थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी Winter Travel Care Tips
हिवाळ्यात (Winter Travel) प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. गुलाबी थंडी आणि सोबत जिव्हाळ्याची माणसं असतील तर क्या बात! पण थंडीत तुम्ही काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे बॅग भरताना काही आवश्यक गोष्टींचा नक्की समावेश करा. त्यासोबतच इतरही काही गोष्टींची काळजी प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी घेतली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या प्रवासात कुठल्याही अडचणी न येता प्रवासाचा आनंद घेता येईल.
तुम्ही जिथे जाणार आहात तेथील हवामानानुसार कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पॅक करा, जेणेकरून तुम्हाला तेथील हवामानाचा आनंद घेता येईल. अशा वातावरणात फिरायला जाताना तुमच्या बॅगेत काही गोष्टी असणे फार आवश्यक आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हिवाळ्याच्या मोसमात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून बॅग पॅकिंग करायला हवी जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल. Winter Travel Care Tips
१)इतर पर्यटकांचे वैयक्तिक अनुभव वाचणे देखील महत्त्वाचे personal experiences of Travellers
सर्वात आधी तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, तेथील हवामानासंदर्भात सर्व माहिती गोळा करा. बर्याच वेबसाइट्सवर तुम्हाला अशा स्थळासंदर्भात लोकांचे वैयक्तिक अनुभव (personal experience) वाचण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमची बॅग पॅक करणे खूप सोपे होईल. अशा अनुभवांमध्ये लोकांनी ज्या गोष्टी अशा ठिकाणी आवश्यक असल्याचे लिहले आहे, त्या पॅकिंग करताना चुकूनही विसरू नका. तसेच गूगल मॅप वरचे लोकांनी त्या स्थळांबाबत लिहिलेले अनुभवही नक्की वाचावेत. जेणेकरून तिथल्या अडचणींबाबत माहिती मिळून जाईल.
२)वजनाला जाड उबदार कपडे पॅक करणे टाळा Avoid packing thick warm clothes
बरेच लोकांना वाटतं की जाड कापड म्हणजे अधिक गरम. मात्र, तसं असेलच असं नाहीये. चांगल्या दर्जाचे उबदार कपडे पातळ आणि वजनाला हलके असले तरी ते खूप गरम असतात. जर तुम्ही तुमची संपूर्ण Bag जाड उबदार कपड्यांनीच भरली असेल, तर तुम्हाला इतर आवश्यक गोष्टींसाठी दुसरी बॅग घ्यावी लागेल, ज्यामुळे तुमचे सामान ओव्हरलोड होईल. त्याऐवजी, स्लिम जॅकेट तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये पॅक करा.
३)कोणत्या ठिकाणी कोणते बुट घालायचे ते जाणून घ्या Shoes Choice
बुट असे असावेत की हवामानाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. प्रवासासाठी गडद रंगाचे शूज पॅक करा. डोंगराळ भागात चालण्यासाठी लेस शूज घालणे कधीही चांगले आहे. तर बर्फाळ भागात घालण्यासाठी बॅगमध्ये उंच बूट आणि उबदार मोजे आठवणीने ठेवा.
Winter Travel Care Tips
हे देखील वाचा-भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत. Best Hill Stations Of India In Marathi
४) हॉटेल बुकिंग करा Hotel Booking In Advance
थंडीच्या मोसमात हॉटेल शोधणे ही देखील मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात तिथे पोहोचून हॉटेल शोधण्याची चूक करू नका. सुट्टीतील त्रास टाळण्यासाठी तुम्ही जिथे जात आहात त्या ठिकाणचे हॉटेल्स आधीच बुक करा. आपण कोणत्याही ट्रॅव्हल कंपनी किंवा कोणत्याही वेबसाइटची मदत देखील घेऊ शकता. वर्षाच्या शेवटी हॉटेल्स चे भाव वाढतात त्यामुळे आपल्याला परवडेल अशी हॉटेल बुकिंग आधीच करून ठेवा.
