Stunning Waterfalls Of Maharashtra पर्यटकांना वेड लावणारे महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध धबधबे ज्यांना नक्कीच भेट द्यायला हवी.

पर्यटकांना वेड लावणारे महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध धबधबे ज्यांना नक्कीच भेट द्यायला हवी. Stunning Waterfalls Of Maharashtra

Stunning Waterfalls Of Maharashtra नमस्कार भटक्या मित्रांनो, पावसाळा सुरु झालाय. काही ठिकाणी जोरात पाऊस आहे तर काही ठिकाणी अजुन मनासारखा पाऊस झालेला नाही. अंगाची लाही लाही केलेला कडक उन्हाळा सहन करून सगळेच वैतागलेले असतील. बऱ्याच मंडळींनी पावसाळी ट्रेक चालूही केले आहेत. पाऊस आणि सह्याद्री हे समीकरण जगात भारी आहे हे आपण जाणतोच. हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग, धुंद करणारा सह्याद्रीचा गार वारा आणि जिकडे बघावं तिकडे डोंगरातून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे ही सुंदरता याची देही याची डोळा अनुभवायला आपण कायमच उत्सुक असतो. स्वर्गाहुनी सुंदर अशा सह्याद्रीतले उंचावरून कोसळणारे धबधबे हा एक जबरदस्त विषय आहे. या पावसाळ्यात तुमच्या वर्षा सहलीला सुंदर बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध धबधब्यांची ही माहिती खास आपल्यासाठी.

१)देवकुंड धबधबा, रायगड Devkund Waterfall, Raigad Marathi

मागील काही वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा आणि पावसाळी पर्यटनात दरवर्षी ट्रेंडिंगला असणारा देवकुंड धबधबा सह्याद्रीतला एक अद्भुत अविष्कार आहे. जितका सुंदर हा धबधबा आहे तितकाच तो रौद्र्रूपी देखील आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भिरा गावाजवळ हा धबधबा आहे. भिरा गावातून अंदाजे दोन तासांचा ट्रेक करून येथे पोहोचता येते.

WhatsApp Group Join Now

देवकुंडला कसे पोहोचावे?

पुण्यातुन ताम्हिणी घाट मार्गे प्रवास करत ताम्हिणी घाट उतरल्यावर विळे भागड MIDC मधून जवळच्या भिरा गावात पोहोचावे. तिथुन अंदाजे ८ किमी चालत देवकुंड धबधब्याला जाता येते.

Stunning Waterfalls Of Maharashtra

सूचना-

-देवकुंड धबधब्याला ताम्हिणी परिसरातून पाणी येते. ताम्हिणी भागात मुसळधार पाऊस असल्यामुळे इथे कुठल्याही क्षणी पाण्याचा जोर वाढू शकतो. देवकुंडला जाताना एक ओढा लागतो, जो अशा वेळी पार करणं धोकादायक होतं.

२)कुंभे धबधबा, रायगड Kumbhe Waterfall Raigad Marathi

रायगड जिल्ह्यातील माणगाव पासुन जवळच्या कुंभे गावात असलेला हा सुंदर आणि नेत्रदीपक धबधबा डोळ्यांचे पारणे फेडतो. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण आणि  उंचावरून कोसळणारा हा फेसाळता धबधबा पाहणे म्हणजे अद्भुत अनुभव आहे. ट्रेकिंग आणि फोटोग्राफी या दोन्हींसाठी हा धबधबा एक उत्कृष्ट पर्वणी आहे. पावसाळ्यात इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

इथे आपण आपल्या वाहनाने एक छोटासा बोगदा ओलांडुन थेट धबधबा दिसेल अशा जागी जाऊ शकतो. परंतु खाली जायचे असल्यास अवघड ट्रेक करत जावे लागते.

दाक्षिणात्य सुपरस्टार थालापती विजय यांच्या वरीसू या चित्रपटातील एक दृश्यदेखील इथे चित्रित करण्यात आले आहे. २०२४ साली एक प्रसिद्ध महिला युट्युबर इथून पडून मृत्युमुखी पावली. त्यामुळे इथे असणाऱ्या टोकाच्या ठिकाणी जाणं टाळा.

