Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi महाबळेश्वर मधील प्रसिद्ध ठिकाणे
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर असलेलं हे ठिकाण महाराष्ट्रातील आणि भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. निसर्ग सौंदर्याचा अनमोल वारसा लाभलेला महाबळेश्वर हे ठिकाण पर्यटकांमध्ये खास लोकप्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हिवाळ्यात पर्यटक तसेच शाळेच्या सहली इथे दाखल होतात. महाबळेश्वर मधील खास आकर्षण म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी पिकण्यापासून ते त्याच्यावर प्रक्रिया होईपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला इथं बघता येतात.
आज आपण जाणून घेणार आहोत की महाबळेश्वर मध्ये असलेली प्रमुख पर्यटन स्थळं कोणती आहेत आणि तुम्ही जर महाबळेश्वर ला भेट देण्याचा विचार करत असाल तर काय काय बघणार आणि तिथे भेट कशी द्यायची ते.
पुणे आणि मुंबईपासुन महाबळेश्वर अंतर- Pune And Mumbai To Mahabaleshwar Distance
पुण्यापासून महाबळेश्वर १२० किलोमीटर तर मुंबईपासून २३० किलोमीटर अंतरावर आहे. आणि साताऱ्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे.
महाबळेश्वरचे प्रामुख्याने जुनं महाबळेश्वर आणि मुख्य महाबळेश्वर असे दोन भाग पडतात.
आधी आपण जुन्या महाबळेश्वर मध्ये काय काय बघायला आहे याची माहिती घेऊयात. जुनं महाबळेश्वर खास करून तिथे असणाऱ्या प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. Best Places To Visit In Mahabaleshwar In Marathi
पाचगणी महोत्सवाबद्दल वाचलंत का? I Love Panchgani Festival 2024 पाचगणी महोत्सव २०२४
Famous Temples and ViewPoints In Old Mahabaleshwar जुन्या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध गोष्टी
१)महाबळेश्वर मंदिर Mahabaleshwar Temple
भगवान शिवाला समर्पित असलेलं आणि सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख मंदिर असलेलं महाबळेश्वर मंदिर हे महाबळेश्वर पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. आठशे वर्षांपूर्वीचं प्राचीन असलेले हे मंदिर यादवांच्या राजांनी 12 व्या शतकात तिसऱ्या वेळी बांधलं होतं. मंदिरातील शिवलिंग रुद्राक्षाच्या स्वरूपात इथं बघायला मिळतं. प्राचीन ग्रंथानुसार इथल्या शिवलिंगाचा संदर्भ सहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. पांडवांचा राजा धौम्य ऋषींनी पाच हजार वर्षांपूर्वी या शिवलिंगाची पूजा केल्याचा संदर्भ पुरातन ग्रंथात आहे.
महाबळेश्वर पासून अंतर ६ किलोमीटर
Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi
२)पंचगंगा मंदिर Panchganga Temple
या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो. कृष्णा कोयना वेण्णा गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा पंचगंगा मंदिरातून उगम होतो. असं मानलं जातं की बारा वर्षातून एकदा भागीरथी आणि साठ वर्षातून एकदा सरस्वती नदीचं पाणी या ठिकाणी येतं. या पाचही नद्यांचे पाणी इथे असलेल्या गोमुखातून खाली कुंडात पडतं. मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे.
महाबळेश्वर पासून अंतर ६ किलोमीटर
३)कृष्णाबाई मंदिर Krishnabai Temple
तेराव्या शतकातील असलेले हे प्राचीन आणि सुंदर रचना असलेलं मंदिर पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली येतं. मंदिराच्या कुंडात कृष्णा नदीचे पाणी गोमुखातून पडतं. मंदिरापासून जवळच असलेल्या कृष्णा नदीचं सुंदर असं दृश्य डोळ्यांना दिसतं.
महाबळेश्वर पासून अंतर ३२ किलोमीटर
४)एल्फिन्स्टन पॉईंट Elphinstone Point
उंचावर असलेल्या या ठिकाणाहून डावीकडे कोयना आणि उजवीकडे सावित्री खोऱ्याचं विहंगम दृश्य नजरेस पडतं. या ठिकाणाहून समोरच प्रतापगड किल्ला आणि आसपासचे बरेच डोंगर सुळके देखील दिसतात. इथून दिसणारा नजारा खरोखरच बघण्यालायक आहे.
महाबळेश्वर पासून अंतर १० किलोमीटर
५)सावित्री पॉईंट Savitri Point
एल्फिन्स्टन पॉईंट पासून तीन किलोमीटर असलेल्या या ठिकाणावरून सावित्री नदीचे खोरे दिसतं, त्यामुळे या ठिकाणाला सावित्री पॉईंट असे म्हणतात.
महाबळेश्वर पासून अंतर १२ किलोमीटर
६)ऑर्थर सीट Arthur Seat Point
सावित्री पॉईंट पासून पुढे ५०० मीटर अंतरावर असलेलं ऑर्थर सीट हे महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध पॉईंट आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. ब्रिटिश अधिकारी ऑर्थर यांची पत्नी आणि मुलगा पुढे असलेल्या सावित्री नदीत बुडून मरण पावले होते त्यामुळे ते इथे तासनतास बसून सावित्री नदीला न्याहाळत बसायचे. त्यामुळे या पॉईंटला ‘ऑर्थर सीट पॉईंट’ म्हणून ओळखलं जातं. आर्थर सीट वरून समोरील डोंगरांचे आणि खालच्या बाजूस असलेल्या घनदाट जंगलाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. जावळीच्या खोऱ्यात असलेल्या चंद्रगड किल्ल्यापासून ऑर्थर सीट पर्यंत बरेच ट्रेकर्स ट्रेक करत येतात.
महाबळेश्वर पासून अंतर १२ किलोमीटर
Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi
आता आपण नवीन अर्थात मुख्य महाबळेश्वर मध्ये असलेल्या ठिकाणांबद्दल माहिती घेऊयात.
Famous Spots and View Points In Main Mahabaleshwar मुख्य महाबळेश्वरमधील प्रसिद्ध गोष्टी
१)केट्स पॉईंट Kate’s Point
महाबळेश्वर पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेले केट्स पॉईंट हे एक उंचावरील ठिकाण आहे. इथून धोम धरणाचं सुंदर दृश्य नजरेस पडतं. या ठिकाणी बऱ्याच चित्रपटांचं चित्रीकरण देखील झालेलं आहे. इथे जवळच ईको पॉइंट देखील आहे ज्या ठिकाणावरून आपण आवाज दिल्यास आपलाच आवाज प्रतिध्वनी बनून आपल्यापर्यंत माघारी येतो.
या ठिकाणाहून समोरच कमळगड किल्ला दिसतो.
महाबळेश्वर पासून अंतर ८ किलोमीटर
२)एलिफंट हेड पॉईंट/ नेढं Elephant Head Point
डोंगराच्या एका बाजूला तुटलेल्या छोट्याशा कड्याच्या तुकड्यामुळे हत्तीच्या सोंडेचा आकार दिसतो त्यामुळे या ठिकाणाला एलिफंट हेड पॉईंट म्हणून ओळखले जाते. केटस पॉईंट पासून हे ठिकाण दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणावरून कृष्णा नदीचं सुंदर दृश्य दिसतं.
महाबळेश्वर पासून अंतर ८ किलोमीटर
३) वेण्णा तलाव Venna Lake
महाबळेश्वर मधील लोकप्रिय आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक असलेला वेण्णा तलाव हा एक मानवनिर्मित तलाव आहे. महाबळेश्वर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या तलावात बोटिंग म्हणजे नौकाविहाराचा तसेच घोडेस्वारीचा देखील आनंद घेता येतो. बोटिंगचे शुल्क ४०० ते १००० रुपये अशा प्रमाणात आहे. महाबळेश्वर मध्ये येणारे पर्यटक येथे हमखास भेट देतात.
महाबळेश्वर पासून अंतर ३ किलोमीटर
Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi
४)मुंबई पॉईंट किंवा सनसेट पॉईंट Mumbai Point/Sunset Point
सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी हा पॉईंट सनसेट पॉईंट म्हणून ओळखला जातो. सूर्यास्ताच्या वेळी इथे पर्यटक गर्दी करतात. इथून प्रतापगड किल्ला आणि कोयना नदी दिसते.
महाबळेश्वर पासून अंतर ३ किलोमीटर
५)प्रतापगड किल्ला Pratapgad Fort
शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आणि स्वराज्यामध्ये ऐतिहासिक भूमिका बजावलेला एक प्रमुख किल्ला म्हणून प्रतापगड ओळखला जातो. प्रतापगड किल्ला हे महाबळेश्वर मधील एक ऐतिहासिक आणि प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये गडाच्या पायथ्याशी युद्ध झाले होते. अनेक इतिहास प्रेमी या गडाला आवर्जून भेट देतात.
