Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi काजवा महोत्सव २०२४ झाला सुरु. वाचा संपूर्ण माहिती.

काजवा महोत्सव २०२४ Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

काजवा हा स्वयंप्रकाशित कीटक आपल्या सर्वांचंच आकर्षण राहिलेला आहे. रात्रीच्या मिट्ट अंधारात हा चमकणारा काजवा बघायला सर्वांनाच भारी वाटतं. जवळजवळ प्रत्येकानेच लहानपणी ह्या काजव्याला पकडायचा प्रयत्न केलेला असेल, त्याला काडीपेटीत बंदिस्त केला असेल. जाम मजा यायची ना हे करताना! पण कल्पना करा रात्रीच्या घट्ट काळोखात एखाद्या जंगलात तुम्ही काजवे बघताय, तेही एक ना दोन तर शेकडो, हजारोंच्या संख्येने. एवढ्या मोठ्या संख्येने हे चमकणारे काजवे त्या अंधारात काय जादू करत असतील नाही? हा काजव्यांचा महोत्सव बघणं म्हणजे निव्वळ विलक्षण अनुभव असेल ना?

तुम्हाला माहितेय का? आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये काही ठिकाणी असे हजारो काजवे दिसतात. आणि हा काजवा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. दूर दूरवरून पर्यटक ह्या अद्भुत घटनेचे साक्षीदार व्हायला येतात.

चला तर मग जाणून घेऊयात, काय असतो हा काजवा महोत्सव. आणि तो औभावायला कुठे जायचं आणि काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. Kajawa Mahotsav

WhatsApp Group Join Now

 

काजवे कसे चमकतात? How Fireflies Produce Light?

काजव्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकाश जैविक प्रकारचा असतो. काजव्यांच्या पोटात असलेल्या मॅग्नेशियम, ऑक्सिजन, लुसिफेरस आणि लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते आणि काजवे चमकतात.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

हिवाळ्यात द्या समुद्रकिनाऱ्यांना भेट, बनवा सुट्टी मजेशीर. हे वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

कधी सुरू होतो हा काजवा महोत्सव? When Fireflies Festival In Maharashtra Starts?

दरवर्षी वळवाच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजव्यांचा मिलनाचा देखील उत्सव सुरू होतो. मादी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी झाडांवर बसलेले नर काजवे लुकलुकतात, चमकतात आणि या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळच घातली आहे, असे चित्र बघायला मिळते. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक व्यावसायिक पर्यटन संस्था काजवा महोत्सवांचे आयोजन करतात. Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

पावसाळ्यापूर्वीच्या म्हणजेच मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून अनुभवायला मिळणारे दमट वातावरण काजव्यांच्या मिलनासाठी अनुकूल असते. या महिनाभराच्या कालावधीत प्रामुख्याने वातावरण दमट होते, ढगही दाटुन आलेले असतात. याच दिवसांमध्ये पश्चिम घाटातील अर्थात सह्याद्रीतील रानावनात, जंगलात काजव्यांचे मिलन होते. लयबद्ध पद्धतीने लुकलुकणारे काजवे या काळात दिसतात. मिलनानंतर काही दिवसातच मादी काजवा पाणथळ जागेत अंडी घालते आणि अशा रितीने पुढील प्रजाती जन्म घेते.

काजव्यांमध्ये असलेल्या ह्या प्रकाशाचा उपयोग त्यांना आपल्या जोडीदाराला आकर्षित करणे आणि अन्न शोधण्यासाठी होतो.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

हेही वाचा- Best Time To Visit Bhigwan Bird Sanctuary In Marathi भिगवण मध्ये होतंय परदेशी पक्ष्याचं आगमन

 

काजवा महोत्सव कुठे बघायला मिळेल? Where To See Fireflies Festival In Maharashtra? Bhandardara Fireflies Festival 

साधारणतः सह्याद्रीतील कुठल्याही जंगलात आपल्याला काजवे बघायला मिळू शकतात. परंतु महाराष्ट्रातील सर्वांत मोठा काजवा महोत्सव हा दर वर्षी भंडारदरा भागात आयोजित केला जातो. वेगवेगळ्या भागांतून पर्यटक, निसर्गप्रेमी या महोत्सवात सहभागी होतात. भंदारदरा, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, जंगलात, रंधा धबधब्याजवळ, भीमाशंकरच्या काही भागात, सिद्धगड वाडी, प्रबळमाची, कोथळीगड, ताम्हिणी अभयारण्य, पौड-मुळशी लोणावळ्यातील राजमाची वनक्षेत्रात काजवा महोत्सव आयोजित केले जातात.

मुख्यतः हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवर काजव्यांचा मुक्काम असतो; पण मागील काही वर्षांत होत असलेली बेसुमार वृक्षतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे काजव्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

२०२४ मध्ये काजवा महोत्सव कधी आहे? Dates Of Fireflies Festival In 2024

भंडारदरा भागात १८ मे ते २२ जुन २०२४ या कालावधीत भंडारदरा इथल्या काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सह्याद्रीतील इतर भागात देखील याच महिन्याभराच्या कालावधीत आपल्याला काजवे बघता येतील. यासंबंधी अधिक माहिती आपल्याला इंटरनेटवर खासगी पर्यटन संस्थांच्या पेजवर किंवा त्या भागातील स्थानिकांशी संपर्क करून मिळेल.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

हेही वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

पर्यटकांचा वाढत्या उपद्रवामुळे होतोय काजव्यांचा ऱ्हास

काजव्यांच्या आकर्षणामुळे आणि हल्ली रील्सच्या दुनियेत प्रत्येक गोष्टींना लगेच प्रसिद्धी मिळत असल्यामुळे दर वर्षी काजवा महोत्सवातील पर्यटकांची गर्दी वाढतेच आहे आणि इथून पुढेही वाढतच जाणार आहे. काजव्यांना बघण्यासाठी पर्यटक जंगलात गाड्या घेऊन जातात. काजव्यांनी बहरलेल्या झाडांवर गाडीचे दिवे, बॅटरीचे झोत, कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकवले जातात. चांगले फोटो मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरू असते. काही बेशिस्त लोक मग झाडांखाली गोंधळ करतात, तिथेच आसपास पार्ट्या झोडल्या जातात. या गोंधळ आणि अनाठायी धडपडीमुळे काजव्यांना त्रास होतो. अलीकडेच महोत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दारूपार्ट्याही सुरू झाल्या आहेत.

स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महोत्सवातील गर्दीवर, पर्यटकांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी याची गंभीर दखल घेत वन विभागातर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. महोत्सवादरम्यान पर्यटकांनी कसे वागावे, कसे वागू नये याचीही नियमावली करण्यात आली आहे. वाढत्या गर्दीला आणि उपद्रवाला थोडाफार आळा बसावा म्हणून वनविभागाने तिथे जाण्यासाठी शुल्क देखील लागू केले आहेत. तसेच नियमांचे पालन न करता निसर्गाला आणि तिथल्या अधिवासाला धोका पोचवनाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याचा वनविभागाने इशारा दिला आहे. Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

हे देखील वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

मादी काजवे नष्ट होण्याचा धोका

काजवा महोत्सवादरम्यान अनेक पर्यटक काजव्यांनी फुललेल्या झाडांच्या एकदम जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. हवेत संचार करणारे नर काजवे असतात, तर मादी काजवे अळीच्या स्वरुपात जमिनीखाली असतात. पर्यटकांच्या अशा अनियंत्रित वावराने मादी काजवे नष्ट होण्याचा अधिक धोका असतो.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

 

काजवा महोत्सवाला कसे जाल? How To Go To Fireflies Festival?

पुण्या मुंबईतून बऱ्याच खासगी पर्यटन संस्थांतर्फे काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्यासोबत जाऊन आपण या महोत्सवाचा अनुभव घेऊ शकता. या ट्रीपमध्ये प्रवास, कॅम्पिंग जेवण इत्यादींचा समावेश असतो.

तसेच आपण वैयक्तिक जाणार असाल तर तिथल्या स्थानिकांशी संपर्क करून देखील जाऊ शकता. किंवा मग स्वतःच जाणार असाल तर दुपारी जाऊन कॅम्पिंग साठी जागा शोधून रात्री काजवे बघू शकता.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

हे देखील वाचा- yogesh alekari mumbai london mumbai bike ride मराठमोळ्या तरुणाची मुंबई लंडन मुंबई बाईक राईड

काजवा महोत्सवाला गेल्यावर या गोष्टींची घ्या काळजी Things To Remember At Fireflies Festival

१)आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत या गोष्टीचे भान ठेवा. तिथल्या शांततेचा भंग होईल अशी कुठलीही कृती करू नका.

२)गोंधळ, हुल्लडबाजी न करता काजव्यांचा आनंद घ्या. आपल्यामुळे काजव्यांना, तिथल्या प्राणी पक्ष्यांना त्रास होऊ देऊ नका.

३)स्थानिकांना सहकार्य करा. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

४)वनविभागाने ठरवून दिलेल्या वेळा पाळा. काजवा महोत्सव हा एक संवेदनशील मुद्दा असल्यामुळे वनविभाग येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करते. दारू पिणाऱ्या तसेच गोंधळ घालणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते. या गोष्टी लक्षात असु द्या.

५)फोटोग्राफीसाठी जात असाल तर रात्री लाईट्सचा वापर टाळा.

६)निसर्गात कचरा करू नका. आपण आपल्यासोबत नेलेला कचरा माघारी आणा.

७)जाताना सोबत बुट, torch, पाणी, डासांचा मलम, पुरेसे खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टी सोबत ठेवा. साप, मधमाशा इत्यादींपासून बचाव करा.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

 

तर तुम्हालाही शहराच्या धकाधकीच्या जीवन आणि प्रदूषणापासून दूर जाऊन काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल तर या काजवा उत्सवाचा एक भाग व्हा आणि तेथे जाऊन येथे कॅम्पिंगपासून ट्रेकिंगपर्यंतच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला काजव्यांचा हळूवार आणि तालबद्ध वावर अनुभवायला मिळणार आहे. हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडतात आणि त्यांची संतती वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे जरी काही ठिकाणी काजव्यांची संख्या कमी होत आहे. परंतु राज्यातील या काही ठिकाणी अजूनही काजवे मोठ्या संखेने पाहायला मिळतात.

तर काजवा महोत्सवाचा नक्की आनंद घ्या, पण काजव्यांना आणि जंगलाला त्रास होऊ न देता.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

सदर लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे एवढाच असुन सध्या ‘काजवा महोत्सवाला’ आलेल्या व्यावसायिक स्वरूपामुळे पर्यटकांकडून काजव्यांच्या आणि निसर्गाच्या होणाऱ्या विनाशाचे आम्ही समर्थन करत नाहीत.

-टीम फिरस्ता (मराठी भटकंती ब्लॉग)

हेही वाचा- वेळास कासव महोत्सव

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना कमेंट करा किंवा आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर देखील कळवू शकता. ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

1 thought on “Fireflies Festival Kajava Mahotsav Maharashtra Marathi काजवा महोत्सव २०२४ झाला सुरु. वाचा संपूर्ण माहिती.”

Comments are closed.