Eighth Wonder Of The World: Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी
दक्षिण आशियाई देश असलेल्या कंबोडियामध्ये असलेले ‘अंगकोर वाट’ हे मंदिर आता जगातील आठवे आश्चर्य म्हणून ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात मोठी धार्मिक वास्तू म्हणून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद आहे. अंगकोर वाट हे निःसंशयपणे जगातील अनेक प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या मंदिराने इटलीतील पॉम्पेईला मागे टाकून जगातील आठवे आश्चर्य होण्याचा मान मिळविला आहे. या जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त मंदिराचा हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीशी दृढ संबंध आहे. अंगकोर वाट हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ सुद्धा आहे.
कंबोडियातील अंगकोर वाट हे जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंचे असून इसवी सनाच्या १२ व्या शतकात उत्तर कंबोडियामध्ये राज्य करत असलेला सूर्यवर्मन दुसरा या राजाच्या कालखंडात बांधण्यात आले होते. सूर्यवर्मन दुसरा याने सन १११३ ते ११५० या कालावधीत कंबोडियावर राज्य केले. या मंदिरामुळेच भारत आणि कंबोडिया यांच्यामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध समजण्यास मदत होते. नंतरच्या काळात हे मंदिर बौद्ध धर्मियांच्या अधिपत्याखाली गेल्याने बौद्ध धर्मियांसाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरले.
हे मंदिर ४०० एकरहून अधिक परिसरावर पसरलेले आहे, म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांमध्ये या मंदिराचे स्थान विशेष मानले जाते. अंगकोर वाट याचा अर्थ स्थानिक ख्मेर भाषेत “मंदिराचे शहर” असा होतो. १९७० च्या दशकात ख्मेर रूज राजवटीत आणि पूर्वीच्या झालेल्या प्रादेशिक संघर्षांमध्ये या मंदिराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळेच या मंदिरात सद्य:स्थितीत कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत. असे असले तरी कंबोडियामधील एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.
(Angkor Wat Information In Marathi)
१)युद्धशिल्पे
या मंदिरामध्ये अनेक युद्धशिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमध्ये वेगवेगळ्या युद्ध शिल्पांचा समावेश आहे. कृष्णाचं बाणासुराशी युद्ध, विष्णूचं असुरांशी युद्ध, लंकेचं युद्ध, देवांचं आणि असुरांचं युद्ध, कुरुक्षेत्राचं युद्ध इत्यादी युद्धशिल्पांचा त्यात समावेश होतो. मूलतः हे विष्णूचं मंदिर असल्याने यात विष्णूशी संबंधित वेगवेगळ्या प्रतिमांचा, प्रसंगांचा समावेश होतो. खुद्द राजा सूर्यवर्मन व त्यांच्या राजदरबारातील अनेक प्रसंग या मंदिराच्या भिंतीवर कोरण्यात आले आहेत. राजा व राजाच्या अधिकाऱ्यांच्या शिल्पांजवळ नामपट्ट कोरण्यात आले आहेत. त्यामुळे त्या शिल्पांची ओळख पटण्यास मदत होते.
या मंदिराच्या मध्यभागी एक गर्भगृह आहे. या गर्भगृहात विष्णूची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. गर्भगृहाच्या कोपऱ्यात शिखर असलेल्या गर्भगृहाच्या प्रतिकृती कोरण्यात आलेल्या आहेत. सूर्यवर्मन राजा नंतर आलेल्या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळे मंदिरात विष्णूच्या जागी बुद्धाची मूर्ती स्थापन करण्यात आली. (Angkor Wat Information In Marathi)
२)स्थापत्यशास्त्राचा चमत्कार
अंगकोर वाटचा मध्य भाग त्याच्या संतुलित रचना आणि मोठ्या खंदकांसाठी ओळखला जातो. त्याच्या भिंतींवरील कोरीव काम एखाद्या प्राचीन चित्र पुस्तकासारखे आहे, ज्यात हिंदू कथा, ऐतिहासिक घटना आणि ख्मेर प्रदेशातील दैनंदिन जीवनातील दृश्ये कोरलेली आढळतात. काळजीपूर्वक कोरलेले तपशील या भव्य प्रकल्पावर काम करणाऱ्या कारागिरांचे कौशल्य दर्शवतात.