महाबळेश्वर पासून अंतर २० किलोमीटर
६)मॅप्रो गार्डन Mapro Garden
1959 मध्ये स्थापन झालेल्या मॅप्रो कंपनीचे महाबळेश्वर मध्ये स्वतःच्या मालकीचे स्ट्रॉबेरीचे मळे आणि अन्नप्रक्रिया उद्योग आहे ज्या ठिकाणी स्ट्रॉबेरी वरती प्रक्रिया करून त्यापासून जाम, रस, जेली, चॉकलेट्स, स्ट्रॉबेरी शेक, आईस्क्रीम, सॅलड आदि उत्पादने बनवली जातात.
स्ट्रॉबेरीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मॅप्रो दरवर्षी वार्षिक स्ट्रॉबेरी महोत्सव साजरा करते. यावेळी राज्यभरातून अनेक पर्यटक येथे भेट देतात.
महाबळेश्वर पासून अंतर १२ किलोमीटर
७)लिंगमळा धबधबा Lingmala Waterfall
लिंगमळा गावाच्या नावावरून या धबधब्याला लिंगमळा धबधबा असे म्हटले जाते. लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी 25 रुपये प्रत्येकी व्यक्ती असं शुल्क आहे. लिंगमळा धबधबा हा देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. या ठिकाणी आपल्याला लिंगमळा धबधबा तसेच एक छोटा धबधबा समूह देखील बघायला मिळतो. वेण्णा नदीवर असलेले हे छोटे धबधबे बघणं एक सुंदर अनुभव आहे.
महाबळेश्वर पासून अंतर ७ किलोमीटर
८)लॉडविक पॉईंट Lodwick Point
ब्रिटीश अधिकारी पीटर लॉडविक यांच्या नावावरून या ठिकाणाला लॉडविक पॉईंट असं नाव देण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने बांधलेला २५ फुटांचा एक दगडी खांब त्या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणावरून महाबळेश्वरचं सुंदर दृश्य नजरेस पडतं.
महाबळेश्वर पासून अंतर २ किलोमीटर
Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi
खादाडी- महाबळेश्वर मध्ये मिळणारे प्रसिद्ध खाद्यपदार्थ Famous Foods In Mahabaleshwar. Strawberry Garden.
Things To Do In Mahabaleshwar
महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध आहे हे आपण जाणतोच. इथे असलेल्या विविध स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आपण जाऊन स्वतः स्ट्रॉबेरी तोडून त्या विकत घेऊ शकतो. महाबळेश्वर मधल्या बऱ्याच हॉटेल्स मध्ये स्ट्रॉबेरी क्रीम/आईस्क्रीम मिळते, त्याचा एकदा नक्की आस्वाद घ्या. तसेच इथे असलेल्या स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये, मॅप्रो गार्डनमध्ये आपण स्ट्रॉबेरी पासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो.
महाबळेश्वर हे फक्त स्ट्रॉबेरी साठी ओळखले जात असले तरी त्यासोबतच इथे बाकी बरेच पदार्थ मिळतात. महाबळेश्वर मध्ये फिरताना आपल्याला जागोजागी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स् उभे असलेले दिसतात. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आपल्याला चणे फुटाणे यांचे विविध प्रकार दिसून येतात. तसेच जागोजागी चाट सेंटरच्या गाड्या देखील दिसून येतात.
Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi
Hotels In Mahabaleshwar महाबळेश्वर मध्ये राहण्याची सोय
पर्यटकांनी गजबजून गेलेल्या महाबळेश्वर मध्ये राहण्याची उत्तम सोय होते. अनेक छोटे मोठे हॉटेल्स आपल्याला मुख्य रस्ता ते शहराच्या सर्व भागात मिळून जातात. १००० ते १५०० पासुन ते महागडे हॉटेल्सचे पर्याय मिळून जातात. डिसेंबरच्या शेवटी हे हॉटेल्सचे दर वाढतात. अशा वेळी आपण मुख्य शहरात घेणार नसाल आसपासच्या गावांत किंवा वाई, पाचगणी अशा बाजूच्या शहरात देखील रहायची सोय करू शकता. जाण्याआधी शक्यतो online बुकिंग करून घ्या म्हणजे गैरसोय होणार नाही.
Temperature In Mahabaleshwar महाबळेश्वरमधील तापमान
थंड हवेचे ठिकाण असल्याने साहजिकच महाबळेश्वर मध्ये थंडी जास्त पडते. हिवाळ्यात महाबळेश्वरमधील तापमान १० ते २४ अंश सेल्सियस असं असतं.
Mahabaleshwar Tourist Attractions In Marathi