भारतातील प्रसिद्ध प्राचीन मंदिरे Ancient Famous Beautiful Temples Of India Marathi
भारतातील सर्वात मोठा आणि जगभरातील प्राचीन धर्मांपैकी एक असलेला हिंदू धर्म मुळातच त्याच्या देवीदेवता आणि प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी ओळखला जातो. हिंदू धर्मातील मंदिरे ही भव्य आणि खास शैलीत बांधली गेली आहेत. प्राचीन मंदिरांची स्थापत्यकला बघून आजही आपण अचंबित होतो. जुन्या काळात कुठल्याही सुविधा नसताना बांधली गेलेली ही भव्य मंदिरे आजच्या काळासाठी आव्हाने आहेत. विशेष म्हणजे हजारो वर्षांपूर्वी बांधली गेलेली ही मंदिरे आजही उत्तम स्थितीत आहेत. यातील काही मंदिरांचा संदर्भ रामायण महाभारताशी असल्याचेही बोलले जाते. या प्रत्येक मंदिरांबद्दल काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत तसेच काही गूढ रहस्येही असल्याचे बोलले जाते. Ancient Famous Temples Of India Marathi
चला तर मग माहिती करून घेऊयात, भारतातील प्रसिद्ध अशी प्राचीन मंदिरं कोणती आणि त्यांना भेट कशी द्यायची ते.
१)जगन्नाथ पुरी मंदिर, ओडिशा Jagannath Puri
ओडिशा राज्यातील असलेले आणि भारतभर प्रसिद्ध असलेले जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथाचे (श्रीकृष्ण) मंदिर हे तिथली मंदिररचना आणि तिथे साजऱ्या होणाऱ्या रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मातील पवित्र चारधाम क्षेत्रांपैकी जगन्नाथ पुरी मंदिर हे एक आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, बलराम, सुदर्शन व सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत आणि दरवर्षी येथे प्रचंड मोठा रथोत्सव अर्थात रथयात्रा होते. जगन्नाथाचा हा प्रचंड मोठा रथ अक्षरशः लाखो भाविक ओढून नेत असतात.
जगन्नाथ मंदिराचे रहस्य व रचना-
जगन्नाथ मंदिराबद्दल काही आख्यायिका/ रहस्ये मानली जातात.
-मंदिराच्या शिखरावर असलेल्या सुदर्शन चक्राला कुठल्याही दिशेने पाहिल्यास चक्राचे तोंड आपल्याकडेच आहे असं भासतं.
-मंदिराची सावली पडत नाही. सूर्यकिरणे मंदिरावर पडून त्याची सावली छतावरच अडकून राहते.
-मंदिराच्या वरून कुठलाही पक्षी, विमान उडत नाही.
-मंदिरावर असलेला झेंडा नेहमी वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो.
-मंदिरात बनलेला प्रसाद कधीच वाया जात नाही.
Ancient Famous Temples Of India Marathi
जगन्नाथ मंदिराला कसे जायचे?
जगन्नाथ पुरी पासुनचे सर्वात जवळचे विमानतळ भुवनेश्वर आहे जे पुरीपासून ६० किमी अंतरावर आहे. विमानतळावर उतरल्यानंतर, तुम्ही पुरीला जाण्यासाठी बस, टॅक्सी किंवा कार बुक करू शकता. तसेच महत्वाच्या शहरांमधून ट्रेन वा बसने देखील पुरीला जाता येते.
पुण्यापासून जगन्नाथ पुरीचे अंतर-१६०० किमी
मुंबईपासून जगन्नाथ पुरीचे अंतर-१६६१ किमी
२)मीनाक्षी मंदिर, मदुराई Minakshi Mandir
तमीळनाडूतील मदुराई येथे असलेले हे मीनाक्षी मंदिर हे एक भव्य मंदिर असुन भारताच्या प्राचीन आणि महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे हे मंदिर आहे. देवी पार्वती अर्थात मीनाक्षी देवीच्या भारतातील पवित्र स्थानांपैकी हे एक आहे. या मंदिराचे गर्भागृह ३५०० वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. अतिशय भव्य गोपुरांनी नटलेले हे विशाल मंदिर पर्यटक तसेच भाविकांसाठी खास आकर्षण आहे.
मीनाक्षी मंदिराला भेट देण्याची वेळ- मीनाक्षी मंदिराची वेळ सकाळी ५ ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते १० आहे.
मीनाक्षी मंदिरात भेट देणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड असुन पारंपारिक वेशात पुरुष व महिलांनी मंदिरात प्रवेश करावा. Ancient Famous Temples Of India Marathi
मीनाक्षी मंदिराला कसे जायचे?
तमिळनाडूमधील मदुराई हे मीनाक्षी मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ आहे. मदुराईपासुन मीनाक्षी मंदिर दीड किमी अंतरावर आहे.
पुण्यापासून मीनाक्षी मंदिराचे अंतर- १३०० किमी
मुंबईपासून मीनाक्षी मंदिराचे अंतर- १५०० किमी
Ancient Famous Temples Of India Marathi
३)तिरूपती बालाजी मंदिर Tirupati Balaji Mandir
आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात तिरुपती येथील तिरुमाला टेकडीवर असलेले बालाजी मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. देशातील श्रीमंत देवस्थान म्हणून बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. व्यंकटेश्वर किंवा विष्णूचे असलेले हे मंदिर सतत भाविकांच्या गर्दीने फुललेले असते. देश तसेच जगभरातून लाखो भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात. इथे येणाऱ्या भक्तांनी इच्छापूर्तीसाठी आपले केस देवाला अर्पण करण्याची प्राचीन प्रथा आहे. त्यानुसार पुरुष तसेच स्त्रियादेखील डोक्यावरचे केस इथे अर्पण करतात. Ancient Famous Temples Of India Marathi
समुद्रसपाटीपासून ८५३ फूट उंचीवर असलेल्या या मंदिराला तिथल्या डोंगरावरील सात शिखरांमुळे ‘टेम्पल ऑफ सेव्हन हिल्स’ असेही म्हटले जाते. बालाजी मंदिरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान केले जाते. तसेच इथे अर्पण केल्या गेलेल्या केसांपासून देखील करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते.
तिरुपती बालाजी मंदिराला कसे जायचे?
विमानाने तिरुपतीला जायचे झाल्यास रेनिगुंटा हे सर्वात जवळचे विमानतळ १५ किमी अंतरावर आहे. बसने जायचे असेल तर चेन्नई, वेल्लोर आणि बंगळुरू येथून बस उपलब्ध आहेत. ट्रेनने तिरुपती बालाजीला जायचे असल्यास आधी तिरुपती रेल्वे स्टेशनला यावे लागेल जे बालाजी मंदिरापासून २६ किमी अंतरावर आहे.
पुण्यापासून तिरुपती बालाजी मंदिराचे अंतर- ११०० किमी
मुंबईपासून तिरुपती बालाजी मंदिराचे अंतर- १२५० किमी
४)वैष्णोदेवी मंदिर Vaishno Devi Mandir
भारतातील प्रसिद्ध तीर्थस्थळपैकी एक असलेले वैष्णोदेवी मंदिर जम्मू काश्मीर पासुन जवळ असलेल्या त्रिकुटा हिल्सवर आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १३००० फुट उंचीवर आहे. देवी दुर्गेचा अवतार असलेल्या वैष्णोदेवीचे हे मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिर आहे.
पुराणातील कथेनुसार वैष्णोदेवीने राक्षसाचा वध करून येथे विश्रांती घेतली असे मानले जाते. मंदिरातील गुहेत पोहोचण्यासाठी सुमारे १३ किमीचे आणि १३ हजार फूट उंचीवरचे वातावरण आणि खडतर मार्ग पार करून जावे लागते. सतत बदलणारे हवामान आणि प्रचंड थंडी सोसत दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनास जात असतात. Ancient Famous Temples Of India Marathi
वैष्णो देवी मंदिराला कसे जायचे?
जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन किंवा विमानाने जावे लागेल. रेल्वे स्टेशनवरून कॅब, टॅक्सी किंवा बस भाड्याने घेऊन कटराला पोहोचू शकता. तिथुन १३ किमीची चढाई करून देवीचे दर्शन घेता येईल. कटरा ते जम्मू हे अंतर ६३ किमी आहे.
पुण्यापासून वैष्णो देवी मंदिराचे अंतर-२१०० किमी
मुंबईपासून वैष्णो देवी मंदिराचे अंतर-१९३० किमी
Ancient Famous Temples Of India Marathi
५)सोमनाथ मंदिर, गुजरात Somnath Mandir
भारतातील महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी पहिले मानले जाणारे सोमनाथ मंदिर हे गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्र इथल्या वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटण येथे आहे. प्रत्यक्ष चंद्रदेवाने हे मंदिर बांधले अशीही एक आख्यायिका आहे. प्राचीन काळात अनेक मुस्लिम आक्रमकांनी व पोर्तुगीजांनी लुटीसाठी सोमनाथ मंदिर वारंवार नष्ट केल्यानंतर सध्याचे हिंदू मंदिर चालुक्य स्थापत्यशैलीमध्ये पुन्हा बांधण्यात आले.
सोमनाथ मंदिराचे वैशिष्ट्य-
अंटार्क्टिका ते सोमनाथ समुद्र यांच्यामध्ये सरळ रेषेत जमीन नाही अशा ठिकाणी हे मंदिर आहे. या मंदिराचा प्राचीन इतिहास, स्थापत्य पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. Ancient Famous Temples Of India Marathi
सोमनाथ मंदिराला कसे जायचे?
सोमनाथ मंदिर भारतातील 10 प्रमुख मंदिरांपैकी एक असूनही येथे विमानतळ नाही. दीव विमानतळ हे सोमनाथ पासुन सर्वात जवळचे विमानतळ ६३ किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ सोमनाथपासून ५ किमी अंतरावर आहे. तसेच प्रमुख शहरांमधून सोमनाथला जाण्यासाठी बससेवा देखील उपलब्ध आहे.
पुण्यापासून सोमनाथ मंदिराचे अंतर- ८१० किमी
मुंबईपासून सोमनाथ मंदिराचे अंतर- ६७५ किमी
६)काशी विश्वनाथ मंदिर Kashi Vishwanath Mandir
वाराणसीमधील गंगा नदीच्या तीरावर वसलेले काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असुन हिंदूंचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन गंगास्नान केल्याने मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी कशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार १७८० साली केला होता त्यानंतर १८५३ साली राजा रणजीतसिंह यांनी या मंदिराला १ टन सोन्याने मढविले असे सांगितले जाते.
मंदिरात कालभैरव, विष्णू, विरुपाक्ष गौरी, विनायक व अविमुक्तेश्वर यांसारखी इतर अनेक छोटी छोटी तीर्थे आहेत. काशीचे हे मंदिर खूप जुने आणि भव्य असुन भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे.
काशी विश्वनाथ मंदिराला कसे जायचे?
काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीसारख्या मुख्य शहरात असल्याने इतर राज्यांतून विमान, बस आणि ट्रेनने इथे आरामात जाता येते. Ancient Famous Temples Of India Marathi
पुण्यापासून काशी विश्वनाथ मंदिराचे अंतर- १५०० किमी
मुंबईपासून काशी विश्वनाथ मंदिराचे अंतर- १४९३ किमी
७)पद्मनाभ मंदिर, केरळ Padmanabham Mandir
केरळ राज्याची राजधानी तिरूवनंतपुरम येथील हे मंदिर भगवान विष्णूच्या १०८ पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. मध्यंतरी या मंदिराच्या काही तळघरात सापडलेल्या अब्जावधी रूपयांच्या जडजवाहीरानी ते एकदम प्रकाशात आले. त्रावणकोर शाही परिवाराकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आहे. प्राचीन द्रविड शैलीत बांधलेल्या या प्रचंड मंदिरात भगवान विष्णुची विशाल मूर्ती आहे. Ancient Famous Temples Of India Marathi
पद्मनाभ मंदिराला कसे जायचे?
जवळचे रेल्वे स्टेशन तिरुवनंतपुरम १ किमी तर जवळचे विमानतळ तिरुवनंतपुरम असुन ६ किमी अंतरावर आहे.
पुणे ते पद्मनाभम मंदिर अंतर-१५९२ किमी
८)गुरूवायूर मंदिर, केरळ Guruwayur Mandir. Prachin Mandir
केरळातील गुरुवायूर शहरात असलेले हे हिंदू मंदिर भगवान कृष्णाचे पवित्र स्थान मानले जाते. भगवान कृष्णाच्या बालरूपातील मूर्ती इथे विराजमान आहे. कृष्णाची चार हातांची मूर्ती इथे असुन हातामध्ये शंख, सुदर्शन चक्र, कमळ आणि गदा बघायला मिळते. तमिळनाडू तसेच केरळ मधील भाविकांसाठी हे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. कौलारू बांधणीच्या या मंदिरातील कृष्णमूर्ती अतिशय सुंदर आहे. हे मंदिर ५ हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. गुरुवायूर मंदिराला दक्षिणेतील द्वारका तसेच पृथ्वीवरील वैकुंठ म्हटले जाते.
त्रिशूर शहरात असलेल्या या गुरुवायूर मंदिराच्या आवारात हत्ती उत्सव साजरा केला जातो. हत्तींना तयार करून त्यांची स्पर्धा लावली जाते. जी बघायला देश विदेशातून पर्यटक आणि भक्त हजेरी लावतात.
गुरुवायूर मंदिराला कसे जायचे?
जवळचे रेल्वे स्टेशन त्रिशूर असुन मंदिरापासून ३० किमी अंतरावर आहे. तसेच जवळचे विमानतळ कोचीन ८५ किमी अंतरावर आहे. Ancient Famous Temples Of India Marathi
पुण्यापासून गुरुवायूर मंदिर अंतर- ११०० किमी
९)मुंडेश्वरी मंदिर, बिहार Mundeshwari Mandir
बिहार राज्यात असलेले मुंडेश्वरी हे मंदिर १७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर जगातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. इथे बकऱ्याचा अहिंसक अर्थात रक्त न सांडता बळी दिला जातो. आणि नंतर देवीच्या कृपेने तो बकरा जिवंत होतो अशी भक्तांची समजूत आहे. एका उंच डोंगरावर असलेले हे मुंडेश्वरी मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असुन भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या गर्भागृहात शिवलिंग असुन ते दिवसातून तीनदा रंग बदलते असं पुजारी सांगतात.
मुंडेश्वरी मंदिराला कसे जायचे?
बिहार राज्यातील कैमुर जिल्ह्यात असलेले हे मंदिर पटना पासुन २०० किमी तर वाराणसी पासुन १०० किमी अंतरावर आहे. पटना किंवा वाराणसीला पोहोचून तिथुन बस अथवा खासगी गाडीने आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
पुणे ते मुंडेश्वरी मंदिर कैमुर अंतर- १५०० किमी
१०)कामाख्या मंदिर, आसाम Kamakhya Mandir
आसाममधील गुवाहाटीपासुन जवळ असलेल्या कामाख्या इथे असलेले हे कामाख्या मंदिर प्राचीन असुन जगभरात प्रसिद्ध आहे. पुराणातील कथांनुसार शक्तीची देवी असलेल्या सतीची योनी याठिकाणी पडली त्यामुळे या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते. हे मंदिर देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असल्याचे मानले जाते.
Ancient Famous Temples Of India Marathi
देवीच्या या वैशिष्ट्यासोबतच हे मंदिर काळी जादू अर्थात जादूटोना उतरवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. भाविक भक्त इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
कामाख्या मंदिराला कसं जायचं?
इथे येण्यासाठी जवळचे विमानतळ गुवाहाटी १३ किमी अंतरावर आहे. रेल्वेने जाण्यासाठी कामाख्या हे स्टेशन आहे किंवा गुवाहाटी हे मोठे रेल्वे स्टेशन आहे.
पुण्यापासून/ मुंबईपासुन कामाख्या मंदिराचे अंतर- २६०० किमी
११)कोणार्क सूर्यमंदिर Suryamandir
ओडिशा राज्यातील पुरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या कोणार्क इथे असलेले सूर्यमंदिर १३ व्या शतकातील मंदिर असुन पुरी शहरापासून ३५ किमी अंतरावर आहे. १९८४ साली युनेस्कोने राष्ट्रीय वारसा स्थळांच्या यादीत सुर्यमंदिराचा समावेश केला.
कलिंग शैलीत बांधल्या गेलेल्या या मंदिरात सूर्यदेव रथाच्या रुपात विराजमान आहेत. राजा नरसिंहदेव यांनी तेराव्या शतकात या मंदिराची निर्मिती केली.
कोणार्क सूर्यमंदिराला कसं जायचं?
भुवनेश्वर हे जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन कोणार्क इथून ६५ किमी अंतरावर आहे. तसेच पुरी रेल्वे स्टेशन ३५ किमी अंतरावर आहे.
पुणे/मुंबईपासून कोणार्क सूर्यमंदिर अंतर- १६०० किमी
Ancient Famous Temples Of India Marathi
१२)केदारनाथ मंदिर, उत्तराखंड – Kedarnath Temple, Uttarakhand
केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हिमालयीन पर्वतरांगेवर आहे. सुमारे ३५८३ मीटर उंचीवर असलेले केदारनाथ मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी असुन सर्वात उंचीवर आहे. भगवान शिवाला समर्पित असणारे हे मंदिर भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू मंदिर आहे.
देशभरात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी उघडले जाते. त्यामुळे वर्षभर लोक इथे येण्यासाठी वाट बघत असतात. केदारनाथ येथील प्रतिकूल वातावरणामुळे हिवाळ्यात हा पूर्ण परिसर बर्फाने झाकलेला असतो. देशभरातून भाविक आणि पर्यटक इथे तुफान गर्दी करतात.
केदारनाथला कसे जायचे?
केदारनाथचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश असून ते २१६ किमी अंतरावर आहे. तिथुन बस किंवा टॅक्सीने गौरीकुंडला जावे लागते. तिथुन १४ किमी चालत जात केदारनाथलापोहोचता येते. देहरादून येथील विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे.
पुणे/मुंबई ते केदारनाथ अंतर-१४५० किमी
Ancient Famous Temples Of India Marathi
हेही वाचा-Best Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.