५)कपडे पॅक करताना या गोष्टी ठेवायला विसरू नका Remember These Things While Bag Packing
कपडे पॅक करताना मफलर, उबदार टोपी, जाड शाल जरूर पॅक करा. स्वेटर किंवा जॅकेट घातल्यावरही मान, कान यांना थंडी वाजते, त्यामुळे सहलीचा आनंद घेण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी कपडे पॅक करताना या सर्व गोष्टी बॅगेत ठेवा. जर तुमच्यासोबत लहान मुलेही असतील तर त्यांच्यासाठी अधिक उबदार कपडे बांधा. थर्मल पॅक केल्याची खात्री करा. थर्मल जितका गरम असेल तितका कपड्यांचा भार कमी होईल.
यासोबत तुम्ही लोकरीचे किंवा वॉटर प्रूफ हातमोजे घेतले पाहिजेत. ते परिधान करून, तुम्ही फोन आणि कॅमेरा आरामात वापरू शकाल. डोंगराळ भागात फिरण्यासाठी पोलराइज्ड सनग्लासेस जरूर घ्या. सामान्य सनग्लासेसमध्ये बर्फावर पडणारा प्रकाश किरण डोळ्यांसाठी घातक असतो.
६)रोख रक्कम जवळ बाळगा. Always Carry Cash With You
प्रवास करताना फक्त online payments, UPI payments किंवा डेबिट/क्रेडिट कार्डवर अवलंबून राहू नका. नेहमी पुरेशी रोख रक्कम सोबत ठेवण्याची सवय असु द्या. छोट्या दुकानांमध्ये प्रवासादरम्यान कार्डद्वारे पैसे भरण्याची सोय नसेल तर तुमची अडचण होऊ शकते. तसेच UPI payments पण कधीकधी ऐन वेळी धोका देतात. त्यामुळे जवळ ठराविक रोख रक्कम ठेवणं कधीही सोयीस्कर आहे. Winter Travel Care Tips
७)मेडिकल किट सोबत ठेवा. Carry Medical Kit/ First Aid Kit
प्रवासादरम्यान सोबत मेडीकल किट ठेवा. प्रवास करताना कधी कोणत्या गोष्टीची गरज लागेल हे सांगता येत नाही. त्यामूळे तूमच्या बॅगेत नेहमी मेडीकल कीट ठेवा. ज्यामूळे सहप्रवाशांनाही त्याची मदत होईल. प्रवासात किंवा ट्रीपला गेल्यावर ट्रेकींग, रनिंग इत्यादी करावे लागू शकते. अशावेळी तूम्हाला एखादी दुखापत होऊ शकते. त्यावेळी हे कीट उपयोगी पडते. त्यासोबत खोकल्याचे औषध, अँटीबायोटिक्स आणि सर्दी/तापीच्या गोळ्या नक्कीच ठेवा. तसेच महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्स कायम जवळ ठेवावीत. अचानक पाळी आल्याने उगाच गैरसोय व्हायला नको. Winter Travel Care Tips
हेही वाचा-ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले
८)सोबत पुरेसे पदार्थ ठेवा. Carry Enough Food
थंडीत प्रवास करताना सोबत Dryfruits किंवा कोरडे खाद्यपदार्थ असु द्या. खजूर किंवा बेरी हे पदार्थ ताकदीचे चांगले स्त्रोत असतात. तेसेच बदाम, पिस्ता हे पदार्थही सोबत असु द्या. तसेच खराब होणार नाहीत असे मोजके अन्नपदार्थ सोबत असु द्यावेत. थंड पदार्थ खाणं टाळा.
