Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.

आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन Matheran Hill Station Information In Marathi

नोव्हेंबर महिना संपत आलाय, आता थंडी वाढत चाललीय. हिवाळा हा फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी एकदम मस्त ऋतू आहे. म्हणूनच हिवाळ्यात व्यायाम चालू करणारांची संख्या वाढते. तसेच ज्यांना ट्रेकिंगची, प्रवासाची आवड आहे ते फिरण्यासाठी आपले प्लान्स तयार ठेवतात. आणि महाराष्ट्र म्हणजे तर भटक्यांसाठी स्वर्गच आहे हे तर आपण जाणतोच. इथला निसर्ग, डोंगरी किल्ले, घनदाट जंगलं, भुरळ घालणारे समुद्र्किनारे आणि थंड हवेची ठिकाणं म्हणजे तर आपल्या राज्याची शान आहेत. आणि आपल्याला सतत प्रवास करायला ते प्रेरित करतात. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातलं एक प्रमुख थंड हवेचं ठिकाण- Matheran Hill Station ज्याची आपणा सर्वांना भुरळ पडल्याशिवाय राहत नाही

Matheran Hill Station

 माथेरान Matheran Raigad Information In Marathi

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन आहे. मुंबई पुण्यातुन सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने पुरेपूर नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. उंचीच्या विस्तीर्ण पठारावर माथेरान वसले आहे. माथेरानचा संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. इंग्रजांनी माथेरान वसवले, म्हणूनच इथल्या ठिकाणांना इंग्रजीत नावं दिलेली आहेत.

WhatsApp Group Join Now

 

इथला हिरवागार निसर्ग, वळणावळणाचे रस्ते, पावसाळ्यात इथे कोसळणारे धबधबे माथेरानच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर घालत असतात. त्यामुळे हिवाळा जवळ आला कि पर्यटकांची पावले आपसुकच माथेरानच्या दिशेने वळतात.

वाहनमुक्त शहर No Vehicles Allowed In Matheran Hill Station In Marathi 

संपूर्ण आशिया खंडामधील एकमेव गिरिस्थान जिथे वाहनांना प्रवेश नाही, ही माथेरानची खरी ओळख आहे. आणि यामुळेच हे शहर प्रदूषणमुक्त आहे आणि आपण या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. गावाच्या बाहेर गाड्या लावुन आपण तिथुन चालत, ढकलगाडी किंवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांना भेटी देऊ शकतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयानुसार माथेरानमध्ये ई रिक्षा सुरु करण्यात आल्या आहेत.

माथेरानला भेट देण्याची योग्य वेळ Best Time To Visit Matheran

ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी माथेरानला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. थंडीच्या काळात माथेरानला भेट देण्याची मजाच वेगळी आहे. Matheran Hill Station

हेही वाचा- भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत. Best Hill Stations Of India In Marathi

माथेरानला आकारण्यात येणारे प्रवेशशुल्क Entry Fees At Matheran

माथेरानला येणाऱ्या पर्यटकांकडून माथेरान गिरीस्थान नगरपरिषदद्वारे माफक प्रवेशशुल्क आकारले जाते. प्रौढ व्यक्तींसाठी २५ रुपये तर लहान मुलांसाठी १० रुपये शुल्क आकारण्यात येते.

Matheran Hill Station

Things To Do In Matheran

 

माथेरान मधील खरेदी Shopping At Matheran in Marathi 

माथेरान मधील प्रसिद्ध बाजारपेठेत आपण बरीच खरेदी देखील करू शकतो. इथं चामड्याच्या वस्तू तसेच विविध हस्तकलेच्या वस्तू देखील मिळतात.  माथेरान काळ्या बेरीच्या उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे.

माथेरान ला कसं जायचं? How To Reach Matheran Hill Station In Marathi?

