Panchgani Festival And Tourism In Marathi पाचगणी महोत्सव २०२४

पाचगणी महोत्सव २०२४ I Love Panchgani Festival 2024- Panchgani Festival And Tourism In Marathi

पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन आहे. सातारा जिल्ह्यातील असलेले पाचगणी शहर तिथल्या थंड वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. राज्यभरातून बरेच जण हिवाळ्यात पाचगणी, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी आपली सुट्टी घालवण्यासाठी येतात.

पाचगणी, वाई या सातारा जिल्ह्यातील ठिकाणी असलेली प्राचीन मंदिरे, सांस्कृतिक वारसा आणि स्वर्गीय निसर्ग यामुळे याठिकाणी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांचं चित्रिकरण होत असतं. बरेच सेलिब्रिटी लोक इथे सुट्या घालवण्यासाठी येत असतात.

तर अशा या लोकप्रिय थंड हवेच्या पाचगणी शहराला अजुन लोकप्रिय करण्यासाठी आणि इथल्या पर्यटनाला चालना, सोबतच स्थानिक व्यवसाय, आणि कलाकार यांना गती मिळवून देण्यासाठी पाचगणी मध्ये दरवर्षी ‘पाचगणी महोत्सव’ साजरा केला जातो. हा महोत्सव ‘I Love Pachgani Festival’ या नावानेही ओळखला जातो.

WhatsApp Group Join Now

 

कधी असतो पाचगणी महोत्सव/ Panchgani Festival Information In Marathi/ Pachgani Mahotsav

दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत सलग तीन दिवस पाचगणी महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. पाचगणी शहराचा लौकिक वाढावा, पर्यटन वाढीला चालना मिळावी यासाठी मागील सात वर्षांपासून हा आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल साजरा होत आहे.

 

२०२४ मध्ये आय लव्ह पाचगणी फेस्टिवल, पाचगणी महोत्सव कधी आहे? Dates Of Panchgani Festival 2024

२०२४ या वर्षी होणाऱ्या पाचगणी महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्या असुन २९ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या सलग तीन दिवशी पाचगणी महोत्सव साजरा होणार आहे.

काय असतं या पाचगणी महोत्सवात? Things To Do In I Love Panchgani Festival 2024

पाचगणी महोत्सव हा स्थानिक व्यवसाय तसेच पर्यटनाला चालना देणारा असल्याने या महोत्सवात स्थानिक विक्रेत्यांची खाद्यपदार्थांची दुकाने, स्थानिक उत्पादित झालेले स्ट्रॉबेरी, जाम, चीज आदि पदार्थ तसेच स्थानिक कलाकार आणि व्यावसायिक यांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि कलाप्रकार इथे बघायला मिळतात.

पाचगणी महोत्सवात तीनही दिवस पर्यटक गर्दी करतात. यादरम्यान इथे वेगवेगळे मनोरंजक खेळ चालू असतात. अनेक मराठी, हिंदी सेलिब्रिटी इथे आमंत्रित असतात. तसेच स्टेजवर विविध कलाप्रकार, संगीत, गायन आदि कार्यक्रम चालू असतात. याठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविध आकाराचे पतंग इथे बघायला मिळतात. रात्री याठिकाणी खाद्यपदार्थांची रेलचेल असते. आपण खवय्ये असाल तर इथे नक्की भेट द्यायला हवी.

हेही वाचा- Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Panchgani Festival And Tourism In Marathi

 

पाचगणी मध्ये काय काय बघायला आहे? Places To Visit In Panchgani Marathi

पाचगणी म्हणजे पाच पठारांमध्ये वसलेलं एक सुंदर गाव, जी पठारं आशिया खंडातील दुसऱ्या मोठ्या क्रमांकाची पठारं आहेत. पाचगणी गावासोबतच गावाच्या आसपास फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. चला तर मग, माहिती घेऊयात.

 

१)टेबल लँड पॉईंट Table Land Point

टेबल लँड पॉईंट हे पाचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे पाचगणी मधील सर्वात उंचावर असलेले ठिकाण आहे. चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणाहून कृष्णा नदीचे खोरे आणि आसपासचा सुंदर व निसर्गरम्य परिसर नजरेस पडतो. या ठिकाणी घोडेस्वारी, मिनी ट्रेन तसेच इतर अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेता येतो. या ठिकाणी बॉलीवूड मधील अनेक सिनेमांचं शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये हे प्रसिद्ध आहे.

पाचगणी पासून टेबल लँड पॉईंट हे ठिकाण २ किलोमीटर अंतरावर आहे.

 

२)सिडनी पॉईंट Sydney Point

कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेले सिडनी पॉईंट हे एक निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाण आहे. इथे असलेल्या टेकडीवर सिडनी पॉईंट हे ठिकाण वसलेले आहे. सर सिडनी बॅकवर्थ यांच्या नावावरून या ठिकाणाला सिडनी पॉईंट असे नाव देण्यात आले होते. सन १८३० मध्ये ते बॉम्बेचे गव्हर्नर होते. इथून आपल्याला कृष्णा खोरे, धोम धरण, कमळगड किल्ला आणि वाई शहराचे दृश्य नजरेस पडते. तसेच इथून पांडवगड आणि मांढरदेवी डोंगर देखील नजरेस पडतो.

पाचगणी पासून सिडनी पॉईंट हे ठिकाण २.३ किलोमीटर अंतरावर आहे.

Panchgani Festival And Tourism In Marathi

३)पारसी पॉईंट Parasi Point

पारसी पॉईंट हे निसर्गरम्य वातावरणात असलेले एक सुंदर ठिकाण आहे. इथून जवळपासचे डोंगर, कृष्णा नदी तसेच धोम धरणाच्या बॅक वॉटर चे विहंगम दृश्य नजरेस पडते. पूर्वीच्या काळी पारसी समुदायाचे हे आवडते ठिकाण होते. त्यामुळे या ठिकाणाला पारसी पॉईंट असे नाव देण्यात आले. पाचगणी मध्ये येणारे पर्यटक आवर्जून पारसी पॉईंट ला भेट देतात

पाचगणी पासून पारसी पॉईंट हे ठिकाण २ किलोमीटर आहे.

 

४)मॅप्रो गार्डन Mapro Garden

मॅप्रो गार्डन हे ठिकाण पाचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे केवळ एक उद्यान नसून तिथे फळांचे उत्पादन देखील होते. स्ट्रॉबेरी चा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम ठिकाण आहे. स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री इत्यादी पदार्थ तसेच त्यांच्यापासून बनवलेले रस, चॉकलेट्स, जाम, जेली इत्यादी अनेक पदार्थांचा येथे आपण आस्वाद घेऊ शकतो. मॅप्रो गार्डन हे दोन एकर परिसरावर वसलेले आहे. मॅप्रो गार्डन हे परिवारासोबत फिरण्यासाठी पाचगणीतील एक उत्तम ठिकाण आहे.

पाचगणी पासून मॅप्रो गार्डन हे ठिकाण साधारण सात किलोमीटर अंतर आहे.

हेही वाचा-Best Hill Stations Of India In Marathi भारतातली ही सुंदर हिल स्टेशन्स जी नक्कीच पाहायला हवीत.

 

५)राजापुरी लेणी Rajapuri Caves

राजापुरी लेणी हेदेखील पाचगणीतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक, धार्मिक ठिकाण आहे. इथे आपल्याला विविध पाण्याची टाकी बघायला मिळतात तसेच इथे गुहा देखील आहेत. इथे असणाऱ्या चार गुहांपैकी एक गुहा वेगळी असुन या ठिकाणी भगवान कार्तिकेयाची प्रतिमा इथे बघायला मिळते.

पाचगणी पासून राजापूरी लेण्या सात किलोमीटर अंतरावर आहेत.