Winter Travel Care Tips
९)ऑफबीट/कमी गर्दीच्या ठिकाणांना भेट द्या Visit Offbeat Or Less Crowded Places
सुट्टीवर असताना खर्च कमी करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे अशी ठिकाणे निवडणे जे पर्यटकांमध्ये कमी प्रसिद्ध आहेत. देशातील लोकांना कमी ज्ञात असलेल्या ठिकाणी सुट्ट्या घालवणे हा विलक्षण अनुभव आहे. गर्दी टाळा, तिथे असलेल्या खेळांमध्ये, साहसी गोष्टींमध्ये सहभागी व्हा आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल जाणून घ्या. आजकाल बरेच लोक मॅप केलेल्या मार्गांव्यतिरिक्त ठिकाणं शोधत असतात. Winter Travel Care Tips
-या सर्व गोष्टींसोबतच आपण जर खासगी गाडीने प्रवास करणार असु तर गाडी सर्विस करून घ्या. अचानक गाडी खराब झाली तर पुरेसं साहित्य सोबत असु द्या.
१०)आपले साहित्य आणि कागदपत्रे यांची काळजी घ्या.
-जर आपण बर्फाळ प्रदेशात प्रवास करत असाल तर आपले वाहन किंवा तिथली स्थानिक वाहतुक सुरक्षित असल्याची खात्री करा. तसेच आपले ओळखपत्र आणि आवश्यक वस्तूंसह सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य ती काळजी घ्या
-अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवास करताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की इतर काही प्रवाशांकडे देखील आपल्यासारख्याच bags, सुटकेस आहेत. यामुळे गोंधळ होऊन अदलाबदली होऊ शकते. आणि ऐनवेळी मोठा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. यावर उपाय म्हणून आपल्या साहित्यांना योग्य ते tags किंवा लगेच ओळखायला येतील अशा काही खुणा कराव्यात. यासोबतच आपल्या महत्वाच्या कागदपत्रांकारिता, मौल्यवान गोष्टींकरिता एक छोटी bag सोबत असू द्या. जी कायम तुमच्या नजरेसमोर राहील.
११)प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करा.
हिवाळ्याच्या दिवसांत दिवस लवकर मावळतो आणि लवकर अंधार पडतो. त्यामुळे त्या हिशोबाने आपल्या फिरण्याचे आणि कामाचे नियोजन करा. रात्री रस्त्यावर धुके पसरलेले असते आणि अशावेळी गाडी चालवणं धोकादायक बनू शकतं. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.
यासोबतच आपण जिकडे जाणार आहोत, त्याबद्दल आपल्या प्रियजनांना, मित्रांना माहिती देऊन ठेवा. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत पुढचे धोके टाळता येतील. महिला सोबत असतील तर रात्रीच्या प्रवासात खास खबरदारी घेणं गरजेचं आहे. अनोळखी प्रदेशात रात्रीच्या वेळी फिरणं टाळा.
Winter Travel Care Tips
हिवाळ्यात भटकंती/ भेट देण्यासाठी खास ठिकाणे Places To Travel, Visit In Winter Marathi-
हिवाळा हा भटकंती करण्यासाठी एकदम उत्तम ऋतू आहे. महाराष्ट्रात तसेच भारतभरात अनेक सुंदर हिल स्टेशन्स/ थंड हवेची ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात. तसेच थंडीच्या दिवसांत समुद्रकिनारी देखील जायची वेगळीच मजा असते. यासोबतच महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले म्हणजे भटकायची हक्काची जागा आहे. हिवाळ्यात भर थंडीत गडकिल्ले चढणे आणि मोकळ्या वातावरणात आजुबाजूचा प्रदेश न्याहाळणे याची भारी मजा असते. त्यामुळे माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी नक्की भेट द्या. तसेच समुद्रकिनारे फिरायला आपला लाडका कोकण आहेच. पुण्या मुंबईच्या आसपास असणारे आणि चढायला सोपे असणारे किल्ले आपण नक्की बघू शकता.
Winter Travel Care Tips
वाचक मित्रांनो, आमच्या पोस्ट्स आपल्याला कशा वाटतात? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्कीच शेअर करा. तसेच आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.
Firastaa- Marathi Travel Blog
हेही वाचा- प्रवास करताना आरोग्याची घ्या अशी काळजी
2 thoughts on “Winter Travel Care Tips थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी”
Comments are closed.