(Angkor Wat Information In Marathi)
३)हिंदू आणि बौद्ध वारसा
मूलतः हिंदू देव विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर नंतर एक महत्त्वपूर्ण बौद्ध मंदिर बनले. मंदिराच्या मध्यवर्ती भागात कमळाच्या आकाराचे पाच बुरुज आहेत जे सममिती दर्शवितात आणि हिंदू व बौद्ध श्रद्धांमधील पवित्र पर्वताचे प्रतिनिधित्व करतात. त्याच्या भिंतींवर तपशीलवार कोरीव काम हिंदू आणि बौद्ध इतिहासातील कथा दर्शवते. (Angkor Wat Information In Marathi)
४)अंगकोर वाटचे सौंदर्य- जगातील एक सुंदर मंदिर
अंगकोर वाट केवळ त्याच्या डिझाइनमध्ये प्रभावी नाही; तर ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. हे एक सक्रिय धार्मिक ठिकाण आहे, जिथे बौद्ध भिक्खू आणि भक्त प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी येतात. अंगकोर वाट येथील सर्वोत्तम अनुभव म्हणजे त्याच्या बुरुजांवरून सूर्योदय पाहणे. सौंदर्याच्या पलीकडे, अंगकोर वाट हे कंबोडियाच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे, जे लोकांना हिंदू आणि बौद्ध वारशाचे मिश्रण एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करते. (Angkor Wat Information In Marathi)
अंगकोर वाट मंदिराला कसं जायचं? How To Reach To Angkor Wat Temple?
भारतातून बँकॉकला विमानाने जात तिथून थेट सीम रीपला (Siem Reap) विमानाने जाता येते. सीम रीप येथून अंगकोर वाटला मिनीबसने फेरफटका मारता येतो. पर्यटकांसाठी ई-बाईक भाड्यानेही उपलब्ध आहेत. तसेच अंगकोर वाट आणि आसपास जाण्यासाठी टुक-टूक रिक्षा देखील मिळतात.
(Angkor Wat Information In Marathi)
Best Time To Visit Angkor Wat अंगकोर वाट मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ कोणता?
अत्यंत उत्तम रीतीने जतन केलेले अंगकोर वाट हे अप्रतिम मंदिर पाहणे हे बऱ्याच पर्यटकांचे तसेच हिंदू भाविक आणि कलाप्रेमी पर्यटकांचे स्वप्न असते. जगभरातून लाखो पर्यटक या वर्ल्ड हेरिटेज असलेल्या साईटला दरवर्षी भेट देतात व या मंदिराचे शालीन सौंदर्य व कलात्मक दिमाख अनुभवून तृप्त होतात. नोव्हेम्बर ते मार्च हा अंगकोर वाट मंदिराला भेट देण्याचा उत्तम सीझन आहे. या वेळेला इथली हवा थंड व प्रसन्न असते. भारतातून काही खासगी संस्थांमार्फत अंगकोर वाट साठी दरवर्षी ट्रीप काढली जाते. आपण त्यांच्यातर्फे देखील अंगकोर वाटला जाण्याचे उत्तम नियोजन करू शकता.
हे देखील वाचा-Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.
मग काय आहेत जगातील सात आश्चर्ये Seven Wonders Of The World In Marathi
१)कोलोझीयम, रोम इटली Colosseum, Rome Italy
कोलोझीयम हे जगातील सर्वात मोठे अँफिथिएटर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. हे अँफिथिएटर रोमन साम्राज्याच्या पहिल्या शतकात फ्लेव्हियन सम्राटांनी ८० CE मध्ये बांधले होते. मूळ वास्तूचा दोन तृतीयांश भाग हा कालांतराने नष्ट झाला असला तरी हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. (Angkor Wat Information In Marathi)
२)माचू पिचू पेरू Machu Picchu Peru
माचू पिचू हे समुद्रसपाटीपासून सुमारे आठ हजार फूट उंचीवर आहे आणि १५ व्या शतकातील इंकन इस्टेटमध्ये सम्राट पचाकुटीसाठी बांधले गेले होते.