रस्ते मार्गे- 

बदलापूर-कर्जत रस्त्याने मुंबईहून नेरळला पोहोचा,  इथून माथेरानला जाण्याचा मार्ग आहे. पुण्याहून माथेरानला जाण्यासाठी साधारण ३-४ तास लागतात. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत जाणे अधिक योग्य ठरेल.

Matheran Hill Station

रेल्वे मार्ग-

माथेरान हिल स्टेशनला रेल्वेनेही जाता येते. या हिल स्टेशनच्या जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ आहे. नेरळला जाण्यासाठी दोन गाड्या आहेत, पहिली कर्जत आणि दुसरी खोपोली. नेरळ ते माथेरान हे अंतर १० किमी आहे.

टॉय ट्रेन-

माथेरानला जाण्यासाठी नेरळ इथुन दोन फूट रुंद नॅरो गेज मार्गावर धावणारी टॉय ट्रेन सुरू होते, हा सर्वोत्तम पर्याय आहे. टॉय ट्रेन प्रवाशांना डोंगरातील वळणदार मार्ग आणि खंदकातून नेत माथेरान मार्केटच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाते. ट्रेनचा हा प्रवास अतिशय रोमांचक आणि जबरदस्त आहे.

Matheran Hill Station

माथेरान पर्यंत अंतर Distance To Matheran From Pune Mumbai

पुणे ते माथेरान अंतर- १२० किमी
मुंबई ते माथेरान अंतर- ८५ किमी
लोणावळा ते माथेरान अंतर- ५५ किमी
कर्जत ते माथेरान अंतर- २३ किमी

माथेरान मधील प्रेक्षणीय स्थळे Attractions at Matheran Hill Station In Marathi/ Places To Visit In Matheran-

लुईसा पॉइंट Louisa Point Matheran- या ठिकाणाहून माथेरानच्या डोंगरांचे अप्रतिम दृश्य दिसते. प्रबळगड आणि इरशाळगड हे किल्ले इथून दिसतात.

शार्लोट लेक Charlotte Lake Matheran- मुख्य बाजारपेठेपासून हा तलाव दीड किमी अंतरावर असुन नयनरम्य असा आहे. तलावाच्या बाजूलाच पुरातन शिव मंदिर असुन तिथले थंड आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

माथेरान लॉर्ड पॉइंट Matheran Lord Point- माथेरानमधील पठाराच्या एका टोकाला हा लॉर्ड पॉइंट आहे. इथुन दिसणारे सह्याद्रीचे अप्रतिम दृश्य मोहित करते. कड्याच्या शेवटच्या टोकाला खोल दरी असुन खाली पाहताना डोळे चक्रावून जातात. पावसाळ्यात इथुन मोठा धबधबा बघायला मिळतो.

पॅनोरमा पॉइंट panorama Point Matheran- इथे पोचायला सोपा ट्रेक करत येता येतं. इथून सह्याद्रीचं सुंदर दृश्य दिसतं.

यासोबतच मंकी पॉइंट Monkey Point Matheran, शिवाजीज लॅडर Shivaji’s Ladder , वन ट्री हिल पॉइंट lOne Tree HilPoint, इको पॉइंट Echo Point, सनसेट पॉइंट Sunset Point, अलेक्झांडर पॉइंट Alexander Point, हनिमून हिल पॉइंट Honeymoon Hill Point, माथेरान मार्केट Matheran Market, खंडाळा पॉइंट Khandala Point आणि किंग जॉर्ज पॉइंट King George Point ही इथली प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.  तसेच इथे शिवसंग्रहालय Museum देखील आहे.

