Best Offbeat Destinations In India भारतातली ५ ऑफबीट ठिकाणं

भारतातली ५ ऑफबीट ठिकाणं: जिथे निसर्ग आणि शांतता तुमची वाट पाहतेय Best Offbeat Destinations In India

फिरायला जायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती नेहमीचीच ठिकाणं—शिमला, मनाली, गोवा, किंवा काश्मीर वगैरे… पण या ठिकाणी आता इतकी गर्दी आणि गोंगाट झाला आहे की खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर काहीतरी वेगळं शोधावं लागतं. जर तुम्हाला अशी जागा हवी असेल जिथे शांतता आहे, निसर्गाची किमया आहे, आणि तुम्ही सारे ताणतणाव विसरून तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आपण भारतातल्या अशा ५ ऑफबीट ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे तुम्हाला शांतता, सौंदर्य आणि एक अनोखा अनुभव मिळेल. चला तर मग, बॅग पॅक करा आणि निघा या अनोख्या प्रवासाला!

 

Travel These Less Crowded Places Of India

 

WhatsApp Group Join Now

१)माजुली, आसाम- जगातलं सर्वात मोठं नदीचं बेट  Majuli, Assam- World’s Largest River Island

माजुली हे आसाममधलं एक लपलेलं अद्भुत रत्न आहे. ‘जगातलं सर्वात मोठं नदीचं बेट’ अशी या ठिकाणाची ओळख आहे. माजुली हे ठिकाण ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध वसलेलं आहे. माजुली म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. इथे तुम्हाला हिरवीगार शेतं, नदीचं शांत पाणी, आणि रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळतील. पण माजुली हे फक्त इथल्या निसर्गापुरतंच मर्यादित नाही, तर इथली संस्कृती आणि परंपरा आपल्याला थक्क करून सोडते. Best Offbeat Destinations In India

Best Offbeat Destinations In India

 

माजुलीमध्ये असं काय खास आहे

माजुली हे तेथील सत्रा नावाच्या वैष्णव मठांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे तुम्हाला आसामची धार्मिक आणि सांस्कृतिक झलक पाहायला मिळेल. इथे दरवर्षी रास महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, जो खरोखरच पाहण्यासारखा असतो. तसंच, माजुली हे पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग आहे. इथे तुम्हाला सायबेरियन क्रेनसारखे दुर्मीळ पक्षी आणि त्यासोबतच विविध जातींचे पक्षी बघायला मिळतात. पक्षीप्रेमी इथे आवर्जून भेट देतात.

 

माजुलीला कसं जायचं

माजुलीला जाण्यासाठी तुम्हाला आधी आसाममधील जोरहाटला पोहोचावं लागेल. जोरहाट हे इथून जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन ३० किमी अंतरावर आहे. तिथून तुम्हाला निमाती घाटापर्यंत गाडीने जावं लागेल, आणि मग फेरीबोटीने माजुलीला पोहोचता येईल. या फेरीचा प्रवास हा एक सुखद अनुभव असतो. ब्रह्मपुत्रेच्या लाटांवर तरंगताना तुम्हाला अगदी निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटेल.

 

माजुलीमध्ये काय काय करता येईल? Things To DO In Majuli, Assam

  • सत्रा मठांना भेट द्या आणि तिथल्या भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्या.
  • सायकल भाड्याने घेऊन माजुलीच्या गावांमधून फिरता येईल.
  • ब्रम्हपुत्रा नदीतील स्वादिष्ट मासे आणि बांबूच्या पानांमध्ये बनवलेला भात खा.
  • सूर्यास्ताच्या वेळी ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर बसून सायंकाळची शांतता अनुभवा.

 

माजुलीमध्ये राहण्याची सोय

माजुलीमध्ये हॉटेल्सपेक्षा होमस्टेचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. स्थानिक लोकांच्या घरी राहून पर्यटकांना तिथली स्थानिक संस्कृती जवळून अनुभवता येईल. एक रात्र राहण्याचा खर्च साधारण १००० ते २००० रुपयांच्या आसपास येईल.

माजुली हे आसामची राजधानी दिसपूरपासुन ३२५ किमी अंतरावर आहे. Best Offbeat Destinations In India

हे देखील वाचा- उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ठिकाणे Best Places To Visit In Summer In Maharashtra

 

२)चोपता, उत्तराखंड- भारताचे मिनी स्वित्झर्लंड Chopta Uttarakhand

उत्तराखंड म्हटलं की आपल्याला केदारनाथ वा बद्रीनाथ ही ठिकाणं आठवतात. पण चोपता हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला बर्फाच्छादित हिमालयाच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल, आणि हे ठिकाण पण गर्दीपासून एकदम दूर आहे. चोपताला भारतातील “मिनी स्वित्झर्लंड” असंही म्हणतात, कारण इथे असणारी हिरवीगार कुरणं, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि शांतता मनाला भावणारी आहे.

Best Offbeat Destinations In India

 

चोपतामध्ये काय खास आहे

चोपता हे हिमालयीन ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथून तुम्ही तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला पीकचा ट्रेक करू शकता. तुंगनाथ हे जगातलं सर्वात उंचावर असलेलं शिवमंदिर आहे आणि चंद्रशिलावरून तुम्हाला हिमालयाच्या नंदादेवी, त्रिशूल आणि केदार शिखराचं विहंगम दृश्य पाहायला मिळेल.

 

कसं जायचं

चोपताला जाण्यासाठी आधी ऋषिकेश किंवा हरिद्वारला पोहोचावं लागेल. तिथून रुद्रप्रयागमार्गे चोपताला रस्तामार्गे जाता येतं. ऋषिकेशपासून चोपता साधारण २०० किमी आहे, आणि हा रस्ता खूपच सुंदर आहे.

 

काय करायचं? Things To Do In Chopta

  • तुंगनाथ-चंद्रशिला हा प्रसिद्ध ट्रेक करता येईल (साधारण ५-६ तासांचा ट्रेक).
  • चोपताच्या कुरणांमध्ये कॅम्पिंग करून आणि रात्री ताऱ्यांनी भरलेलं निरभ्र आकाश पाहा.
  • स्थानिक प्रसिद्ध गढवाली पदार्थ, जसं की फाणू आणि कौमल यांचा आस्वाद घ्या.
  • डेहरिया कुरणात फिरा आणि मनसोक्त फोटोग्राफी करा.

 

राहण्याची सोय-

Best Offbeat Destinations In India चोपतामध्ये छोटी हॉटेल्स आणि कॅम्पिंग साइट्स आहेत. एक रात्र राहण्याचा खर्च साधारण १५०० ते ३००० रुपये इतका येतो. जर तुम्हाला कॅम्पिंग करायचं असेल, तर टूर ऑपरेटर्स तुमच्यासाठी सगळी व्यवस्था करतील.

हे देखील वाचा- Sandhan Valley Dari Information In Marathi सांधण दरी- नगर जिल्ह्यातील एक अद्भुत आश्चर्य जे आहे जगभरात प्रसिद्ध

 

३)गोकर्ण, कर्नाटक- गोव्याला उत्तम पर्याय Gokarna, Karnataka

नेहमीचं ट्रिपचं ठिकाण असलेलं गोवा म्हटलं की पार्टी, समुद्रकिनारे आणि होणारी तुडुंब गर्दी आठवते. पण जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल, तेही शांततेत, तर कर्नाटकात असलेलं गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे. कर्नाटकातलं हे छोटंसं गाव समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

Best Offbeat Destinations In India

 

काय खास आहे?

गोकर्णमध्ये प्रसिद्ध असलेले ओम बीच, कुडले बीच आणि हाफ मून बीच असे सुंदर समुद्रकिनारे आहेत, जिथे शांतता आणि निसर्गाचा संगम अनुभवायला मिळतो. तसंच, इथलं महाबळेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर आहे,  ज्याठिकाणी शांत वातावरणात ध्यान करायची मजा घेता येते.

 

गोकर्णला कसं जायचं? How To Reach Gokarna

गोकर्णला रेल्वे आणि रस्त्याने अगदी सहज पोहोचता येतं. गोकर्ण रेल्वे स्टेशन भारतातील अनेक प्रमुख शहरांशी जोडलं गेलं आहे. गोव्यातून गोकर्णला गाडीने ३ तासांत पोहोचता येईल.

 

काय करायचं? 

  • इथल्या ओम बीचवर सूर्यास्त पाहा आणि समुद्रात पोहा.
  • कुडले बीचवर योगा आणि मेडिटेशन करा.
  • स्थानिक मालवणी मासे आणि नारळाच्या पाण्याचा आनंद घ्या.
  • मिरजान किल्ल्याला भेट द्या आणि तिथला इतिहास जाणून घ्या.

 

गोकर्णमध्ये राहण्याची सोय-

गोकर्णमध्ये बीचवर हट्स आणि गेस्टहाऊस आहेत. एक रात्र राहण्याचा खर्च साधारण १००० ते २५०० रुपये आहे.

Best Offbeat Destinations In India

 

४)डिब्रू-सैखोवा नॅशनल पार्क, आसाम- जंगलातली सुखद शांतता Dibru Saikhowa National Park, Assam

आसाममधलं डिब्रू-सैखोवा नॅशनल पार्क हे निसर्ग आणि जंगलप्रेमींसाठी एक परफेक्ट ऑफबीट डेस्टिनेशन आहे. हे राष्ट्रीय उद्यान डिब्रूगड आणि तिनसुकिया या जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. पर्यटक इथे जंगल, नद्या आणि वन्यजीवांचा आनंद घेऊ शकतात.

Best Offbeat Destinations In India

 

काय खास आहे? 

आसाममधील प्रसिद्ध फेरल हॉर्सेस (जंगली घोडे) इथे पाहायला मिळतील, जे भारतात फार कमी ठिकाणी दिसतात. तसंच, हे पार्क पक्षी प्रेमींसाठी स्वर्ग आहे. इथे ५०० हून जास्त प्रजातींचे पक्षी आढळतात. Best Offbeat Destinations In India

 

कसं जायचं? 

डिब्रूगड विमानतळ हे इथून सर्वात जवळचं विमानतळ आहे. तिथून गाडीने १ तासात पार्कला पोहोचता येतं.

 

काय करायचं? 

  • जंगल सफारी आणि वन्यजीव निरीक्षण आणि फोटोग्राफी
  • डिब्रू नदीवर बोटिंग
  • स्थानिक मिझो आणि आसामी पदार्थांचा आनंद

 

राहण्याची सोय-

पार्कजवळ काही गेस्टहाऊस आणि रिसॉर्ट्स आहेत. खर्च साधारण २००० ते ४००० रुपये प्रति रात्र इतका येतो. Best Offbeat Destinations In India

 

५)स्पीती व्हॅली, हिमाचल प्रदेश- हिमालयात लपलेलं सौंदर्य Spiti Valley, Himachal Pradesh

स्पीती व्हॅली हे हिमाचल प्रदेशातलं एक ऑफबीट ठिकाण आहे. हिमालयाचं खरं सौंदर्य पाहायचं असेल तर स्पिती व्हॅली हा एक जबरदस्त पर्याय आहे. अनेक पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण आहे. इथे प्राचीन बौद्ध मठ, उंचच उंच पर्वत, हिमालयात वाहणाऱ्या नद्या आणि स्वर्गीय सुंदरता अनुभवता येते.

Best Offbeat Destinations In India

स्पीती व्हॅलीला काय खास आहे? 

स्पीतीमध्ये की मठ आणि ताबो मठ ही प्राचीन मठं आहेत, जिथे तुम्हाला बौद्ध संस्कृतीचा अनुभव घेता येईल. तसंच, इथे चंद्रताल लेक आहे. हा एक सुंदर तलाव आहे. इथे बाईक राईड करत जायला मजा येते. Best Offbeat Destinations In India

 

स्पीतीला कसं जायचं? How To Reach Spiti Valley?

स्पीतीला जाण्यासाठी शिमला किंवा मनालीमार्गे रस्त्याने जाता येतं. हा रस्ता थोडा खडतर आहे, पण प्रवासातलं सौंदर्य नक्कीच थक्क करणारं आहे. Best Offbeat Destinations In India

 

स्पीतीला गेल्यावर काय करता येईल? 

  • की मठ आणि ताबो मठाला भेट द्या
  • चंद्रताल लेकचा प्रसिद्ध ट्रेक करता येईल.
  • स्थानिक थुक्पा आणि मोमोज यासोबत अनेक प्रसिद्ध पदार्थ खाता येतील.

 

स्पीतीला राहण्याची सोय- Stay Facility In Spiti

स्पीतीमध्ये अनेक होमस्टे आणि छोटी हॉटेल्स आहेत. इथे राहण्याचा खर्च साधारण १५०० ते ३००० रुपये प्रति रात्र इतका आहे.

 

हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

तर मित्रांनो, भारतातील ही ५ ऑफबीट ठिकाणं तुम्हाला निसर्ग, शांतता आणि एक सुंदर अनोखा अनुभव देऊ शकतात. मग वाट कसली पाहताय? सुट्ट्या काढा, बॅग पॅक करा आणि या ठिकाणांना भेट द्या. नेहमी त्याच त्या बोअरिंग ठिकाणांना भेट देण्यापेक्षा ही ठिकाणं एकदा बघा. तुम्हाला या ठिकाणांपैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.

Best Offbeat Destinations In India