अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे Best Places To Visit In Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे Best Places To Visit In Ahmednagar

अहिल्यानगर उर्फ अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमद निजाम शाह या निजाम राजाच्या नावावरून शहराला अहमदनगर हे नाव पडले होते. सन २०२४ साली हे नाव बदलून अहिल्यानगर असे अधिकृत नामांतर करण्यात आले. नगर शहरात अनेक निजामकालीन वास्तू बघायला मिळतात. नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता. सध्या अहिल्यानगर मध्ये १९ साखर कारखाने आहेत. तर सहकारी चळवळीचे जन्मस्थान म्हणूनही नगर ओळखले जाते.

पुण्याहून १२० किमी अंतरावर असलेल्या अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात बरीच मोठमोठी आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. यापैकी महत्वाच्या आणि प्रसिद्ध ठिकाणांची माहिती आपण घेऊयात. Best Places To Visit In Ahmednagar

 

WhatsApp Group Join Now

Ahilyanagar Tourist Places

 

१)खर्डा किल्ला Kharda Fort

नगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यात असलेल्या खर्डा गावात हा भुईकोट किल्ला आहे. शिवपट्टण उर्फ खर्डा किल्ला या नावाने परिचित असलेला हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असुन हिंदवी स्वराज्यातील शेवटची लढाई या किल्ल्याभोवती लढली गेली होती. निजाम आणि मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी झालेल्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. या लढाईसाठी हिंदुस्थानात पसरलेल्या मराठी सरदारांच्या फौजा एकत्र आल्या होत्या.

Best Places To Visit In Ahmednagar

चौकोनी आकाराचा हा किल्ला ५ एकरावर पसरलेला असुन किल्ल्याभोवती खंदक आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन दोन बुरुजांच्या मध्ये असल्याने दिसुन येत नाही. तिथपर्यंत गाडी रस्ता आहे. किल्ल्याला एकूण सात बुरुज आहेत. किल्ल्यात असलेल्या देवड्यांमध्ये तोफगोळे, वीरगळी बघायला मिळतात. किल्ल्यात एक मशीद असुन तिच्या मागे चावीच्या आकाराची सुंदर बारव आहे. या बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आणि दरवाजा आहे. किल्ल्यात काही पडक्या खोल्या, काही वास्तूंचे अवशेष, जात्याचे चाक आदि अवशेष बघायला मिळतात. Best Places To Visit In Ahmednagar

खर्डा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन सकाळी ९.३० ते ५ या वेळेतच पाहता येतो.

खर्डा हे गाव जामखेड धाराशिव या रस्त्यावर असुन तिथे सहज पोहोचता येते. कुर्डूवाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

अहिल्यानगर ते खर्डा अंतर-९८ किमी

जामखेड ते खर्डा अंतर-२३ किमी

 

२)नगरचा भुईकोट किल्ला Nagar Fort

Best Places To Visit In Ahmednagar एकेकाळी निजामशाहीची राजधानी असलेल्या अहमदनगरमध्ये १५ व्या शतकात हा भुईकोट किल्ला बांधला गेला. इंग्रजांच्या काळात त्यांनी अनेक राष्ट्रीय नेत्यांना या किल्ल्यात स्थानबद्ध केले होते. पंडित नेहरूंनी या किल्ल्यातुनच त्यांचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले होते.

Best Places To Visit In Ahmednagar

किल्ल्याभोवती मोठा खंदक असुन एकूण २२ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेशद्वार, बुरुज, तोफा, शिलालेख, खंदक, झुलता पूल आदि अवशेष बघता येतात.

सध्या हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असुन सकाळी ९ ते ५ यावेळेतच बघता येतो. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र जवळ असणे गरजेचे आहे.

अहिल्यानगर शहरापासून हा किल्ला २ किमी अंतरावर आहे.

 

३)महादजी शिंदे किल्ला, जामगाव Mahadji Shinde Fort Jamgaon

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात हा जामगावचा भुईकोट किल्ला आहे. सध्या हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असुन किल्ल्यात त्यांचे कॉलेज भरते. किल्ला बघायचा असल्यास सुट्टीच्या दिवशी जावे लागते. हा किल्ला एका मोठ्या टेकडीवर असुन ८६ एकरावर पसरलेला आहे. किल्ल्यात २० बुरुज आणि ४ दरवाजे असुन सध्या एकच दरवाजा चालू आहे. बाकी ३ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

Best Places To Visit In Ahmednagar

किल्ल्यात २ बुरुज, तटबंदी, हनुमान मंदिर, महादजी शिंदे यांचा वाडा, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, मशिदीची इमारत, एक वाडा आणि मोठी विहीर या गोष्टी बघायला मिळतात. Best Places To Visit In Ahmednagar

नगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या गावाहून १२ किमी अंतरावर जामगावचा किल्ला आहे.

अहिल्यानगर ते जामगाव अंतर-२९ किमी

 

४)धर्मवीरगड किल्ला, पेडगाव Dharmveergad Pedgaon Fort/ Bahadurgad Fort

बहादूरगड किंवा पेडगावचा किल्ला या नावाने देखील परिचित असलेला धर्मवीरगड हा भुईकोट किल्ला नगर जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे. सिद्धटेक या अष्टविनायक मंदिरापासून हा किल्ला ९ किमी अंतरावर आहे. आडबाजूला असलेला हा किल्ला जरी सध्या उपेक्षित असला तरी इथे बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. किल्ल्यावर अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत.

Best Places To Visit In Ahmednagar

इसवी सन १६६४ साली मराठ्यांनी या किल्ल्यावर राज्य करत असलेल्या मुघलांना गनिमी काव्याचा वापर करून पळवून लावले होते. नंतर  १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांना मोगल सैन्याने कैद करून बहादुरगडावर आणले होते.

हा किल्ला भुईकोट असुन किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडीने जाता येते. किल्ल्याच्या आवारात हनुमान, गणपती, भैरवनाथ, रामेश्वर, मल्लिकार्जुन, लक्ष्मीनारायण, बालेश्वर, पाताळेश्वर आदि अनेक मंदिरे असुन बऱ्याच देवी देवतांच्या शिळा बघायला मिळतात. किल्ल्यावरील बरीच मंदिरे, बुरुज, वास्तू भग्नावस्थेत आढळतात. किल्याच्या बाजूलाच भीमा नदी असुन तिचे पाणी किल्ल्यावर आणण्यात आले आहे. ही तत्कालीन पाईपलाईन देखील बघण्याजोगी आहे. Best Places To Visit In Ahmednagar

दौंड या रेल्वेस्थानकापासून किल्ला ३५ किमी अंतरावर असुन सिद्धटेक आणि बहादूरगड दोन्ही ठिकाणे एका दिवसात बघून होतात.

अहिल्यानगर ते पेडगाव अंतर-७३ किमी

 

५)सिद्धटेक गणपती मंदिर Siddhatek Ganpati Temple

सिद्धटेक गणपती हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचे एक प्रसिद्ध मंदिर असुन अष्टविनायकांपैकी एक आहे. इथला सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे.

Best Places To Visit In Ahmednagar

या मंदिरास सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा घातल्यास इच्छित कार्ये पूर्ण होतात अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाजूनेच भीमा नदी वाहते त्यामुळे इथला परिसर विलोभनीय असुन भाविक आणि पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. Best Places To Visit In Ahmednagar

दौंड हे इथून जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

अहिल्यानगर ते सिद्धटेक अंतर-८१ किमी

दौंड ते सिद्धटेक अंतर-२५ किमी

 

६)रेहेकुरी काळवीट अभयारण्य, कर्जत Rehekuri Black Bucks Sanctuary

रेहेकुरी काळवीट अभयारण्य हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. हे अभयारण्य काळवीटांच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे अभयारण्य ‘रेहेकुरी ब्लॅक बक अभयारण्य’ या नावानेही ओळखले जाते. हे अभयारण्य २.५ चौ.किमी क्षेत्रात वसलेले आहे.  शुष्क काटेरी वनांमध्ये वसलेल्या या अभयारण्यात खैर, हिवर, शिसव, बाभळी, बोर या वनस्पती प्रामुख्याने आढळतात. या अभयारण्याचा बहुतांशी भाग हा गवताळ आहे.

Best Places To Visit In Ahmednagar

काळवीटांच्या संरक्षणासाठी १९८० साली स्थापन करण्यात आलेले हे अभयारण्य काळवीट पाहण्यासाठी असलेल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या अभयारण्यात सुमारे ४०० काळवीट आहेत.

नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्याच्या ठिकाणाहून रेहेकुरू ५ किमी अंतरावर आहे. अभयारण्याचे विश्रामगृह असुन तिथे राहण्याची सोय होते. Best Places To Visit In Ahmednagar

कर्जत ते रेहेकुरी अंतर-८ किमी

अहिल्यानगर ते रेहेकुरी अंतर-७७ किमी

जामखेड ते रेहेकुरी अंतर-४५ किमी

 

७)शिर्डी साईबाबा मंदिर, शिर्डी Shirdi Saibaba Temple

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी येथे साईबाबा मंदिर आहे. साईबाबा यांनी याठिकाणी जवळपास ६० वर्षे वास्तव्य केले होते. साईबाबा हे जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. भक्तांकडून मिळणारी देणगी हा साईबाबा संस्थानाचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी भेट देतात. १९२२ साली निर्मिती करण्यात आलेल्या या मंदिरात साईबाबांची संगमरवरी मूर्ती असुन मंदिराचा गाभारा आणि कळस सोन्याचा आहे.

Best Places To Visit In Ahmednagar

अहिल्यानगर ते शिर्डी अंतर-८४ किमी

कोपरगाव ते शिर्डी अंतर-१५ किमी

राहता ते शिर्डी अंतर-६ किमी

हेही वाचा- कोल्हापूरातील प्रसिद्ध ठिकाणे Best Places To Visit In Kolhapur In Marathi 

 

८)शनी शिंगणापूर मंदिर Shani Shinganapur Temple

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेले शनी शिंगणापूर हे शनीदेवाचे देवस्थान अनेक भाविकांचे तीर्थस्थान आहे. घरांना दरवाजे नसलेले गाव म्हणून शनी शिंगणापूर प्रसिद्ध आहे. मंदिरात शानिदेवांची सहा फुटांची पाषाण स्वरूपातील मूर्ती आहे. ही मूर्ती उघड्या ठिकाणी असुन देऊळविरहित आहे.

Best Places To Visit In Ahmednagar

दीडशे वर्षांपूर्वी इथली शिळा पुराच्या पाण्यात वाहत आली होती. त्यानंतर शनिदेवाने दृष्टांत देऊन हे मंदिर बांधायला सांगितले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. प्रत्येक शनिवारी येथे यात्रा भरते. शनिदेवाला खुश करण्यासाठी दररोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण करण्यात येते. Best Places To Visit In Ahmednagar

अहिल्यानगर ते शनी शिंगणापूर अंतर-४० किमी

नेवासा ते शनी शिंगणापूर अंतर-२६ किमी

शिर्डी ते शनी शिंगणापूर अंतर-७२ किमी

 

९)मोहटादेवी मंदिर, पाथर्डी Mohata Devi Temple, Pathardi

Best Places To Visit In Ahmednagar

नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावात एका डोंगरावर असलेले मोहटादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिराचे बांधकाम अत्यंत अत्याधुनिक स्वरुपात असुन सर्व सोयीसुविधा इथे आहेत. नवरात्रात इथे मोठा उत्सव असतो. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे.

अहिल्यानगर ते मोहटादेवी अंतर-६१ किमी

पाथर्डी ते मोहटादेवी अंतर-१० किमी

 

१०)कळसुबाई शिखर Kalasubai Peak

Best Places To Visit In Ahmednagar

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असुन समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर आहे. या शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. पायथ्याच्या गावातून शिखरावर जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. कळसुबाई हे देवस्थान प्रसिद्ध असुन भाविक आणि गिर्यारोहक तसेच पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. Best Places To Visit In Ahmednagar

भंडारदरा धरणापासून कळसुबाई १५ किमी अंतरावर आहे.

अहिल्यानगर ते कळसुबाई अंतर-१५४ किमी

 

११)हरिश्चंद्रगड किल्ला Harishchandragad Fort

‘ट्रेकर्सची पंढरी’ अशी ओळख असणारा हरिश्चंद्रगड किल्ला सह्याद्रीतील अति दुर्गम भागात असुन त्यावरील अर्धगोलाकार आकारात असलेल्या कोकणकड्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे. माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला भव्य हरिश्चंद्रगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यांच्या सीमेवर हरिश्चंद्रगड किल्ला वसलेला आहे. Best Places To Visit In Ahmednagar

भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या  असलेल्या सह्याद्रीच्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ४००० फुट असुन हा किल्ला चढाईच्या बाबतीत मध्यम श्रेणीत मोडतो. इथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा निव्वळ अप्रतिम आहे.

अहिल्यानगर ते हरिश्चंद्रगड अंतर-१४६ किमी

अकोले ते हरिश्चंद्रगड अंतर-४६ किमी

 

१२)भंडारदरा धरण Bhandardara Dam

Best Places To Visit In Ahmednagar

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या प्रवरा नदीवर वसलेले भंडारदरा धरण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात इथला सुंदर निसर्ग बघण्यासाठी पर्यटक इथे कायम गर्दी करतात. विविध मराठी, हिंदी चित्रपटांचे या ठिकाणी चित्रीकरण झालेले आहे. तसेच याठिकाणचा निसर्ग कॅमेऱ्यात टिपण्यासाठी फोटोग्राफर्स आवर्जून हजेरी लावतात. रंधा धबधबा, अम्ब्रेला धबधबा असे खूप प्रसिद्ध धबधबे देखील इथे पाहता येतात.

अहिल्यानगर ते भंडारदरा धरण अंतर-१५० किमी

 

१३)सांधण दरी Sandhan Valley

अतिदुर्गम निसर्गाच्या कुशीत दडलेली आणि आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी अशी ओळख असलेली ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’ हे आश्चर्य आजही अनेकांच्या नजरेपासून दूर आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील साम्रद या गावातून पुढे दीड-दोन किमी पसरलेली ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते.

Best Places To Visit In Ahmednagar

२०० ते ४०० फुट खोल आणि सुमारे २ किमी लांब अशी ही सांधण दरी म्हणजे निसर्गातील एक अनोखं आश्चर्य आहे. दोन्ही बाजूला उंचच उंच कातळ आणि त्यातून साचलेले पाणी आणि अजस्र खडकांवरून मार्ग काढत हा २ किमीचा थरारक ट्रेक करणं म्हणजे निव्वळ जबरदस्त आहे. Best Places To Visit In Ahmednagar

‘सांधण व्हॅली’ला पोहचण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या बाजुने जात साम्रद या गावी जावे लागते.

अहिल्यानगर ते सांधण दरी अंतर-१७० किमी

हेही वाचा- ‘वेळास कासव महोत्सव’ होतोय सुरु Velas Turtle Festival Best Time To Visit