३)पेट्रा जॉर्डन Petra Jorden
पेट्राला त्याच्या रंगामुळे रोझ सिटी म्हणूनही ओळखले जाते. पेट्रा हे दक्षिण जॉर्डनमधील एक आश्चर्यकारक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय शहर आहे. पेट्राच्या भौगोलिक स्थानामुळे ते त्यावेळी त्या भागात व्यापाराचे केंद्र होते. पेट्रा शहर हे जॉर्डनची राजधानी जेरुसलेम आणि अम्मान या दोन्ही शहरांच्या दक्षिणेस सुमारे दीडशे मैलांवर आणि दमास्कस, सीरिया व लाल समुद्राच्या मध्यभागी वसलेले आहे. (Angkor Wat Information In Marathi)
हेही वाचा-Best Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.
४)ताजमहाल Tajmahal India
ताजमहाल ही भारतातील आग्रा इथे संगमरवरी बांधकाम असलेली भव्य वास्तू आहे. ताजमहाल हे मुघल वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुघल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज महल यांच्या सन्मानार्थ ताजमहाल बांधला होता. ताजमहालाचे बांधकाम तत्कालीन तज्ञ असलेल्या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली 20,000 कारागिरांनी केले होते.
५)क्रिस्टो रेडेंटर/ख्रिस्त द रिडीमर पुतळा Christ The Redeemer, Rio De Janeiro
क्रिस्टो रेडेंटर किंवा ख्रिस्त द रिडीमर हा भव्य पुतळा रिओ डी जनेरियो मधील माउंट कॉर्कोवाडो वर उभा आहे. हा १३० फुटी भव्य पुतळा हेटोर दा सिल्वा कोस्टा यांनी डिझाईन केला होता आणि तो बांधण्यासाठी अंदाजे अडीच लाख डॉलर इतका खर्च आला होता, ज्यापैकी बरीच रक्कम काही देणग्यांद्वारे उभारली गेली होती.
Angkor Wat Information In Marathi
६)चीनची भिंत Great Wall Of China
चीनची ही महाकाय भिंत एक मोठा अभियांत्रिकी चमत्कार आहे आणि ती सुमारे ८८५० किमी लांब असल्याचे मानले जाते. परंतु चिनी लोकांच्या दाव्यानुसार या भिंतीची लांबी २१००० किमी आहे. चीनची भिंत बांधण्याचे काम इसवी सन पूर्व सातव्या शतकात सुरू झाले आणि ते दोन हजार वर्षे चालू राहिले. जगभरातील पर्यटक या भिंतीला पाहण्यासाठी इथे गर्दी करतात.
हेही वाचा-Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary In Marathi भिगवण मध्ये होतंय परदेशी पक्ष्याचं आगमन
७)चिचेन इत्झा, मेक्सिको Chichen Itza, Mexico
मेक्सिको मधील हा महाकाय पिरॅमिड ख्रिस्तोफर कोलंबसच्या सुमारे शंभर वर्षे आधी बांधला गेला होता.
(Angkor Wat Information In Marathi)
वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. त्याबरोबरच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.
आम्ही आपल्यापर्यंत भारत तसेच जगभरातील प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, वास्तू, निसर्गरम्य ठिकाणे इत्यादी माहितीसोबतच प्रवासाच्या टीप्स देखील पोहचवतो आहोत. आपल्या प्रवासाला सुखकर आणि निवांत बनवण्यासाठी आमच्या ब्लॉग फिरस्ताला भेट देत चला.
टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग
Temples Of The World
Eight Wonders Of The World
हेही वाचा-महाराष्ट्रातले सुंदर समुद्रकिनारे
1 thought on “Angkor Wat Information In Marathi जगातील आठवं आश्चर्य बनलेल्या अंगकोर वाट या हिंदू मंदिराबद्दल जाणून घ्या ह्या गोष्टी 2024”
Comments are closed.