Marathi

 

५)बिर्याणी

अयोध्येतल्या प्रसिद्ध पदार्थांपैकी व्हेज बिर्याणी हा एक पदार्थ आहे. उत्तम प्रतीचा तांदूळ आणि विविध भाज्या आणि मसाल्यांपासून बिर्याणी तयार केली जाते.

अयोध्येतील या स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घेण्यासाठी जास्त पैसे मोजण्याची गरज पडत नाही. कमी पैशांमध्ये या सर्व पदार्थांचा आपण आस्वाद घेऊ शकता. Ayodhya Travel Information In Marathi

६)लिट्टी चोखा Litty Chokha

‘लिट्टी चोखा’ हा पदार्थ उत्तरप्रदेश, बिहार मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. भाजलेल्या लिट्टीला तुपात भिजवुन खाताना जीभेवर रेंगाळणारी चव आणि बटाटे, वांगे, टोमॅटो यांच्या मिश्रणातून तयार झालेला गावरान धाटणीचा चोखा हा अनेकांना आवडतो. कांदा, लिंबू, पुदिना चटणी, लोणच्यासोबत ‘लिट्टी चोखा’ आवडीने खाल्ला जातो.

Ayodhya Travel Information In Marathi

 

अयोध्येत काय काय खरेदी कराल? Shopping At Ayodhya Market-

अयोध्येत असलेली मुख्य बाजारपेठ ही शहरातल्या बऱ्याच मंदिरांपासून आणि धार्मिक स्थळांपासून अगदी जवळ असल्यामुळे बाजारपेठेत फिरणं आणि खूप सारी खरेदी करणं सहज सोपं आहे. तुम्ही तिथे विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्त्या, फुलदाण्या, राम-सीता आणि लक्ष्मण यांच्या लाकडी आणि मार्बल मध्ये असलेल्या मुर्त्या, तसेच विविध प्रकारचे दिवे खरेदी करू शकता.

हेही वाचा-लक्षद्वीपला २०२४ मध्ये द्या भेट, जाणून घ्या सर्व काही

 

मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आम्ही आपल्यापर्यंत अशीच सविस्तर आणि खास माहिती घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या ब्लॉगला भेट देत चला. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर देखील कळवू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी या साईटवर whatsapp किंवा फेसबुकचा आयकॉन दिसेलच.

तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.

आपण किंवा मित्र जर राममंदिराला भेट देणार असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

Ayodhya Travel Information In Marathi