माथेरानला आल्यावर या सर्व ठिकाणांना नक्की भेटी द्या. Matheran Hill Station

हेही वाचा- थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी Winter Travel Tips In Marathi For Better Enjoy In 2024

माथेरान Toy ट्रेन Toy Train Matheran 

माथेरानची खास ओळख असलेली Toy ट्रेन ही छोटी रेल्वे नेरळ ते माथेरान या मार्गावर धावते. इथल्या डोंगररांगांमधुन धावत ही टॉय ट्रेन आपल्याला माथेरानच्या सुंदर निसर्गाचे दर्शन घडवते. साधारण एकवीस किमी प्रवास २ तासात करत ही ट्रेन आपल्याला इथल्या निसर्गाचा आनंद देते. या टॉय ट्रेन साठी सध्या तरी Online बुकिंग सेवा उपलब्ध नाही. माथेरानला गेल्यावर या सफारीचा नक्की आनंद घ्या.

माथेरान मधून दिसणारे गडकिल्ले  Forts seen From Matheran 

माथेरानचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माथ्यावरून अनेक गडांचे दर्शन होते. पनवेलच्या बाजूने प्रबळगड, इरशाळगड दिसतो, वन ट्री हिल पासून माणिकगड आणि कर्नाळा, पॅनोरमा पॉईंटवरून पेठचा कोथळीगड आणि निरभ्र आकाश असल्यास दूरचा सिद्धगडही दिसू शकतो. त्याशिवाय डोंगररांगांमध्ये लपलेल्या राजमाची किल्ल्याचेही  दर्शन होते. Matheran Hill Station

माथेरान मधील ट्रेक्स Trekking At Matheran

माथेरानमधील प्रत्येक पॉइंटवर माथेरानच्या परिसरातील विविध डोंगरवाटांनी चढुन जाता येते. जवळपास ५० पेक्षाही जास्त डोंगर वाटा आजूबाजूच्या परिसरातून चढुन माथेरानला येतात. यातील ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सचा oneTree Hill हा लोकप्रिय मार्ग आहे. माथेरान च्या खालीच असलेला पेबचा विकटगड हा अतिशय सुंदर किल्ला आहे. माथेरानच्पेया जवळ असणाऱ्या पेबच्या विकटगड किल्ल्यावर पावसाळ्यात पर्यटक हमखास गर्दी करतात. तसेच कलावंतीण, प्रबळगड, इरशाळगड वगैरे किल्ले इथून जवळ असल्याने तिकडे जायचंही नियोजन आपण करू शकता.

माथेरान मध्ये राहण्याची सोय Hotels In Matheran

MTDC चे Resorts, तसेच विविध प्रकारचे हॉटेल्स आणि होमस्टे इथं उपलब्ध आहेत. आपण आपल्या गरजेनुसार त्यांची निवड  करू शकतो. इथं विविध प्रकारच्या खानावळी आणि शाकाहारी/मांसाहारी हॉटेल्स उपलब्ध आहेत. आपल्या गरजेनुसार आपण त्यातील निवड करू शकतो.

Matheran Hill Station

माथेरान मधला निसर्ग- Nature At Matheran

माथेरानच्या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. इथल्या जंगलात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आपल्याला बघायला मिळते. विविध प्रकारचे पक्षी, किटक आणि विविध सरपटणारे प्राणी इथे आढळतात. म्हणूनच इथे निसर्गात भटकंती करताना भरपूर चालण्याच्या आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट न्याहाळण्याच्या तयारीनिशी जायला हवे. मुंग्यांची वारूळं, झाडांच्या फांद्यांवरून खाली लटकणारे कोळी-किटक, उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खोडावर उगवलेले मशरूम, लाल मातीवरून सरपटत जाणारे साप आणि कधीही न पाहिलेले असंख्य जीव या जंगलात वस्तीला असल्याची अनुभूती इथे फिरताना येते. यामुळे माथेरानला येणार असाल तर निवांत वेळ काढून इथलं जंगलदेखील फिरून घ्या.

माथेरान बद्दल अधिक माहितीसाठी आपण www.matheranonline.com या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
Matheran Hill Station In Marathi 

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता किंवा इथे कमेंट करू शकता. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरित करतात. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये देखील नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक व इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

टीम Firastaa- Marathi Travel Blog

1 thought on “Matheran Hill Station आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.”

Comments are closed.