Stunning Waterfalls Of Maharashtra

३)काळू धबधबा Kalu Waterfall, Malshej

माळशेज घाटातल्या आदराई जंगलात असलेला हा धबधबा एक स्वर्गीय ठिकाण आहे. अलीकडच्या काळात लोकप्रिय झाल्यामुळे इथे पर्यटक गर्दी करतात. इथला निसर्ग खरोखरच स्वर्गीय सुंदर असुन डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. आदराई सारख्या सुंदर जंगलातून ३-४ तासांचा ट्रेक करत इथे पोहोचता येते. या धबधब्याचे पुढे काळू नदीत रुपांतर होते. पुण्यापासून हे ठिकाण ११० तर मुंबईपासून ९० किमी अंतरावर आहे. हरिश्चंद्रगडाच्या कुशीतून वाहत आलेला हा धबधबा माळशेज घाटातील सर्वात मोठा धबधबा आहे.

काळू धबधब्याला कसे जायचे?

काळू धबधब्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे. कल्याणहून, तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने थितबी या  पायथ्याच्या गावात जाऊ शकता. थितबी किंवा खिरेश्वर येथून धबधब्याकडे ट्रेक करत जावे लागते. हे अंतर सुमारे ३ किलोमीटर आहे आणि जायला एक दीड तास लागतो. पुण्यापासून काळू धबधबा १२५ किमी तर मुंबईपासून १३५ किमी अंतरावर आहे.

Stunning Waterfalls Of Maharashtra

४)मढेघाट धबधबा Madheghat Waterfall Marathi

मढे घाट धबधबा हा पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तोरणा किल्ला , राजगड , रायगड किल्ला आणि भाटघर धरणाच्या मागच्या भागात आहे. मढेघाट धबधब्याला लक्ष्मी धबधबा म्हणून देखील ओळखले जाते. मढेघाट ते शिवथरघळ असा ट्रेक देखील प्रसिद्ध आहे. मढेघाट परिसर आणि धबधबा तिथल्या स्वर्गीय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या एका टोकाला अतिशय दुर्गम भागात असलेल्या या धबधब्याला पावसाळ्यात पर्यटक गर्दी करतात.

मढेघाटला कसे जायचे?

पुण्यापासून वेल्हे मार्गे मढेघाट इथे जाता येते. हे अंतर ६५ किमी आहे. एसटी बस तसेच खाजगी वाहनाने देखील इथे जाता येते.

५)वजराई धबधबा, सातारा Vajrai Waterfall Satara

सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या पुढे असणारा हा धबधबा देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. साधारण १८०० ते १९०० फुटांच्या उंचीवरून हा धबधबा तीन टप्प्यात कोसळतो. कास पठारापासून हा धबधबा ५ किमी अंतरावर असलेल्या भांबवली गावाजवळ आहे. वजराई धबधब्याजवळ कास सरोवर, कास पठार, भांबवली फ्लॉवर Valley इत्यादी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. या देखण्या धबधब्याला एकदा तरी नक्की भेट द्या. मुसळधार पावसात इथे जाणे शक्यतो टाळावे.

Stunning Waterfalls Of Maharashtra

६)लिंगमळा धबधबा, महाबळेश्वर Lingmala Waterfall, Mahabaleshwar

महाबळेश्वर मधील वेण्णा नदीच्या खोऱ्यात असलेला हा धबधबा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर पासुन हा धबधबा ५ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात भेट देण्यासाठी लिंगमळा धबधबा एक सुंदर ठिकाण आहे.

७)कुणे धबधबा, लोणावळा Kune Waterfall, Lonavala

लोणावळ्यात असणारा हा धबधबा २०० मीटर उंचीवरून कोसळतो. देशातील १४ वा सर्वात उंच धबधबा म्हणून कुणे धबधबा ओळखला जातो. पुणे आणि मुंबईकरांसाठी भेट देण्याकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे. लोणावळा शहरातून हा धबधबा ४ किमी अंतरावर आहे.

Stunning Waterfalls Of Maharashtra

८)ठोसेघर धबधबा, सातारा Thoseghar Waterfall Satara

सातारा जिल्ह्यातील हा धबधबा पावसाळ्यात भेट देण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात या धबधब्याचा आनंद लुटणे म्हणजे कमालीचा सुंदर अनुभव आहे. या ठिकाणी २ धबधबे असुन ११० मीटर आणि ३५० मीटर अशा उंचीवरून ते कोसळतात. इथे दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

पुण्यापासून ठोसेघर हा धबधबा १४० किमी तर साताऱ्यापासून २५ किमी अंतरावर आहे.

९)आंबोली धबधबा Amboli Waterfall, Amboli

दक्षिण महाराष्ट्रातल्या आंबोली हिल स्टेशनवर असणारा हा धबधबा एक आदर्श ठिकाण असुन पावसाळ्यात इथे नक्की भेट द्यायला हवी. आंबोली जंगल हे तिथल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असुन पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यायोग्य आहे. पुण्यापासून आंबोली ३५० किमी तर सिंधुदुर्गपासुन ८० किमी अंतरावर आहे.

Stunning Waterfalls Of Maharashtra

१०)नाणेमाची धबधबा, महाड Nanemachi Waterfall, Mahad Raigad

दाट जंगलातील निसर्गाच्या कुशीत लपलेला नाणेमाची धबधबा हा निसर्गाचा सुंदर कलाविष्कार आहे. अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेला हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण तरत आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणारा हा धबधबा ४०० फुटांवरून कोसळत पुढे दोन टप्प्यात वाहतो. महाड जवळील वाकी गावापासून नाणेमाची हे जवळील गाव आहे. तिथुन पाऊण तासांचा सोपा ट्रेक करत येथे पोहोचता येते.

नाणेमाची धबधबा पुण्यापासून १३० तर मुंबईपासून २०० किमी अंतरावर आहे.

Stunning Waterfalls Of Maharashtra

११)रंधा धबधबा, भंडारदरा Randha Falls, Bhandardara

भंडारदरा परिसरातील शेंडी गावापासून १० किमी अंतरावर रंधा गावात असणारा हा विशाल धबधबा रंधा धबधबा किंवा Randha Falls म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात हा धबधबा अत्यंत रौद्र रूप धरण करतो. पावसाळ्यात हा धबधबा पाहणे म्हणजे एक रोमांचक अनुभव असतो. या धबधब्यासोबतच भंडारदरा परिसरात इतर अनेक सुंदर धबधबे देखील पाहायला मिळतात. त्यांनाही भेट द्या.

Stunning Waterfalls Of Maharashtra

१२)बेंदेवाडी धबधबा, खांडी धबधबा Bendewadi Waterfall, Khandi Waterfall, Pune

पुण्याजवळील मावळमध्ये असणारा आणि अलीकडेच लोकप्रिय झालेला खांडी परिसर हा नितांतसुंदर आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या तळेगाव दाभाडेच्या पुढे असणाऱ्या कान्हे फाट्यावरून उजवीकडे आत गेल्यावर डोंगरांची आणि छोट्यामोठ्या धबधब्यांची रांगच लागते. लालवाडी किवा बेंदेवाडी धबधबा हा देखील एक सुंदर धबधबा आहे. वाटेतले एकेक धबधबे बघत आणि मज्जा करत खांडी गावापर्यंत जाऊन तिथल्या खांडी पोइंत वरून खालचा कर्जत भागातील कोकणाचा नजारा बघता येतो. वाटेत bendewadi waterfall, Khandi waterfall हे सुंदर धबधबे बघता येतात. हे ठिकाण पुण्यापासून जवळपास ६० कि.मी. अंतरावर आहे आणि पावसाळ्यात एका दिवसाच्या सहलीसाठी खूप छान पर्याय देखील आहे.

सूचना- धबधबे हा निसर्गातील जेवढा सुंदर कलाविष्कार आहे तेवढाच तो प्रसंगी रौद्ररूप धरण करू शकतो. केवळ काही सेकंदात पाणी वाढुन परिस्थिती गंभीर होऊ शकते. धबधबा बघायला जाताना पायात बुट,अंगभरून कपडे, इत्यादी काळजी घ्या. तसेच जळवांपासुन स्वतःचा बचाव करा.

Stunning Waterfalls Of Maharashtra

हेही वाचा- पावसाळ्यात ट्रेकला जाताय? ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना कमेंट करा किंवा आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर देखील कळवू शकता. ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog