Best Places to visit in Pune Marathi – पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणं

Best Places to visit in Pune Marathi पुण्यातील प्रसिद्ध आणि भारी ठिकाणं

विद्येचं माहेर घर असणारं पुणे शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात तसेच शहराच्या आसपास अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक वीकेंडला पुण्याला तसेच पुण्याच्या आसपास फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून अगदीच जवळ असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर, मुंबईतील लोकही शनिवार व रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या योजना करतात. पुणे या शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. ‘वाड्यांचे शहर’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या पुण्याला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तिथल्या या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Best Places to visit in Pune Marathi.

Best Places to Visit In Pune In Marathi-

१)शनिवार वाडा Shaniwar Wada

शनिवार वाडा ही पुणे शहरातील जगप्रसिद्ध अशी ऐतिहासिक वास्तू आहे. शनिवार वाडा हा पेशवेकाळात बांधण्यात आला होता. याच ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी इसवी सन १७३६ मध्ये या जागी लाकडी राजवाडा बांधला होता. मात्र, इंग्रजांनी हा वाडा नष्ट केला. आता केवळ वाड्याचा पाया येथे शिल्लक आहे. शनिवारवाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो

पुणे स्टेशन पासून अंतर- ०४ किमी

WhatsApp Group Join Now

२)आगा खान पॅलेस Aga Khan Palace

गांधी मेमोरिअल सोसायटीचा आगा खान पॅलेस हा इटालियन बनावटीचा महाल आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी तसेच महादेव भाई यांच्यासाठी तुरूंग म्हणून करण्यात आला होता. महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये शेवटचा श्वास घेतला होता, असे म्हटले जाते. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे. सन २००३ मध्ये भारतीय पुरातत्व खात्याने या स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

इथले बांधकाम म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. याठिकाणी महात्मा गांधी संग्रहालय असुन त्यात महात्मा गांधींविषयी बऱ्याच गोष्टी आणि पुतळे पाहायला मिळतात. तसेच स्वातंत्र्य चळवळीबद्दल बरेच चार्टस आणि पोस्टर्स बघायला मिळतात.

पुणे स्टेशन पासून अंतर-०७ किमी

३)ओशो आश्रम Osho Ashram

पुण्यातील ओशो आश्रम एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही. शहरातील कोरेगाव पार्क भागात २८ एकरांवर पसरलेला आश्रम १९७४ साली ओशोंनी बांधला होता. येथे निसर्ग व आधुनिकतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. बांबूच्या कॉटेजेस, आश्रमातील संगमरवरी मंडप, कृत्रिम पाण्याचे झरे, सर्वत्र हिरवळ, थंड हवेचे झोत, मोठा जलतरण तलाव या गोष्टी इथले प्रमुख आकर्षण आहेत. आश्रमात विविध प्रकारचे ध्यानप्रकार, व्यायामप्रकार तसेच योगासन केले जातात.

आश्रमात जाण्यासाठी प्रत्येकी प्रवेश फी ८७० रुपये आकारली जाते.

पुणे स्टेशन पासून अंतर-०३ किमी

४)दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर Dagdushet Halwai Ganpati Temple

प्लेगच्या साथीने आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर गणपतीचे ‘दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर’ श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले. नंतरच्या काळात टिळकांनी लोकांना स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आणण्यासाठी गणपती उत्सव एक सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला. दरवर्षी लाखो पर्यटक दगडूशेठ मंदिराला भेट देतात. पुण्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी दगडुशेठ हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. Best Places to visit in Pune Marathi

मंदिराच्या मागच्या बाजुलाच पुस्तकांसाठी सुप्रसिद्ध आप्पा बळवंत चौक उर्फ ABC आहे. इथे पुस्तकं घेण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. तसेच मंदिराच्या बाजूलाच पुण्यातील स्वस्तात मस्त खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग आहे, जिथे विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी महिला तसेच पुरुष मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

पुण्यातल्या मोक्याच्या  आणि गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळे इथे गाड्या पार्किंगसाठी जागा मिळणं अवघड होऊन बसतं.

पुणे स्टेशन पासून अंतर-०४ किमी

Best Places to visit in Pune Marathi

५)लाल महाल Lal Mahal

पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महाल पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात गेले. इथेच त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्य हिसकावू पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील महाराजांनी याच लाल महालात छाटली होती. आता पुणे महापालिकेने लाल महालाची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे. Best Places to visit in Pune Marathi

पुणे स्टेशन पासून अंतर-०४ किमी

६)ओकायामा फ्रेंडशिप गार्डन- पुण्यातील प्रसिद्ध उद्यान Okayama Friendship Garden

पुण्यातील पु.ल.देशपांडे या सुप्रसिद्ध उद्यानाचे पूर्वीचे नाव ‘ओकायामा फ्रेंडशिप गार्डन’ असे होते. पुण्यातील सिंहगड रोडवर हे उद्यान वसलेले आहे. या उद्यानाची रचना ही जपानी पद्धतीची आहे. जपान मधील ओकोयामा शहरात असलेल्या ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील हे एक उद्यान आहे. हे उद्यान अतिशय सुंदर आणि सुनियोजित असून बऱ्याच मराठी, हिंदी सिनेमांचं इथे चित्रीकरण झालेलं आहे.

