आंगणेवाडी जत्रा २०२५ बद्दल सगळं काही Anganewadi Jatra 2025

आंगणेवाडी जत्रा २०२५ Anganewadi Jatra 2025

 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी आणि समस्त कोकणवासी ज्याकडे नजर लावून असतात ती कोकणातल्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरविण्यात आली आहे. यंदाची जत्रा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आंगणेवाडी येथे देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोकणातील मालवण तालुक्यातील भराडी देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित करण्यात येते. यावेळी देवीने कौल दिल्यावर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने यात्रेची तारीख २२ फेब्रुवारी असल्याचे जाहीर केले आहे. दरवर्षी लाखो भाविक भक्त आणि कोकणवासी या जत्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात.

Anganewadi Jatra 2025

WhatsApp Group Join Now

कुठे आहे आंगणेवाडी? Where Is Anganewadi?

तळकोकणातील मालवण तालुक्यात मसुरे हे गाव असुन गावात आंगणेवाडी ही वाडी आहे. गावात असणाऱ्या आंगणे कुटुंबाची ही देवी आहे. आंगणे कुटुंबाची ही खाजगी देवी असली तरी नवसाला पावणारी देवी असल्याने कोकणासह, महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशातल्या इतर भागातूनही भाविक इथे जत्रेला येतात आणि देवीचे दर्शन घेतात. आंगणेवाडी जत्रेसाठी कोकणातील जे नागरिक मुंबईला नोकरीसाठी राहतात ते मोठ्या प्रमाणात गावाकडे दाखल होतात आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. ‘कोकणातील प्रतिपंढरपुर’ अशी आंगणेवाडीची ख्याती आहे.

 

नवसाला पावणारी भराडी देवी

मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडीतील भराडी देवीची ख्याती राज्यभर आहे. देवीला बोललेले नवस पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी भरडावर असल्याने देवीचे नाव भराडी देवी असे ठेवण्यात आले आहे. भराड म्हणजे उघडे माळरान असा अर्थ आहे. देवीच्या आजुबाजूचा परिसर हा माळरान आहे त्यामुळे देवीला भराडी देवी हे नाव पडले आहे.

Anganewadi Jatra 2025

 

किती दिवस चालते आंगणेवाडीची जत्रा?

आंगणेवाडीची जत्रा केवळ दीड दिवस चालते. दीड दिवसांच्या या जत्रेला तब्बल पाच ते सात लाख भाविक हजेरी लावतात. भराडी देवीचा नैवेद्य हा खास असतो. आणि जत्रेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ मिळतो. आंगणे कुटुंबातील बायका हा नैवेद्य अबोल राहून करतात. देवीच्या दर्शनासाठी सर्व कोकणवासी खास हजेरी लावतात.

या जत्रेची तारीख अथवा तिथी निश्चित नसून देवीचा कौल घेऊन त्यानुसार मग तारीख ठरवली जाते.

यंदाची तारीख २२ फेब्रुवारी असल्याने मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावात दाखल होतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय लोक, कलाकार देखील या जत्रेला हजेरी लावतात.

विविध व्यापारी आणि व्यावसायिक या जत्रेत आपली दुकाने थाटतात. त्यामुळे खरेदी साठी देखील लोकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. व्यावसायिकांची या दीडच दिवसांत करोडोंची उलाढाल होते.

महाकुंभला जाताय, मग हे वाचाच- महाकुंभला जाताय? आधी हे वाचा Mahakumbh 2025

 

आंगणेवाडी जत्रेला कसे जाल? How To Reach Anganewadi jatra?

या जत्रेला जाण्यासाठी मुंबईहून विशेष ट्रेन रेल्वे प्रशासनाकडून सोडल्या जातात. तसेच सिंधुदुर्ग एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात. तसेच मुंबईहून खासगी बस सेवा कंपन्या विशेष बस सोडतात. स्वतःच्या वाहनाने देखील पर्यटक सिंधुदुर्ग वा मालवण ला जाऊन तिथुन आंगणेवाडी पर्यंत पोहोचू शकतात.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) इथून यावर्षी तीन विशेष ट्रेन सावंतवाडी रोड स्टेशनपर्यंत सोडण्यात येणार आहेत. २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सुटणाऱ्या या ट्रेनने भाविक जत्रेला पोहोचू शकतील. रेल्वेच्या वेळा आणि वेळापत्रकासाठी आपल्याला रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. Anganewadi Jatra 2025

 

हे देखील वाचा- नागपुर देखील पर्यटनात कमी नाहीये, ही आहेत प्रसिद्ध ठिकाणे Tourist Places In Nagpur

 

आंगणेवाडी गाव किती अंतरावर आहे? Anganewadi Distance

-रत्नागिरी पासून १५० किमी

-मालवण पासुन १२ किमी

-कणकवली पासुन ३० किमी

-सिंधुदुर्ग पासुन ८ किमी

-पुण्यापासून ३७० किमी

-मुंबई पासुन ४५० किमी अंतरावर आहे.

Anganewadi Jatra 2025

 

आंगणेवाडी गावात राहायची सोय कुठे होईल? Stay Facility In Anganewadi Jatra

मालवण आणि सिंधुदुर्ग इथून जवळ असल्याने बरेच हॉटेल्स आणि होमस्टे या भागात स्वस्तात उपलब्ध आहेत. ५०० रुपयांपासून ते महागडे हॉटेल्स या भागात मिळून जातात. मालवण हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय असल्याने मालवण मध्ये पर्यटकांची सोय स्वस्तात होऊन जाईल. मालवण मध्ये अनेक ठिकाणी होमस्टे वा घरगुती ठिकाणी राहायची सोय होऊन जाते.

 

हे देखील वाचा- Travel To These Beautiful Beaches Of Konkan Maharashtra महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

 

आंगणेवाडीला जात आहात तर जवळपासच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या. Places To Visit Near Anganewadi, Malwan

आंगणेवाडी जत्रेला जाणार आहात तर जत्रा झाल्यावर मालवण किंवा सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या विविध निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देता येतात. ही सारी ठिकाणे जवळपास असुन स्वतःच्या वाहनाने गेला असाल तर कमी वेळात बघून होतात.

१)भरतगड किल्ला

आंगणेवाडीपासुन जवळ असलेल्या मसुरे गावातील टेकडीवर भरतगड हा एक छोटेखानी किल्ला आहे. सन १७०१ मध्ये फोंड सावंतांनी हा किल्ला बांधला. गडावर पोहोचण्यासाठी चिरेबंदी पायऱ्या असुन ५ मिनिटांत गडावर पोहोचता येते. गडाचे बुरुज आणि तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली मोठा खंदक बघायला मिळतो. गडावर एक छोटे मंदिर असुन मागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. तसेच गडावर दारूकोठार आणि धान्य कोठार यांचे अवशेष आहेत. Anganewadi Jatra 2025

Anganewadi Jatra 2025

 

२)भगवंतगड

आंगणेवाडीपासुन भगवंतगड किल्ला १० किमी अंतरावर आहे. गड एकदम छोटा असुन ह्या गडावर प्रवेशद्वार, बुरुज वा तटबंदी अस्तित्वात नाही. गडावर फक्त एक सिद्धेश्वर मंदीर बघायला मिळते. दाट वनराईत हा किल्ला असुन तासाभरात बघून होतो. चिरेबंदी बांधणीच्या या मंदिरात ओबडधोबड दगड दिसतात. मंदीराच्या बाजुला ४ फूटी चिरेबंदी तुळशीवृंदावन दिसते. गडावर लोकांचा फारसा वावर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दाट झाडी माजलेली आहे. त्यामुळे गडावरील अवशेष पाहता येत नाहीत. तटबंदीचे काही मोजके अवशेष आणि काही जोती गडभर पसरलेली दिसतात. गडावरुन कालावल खाडी व भरतगड किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते. मालवणहून भरतगड व भगवंतगडला जाताना रस्त्यात आंगणेवाडी, आचर्‍याचे रामेश्वर ही मंदिरे देखील  पाहता येतात.

Anganewadi Jatra 2025

 

३)सर्जेकोट किल्ला

सर्जेकोट किल्ला हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असुन मालवण शहराजवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. अरबी समुद्राच्या कडेला असलेल्या एका छोट्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे, जो किनारपट्टी तसेच हिरवळीचे विहंगम दृश्ये देतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून या किल्ल्यावर सहज पोहोचता येते. यामुळे कोकण प्रदेशात फिरणाऱ्या प्रवाशांसाठी ते एक सोयीस्कर ठिकाण बनते. हा परिसर अतिशय शांत असुन शांत परिसराचा इथे अनुभव घेता येतो. हा किल्ला देखील एकदम छोटा असुन किल्ल्यावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट, सिंधुदुर्ग हे किल्ले एका दिवसात आरामात बघून होतात.

Anganewadi Jatra 2025

 

४)सिंधुदुर्ग किल्ला

शिवाजी महाराजांनी १६६७ साली हा किल्ला बांधला. किल्ल्याला ४२ बुरुज असुन ४ किमी लांबीची नागमोडी तटबंदी आहे. किल्ला समुद्रात असुन बोटीने जावे लागते. गडावर मंदिरे आणि विहिरी असुन एक तलाव देखील आहे. सुस्थितीत असलेला हा किल्ला बघण्यासाठी पर्यटक दूरवरून येत असतात. इथे जायला मालवणवरून बोटी उपलब्ध आहेत.

Anganewadi Jatra 2025 

भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट, सिंधुदुर्ग हे किल्ले एका दिवसात आरामात बघून होतात. स्वतःची गाडी असल्यास हे चारही किल्ले एका दिवसात आरामात बघून होतात. Anganewadi Jatra 2025

 

५)रामेश्वर मंदिर

रामेश्वर मंदिर हे मालवणमधील पुरातन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो. हे मंदिर वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे.

 

६)सुनामी आयलंड Tsunami Island

सुनामी आयलंड हे मालवणच्या देवबाग किनाऱ्यावरील एक सुंदर बेट आहे. या ठिकाणी अनेक जलक्रीडा प्रकारांचा आनंद घेता येतो. हे बेट छोटे आणि सुंदर असुन पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

 

 

७)तारकर्ली बीच

हे ठिकाण तिथल्या जलक्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध असुन राज्यभरातून अनेक पर्यटक इथे येत असतात. पाण्यातल्या विविध साहसी खेळांचा इथे आनंद घेता येतो. हा किनारा खूप प्रसिद्ध असुन महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक इथली सुंदरता आणि साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. Anganewadi Jatra 2025

याशिवाय मालवण तसेच सिंधुदुर्ग या ठिकाणी असलेले अनेक समुद्रकिनारे, प्रसिद्ध मंदिरे यांना पर्यटक भेटी देऊ शकतात. आंगणेवाडी जत्रा झाली कि मालवण इथे मुक्काम करून पर्यटक आसपास असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन आपल्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करू शकतात.

 

७)देवबाग बीच

देवबागचा समुद्रकिनारा लांबवर पसरलेला असुन चमकत्या पांढऱ्या वाळूने भरलेला आहे. देवबागचा निळ्याशार पाण्याचा समुद्र पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतो. इथे बोटीतून प्रवास करत खाडीकडे जाता येते. खाडीकडे गेल्यावर तिथे विविध सुंदर ठिकाणे बघता येतात. पुढे त्सुनामी आयलंडवर देखील जाता येते. हा समुद्रकिनारा देशभरातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असुन दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात.

तर पर्यटक आणि भटक्या मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आपल्याला आवडली असले तर आपल्या कोकणी मित्रांना पाठवा. किंवा जे जत्रेला जाणार आहेत त्यांच्याशी शेअर करा. आपण आमच्या whatsaap ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. वर दिलेल्या whatsapp च्या चीन्हावर क्लिक करा आणि जॉईन व्हा. आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून तुमची भटकंती अधिकाधिक सुंदर होऊ शकते. Anganewadi Jatra 2025

हे देखील वाचा- Velas Turtle Festival Kokan Maharashtra Marathi २०२४ मधील वेळास कासव महोत्सवाची तारीख जाहीर

फिरस्ता- मराठी भटकंती ब्लॉग