 

६)देवराई आर्ट व्हिलेज Devrai Art Village

देवराई आर्ट व्हिलेज हे ग्रामीण आदिवासी आणि शहरी जीवन यांच्यामधील एक दुवा म्हणावं असं ठिकाण आहे. गडचिरोली मधील काही आदिवासी लोकांनी पाचगणी मध्ये येऊन विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या, ज्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. घरात ठेवण्यासाठी विविध शोभेच्या वस्तू, फ्रेम्स, लॉकेट्स आणि विविध प्रकारच्या अप्रतिम कलाकुसरीच्या वस्तू इथं बघायला मिळतात. देवराई गावामध्ये विविध स्वदेशी कला आणि हस्तकला टिकवून ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. इथे अनेक आधुनिक तसेच पारंपारिक कलाविष्कार केलेले साहित्य आपल्याला बघायला मिळतं. कलाप्रेमी लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे एक सुंदर पर्वणी आहे

देवराई आर्ट व्हिलेज हे ठिकाण पाचगणी पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे.

Panchgani Festival And Tourism In Marathi

७)चीज फॅक्टरी Cheese Factory

विविध प्रकारचे चीज, जाम आणि सिरप या फॅक्टरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. २०१६ सालापासून सुरू असलेल्या या फॅक्टरीमध्ये चीज बनवणं, त्याच्यावर प्रोसेस करणं आदि प्रक्रिया इथे बघायला मिळतात. विविध चवीच्या चीज, पल्प, सिरप आणि जाम यांची आपण इथे चव चाखू शकतो तसेच खरेदी करू शकतो.

हे ठिकाण पाचगणी पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.

 

८)कमळगड किल्ला Kamalgad Fort

महाराष्ट्रातील प्रमुख गिरीदुर्ग किल्ल्यां पैकी एक असलेला कमळगड हा एक प्रसिद्ध किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मोहिमेच्या अगोदर कमळगड किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला होता. इथे असणाऱ्या विहिरीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे कमळगड विशेष प्रसिद्ध आहे. कमळगड किल्ला साधारण ४५११ फूट उंचीवर आहे.

पाचगणी पासून कमळगड किल्ला ४० किलोमीटर अंतरावर आहे.

Panchgani Festival And Tourism In Marathi

९)धोम धरण Dhom Dam

धोम धरण हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील धोम या गावात असलेले एक धरण आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. एक दिवसीय सहलीसाठी हे ठिकाण एक उत्तम ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर आणि जलाशयातील नौकाविहार यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. इथे असणाऱ्या बोट क्लबद्वारे पर्यटकांना पाण्यातील विविध साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद दिला जातो.

पाचगणी पासून धोम धरण १९ किलोमीटर अंतरावर आहे.

Panchgani Festival And Tourism In Marathi

१०)कास पठार Kaas Pathar

एका विशाल ज्वालामुखी पठारावर वसलेलं हे ठिकाण फुलांचं नंदनवन किंवा फुलांचे पठार म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेलं कास पठार हे ठिकाण खूप प्रसिद्ध असून इथे प्रत्येक वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. इथे विविध प्रकारची व दुर्मिळ प्रकारची फुले आपल्याला बघायला मिळतात. तसेच अनेक औषधी वनस्पती देखील इथं बघायला मिळतात.

साताऱ्यापासून कास पठार २४ किलोमीटर अंतरावर आहे तर पाचगणी पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे.

 

११)महाबळेश्वर Mahabaleshwar

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून दरवर्षी हिवाळ्यामध्ये इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. महाबळेश्वर मधील मनमोहक निसर्ग आणि आल्हाददायक थंड वातावरण यामुळे महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे. प्रतापगड किल्ला, वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा इत्यादी पर्यटन स्थळे आपल्याला महाबळेश्वर मध्ये बघायला मिळतात.

पाचगणी पासून महाबळेश्वर हे अंतर १९ किलोमीटर आहे.

Panchgani Festival And Tourism In Marathi

हेही वाचा- Monuments Of India Marathi भारतातल्या प्रसिद्ध १० ऐतिहासिक वास्तू

तर मंडळी, ही होती पाचगणी बद्दलची आणि पाचगणी महोत्सवाची संपूर्ण माहिती. या महोत्सवाला नक्की भेट द्या आणि सुट्ट्यांचा आनंद घ्या. ही माहिती आवडली असेल तर मित्रांना शेअर करा.

-फिरस्ता…