इथं प्रवेश सशुल्क असुन कॅमेऱ्याने फोटोग्राफी करणार असाल तर त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागते.

पुणे स्टेशन पासून अंतर-०८ किमी

७)विश्रामबाग वाडा Vishrambag Wada

विश्रामबाग वाडा हा दुसरा बाजीराव पेशवा यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव यांना विश्रामबागेत राहणं पसंत होतं. पुणे महानगरपालिकेने आता या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे. Best Places to visit in Pune Marathi

पुणे स्टेशन पासून अंतर-०४ किमी

हेही वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

८)पर्वती टेकडी- पुण्यातील प्रसिद्ध टेकडी Parvati Hills

पर्वती ही पुणे शहराच्या आग्नेय दिशेस असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन या टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. पर्वतीच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर आहे. सुमारे १०३ पायर्‍या चढून पर्वतीच्या माथ्यावर पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. या टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व इतर काही देवदेवतांची मंदिरे आहेत. Best Places to visit in Pune Marathi

पुणे स्टेशन पासून अंतर-०७ किमी

९)सिंहगड किल्ला Sinhagad Fort

‘गड आला पण सिंह गेला’ असा इतिहास सांगणारा सिंहगड किल्ला पुर्वी ‘कोंढाणा’ या नावाने ओळखला जायचा. सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. छत्रपती शिवाजी महराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघलांशी युध्द झाले, आणि ते धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ‘गड आला पण सिंह गेला’ त्यानंतर त्यांनी किल्ल्याचे ‘कोंढाणा’ नाव बदलून ‘सिंहगड’ असे ठेवले.

गडावर मिळणारे बेसण भाकरी, ताक, चिंच, कैरी वगैरे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

पुणे स्टेशन पासून अंतर-३३ किमी

१०)राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यप्राणी संशोधन केंद्र Rajeev Gandhi Zoological Park

हे प्राणीसंग्रहालय कात्रज प्राणीसंग्रहालय म्हणून देखील प्रसिद्ध आहे. सुमारे १३० एकर (तलाव मिळुन) मध्ये वसलेल्या या प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी बघायला मिळतात. वाघ, हरीण, हत्ती, लांडगा, माकड यासह साप, मगर, मोर आणि विविध प्रकारचे वन्यजीव बघण्यासाठी नागरिक इथं गर्दी करतात. इथं प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावं लागतं.

Katraj Dairy- प्राणी संग्रहालयाच्या बाहेर विरुद्ध दिशेला कात्रज डेअरी आणि तिचं outlet आहे. तिथं मिळणारे सुगंधी दुध, लस्सी वगैरे पदार्थ आवर्जुन ट्राय करा.

पुणे स्टेशन पासून अंतर-१० किमी

Best Places to visit in Pune Marathi

११)पाताळेश्वर मंदिर आणि लेणी Pataleshwar Temple and Caves

पाताळेश्वर मंदिर व लेणे हे पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागातील एक शिवालय व लेणे आहे. हे शिवालय राष्ट्कुट काळातील राजाने इसवी सनाच्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. पाताळेश्वर लेणे जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर व वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात बरेच साम्य आढळते. पाताळेश्वर लेणीला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी एक वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत हे आकाराने मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे बनलेले आहे. हा कातळ स्तंभांवर पेलला गेला आहे.

लेण्यात प्रवेश केल्यावर अनेक चौकोनी स्तंभ आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. यातील मधल्या गर्भगृहात एक शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. तसेच एका भागातील लेणीचे काम अर्धवट स्वरुपात आहे. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर असणारी शिल्पे पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुर्ण राहिले आहे. त्या शिल्पांमध्ये एक शिल्प शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर असणारा एक शिलालेख झिजल्यामुळे वाचता न येणारा आहे.

भारत सरकारने पाताळेश्वर लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. जंगली महाराज रस्ता इथे जवळच आहे.

पाताळेश्वर लेणीला कसे जायचे?

शिवाजीनगर पासुन जवळच असलेल्या जंगली महाराज रस्त्याने गेल्यास पाताळेश्वर लेणी बघता येतात. या शिवाजीनगरपासुन १ किमी तर पुणे स्टेशनपासुन ३.५ किमी अंतरावर आहेत.

हेही वाचा-मोरगिरी किल्ला- एक अपरिचित सौंदर्य

Best Places to visit in Pune Marathi

आपल्याला हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आमच्या मेल आयडी firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता.